Google Play च्या डेटासंबंधित सुरक्षितता विभागासह अ‍ॅप गोपनीयता आणि सुरक्षा पद्धती समजून घ्या

Google Play वरून अ‍ॅप इंस्टॉल करण्यापूर्वी, तुम्ही त्या अ‍ॅपचा डेटासंबंधित सुरक्षितता विभाग तपासू शकता. डेव्हलपर त्यांचे अ‍ॅप तुमचा डेटा कसा हाताळते याबद्दलची माहिती शेअर करण्यासाठी डेटासंबंधित सुरक्षितता विभाग वापरतात. या प्रकारे, कोणती अ‍ॅप्स वापरायची याबद्दल तुम्ही अधिक अभ्यासपूर्ण निर्णय घेऊ शकता.

अ‍ॅपची डेटासंबंधित सुरक्षितता माहिती शोधणे

  1. Google Play Google Play उघडा.
  2. अ‍ॅप शोधण्यासाठी ब्राउझ करा किंवा शोध बार वापरा.
  3. अ‍ॅपवर टॅप करा.
  4. "डेटासंबंधित सुरक्षितता" या अंतर्गत तुम्हाला अ‍ॅपच्या डेटासंबंधित सुरक्षितता पद्धतींचा सारांश सापडेल.
  5. अधिक तपशिलांसाठी, तपशील पहा वर टॅप करा.

टीप: डेटासंबंधित सुरक्षितता विभागामधील माहिती फक्त Google Play वर वितरित केल्या जाणार्‍या अ‍ॅप्सना लागू होते. डेटासंबंधित सुरक्षितता विभाग तुम्हाला फक्त Android 5 आणि त्यावरील आवृत्तीवर सापडेल.

अ‍ॅप डेटासंबंधित सुरक्षितता पद्धती समजून घेणे आणि त्यांचे पुनरावलोकन करणे

अ‍ॅप सूचीचा डेटासंबंधित सुरक्षितता विभाग डेव्हलपरना त्यांची अ‍ॅप्स वेगवेगळे डेटाचे प्रकार कशी गोळा करतात, शेअर करतात आणि हाताळतात त्याचे वर्णन करू देतो. डेव्हलपर यांसाठी त्यांच्या पद्धती स्पष्ट करतात:

  • डेटा संग्रह: डेव्हलपर त्यांचे अ‍ॅप गोळा करत असलेल्या वापरकर्ता डेटाचे प्रकार, हा डेटा ते कसा वापरतात आणि हा डेटा गोळा करणे पर्यायी आहे का याचे वर्णन करतात. तुमच्या डिव्हाइसवरून डेटा पुन्हा मिळवण्यासाठी डेव्हलपर त्यांचे अ‍ॅप वापरतात तेव्हा सर्वसाधारणपणे डेटा “गोळा केलेला” मानला जातो.
  • डेटा शेअरिंग: डेव्हलपर त्यांचे अ‍ॅप तुमचा डेटा तृतीय पक्ष यांसोबत शेअर करते का आणि कोणत्या प्रकारचा डेटा शेअर केला जातो त्याचे वर्णन करतात. अ‍ॅपद्वारे डेटा अ‍ॅक्सेस केला जातो आणि तृतीय पक्षाकडे ट्रान्सफर केला जातो तेव्हा सर्वसाधारणपणे डेटा "शेअर केलेला" मानला जातो.
    • काही प्रकरणांत, डेटा दुसर्‍या पक्षाकडे तांत्रिकदृष्ट्या ट्रान्सफर केला गेला (उदाहरणार्थ, अ‍ॅप डेटा कसा वापरणार आहे हे त्याने स्पष्ट केल्यानंतर तुम्ही डेटा ट्रान्सफर करण्यास संमती देता तेव्हा किंवा डेव्हलपरच्या सेवा पुरवठादारासोबत डेटा शेअर केला जातो तेव्हा) तरीही डेव्हलपरना डेटा "शेअर केलेला" म्हणून उघड करण्याची आवश्यकता नसते. या प्रकरणांबद्दल खाली अधिक जाणून घ्या.

डेव्हलपर Google Play वर वितरित केलेल्या अ‍ॅपच्या सर्व आवृत्त्यांमध्ये त्यांच्या अ‍ॅपचा एकूण डेटा संग्रह आणि शेअरिंगचे वर्णन करण्यासाठी Google Play चा डेटासंबंधित सुरक्षितता विभाग वापरतात. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे अ‍ॅपची डेटा गोपनीयता व सुरक्षेसंबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपर त्यांच्या वापरकर्त्यांसह ॲप आवृत्ती विशिष्ट माहिती शेअर करण्यासाठी ॲपच्या Google Play सूचीमधील "या ॲपबद्दल" विभाग, गोपनीयता धोरण किंवा इतर दस्तऐवज वापरू शकतात.

डेटा संग्रह आणि डेटा शेअरिंग समजून घेणे

डेटा संग्रह

पुढील परिस्थितींमध्ये डेव्हलपरना डेटासंबंधित सुरक्षितता विभागामध्ये अ‍ॅपने अ‍ॅक्सेस केलेला डेटा "गोळा केलेला" म्हणून उघड करण्याची आवश्यकता नसते:

  • अ‍ॅप फक्त तुमच्या डिव्हाइसवर डेटा अ‍ॅक्सेस करते आणि तो तुमच्या डिव्हाइसवरून बाहेर पाठवला जात नाही. उदाहरणार्थ, तुम्ही अ‍ॅपला तुमचे स्थान अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी दिल्यास, पण ते फक्त तुमच्या डिव्हाइसवर अ‍ॅपची कार्यक्षमता पुरवण्यासाठी डेटा वापरत असल्यास आणि तो सर्व्हरला पाठवत नसल्यास, त्याने तो डेटा गोळा केलेला म्हणून उघड करण्याची आवश्यकता नाही.
  • तुमचा डेटा डिव्हाइसवरून बाहेर पाठवला जातो, पण त्यावर फक्त अल्प काळासाठी प्रक्रिया केली जाते. याचा अर्थ डेव्हलपर तुमचा डेटा फक्त मेमरीमध्ये स्टोअर केलेला असताना अ‍ॅक्सेस करतो आणि वापरतो व विशिष्ट विनंतीवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असेल त्यापेक्षा जास्त काळ राखून ठेवत नाही. उदाहरणार्थ, एखादे हवामान अ‍ॅप तुमच्या स्थानावरील सध्याच्या हवामानाबाबत माहिती मिळवण्यासाठी तुमचे स्थान तुमच्या डिव्हाइसवरून बाहेर पाठवते, पण अ‍ॅप फक्त मेमरीमधील तुमचा स्थान डेटा वापरते आणि हवामानाबाबत माहिती देण्यासाठी आवश्यक असेल त्यापेक्षा जास्त काळ डेटा स्टोअर करत नाही.
  • तुमचा डेटा एंड-टू-एंड एंक्रिप्शन वापरून पाठवला जातो. याचा अर्थ पाठवणारा आणि मिळवणारा वगळता तुमचा डेटा इतर कोणालाही वाचता येत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही एंड-टू-एंड एंक्रिप्शन असलेले मेसेजिंग अ‍ॅप वापरून एखाद्या मित्राला मेसेज पाठवल्यास, फक्त तुम्हाला आणि तुमच्या मित्राला मेसेज वाचता येतो.

काही वेळा ठरावीक कृती पूर्ण करण्यासाठी अ‍ॅप्स तुम्हाला वेगळ्या सेवेकडे रीडिरेक्ट करू शकतात. उदाहरणार्थ, खरेदी पूर्ण करण्यासाठी एखादे अ‍ॅप तुम्हाला PayPal, Google Pay किंवा त्यांसारख्या दुसर्‍या पेमेंट सेवेकडे निर्देशित करू शकते. या प्रकरणांत, अ‍ॅप डेव्हलपरला पुढील परिस्थितींमध्ये दुसर्‍या सेवेने गोळा केलेला डेटा घोषित करण्याची आवश्यकता नसते:

  • अ‍ॅप ही माहिती अ‍ॅक्सेस करत नाही आणि
  • तुम्ही ही माहिती दुसर्‍या सेवेला त्या सेवेचे गोपनीयता धोरण आणि सेवा अटी या अंतर्गत थेट पुरवता.
डेटा शेअरिंग

काही प्रकरणांत, अ‍ॅप डेव्हलपरना इतरांकडे ट्रान्सफर केलेला डेटा हा डेटासंबंधित सुरक्षितता विभागामध्ये "शेअर केलेला" म्हणून घोषित करण्याची आवश्यकता नसते. यामध्ये पुढील परिस्थितींचा समावेश आहे:

  • तुम्ही सुरू केलेल्या विशिष्ट कृतीच्या आधारावर डेटा तृतीय पक्षाकडे ट्रान्सफर केला जातो, जेथे तुम्ही डेटा शेअर केला जाण्याची वाजवी अपेक्षा करता. उदाहरणार्थ, तुम्ही दुसर्‍या व्यक्तीला ईमेल पाठवता किंवा तिच्यासोबत दस्तऐवज शेअर करता तेव्हा.
  • तृतीय पक्षाकडे ट्रान्सफर केलेला डेटा अ‍ॅपमध्ये ठळकपणे उघड केला जातो आणि Google Play चे वापरकर्ता डेटा धोरण याच्या आवश्यकतांची पूर्तता होईल अशा प्रकारे अ‍ॅप तुमच्या संमतीची विनंती करते.
  • डेव्हलपरच्या वतीने डेटावर प्रक्रिया करण्यासाठी तो सेवा पुरवठादाराकडे ट्रान्सफर केला जातो. उदाहरणार्थ, डेव्हलपर त्यांच्या वतीने आणि डेव्हलपरच्या सूचना, कराराशी संबंधित अटी, गोपनीयता धोरणे व सुरक्षा मानकांचे पालन करून डेटा होस्ट करण्यासाठी सेवा पुरवठादार वापरू शकतो.
  • डेटा विशिष्ट कायदेशीर उद्देशांनी ट्रान्सफर केला जातो, जसे की सरकारी विनंतीला प्रतिसाद म्हणून.
  • ट्रान्सफर केला जाणारा डेटा पूर्णपणे अ‍ॅनोनिमाइझ केला जातो, ज्यामुळे तो कोणत्याही व्यक्तीशी संबद्ध केला जाऊ शकत नाही.

डेटासंबंधित सुरक्षितता विभागामधील इतर माहिती

सुरक्षा पद्धती

डेव्हलपर ते वापरत असलेल्या ठरावीक सुरक्षा पद्धतींचे वर्णन करू शकतात. यामध्ये त्यांचे अ‍ॅप पुढील गोष्टींची पूर्तता करते का त्याचा समावेश आहे:

  • ते ट्रांझिटमध्ये असताना गोळा करत असलेला किंवा शेअर करत असलेला डेटा एन्क्रिप्ट करणे.
    • काही अ‍ॅप्स तुम्हाला तुमचा डेटा दुसर्‍या साइटवर किंवा सेवेवर ट्रान्सफर करू देतात. ही अ‍ॅप्स त्यांच्या डेटासंबंधित सुरक्षितता विभागामध्ये घोषित करू शकतात, की तुमचा डेटा तुमचे डिव्हाइस आणि अ‍ॅपचे सर्व्हर यांदरम्यान प्रवास करत असताना तो सुरक्षितपणे एन्क्रिप्ट करण्यासाठी ते सर्वोत्तम औद्योगिक मानके वापरत असेपर्यंत तुमचा डेटा सुरक्षित कनेक्शनवरून ट्रान्सफर केला जातो. तुमचा डेटा ज्यांवर ट्रान्सफर करायचा आहे अशा तुम्ही निवडलेल्या साइट किंवा सेवांच्या गोपनीयता आणि सुरक्षा पद्धती वेगळ्या असू शकतात. तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित गंतव्यस्थानांवर ट्रान्सफर करत असल्याची खात्री करण्यासाठी, त्या पद्धतींचे स्वतंत्रपणे पुनरावलोकन करा. उदाहरणार्थ, तुमचा डेटा ट्रांझिटमध्ये असताना एन्क्रिप्ट केला जातो असे घोषित करणारे मेसेजिंग अ‍ॅप तुम्हाला तुमच्या मोबाइल सेवा पुरवठादारामार्फत एसएमएस पाठवण्याचा पर्याय देऊ शकते. तुम्ही तुमच्या मोबाइल सेवा पुरवठादाराच्या डेटा हाताळण्याच्या पद्धतींचे पुनरावलोकन केले पाहिजे, कारण तो त्याच्या मोबाइल नेटवर्कवरून सुरक्षितपणे एसएमएस पाठवण्यासाठी ट्रांझिटमध्ये एन्क्रिप्शन वापरत नसण्याची शक्यता आहे.
  • त्याचे जागतिक सुरक्षा मानकांच्या निकषांवर स्वतंत्रपणे परीक्षण झालेले असणे. हे स्वतंत्र परीक्षण अ‍ॅपच्या सुरक्षा पद्धतींना जागतिक मानकांच्या निकषांवर प्रमाणित करते. परीक्षण करणार्‍या तृतीय पक्ष संस्था असे डेव्हलपरच्या वतीने करत असतात. हे पुनरावलोकन डेव्हलपरच्या डेटासंबंधित सुरक्षितता विभागाच्या डिस्क्लोजरच्या अचूकता आणि पूर्णत्वाची पडताळणी करत नाही.
  • युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे पेमेंट करू देते. UPI ही पैशांचे ट्रान्सफर झटपट करणारी सिस्टीम आहे. ती RBI ने नियमन केलेल्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या संस्थेने विकसित केली आहे. डेव्हलपर सूचित करतात, की NPCI ने या ॲपच्या UPI च्या अंमलबजावणीची पडताळणी करून, ती व्हॅलिडेट केली आहे. ही सुरक्षा पद्धत फक्त भारतामधील अ‍ॅपच्या वापरासाठी उपलब्ध आहे.
डेटा नियंत्रणे

डेटा नियंत्रणे या विभागामध्ये डेव्हलपरना ते अ‍ॅपमधील तुमचा डेटा काढून टाकण्यासाठी तुम्हाला कोणते मार्ग पुरवतात याचे वर्णन करता येते.

काही अ‍ॅप्स तुम्हाला खाते तयार करण्याची क्षमता देऊ करू शकतात. खाते तयार करण्याची क्षमता देऊ करणाऱ्या अ‍ॅप्सनी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे:

  • वापरकर्त्यांना त्यांची अ‍ॅप खाती आणि संबंधित डेटा हटवण्यासाठी अ‍ॅपमधील पाथ देऊ करणे.
  • वापरकर्ते जिथे अ‍ॅप खाते आणि संबंधित डेटा हटवण्याची विनंती करू शकतात असा वेब लिंक स्रोत देऊ करणे.

खाते तयार करण्याची क्षमता देऊ करणारी काही अ‍ॅप्स ही तुम्हाला तुमचे संपूर्ण खाते न हटवता ठरावीक अ‍ॅप डेटा हटवण्याचा पर्यायदेखील देऊ शकतात.

इतर अ‍ॅप्स खाते तयार करण्याची क्षमता देऊ करत नाहीत, पण तुम्हाला तुमचा संबंधित डेटा हटवण्याचा मार्ग देऊ शकतात. तुमचा डेटा हटवला जाण्याची विनंती कशी करावी आणि डेव्हलपर त्यास प्रतिसाद कसा देतो व डेटा हटवला जाण्याच्या विनंत्या कशा हाताळतो हे जाणून घेण्यासाठी:

अ‍ॅप्साठी Google Play चे खाते हटवण्याच्या संदर्भातील आवश्यकतेबद्दल अधिक जाणून घ्या.
इतर अ‍ॅप आणि डेटा डिस्क्लोजर

खाते व्यवस्थापन डेटा आणि सिस्टीम सेवा यांसाठी डिस्क्लोजरबद्दल अधिक जाणून घ्या.

खाते व्यवस्थापन

काही अ‍ॅप्स तुम्हाला खाते तयार करू देतात किंवा डेव्हलपर त्याच्या सर्व सेवांवर वापरत असलेल्या खात्यामध्ये माहिती जोडू देतात. अ‍ॅपमार्फत गोळा केलेला खाते डेटा डेव्हलपर विशिष्ट अ‍ॅपसाठी नसलेल्या त्याच्या सर्व सेवांवर अतिरिक्त उद्देशांसाठी वापरू शकतो, जसे की फसवणूक रोखणे किंवा जाहिराती. डेव्हलपर हा संग्रह उघड करू शकतात आणि "खाते व्यवस्थापन" म्हणून खाते डेटा त्यांच्या सर्व सेवांवर वापरू शकतात. डेव्हलपरनी तरीही अ‍ॅप स्वतः ज्या उद्देशांसाठी डेटा वापरते ते सर्व उद्देश घोषित करणे आवश्यक आहे. डेव्हलपर तुमचा खाते डेटा त्याच्या सर्व सेवांवर कसा वापरतो हे समजून घेण्यासाठी, अ‍ॅपचे गोपनीयता धोरण यासारख्या माहितीचे पुनरावलोकन करा.

सिस्‍टीम सेवा

सिस्टीम सेवा म्हणजे काही डिव्हाइसवर आधीच इंस्टॉल केलेले सॉफ्टवेअर असते आणि ते अनइंस्टॉल केले जाऊ शकत नाही. त्या विशिष्ट डिव्हाइससाठी असलेल्या वैशिष्ट्यांना आणि फंक्शनना सपोर्ट करतात. पात्र सिस्टीम सेवांच्या डेव्हलपरना डेटासंबंधित सुरक्षितता विभाग पूर्ण करण्याची आवश्यकता नसते. डेव्हलपरच्या डेटासंबंधित सुरक्षितता पद्धतींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, तुम्ही त्यांच्या साइटचे आणि गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन करू शकता.

डेटासंबंधित सुरक्षितता विभागामध्ये नमूद केलेले डेटाचे प्रकार आणि तो गोळा करण्याचे उद्देश

डेटासंबंधित सुरक्षितता विभाग हा विशिष्ट प्रकारचा डेटा गोळा करण्याचा आणि शेअर करण्याचा उद्देश स्पष्ट करतो. हे उद्देश स्पष्ट करण्यासाठी डेव्हलपरनी सारख्याच वर्गवार्‍या वापरणे आवश्यक आहे जेणेकरून, तुम्हाला एकाहून अधिक अ‍ॅप्समध्ये सुसंगतपणे तुलना करता येईल. माहितीमध्ये अ‍ॅपच्या सर्व आवृत्त्या आणि विविधतांचे वर्णन असले पाहिजे.

डेटासंबंधित सुरक्षितता विभागामध्ये समाविष्ट असलेले डेटा प्रकार आणि उद्देश यांबद्दल अधिक जाणून घ्या.

डेटा प्रकार
वर्गवारी डेटा प्रकार वर्णन
स्थान अंदाजे स्‍थान

तुमचे किंवा तुमच्या डिव्हाइसचे तीन चौरस किलोमीटरपेक्षा मोठ्या किंवा तेवढ्याच भागातील प्रत्यक्ष स्थान, जसे की तुम्ही ज्यामध्ये आहात ते शहर.

अचूक स्थान तुमचे किंवा तुमच्या डिव्हाइसचे तीन चौरस किलोमीटरपेक्षा लहान भागातील प्रत्यक्ष स्थान.
वैयक्तिक माहिती नाव

तुम्ही स्वतःला कसे संबोधता, जसे की तुमचे नाव आणि आडनाव किंवा टोपणनाव.

ईमेल ॲड्रेस तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस.
वापरकर्ता आयडी ओळखता येणार्‍या व्यक्तीशी संबंधित आयडेंटिफायर. उदाहरणार्थ, खाते आयडी, खाते क्रमांक किंवा खात्याचे नाव.
पत्ता

तुमचा पत्ता, जसे की मेलिंग किंवा घराचा पत्ता.

फोन नंबर तुमचा फोन नंबर.
वंश आणि वांशिकता

तुमचा वंश किंवा वांशिकतेबद्दलची माहिती.

राजकीय किंवा धार्मिक श्रद्धा

तुमच्या राजकीय किंवा धार्मिक श्रद्धांबद्दलची माहिती.

लैंगिक अभिमुखता

तुमच्या लैंगिक अभिमुखतेबद्दलची माहिती.

इतर माहिती

इतर कोणतीही वैयक्तिक माहिती, जसे की जन्मतारीख, लिंग ओळख, माजी सैनिक स्टेटस, इ.

आर्थिक माहिती वापरकर्त्याची पेमेंट माहिती

तुमच्या आर्थिक खात्यांबद्दलची माहिती, जसे की क्रेडिट कार्ड क्रमांक.

खरेदी इतिहास

तुम्ही केलेली खरेदी किंवा व्यवहारांबद्दलची माहिती.

क्रेडिट स्कोअर

तुमच्या क्रेडिटबद्दलची माहिती. उदाहरणार्थ, तुमचा क्रेडिट इतिहास किंवा क्रेडिट स्कोअर.

इतर आर्थिक माहिती

इतर कोणतीही आर्थिक माहिती, जसे की तुमचा पगार किंवा कर्जे.

आरोग्य आणि फिटनेस आरोग्याशी संबंधित माहिती

तुमच्या आरोग्याबद्दलची माहिती, जसे की वैद्यकीय माहिती किंवा लक्षणे.

फिटनेसशी संबंधित माहिती

तुमच्या फिटनेसबद्दलची माहिती, जसे की व्यायाम किंवा इतर शारीरिक अ‍ॅक्टिव्हिटी.

मेसेज ईमेल

ईमेलचा विषय, पाठवणारा, मिळवणारे आणि ईमेलचा आशय यांसह, तुमचे ईमेल.

एसएमएस किंवा MMS

पाठवणारा, मिळवणारे आणि मेसेजचा आशय यांसह, तुमचे एसएमएस.

अ‍ॅपमधील इतर मेसेज

इतर कोणत्याही प्रकारचे मेसेज. उदाहरणार्थ, झटपट मेसेज किंवा चॅट आशय.

फोटो आणि व्हिडिओ फोटो तुमचे फोटो.
व्हिडिओ तुमचे व्हिडिओ.
ऑडिओ फाइल व्हॉइस किंवा साउंड रेकॉर्डिंग

तुमचा आवाज, जसे की व्हॉइसमेल किंवा साउंड रेकॉर्डिंग.

संगीत फाइल

तुमच्या संगीत फाइल.

इतर ऑडिओ फाइल

तुम्ही तयार केलेल्या किंवा पुरवलेल्या इतर कोणत्याही ऑडिओ फाइल.

फाइल आणि दस्तऐवज फाइल आणि दस्तऐवज

तुमच्या फाइल किंवा दस्तऐवज अथवा तुमच्या फाइल किंवा दस्तऐवजांबद्दलची माहिती, जसे की फाइलची नावे.

कॅलेंडर कॅलेंडर इव्हेंट

तुमच्या कॅलेंडरबद्दलची माहिती, जसे की इव्हेंट, इव्हेंटसंबंधी टिपा आणि उपस्थित राहणारे.

संपर्क संपर्क

तुमच्या संपर्कांबद्दलची माहिती, जसे की संपर्कांची नावे, मेसेज इतिहास आणि वापरकर्ता नावे, संपर्काची नवीनता, संपर्काची वारंवारता, सुसंवादाचा कालावधी आणि कॉल इतिहास यांसारखी सामाजिक आलेखासंबंधी माहिती.

अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी अ‍ॅपशी सुसंवाद

तुम्ही अ‍ॅपशी सुसंवाद कसा साधता त्याबद्दलची माहिती. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या पेजला किती वेळा भेट देता किंवा विभागांवर किती वेळा टॅप करता ती संख्या.

अ‍ॅपमधील शोध इतिहास तुम्ही अ‍ॅपमध्ये काय शोधले त्याबद्दलची माहिती.
इंस्टॉल केलेली अ‍ॅप्स तुमच्या डिव्हाइसवर इंस्टॉल केलेल्या अ‍ॅप्सबद्दलची माहिती.
वापरकर्त्याने जनरेट केलेला इतर आशय

तुम्ही जनरेट केलेला, येथे किंवा इतर कोणत्याही विभागामध्ये सूचीबद्ध न केलेला इतर कोणताही आशय. उदाहरणार्थ, माहिती, टिपा किंवा मुक्त प्रतिसाद.

इतर कृती

येथे सूचीबद्ध न केलेली इतर कोणतीही अ‍ॅक्टिव्हिटी किंवा कृती, जसे की गेमप्ले, लाइक आणि डायलॉगचे पर्याय.

वेब ब्राउझिंग वेब ब्राउझिंग इतिहास

तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइटबद्दलची माहिती.

अ‍ॅपची माहिती आणि परफॉर्मन्स क्रॅश लॉग

अ‍ॅपमधील क्रॅश डेटा. उदाहरणार्थ, डिव्हाइसवर अ‍ॅप किती वेळा क्रॅश झाले ती संख्या किंवा क्रॅशशी थेट संबंध असलेली इतर माहिती.

निदान

डिव्हाइसवरील अ‍ॅपच्या परफॉर्मन्सबद्दलची माहिती. उदाहरणार्थ, बॅटरी लाइफ, लोड होण्यास लागणारा वेळ, लेटन्सी, फ्रेम दर किंवा कोणतेही तांत्रिक निदान.

अ‍ॅपच्या परफॉर्मन्ससंबंधी इतर डेटा

येथे सूचीबद्ध न केलेला, अ‍ॅपच्या परफॉर्मन्ससंबंधी इतर कोणताही डेटा.

डिव्हाइस किंवा इतर आयडी डिव्हाइस किंवा इतर आयडी

स्वतंत्र डिव्हाइस, ब्राउझर किंवा अ‍ॅपशी संबंधित असलेले आयडेंटिफायर. उदाहरणार्थ, IMEI क्रमांक, MAC अ‍ॅड्रेस, Widevine डिव्हाइस आयडी, Firebase इंस्टॉलेशन आयडी किंवा जाहिरात आयडेंटिफायर.

डेटाचे उद्देश
डेटाचे उद्देश वर्णन उदाहरण
खाते व्यवस्थापन तुमच्या खात्याचा डेव्हलपरसोबत सेटअप किंवा व्यवस्थापन यांसाठी वापरला जातो.

उदाहरणार्थ, तुम्हाला पुढील गोष्टी करू देण्यासाठी:

  • खाती तयार करणे किंवा डेव्हलपर त्याच्या सर्व सेवांवर वापरण्यासाठी पुरवत असलेल्या खात्यामध्ये माहिती जोडणे.
  • अ‍ॅपमध्ये लॉग इन करणे किंवा तुमच्या क्रेडेंशियलची पडताळणी करणे.
जाहिरात किंवा मार्केटिंग जाहिराती किंवा मार्केटिंगसंबंधी संवाद दाखवणे अथवा लक्ष्य करणे किंवा जाहिरात परफॉर्मन्सचे मापन करणे यांसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, तुमच्या अ‍ॅपमध्ये जाहिराती दाखवणे, इतर उत्पादने किंवा सेवांची जाहिरात करण्यासाठी पुश सूचना पाठवणे अथवा जाहिरात भागीदारांसोबत डेटा शेअर करणे.
अ‍ॅपची कार्यक्षमता अ‍ॅपमध्ये उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांसाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, अ‍ॅप वैशिष्ट्ये सुरू करण्यासाठी किंवा तुम्हाला ऑथेंटिकेट करण्यासाठी.
विश्लेषण तुम्ही अ‍ॅप कसे वापरता आणि ते कसे परफॉर्म करते याबद्दलचा डेटा गोळा करण्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ, ठरावीक वैशिष्ट्य किती वापरकर्ते वापरत आहेत हे पाहण्यासाठी, अ‍ॅपच्या आरोग्याचे परीक्षण करण्यासाठी आणि बग किंवा क्रॅशचे निदान व निराकरण करण्यासाठी अथवा भविष्यातील परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्यासाठी.
डेव्हलपर संवाद

अ‍ॅप किंवा डेव्हलपरबद्दलच्या बातम्या अथवा सूचना पाठवण्यासाठी वापरला जातो.

उदाहरणार्थ, तुम्हाला अ‍ॅपच्या नवीन वैशिष्ट्यांबद्दल कळवण्यासाठी किंवा महत्त्वाच्या सुरक्षा अपडेट देण्यासाठी पुश सूचना पाठवणे.

फसवणूक प्रतिबंध, सुरक्षा आणि पालन

फसवणूक प्रतिबंध, सुरक्षा आणि कायद्याचे पालन यांसाठी वापरला जातो.

उदाहरणार्थ, संभाव्य फसवी अ‍ॅक्टिव्हिटी ओळखण्याकरिता लॉगिनच्या अयशस्वी झालेल्या प्रयत्नांचे परीक्षण करण्यासाठी.

पर्सनलायझेशन

तुमचे अ‍ॅप कस्टमाइझ करण्यासाठी वापरला जातो, जसे की शिफारस केलेला आशय किंवा आशय दाखवणे.

उदाहरणार्थ, तुमच्या ऐकण्याच्या सवयींच्या आधारावर प्लेलिस्ट सुचवणे किंवा तुमच्या स्थानाच्या आधारावर स्थानिक बातम्या पुरवणे.

अ‍ॅप परवानग्या आणि डेटा संग्रह नियंत्रित करणे

अ‍ॅप परवानग्यांबद्दल समजून घेणे

अ‍ॅप परवानग्या सूची ही अ‍ॅप कोणता विशिष्ट डेटा किंवा वैशिष्ट्ये अ‍ॅक्सेस करू शकते किंवा कशाच्या अ‍ॅक्सेसची विनंती करू शकते ते दाखवते. या सूचीमध्ये हे समाविष्ट आहे:

  • ॲपला काम करण्यासाठी आवश्यक डेटा किंवा वैशिष्ट्ये, जसे की मोबाइल नेटवर्क अ‍ॅक्सेस
  • तुम्‍ही वापरत असताना अ‍ॅपने विनंती केलेला डेटा, जसे की तुमच्‍या कॅमेराचा अ‍ॅक्सेस

ही सूची तांत्रिक माहितीवर आधारित आहे, जी डेव्हलपरचे ॲप कसे काम करते याचे वर्णन करते. हे डेटासंबंधित सुरक्षितता विभाग यापेक्षा वेगळे आहे, जे ॲप डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात, शेअर करतात आणि हाताळतात याबद्दल घोषित केलेल्या माहितीवर आधारित आहे.

काही वेळा, ॲप परवानग्या सूचीमधील माहिती डेटासंबंधित सुरक्षितता विभाग यातील माहितीपेक्षा वेगळी असू शकते. याच्या काही संभाव्य कारणांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • डिव्हाइसवर प्रक्रिया करण्यासाठी ॲप डेटा अ‍ॅक्सेस करते, पण तो गोळा किंवा शेअर करत नाही.
  • ॲप हे परवानग्यांद्वारे व्यवस्थापित न केलेल्या पद्धतीने डेटा गोळा करते.
  • परवानग्या सूचीमधील सेवा किंवा डेटा प्रकार डेटासंबंधित सुरक्षितता विभाग यामध्ये समाविष्ट केलेला नाही.
डाउनलोडनंतर अ‍ॅप परवानग्या आणि डेटा संग्रह नियंत्रित करणे

तुम्ही अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, अ‍ॅपने काही डेटा अ‍ॅक्सेस करण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. एखादे ॲप तुम्हाला शेअर करायचा नसलेला डेटा गोळा करत असल्यास, तुम्ही हे करू शकता:

टीप: तुम्ही तुमचा डेटा ॲपमधून हटवण्याची विनंती करू शकत नसल्यास, ॲपद्वारे गोळा केलेला कोणताही डेटा हटवण्यासाठी तुम्ही डेव्हलपरशी संपर्क साधू शकता. Android ॲपच्या डेव्हलपरशी संपर्क कसा साधायचा ते जाणून घ्या.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10694066624639164263
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false