बाउन्स झालेल्या किंवा नाकारल्या गेलेल्या ईमेलचे निराकरण करा

अनेक कारणांमुळे, मिळवणाऱ्यांचे ईमेल सर्व्हर तुम्ही पाठवलेल्या ईमेलना नकार देऊ शकतात. प्राप्तकर्त्याच्या सर्व्हरकडून देण्यात आलेला प्रतिसाद प्रतिबिंबित करणारा मेसेज Gmail मिळवते.

खाली, तुम्हाला येऊ शकणार्‍या काही नेहमीचे एरर मेसेज दिले आहेत: तुमचा मेसेज बाउन्स का झाला आणि या समस्येचे निराकरण कसे करावे याबद्दल जाणून घ्या. 

नेहमीच्या बाउन्स उत्तरांचा अर्थ लावा

"तुम्ही ज्या ईमेल खात्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला" ते अस्तित्वात नाही

तुमचा मेसेज बाउन्स का झाला

तुमच्या प्राप्तकर्त्याचा पत्ता आता कदाचित काम करत नाही किंवा अस्तित्वात नाही. किंवा, तुम्ही तो एंटर करताना त्यात टायपिंगची चूक झाली असेल.

तुम्‍ही काय करू शकता

  1. तुम्ही ज्या अ‍ॅड्रेसवर ईमेल पाठवत आहात त्यातील या नेहमी होणाऱ्या चुका तपासा:
    • अवतरण चिन्हे
    • पत्त्याच्या शेवटी टिंब
    • पत्त्याच्या आधी किंवा नंतर स्पेस
    • शब्दलेखनाच्या चुका
  2. तुमच्या संपर्कांमध्ये हीच व्यक्ती वापरत असलेला वेगळा अ‍ॅड्रेस शोधा.

तुम्हाला ऑफिस, शाळा येथील एखाद्या व्यक्तीला किंवा इतर संस्थेला ईमेल करताना ही एरर आली असल्यास, तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटर शी संपर्क साधा.

"स्पॅम म्हणून फ्लॅग केलेला मेसेज" किंवा "तात्पुरता नाकारलेला मेसेज"

तुमचा मेसेज बाउन्स का झाला

  • तुमच्या मेसेजमधील मजकूर किंवा लिंक संशयास्पद वाटले.
  • तुम्ही “cc” किंवा “bcc” भागांमध्ये प्राप्तकर्त्यांचा एक मोठा गटाचा जोडला आहे.

तुम्‍ही काय करू शकता

  1. वैयक्तिक माहिती मागणाऱ्या वेबसाइटच्या लिंक काढून टाका.
  2. तुम्ही मोठ्या गटाला ईमेल पाठवत असल्यास, Google Groups वर गट तयार करा व त्यानंतर त्या गटाला ईमेल पाठवा.
    गट तयार करणे हे कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

"मिळवणाऱ्याच्या सर्व्हरने आमच्या विनंत्या स्वीकारल्या नाहीत"

तुमचा मेसेज बाउन्स का झाला

Gmail प्राप्तकर्त्याच्या ईमेल सर्व्हरशी कनेक्ट करू शकत नसेल तर तुम्हाला हा एरर मेसेज दिसेल.

तुम्‍ही काय करू शकता

ही समस्या सामान्यतः तुम्हाला काहीही करावे न लागता लवकरच नाहीशी होते. ईमेल नंतर परत पाठवण्याचा प्रयत्न करून पहा.

तुम्हाला एरर येत राहिल्यास:

  1. प्राप्तकर्त्याच्या ईमेल अॅड्रेसमध्ये काही चुका आहेत का ते तपासून पहा.
  2. तुमच्या प्राप्तकर्त्याच्या ईमेल पुरवठादाराच्या ग्राहक सपोर्ट टीमशी संपर्क साधा.

तुम्हाला ऑफिस, शाळा येथील एखाद्या व्यक्तीला किंवा इतर संस्थेला ईमेल करताना ही एरर आली असल्यास, तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटर शी संपर्क साधा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3394593034219760144
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false