Google Play वर कुटुंब पेमेंट पद्धत वापरणे

तुम्ही कुटुंब गटामध्ये असता तेव्हा कुटुंब पेमेंट पद्धत किंवा एखादी वेगळी पेमेंट पद्धत वापरून Google Play वर खरेदी करू शकता.

कुटुंब पेमेंट पद्धत कशी काम करते

  • कुटुंब गट तयार केला जातो, तेव्हा कुटुंब व्यवस्थापक कुटुंब पेमेंट पद्धत जोडू शकतो.
  • कुटुंब सदस्य Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे Google Play वर खरेदी करण्यासाठी किंवा अ‍ॅपमधील खरेदीसाठी कुटुंब पेमेंट पद्धत वापरू शकतात.
  • कुटुंब पेमेंट पद्धत वापरून कुटुंब सदस्यांनी केलेल्या कोणत्याही खरेदीसाठी कुटुंब व्यवस्थापक जबाबदार असतो.
  • एखादा कुटुंब सदस्य Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे खरेदी करतो, तेव्हा प्रत्येक वेळी कुटुंब व्यवस्थापकाला ईमेलवर पावती मिळते.
  • ठरावीक खरेदी करण्यासाठी कुटुंब सदस्यांना कुटुंब व्यवस्थापकाची मंजुरी घेणे आवश्यक करण्यासाठी, तो खरेदी मंजुरी सुरू करू शकतो.

    महत्त्वाचे: खरेदी मंजुरी सेटिंग्ज ही फक्त Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे केलेल्या खरेदीवर लागू होतात.

कुटुंब पेमेंट पद्धत वापरून खरेदी करा

कुटुंब सदस्य हे कुटुंब पेमेंट पद्धत किंवा दुसरी पेमेंट पद्धत वापरून खरेदी करू शकतात.

तुम्ही कुटुंब पेमेंट पद्धत वापरून करू शकता अशी खरेदी

कुटुंब सदस्य Google Play वर Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे अ‍ॅपमधील खरेदी आणि खालील आशय खरेदी करण्यासाठी कुटुंब पेमेंट पद्धत वापरू शकतात:

  • ॲप्स
  • पुस्तके
  • चित्रपट
  • गेम
  • टीव्ही शो
  • मासिकाचे अंक

टीप: आशय कौटुंबिक लायब्ररी मध्ये जोडण्यासाठी पात्र असल्यास, तुम्हाला तपशील पेजवर कौटुंबिक लायब्ररी आयकन Family Library दिसेल.

तुम्ही कुटुंब पेमेंट पद्धत वापरून करू शकत नाही अशी खरेदी

पुढील गोष्टींच्या समावेशासह कुटुंब पेमेंट पद्धत वापरून काही ठरावीक खरेदी करू शकत नाही:

कुटुंब व्यवस्थापकासाठी पेमेंट पर्याय

तुम्ही तुमचा कुटुंब गट तयार केला असल्यास, तुमच्या कुटुंबाची पेमेंट पद्धत व्यवस्थापित करण्यासाठी आणि खरेदी ट्रॅक करण्यासाठी खालील सूचनांचा वापर करा.

कुटुंब पेमेंट पद्धत जोडा

महत्त्वाचे:

  • तुम्ही कुटुंब व्यवस्थापकाच्या Google खात्यामध्ये कुटुंब पेमेंट पद्धत जोडणे आवश्यक आहे. फक्त कुटुंब व्यवस्थापक हा कुटुंब पेमेंट पद्धत जोडू, संलग्न करू, संपादित करू किंवा हटवू शकतो.
  • तुम्ही कुटुंब पेमेंट पद्धत म्हणून क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरणे आवश्यक आहे. Google Play भेटकार्डच्या समावेशासह इतर पेमेंट पद्धती पात्र नाहीत.
  1. तुमच्या Android डिव्हाइसवरील, Google Play वर कौटुंबिक लायब्ररी सेट करणे हे करा.
  2. कौटुंबिक लायब्ररी आणि कुटुंब पेमेंट पद्धत सेट करण्यासाठी स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.
तुमच्या कुटुंबाची पेमेंट पद्धत बदलणे
  1. Google Play अ‍ॅप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. पेमेंट आणि सदस्यत्वे आणि त्यानंतर पेमेंट पद्धती आणि त्यानंतर कुटुंब पेमेंट पद्धत बदला वर टॅप करा
  4. नवीन पेमेंट पद्धत निवडा.
  5. ठीक आहे वर टॅप करा.
प्रत्येक कुटुंब सदस्यासाठी खरेदी मंजुरी सेटिंग्ज निवडणे

तुमच्या कुटुंब सदस्यांसाठी खरेदी मंजुरी सेटिंग्ज निवडा. खरेदी मंजुरी सेटिंग्ज ही फक्त Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे केलेल्या खरेदीवर लागू होतात.

कुटुंब सदस्यांनी केलेली खरेदी पाहणे

कुटुंब व्यवस्थापक हा Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे कुटुंब पेमेंट पद्धत वापरून केलेल्या सर्व खरेदीची सूची पाहू शकतो.

  1. Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकन आणि त्यानंतर पेमेंट आणि सदस्यत्वे आणि त्यानंतर बजेट आणि इतिहास वर टॅप करा.
  3. खरेदी इतिहास वर टॅप करा.
  4. मागील सर्व खरेदीवर स्क्रोल करा. तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने खरेदी केली असल्यास, तुम्हाला "यांनी खरेदी केली" आणि त्या व्यक्तीचे नाव दिसेल.

टीप: तुम्ही तुमच्या कुटुंब सदस्यांसोबत क्रेडिट कार्ड शेअर केल्यास, तुम्ही कुटुंब पेमेंट पद्धत म्हणून वापरत असलेल्या क्रेडिट कार्डचा त्यांना आधीपासून अ‍ॅक्सेस असू शकतो. तुमच्या कुटुंब सदस्याने खरेदी करण्यासाठी कुटुंब पेमेंट पद्धत निवडल्यास, तुमच्या ऑर्डर इतिहासामध्ये तुम्हाला फक्त या क्रेडिट कार्डने केलेली खरेदी दिसेल.

महत्त्वाचे: कुटुंब व्यवस्थापक फक्त Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे कुटुंब सदस्याने केलेली खरेदी पाहू शकेल. याचा अर्थ असा, की कुटुंबातील सदस्याने पर्यायी बिलिंग सिस्टीम वापरून केलेली खरेदी कुटुंब व्यवस्थापकाला दिसणार नाही.

समस्या ट्रबलशूट करणे

कुटुंब पेमेंट पद्धत पर्याय प्रदर्शित होत नाही

तुम्ही खरेदीला जाता, तेव्हा कुटुंब पेमेंट पद्धत ही पर्याय म्हणून प्रदर्शित होत नसल्यास, त्या प्रकारच्या खरेदीसाठी कुटुंब पेमेंट पद्धत वापरली जाऊ शकत नाही.

"तुमची कुटुंब पेमेंट पद्धत चुकीची आहे" एरर

याचे निराकरण करण्यासाठी कुटुंब व्यवस्थापकाला सांगा:

  1. Google Play अ‍ॅप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. पेमेंट आणि सदस्यत्वे आणि त्यानंतर पेमेंट पद्धती आणि त्यानंतर कुटुंब पेमेंट पद्धत बदला वर टॅप करा
  4. नवीन पेमेंट पद्धत निवडा.
  5. ठीक आहे वर टॅप करा.
मला कुटुंब पेमेंट पद्धत वापरून केलेल्या खरेदीचा परतावा हवा आहे

कुटुंब व्यवस्थापक किंवा कुटुंब सदस्य, ज्याने आशय खरेदी केला आहे तो कुटुंब पेमेंट पद्धत वापरून खरेदी केलेल्या आशयाचे परतावे मागू शकतो.

परतावे कुटुंब पेमेंट पद्धतीवर दिले जातात.

विनंत्या कशा कराव्या आणि Google Play परतावा धोरणे यांविषयी अधिक जाणून घ्या.

लहान मुलाच्या कुटुंब पेमेंट पद्धतीचा वापर मर्यादित करणे

तुमच्या लहान मुलाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास आणि त्यांचे खाते Family Link वापरून व्यवस्थापित केले असल्यास, त्यांच्या कुटुंब पेमेंट पद्धतीचा वापर मर्यादित करण्यासाठी तुम्ही खरेदी मंजुरी सेट करू शकता.

टीप: खरेदी मंजुरी फक्त Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे कुटुंब पेमेंट पद्धत वापरून केलेली खरेदी मर्यादित करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7984460341226120976
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false