तुमचा Gmail मेसेज ऑथेंटिकेट केलेला आहे की नाही ते तपासा

तुम्हाला पाठवणाऱ्याच्या नावाच्या बाजूला प्रश्न चिन्ह दिसत असल्यास, मेसेज ऑथेंटिकेट केलेला नाही. एखादा ईमेल ऑथेंटिकेट होत नाही तेव्हा याचा अर्थ असा होतो की, जी व्यक्ती मेसेज पाठवत असल्याचे दिसत आहे, नक्की तीच व्यक्ती मेसेज पाठवत आहे की नाही हे Gmail ला माहिती नाही. तुम्हाला हे दिसत असल्यास, कोणत्याही अटॅचमेंटना उत्तर देणे किंवा डाउनलोड करण्यासंबंधित सावधगिरी बाळगा.

ऑफिस किंवा शाळेमध्ये असताना Google अ‍ॅप्सचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे का?  कोणत्याही शुल्काशिवाय Google Workspace चाचणीसाठी साइन अप करा.

मेसेज ऑथेंटिकेट केला आहे की नाही ते तपासा

महत्त्वाचे: ऑथेंटिकेट न केलेले मेसेज स्पॅम असतीलच असे नाही. कधीकधी ऑथेंटिकेशन हे मेलिंग सूचीला पाठवलेले मेसेज यांसारख्या मोठ्या गटांना ईमेल पाठवणाऱ्या खऱ्या संस्थांसाठी काम करत नाही.

Gmail मेसेज पहा
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Gmail ॲप  उघडा.
  2. ईमेल उघडा.
  3. तपशील पहा आणि त्यानंतर सुरक्षेशी संबंधित तपशील पहा वर टॅप करा.
  4. तुम्हाला हे दिसत असल्यास मेसेज ऑथेंटिकेट केलेला आहे:
  • google.com सारख्या डोमेन नावासह "यांनी मेल पाठवला" हेडर.
  • पाठवणार्‍या डोमेनसह "यांनी स्वाक्षरी केली" हेडर.

तुम्हाला पाठवणाऱ्याच्या नावापुढे प्रश्न चिन्ह दिसत असल्यास, मेसेज ऑथेंटिकेट केलेला नाही. तुम्हाला हे दिसत असल्यास, कोणत्याही अटॅचमेंटना उत्तर देणे किंवा डाउनलोड करण्यासंबंधित सावधगिरी बाळगा.

Outlook यासारख्या दुसर्‍या ईमेल क्लायंटमध्ये मेसेज पहा
तुम्ही दुसर्‍या ईमेल क्लायंटवर तुमचा ईमेल पाहात असल्यास, तुम्ही मेसेज हेडर तपासू शकता.
ऑथेंटिकेशन कसे काम करते याबद्दल अधिक जाणून घ्या (SPF आणि DKIM)

SPF किंवा DKIM वापरून ईमेल ऑथेंटिकेट करता येतात.

SPF तयार करून कोणत्या होस्टना दिलेल्या डोमेनमधून मेसेज पाठवण्यास परवानगी दिली जाते हे SPF नमूद करते.

DKIM हे पाठवणाऱ्याला सार्वजनिक की वापरून कायदेशीर ईमेलवर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्वाक्षरी करण्याची परवानगी देते ज्याची मिळवणाऱ्यांद्वारे पडताळणी केली जाऊ शकते.

ARC फॉरवर्ड केलेल्या मेसेजचे मागील ऑथेंटिकेशन स्टेटस तपासते. एखाद्या फॉरवर्ड केलेल्या मेसेजचे SPF किंवा DKIM ऑथेंटिकेशन यशस्वी झाल्यास, पण ARC ने मागील अयशस्वी ऑथेंटिकेशन दाखवल्यास, Gmail त्या मेसेजला ऑथेंटिक नसल्याचे समजते.

ईमेल ऑथेंटिकेशनबद्दल अधिक जाणून घ्या..

ऑथेंटिकेट न केलेल्या मेसेजसंबंधित समस्यांचे निराकरण करा

मला मिळालेला मेसेज ऑथेंटिकेट केलेला नव्हता
तुम्हाला विश्वासू स्रोताकडून मिळालेला मेसेज ऑथेंटिकेट केलेला नसल्यास, तुम्हाला ईमेल पाठवणार्‍या व्यक्ती किंवा कंपनीशी संपर्क साधा. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधाल तेव्हा, त्यांना ही मदत पेजची लिंक द्या जेणेकरून, त्यांचे मेसेज ऑथेंटिकेट कसे करावे याबद्दल ते जाणून घेऊ शकतील.
मी माझ्या डोमेनमधून पाठवलेला मेसेज ऑथेंटिकेट केलेला नव्हता

तुम्ही पाठवलेला मेसेज तुमच्या ईमेल ॲड्रेसच्या बाजूला प्रश्नचिन्हासह "?" मिळाल्यास, मेसेज ऑथेंटिकेट केलेला नव्हता.

मेसेजचे योग्य वर्गीकरण केले जाईल याची खात्री करण्यासाठी ते ऑथेंटिकेट केले जाणे आवश्यक आहे. तसेच, ऑथेंटिकेट न केलेले मेसेज नाकारले जाण्याची जास्त शक्यता असते. स्पॅमरदेखील ईमेल ऑथेंटिकेट करू शकत असल्यामुळे, तुमचे मेसेज डिलिव्हर केले जातील याची हमी देण्यासाठी फक्त ऑथेंटिकेशन पुरेसे नाही.

ऑथेंटिकेट न केलेल्या मेसेजसंबंधित समस्यांचे निराकरण करा

तुम्ही पाठवलेले मेसेज DKIM (प्राधान्यकृत) किंवा SPF वापरून ऑथेंटिकेट केले असल्याची खात्री करा.

तुमचे ईमेल Gmail कडून ब्लॉक होण्यापासून प्रतिबंधित करणे हे करण्यासाठी तुम्ही या पायऱ्या फॉलो करू शकता:

  • किमान १०२४ बिट लांब असलेल्या RSA की वापरा. १०२४-बिटपेक्षा कमी की ने स्वाक्षरी केलेले ईमेल स्वाक्षरी केलेले मानले जात नाहीत आणि सहजरीत्या स्पूफ केले जाऊ शकतात.
  • मेसेजचे वर्गीकरण करताना, Gmail ऑथेंटिकेशन माहितीसह वापरकर्ता अहवाल आणि इतर संकेत एकत्र करते. तुमच्या मेसेजचे योग्यरीत्या वर्गीकरण केले असल्याची खात्री करण्यासाठी प्रत्येक ईमेल पाठवणाऱ्यासाठी ऑथेंटिकेशन अनिवार्य आहे. 
  • तुमच्या डोमेनवरील ऑथेंटिकेट न केलेले ईमेल नियंत्रित करणे हे करण्यात मदत करण्यासाठी धोरण कसे तयार करावे याबद्दल जाणून घ्या.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12383686939108638881
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false