Play Games प्रोफाइल गोपनीयता आणि इतर सेटिंग्ज

तुम्ही गेममध्ये आपोआप साइन इन करण्यासाठी, तुमची गेम अ‍ॅक्टिव्हिटी सार्वजनिक करण्यासाठी किंवा इतर सेटिंग्ज बदलण्यासाठी डीफॉल्ट खाते निवडू शकता.

गेममध्ये आपोआाप साइन इन करा

तुमची प्रगती सेव्ह करण्यासाठी आणि झकास कामगिरी मिळवण्यासाठी तुम्ही सपोर्ट असलेल्या गेममध्ये आपोआप साइन इन करू शकता. तुम्हाला तुमच्या सध्याच्या गेममध्ये आणि तुम्ही खेळणार असलेल्या भविष्यातील कोणत्याही गेममध्ये साइन इन करता येईल. तुम्ही फक्त नवीन गेमसाठी, सर्व गेमसाठी डीफॉल्ट खाते बदलू शकता किंवा सर्व गेममधून साइन आउट करू शकता. तुम्ही डीफॉल्ट खाते बदलल्यास:

नवीन गेमसाठी: तुम्ही खेळलेल्या गेमसाठी प्रगती आणि सेटिंग्ज यांचा अ‍ॅक्सेस गमवणार नाही. मात्र, तुमची प्रगती खात्यांदरम्यान विभाजित होऊ शकते.

सर्व गेमसाठी: तुम्ही खेळलेल्या गेमसाठी प्रगती आणि सेटिंग्ज यांचा अ‍ॅक्सेस गमवू शकता. तुम्ही केलेले बदल लागू करण्यासाठी, आम्ही गेम रीस्टार्ट करू.

Android फोन किंवा टॅबलेटवर

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Settings अ‍ॅप उघडा.
  2. Google आणि त्यानंतर Google अ‍ॅप्ससाठी सेटिंग्ज आणि त्यानंतर Play Games वर टॅप करा.
  3. खात्यामध्ये साइन इन करा वर टॅप करा.
  4. गेम साठी डीफॉल्ट खाते बदलण्याकरिता, “साइन इन व्यवस्थापन” या अंतर्गत, बदला वर टॅप करा.
  5. तुम्हाला गेममध्ये आपोआप साइन इन करण्यासाठी खाते निवडा.

Android TV वर

  1. Play Games अ‍ॅप Play Games उघडा.
  2. साइडबारवर, सेटिंग्ज आणि त्यानंतर गेमर प्रोफाइल निवडा.
  3. पुढील निवडा.
  4. तुम्हाला "सपोर्ट असलेल्‍या गेममध्ये ऑटोमॅटिक साइन इन करायचे का?" हे दिसते तेव्हा, अनुमती द्या किंवा अनुमती देऊ नका निवडा.

टिपा:

  • तुम्हाला एखाद्या गेमसाठी वेगळ्या Google खाते मध्ये साइन इन करायचे असल्यास, त्या गेममधून साइन आउट करा आणि पुन्हा साइन इन करा.
  • पर्यवेक्षित Google खाते मध्ये एकाहून अधिक Play Games प्रोफाइल असू शकत नाहीत.
  • पर्यवेक्षित Google खाती यांसाठी, Play Games प्रोफाइल वापरून ऑटोमॅटिक साइन-इनला सर्व गेम सपोर्ट करत नाहीत.
  • तुम्ही सर्व गेममधून साइन आउट केल्यास, तुम्ही खेळलेल्या गेमसाठी प्रगती आणि सेटिंग्ज यांचा अ‍ॅक्सेस गमवू शकता. तुम्ही केलेले बदल लागू करण्यासाठी, आम्ही गेम रीस्टार्ट करू.

तुमची गेम अ‍ॅक्टिव्हिटी कोण शोधू शकते ते बदला

तुमची प्रोफाइल, झकास कामगिरी, लीडरबोर्ड आणि खेळलेले गेम कोण पाहू शकते ते निवडा.

Android फोन किंवा टॅबलेटवर

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Settings अ‍ॅप उघडा.
  2. Google आणि त्यानंतर Google अ‍ॅप्ससाठी सेटिंग्ज आणि त्यानंतर Play Games वर टॅप करा.
  3. "प्रोफाइल आणि गोपनीयता" या अंतर्गत, तुमची अ‍ॅक्टिव्हिटी कोण पाहू शकते ते निवडा:
    • Google Play Games च्या मोबाइल अ‍ॅप वरील प्रत्येकजण
    • फक्त मित्रमैत्रिणी
    • फक्त तुम्ही
टीप: Play Games प्रोफाइलमुळे तुमच्या लहान मुलाला ऑटोमॅटिक साइन-इन, झकास कामगिरी आणि लीडरबोर्डचा अ‍ॅक्सेस मिळतो आणि त्यामुळे त्यांना Play च्या संपूर्ण सर्फेसवर त्यांच्या पर्यवेक्षित Google खाते मध्ये आणखी इमर्सिव्ह अनुभव मिळेल. सध्या, हे सेटिंग बाय डीफॉल्ट “फक्त तुमच्यासाठी” वर सेट केले आहे. हे सेटिंग बदलले जाऊ शकत नाही.

Android TV वर

  1. Play Games अ‍ॅप Play Games उघडा.
  2. साइडबारवर, सेटिंग्ज आणि त्यानंतर गेमर प्रोफाइल निवडा.
  3. पुढील निवडा.
  4. तुम्हाला "इतरांना तुमची गेम अ‍ॅक्टिव्हिटी पाहाण्याची अनुमती द्यायची का?" हे दिसते तेव्हा, अनुमती द्या किंवा अनुमती देऊ नका निवडा.

टीप: तुम्ही तुमचे गेमरचे नाव वापरून गेम खेळता तेव्हा, गेम डेव्हलपरला गेममधील तुमची अ‍ॅक्टिव्हिटी आणि खरेदी यांविषयीची माहिती मिळते. गेम डेव्हलपर ही माहिती त्यांच्या गेममध्ये सुधारणा करण्यासाठी वापरतात. गेम डेव्हलपर ही माहिती कशी वापरतात याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, गेम डेव्हलपरचे गोपनीयता धोरण तपासा.

तुमचा ईमेल ॲड्रेस वापरून लोकांना तुमची प्रोफाइल शोधू द्या

तुम्ही इतर खेळाडूंना तुमच्या ईमेल अ‍ॅड्रेसद्वारे तुमची गेम प्रोफाइल शोधू देऊ शकता.

Android फोन किंवा टॅबलेटवर

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Settings अ‍ॅप उघडा.
  2. Google आणि त्यानंतर Google अ‍ॅप्ससाठी सेटिंग्ज आणि त्यानंतर Play Games वर टॅप करा.
  3. तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस वापरून इतरांना तुमची प्रोफाइल शोधू द्या सुरू करा.
टीप: तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या पर्यवेक्षित Google खाते साठी Play Games प्रोफाइल तयार करता, तेव्हा त्यांच्या प्रोफाइलवर हे सेटिंग बाय डीफॉल्ट "बंद" वर सेट केले जाते. हे सेटिंग बदलले जाऊ शकत नाही.

Android TV वर

  1. Play Games अ‍ॅप Play Games उघडा.
  2. साइडबारवर, सेटिंग्ज आणि त्यानंतर गेमर प्रोफाइल निवडा.
  3. पुढील निवडा.
  4. तुम्हाला "तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस किंवा नाव वापरून इतरांना तुमचा गेमर आयडी शोधण्याची अनुमती द्यायची का?" हे दिसते तेव्हा, अनुमती द्या किंवा अनुमती देऊ नका निवडा.

तुमच्या मित्रमैत्रिणींची सूची गेम कधी अ‍ॅक्सेस करू शकतात ते बदला

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Settings अ‍ॅप उघडा.
  2. Google आणि त्यानंतर Google अ‍ॅप्ससाठी सेटिंग्ज आणि त्यानंतर Play Games वर टॅप करा.
  3. "प्रोफाइल आणि गोपनीयता" या अंतर्गत, तुम्ही खेळता ते गेम तुमच्या मित्रमैत्रिणींची सूची आपोआप ॲक्सेस करू शकतात की नाही ते निवडा.
टीप: पर्यवेक्षित Google खाती यांसाठीच्या Play Games प्रोफाइलना मित्रमैत्रिणी या Play Games मधील वैशिष्ट्याचा ॲक्सेस नाही. हे सेटिंग बदलले जाऊ शकत नाही.
गेम तुमच्या मित्रमैत्रिणींची सूची कशी अ‍ॅक्सेस करू शकतात आणि वापरू शकतात

तुम्ही गेमला तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सूचीचा अ‍ॅक्सेस देता, तेव्हा त्या गेमसोबत तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सूचीमधील गेमरच्या नावाची सूची शेअर करता. या सूचीमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ईमेल अ‍ॅड्रेसचा समावेश नसतो. तुम्हाला मित्रमैत्रिणींना सहजपणे पाहू आणि त्यांसोबत खेळू देण्यासाठी गेम त्यांच्या गोपनीयता धोरणांच्या अधीन राहून ही माहिती वापरू शकतात. तुम्हाला ही धोरणे गेममध्ये आणि गेमच्या Play Store पेजवर मिळू शकतात.

याव्यतिरिक्त, प्रत्येक गेमच्या मित्रमैत्रिणींच्या सूचीच्या वापरासाठी, प्रत्येक गेमच्या डेव्हलपरने Google Play Games च्या मोबाइल अ‍ॅप च्या पुढील गोष्टींशी सहमत असणे आवश्यक आहे:

  • गेममध्ये तुम्हाला मित्रमैत्रिणींची सूची दाखवणे किंवा अंतिम वापरकर्त्याला दृश्यमान असलेल्या संबंधित मित्रमैत्रिणींच्या कार्यक्षमता सुरू करणे फक्त याच उद्देशासाठी मित्रमैत्रिणींची ही सूची वापरणे आणि ती जाहिरातीसारख्या इतर कोणत्याही उद्देशाने न वापरणे.
  • ३० दिवसांपेक्षा जास्त काळ मित्रमैत्रिणींची सूची स्टोअर करू नये किंवा ती तशीच ठेवू नये. ३० दिवसांनतर गेमने मित्रमैत्रिणींची सूची हटवणे किंवा रिफ्रेश करणे आवश्यक आहे.
  • लागू कायद्याचे पालन करण्याच्या आवश्यकतेशिवाय ही मित्रमैत्रिणींची सूची तृतीय पक्षांना उपलब्ध करून न देणे.

तुमच्या गेमची सूचना सेटिंग्ज बदलणे

डिव्हाइसनुसार सेटिंग्ज बदलू शकतात. तुमच्या डिव्हाइसच्या तपशिलांसाठी, तुमच्या डिव्हाइस उत्पादकाशी संपर्क साधणे हे करा.

पर्याय पहिला: तुमच्या Settings अ‍ॅपमध्ये

  1. तुमच्या डिव्हाइसचे Settings अ‍ॅप उघडा.
  2. अ‍ॅप्स आणि सूचना आणि त्यानंतर सूचना वर टॅप करा.
  3. "अलीकडे पाठवलेल्या" या अंतर्गत, अलीकडे तुम्हाला सूचना पाठवणारी अ‍ॅप्स पाहा.
    • तुम्ही सूचीबद्ध अ‍ॅपच्या सर्व सूचना बंद करू शकता.
    • सूचनांच्या विशिष्ट वर्गवाऱ्या निवडण्यासाठी, अ‍ॅपच्या नावावर टॅप करा.
    • आणखी अ‍ॅप्स पाहाण्यासाठी, मागील सात दिवसांतील सर्व पाहा वर टॅप करा. सर्वात अलीकडील किंवा नेहमीची यानुसार क्रमाने लावण्यासाठी, त्यांच्यावर टॅप करा.

तुम्हाला "अलीकडे पाठवलेल्या" हे दिसत नसल्यास, तुम्ही Android ची जुनी आवृत्ती वापरत आहात. त्याऐवजी, अ‍ॅप सूचना वर टॅप करून एखाद्या अ‍ॅप वर टॅप करा. तुम्ही सूचना, सूचना बिंदू आणि सूचना वर्गवाऱ्या सुरू किंवा बंद करू शकता. एखाद्या अ‍ॅपमध्ये वर्गवाऱ्या असल्यास,आणखी पर्यायांसाठी तुम्ही वर्गवारी वर टॅप करू शकता.

पर्याय दुसरा: सूचनेवर

  • तुम्ही तुमच्या स्क्रीनच्या सर्वात वरून खाली स्वाइप केल्यानंतर, सूचना किंचित उजवीकडे किंवा डावीकडे ड्रॅग करा आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  • सूचना बिंदूमधून अ‍ॅपला स्‍पर्श करा आणि धरून ठेवा आणि त्यानंतर माहिती  वर टॅप करा.

पर्याय तिसरा: ठरावीक अ‍ॅपमध्ये

बरीच अ‍ॅप्स अ‍ॅपमधील सेटिंग्ज मेनूमधून तुम्हाला सूचना नियंत्रित करू देतात. उदाहरणार्थ, अ‍ॅपच्या सूचनांसाठी कोणता आवाज निवडावा याबद्दलचे अ‍ॅपचे सेटिंग असू शकते.

व्हिडिओना आपोआप प्ले होण्यापासून थांबवणे

तुम्ही माझे गेम किंवा आर्केड वर खाली स्क्रोल करता तेव्हा, तुमचे व्हिडिओ त्वरित प्ले होतील. ते प्ले होण्यापासून थांबवण्यासाठी:

  1. तुमच्या डिव्हाइसवर, Settings अ‍ॅप उघडा.
  2. Google आणि त्यानंतर Google अ‍ॅप्ससाठी सेटिंग्ज आणि त्यानंतर Play Games वर टॅप करा.
  3. व्हिडिओ आपोआप प्ले करा बंद करा.

Play Games तुमचा डेटा कसा हाताळते (Play Games अ‍ॅप इंस्टॉल केलेले नाही)

तुमच्याकडे Play Games अ‍ॅप इंस्टॉल केलेले नसल्यास, तुम्ही Play Games प्रोफाइल तयार करणे, Play Games सेवा वापरणे हे केल्यास किंवा Play Games अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी सूचित केले गेल्यास, Google काही विशिष्ट माहिती गोळा करते. ही वैशिष्ट्ये Google Play सेवा वापरतात.

Play Games हे कार्यक्षमता, खाते व्यवस्थापन, विश्लेषणे आणि डीबगिंगसाठी तुमची अ‍ॅक्टिव्हिटी, वापर माहिती, परफॉर्मन्स माहिती, वैयक्तिक आयडेंटिफायर आणि डिव्हाइस आयडेंटिफायर गोळा करते. Play Games ने गोळा केलेला डेटा ट्रांझिटमध्ये एन्क्रिप्ट केला जातो.

टीप: तुम्ही Android सेटिंग्जमध्ये गोळा केलेला डेटा हटवण्याची विनंती करू शकता. "Play Games" अंतर्गत, "प्रोफाइल सेटिंग्ज" वर जा. तुम्ही माझे खाते द्वारेदेखील विनंती सबमिट करू शकता.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6082170628517471983
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false
false