Gmail पत्त्यांमध्ये बिंदूू महत्त्वाचे नसतात

कोणीतरी तुम्हाला ईमेल करीत असताना चुकून आपल्या पत्त्यावर बिंंदू जोडल्यास, तरीही तो ईमेल तुम्हाला मिळेल. उदाहरणार्थ, तुमचा ईमेल johnsmith@gmail.com असा असल्यास, तुमच्याकडे तुमच्या पत्त्याच्या सर्व बिंदू आवृत्त्या आहेतः

  • john.smith@gmail.com
  • jo.hn.sm.ith@gmail.com
  • j.o.h.n.s.m.i.t.h@gmail.com

टीप: तुम्ही कार्य, शाळा किंवा अन्य संस्थेद्वारे (yourdomain.com किंवा yourschool.edu सारख्या) Gmail चा वापर करत असल्यास, बिंदू तुमचा पत्ता बदलवतात. तुमच्या वापरकर्ता नावामध्ये बिंदू बदलविण्यासाठी, तुमच्या ॲडमिन शी संपर्क करा.

दुसर्‍या कोणालाही तुमचे ईमेल मिळणार नाहीत

कोणीही तुमचे वापरकर्तानाव घेऊ शकत नाही

तुमचा Gmail पत्ता अनन्य आहे. कोणीही तुमच्या वापरकर्तानावाच्या बिंदूच्या आवृत्तीसह एखादे Gmail खाते तयार करण्याचा प्रयत्न करीत असल्यास, त्यांना वापरकर्तानाव आधीपासून मिळवले असल्याचे सांगणारी एक एरर मिळेल.

उदाहरणार्थ, तुमचा पत्ता johnsmith@gmail.com असा असल्यास, कोणीही j.o.h.n.s.m.i.t.h@gmail.com साठी साइन अप करू शकणार नाही.

कोणीही तुमचे मेल पाहू शकत नाही

तुमचे खाते अद्याप खाजगी आणि सुरक्षित आहे. तुमच्या पत्त्याच्या कोणत्याही बिंदू आवृत्तीवर पाठविलेले ईमेल केवळ तुमच्याकडेच जातील.

उदाहरणार्थ, johnsmith@gmail.com आणिj.o.h.n.s.m.i.t.h@gmail.com हे दोघे समान पत्ते आहेत आणि ते एकाच इनबॉक्स मध्ये जातात.

तुम्हाला खाद्या दुसर्‍याचा मेल मिळाल्यास काय करावे

बिंदू जोडल्यामुळे तुमचा पत्ता बदलत नाही, म्हणून तुम्हाला दुसर्‍याची मेल मिळण्याचे कारण बिंदू नसते. त्याऐवजी, पाठविणार्‍याने कदाचित चुकीचा पत्ता टाइप केला असेल किंवा योग्य पत्ता विसरला असेल.

उदाहरणार्थ, कोणीतरी john.43.smith@gmail.com वर ईमेल पाठवायचा असेल परंतू त्याने john.smith@gmail.com असा चुकीचा टाइप केल्यास, मेसेज तूम्हाला मिळाला कारण johnsmith@gmail.com हा पत्ता तुमच्या मालकीचा आहे.

पाठविणार्‍याला सूचना द्या

ईमेल असंबधित वाटत असेल परंतु संशयास्पद नसल्यास, पाठविणार्‍याला चुकीचा पत्ता आहे असे सांगणारे उत्तर द्या.

संशयास्पद ईमेलची तक्रार करा

कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका. ईमेलची स्पॅम किंवा फिशिंग म्हणून तक्रार करा.

तुम्ही साइन अप केलेले नाही अशा बातमीपत्रकाचे सदस्यत्व रद्द करा

सदस्यत्व रद्द कसे करावेहे जाणून घ्या, किंवा त्यांच्या मेलिंग सूचीमधून तुमचा पत्ता काढून टाकण्यासाठी वेबसाइटशी संपर्क साधा. 

टीप: दुर्दैवाने, सदस्यत्व असलेल्या ईमेलसाठी साइन अप करण्यासाठी चुकीने किंवा दुर्भावनापूर्ण हेतूने तुमच्या पत्त्याची बिंदू असलेली आवृत्ती वापरण्यापासून लोकांना आम्ही प्रतिबंधित करू शकत नाही.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10889542294989377792
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false