गोपनीय ईमेल पाठवा आणि उघडा

तुम्ही अनधिकृत अॅक्सेसपासून संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी Gmail च्या गोपनीय मोडसह मेसेज आणि अटॅचमेंट पाठवू शकता. तुम्ही मेसेजसाठी एक्स्पायरीची तारीख सेट करण्यासाठी गोपनीयता मोडचा वापर करू शकता किंवा कोणत्याही वेळी अॅक्सेस मागे घेऊ शकता. गोपनीय मेसेज प्राप्तकर्त्यांकडे फॉरवर्ड करणे, कॉपी करणे, प्रिंट करणे आणि डाउनलोड बंद करणे असे पर्याय असतील. 

टीप: गोपनीय मोड प्राप्तकर्त्यांकडून तुुुुुमचा ईमेल अपघाती शेअर करण्यास प्रतिबंधित करण्यात मदत करीत असला तरीही, तो प्राप्तकर्त्यांना तुमच्या मेसेजचे किंवा अटॅचमेंटचे स्क्रीनशॉट किंवा फोटो घेण्यापासून प्रतिबंधित करत नाही. ज्या प्राप्तकर्त्यांच्या कॉंप्युटरवर दुर्भावनापूर्ण प्रोग्राम आहेत ते अद्याप तुमचे मेसेज किंवा अटॅचमेंट कॉपी किंवा डाउनलोड करण्यात सक्षम होऊ शकतात.

गोपनीयता ईमेल कसे कार्य करतात ते पहा 

In this animation for confidential mode in Gmail, Lisa clicks the confidential mode icon at the bottom of the message, then sends a confidential message to Sam
टीप: या अ‍ॅनिमेशनमधील आशय सध्या केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.

मेसेज आणि अटॅचमेंट गोपनीयपणे पाठवा

महत्त्वाचे: तुम्ही ऑफिस किंवा शाळेचे खाते वापरून Gmail वापरत असल्यास, तुम्ही गोपनीयता मोड वापरू शकता याची खात्री करण्यासाठी, तुमच्या अ‍ॅडमिनशी संपर्क साधणे हे करा.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Gmail वर जा.
  2. तयार करा वर क्लिक करा.
  3. विंडोच्या तळाशी उजवीकडे, गोपनीय मोड सुरू करा वर क्लिक करा.
    टीप: तुम्ही एखाद्या ईमेलसाठी गोपनीय मोड आधीपासून सुरू केलेला असल्यास, ईमेलच्या तळाशी जा, त्यानंतर संपादित करा वर क्लिक करा.
  4. एक्स्पायरीची तारीख आणि पासकोड सेट करा. मेसेजचा मजकूर आणि कोणत्याही अटॅचमेंट या दोन्हींवर या सेटिंग्ज परिणाम करतात. 
    • तुम्ही "SMS पासकोड नको" असे निवडल्यास, Gmail ॲप वापरणाऱ्या मिळवणाऱ्यांना ते थेट उघडता येतील. Gmail वापरत नसलेल्या मिळवणाऱ्यांना ईमेलने पासकोड मिळेल.
    • तुम्ही "SMS पासकोड" निवडल्यास, मिळवणाऱ्यांना एसएमएसने पासकोड मिळेल. तुम्ही तुमच्या स्वतःच्या नंबरऐवजी मिळवणाऱ्याचा फोन नंबर एंटर करता याची खात्री करा.
  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

लवकर ॲक्सेस काढून टाका

एक्स्पायरीच्या तारखेपूर्वी तुम्ही तुमच्या प्राप्तकर्त्याला ईमेल पाहण्यापासून थांबवू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Gmail उघडा.
  2. डावीकडे, पाठवा वर क्लिक करा.
  3. गोपनीय ईमेल उघडा.
  4. ॲक्सेस काढून टाकावर क्लिक करा.

गोपनीय मोड सह पाठवलेले इमेल उघडा

पाठविणार्‍याने ईमेल पाठविण्यासाठी गोपनीय मोडचा वापर केला असल्यास:

  • एक्स्पायरीच्या तारखेपर्यंत किंवा पाठविणारा अॅक्सेस काढून घेत नाही तोपर्यंत आपण मेसेज आणि अटॅचमेंट दृश्य करू शकता.
  • मेसेज मजकूर आणि अटॅचमेंट कॉपी, पेस्ट, डाउनलोड, प्रिंट आणि फॉरवर्ड करण्याचे पर्याय अक्षम केले जातील.
  • तुम्हाला ईमेल उघडण्यासाठी पासकोड प्रविष्ट करण्याची आवश्यकता असूू शकते.

मी Gmail खात्याचा वापर करत आहे

  1. इमेल उघडा.
  2. पाठविणार्‍याला एसएमएस पासकोडची आवश्यकता नसल्यास:
    • तुम्ही नवीनतम Gmail अॅप्स (वेब किंवा मोबाइल) वापरल्यास, तुम्ही ते उघडाल तेव्हा तुम्हाला थेट ईमेल दिसेल.
    • तुम्ही दुसरा ईमेल क्लायंटचा वापर करत असल्यास, ईमेल उघडा, लिंकवर क्लिक करा ईमेल दृश्य करा आणि मेसेज पाहण्यासाठी तुमच्या Google क्रेडेंशियलसह साइन इन करा.
  3. पाठविणार्‍याला एसएमएस पासकोडची आवश्यकता असल्यास:
    • पाठवण्याचा पासकोडनिवडा.
    • पासकोड साठी तुमचा मजकूर मेसेज तपासा
    • पासकोड एंटर करा, नंतर सबमिट करानिवडा.

मी दुसरे ईमेल खाते वापरत आहे

  1. इमेल उघडा. लिंक निवडा ईमेल दृश्य करा.
  2. एक नवीन पृष्ठ उघडेल. पाठवण्याचा पासकोडनिवडा.
    • पासकोडसाठी तुमचे एसएमएस किंंवा ईमेल तपासा.
    • पासकोड एंटर करा, नंतर सबमिट करानिवडा.

मला एक एरर आली आहे

ईमेलची मुदत संपली आहे

पाठवणार्‍याने एक्स्पायरीच्या तारखेपूर्वी ईमेल हटविला असेल किंवा तुमचा अॅक्सेस काढूूून टाकला असेल. तुम्हाला अधिक वेळ देण्यासाठी किंवा ईमेल पुन्हा पाठविण्यासाठी पाठविणार्‍याशी संपर्क साधा.

दिलेला नंबर सपोर्ट नसलेल्‍या देशातीमधील आहे.

तुम्ही या प्रदेशांमधून केवळ फोन नंबरसाठी एसएमएस पासकोड जोडू शकता: 

  • उत्तर अमेरिका
  • दक्षिण आफ्रिका
  • युरोप
  • ऑस्ट्रेलिया
  • आशिया: भारत, कोरिया आणि जपान
खाती स्विच करा
मिळवणाऱ्याच्या ईमेलशी सहयोगी असलेले योग्य Google खाते वापरून तुम्ही साइन इन केले असल्याची खात्री करा. त्यानंतर, ईमेल पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करा.
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7346248785333948963
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false