Google Play वरून डिव्हाइस कसे काढून टाकावे आणि डिव्हाइसची टोपणनावे कशी जोडावीत

Google Play वेबसाइटवरील अ‍ॅप मेनूमध्ये तुमची कोणती डिव्हाइस दाखवायची हे तुम्ही निवडू शकता. डिव्हाइस सहजरीत्या ओळखता यावीत यासाठी तुम्ही त्यांना टोपणनावेदेखील देऊ शकता.

तुम्ही Google Play वरून डिव्हाइस लपवूनदेखील ते काढून टाकू शकता. डिव्हाइस लपवलेले असते, तेव्हा तुम्ही तुमच्या वेब ब्राउझरवरून त्या डिव्हाइसवर अ‍ॅप्स इंस्टॉल करू शकत नाही.

Google Play वरून डिव्हाइस कशी काढून टाकावी

Google Play हे तुम्ही यापूर्वी वापरलेल्या डिव्हाइसचा माग ठेवते. तुम्ही तुमच्या Google Play इतिहासामधून डिव्हाइस काढून टाकू शकत नाही, पण तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • डिव्हाइसवरून तुमचे खाते काढून टाकणे. तुम्ही जुन्या डिव्हाइसवरून तुमचे खाते काढून टाकल्यास, तुमचा Google Play इतिहास किंवा अ‍ॅक्टिव्हिटी त्या डिव्हाइसवर दिसत नाही.
  • Google Play वर डिव्हाइस लपवणे. तुम्ही डिव्हाइस लपवता, तेव्हा तुम्ही Google Play वेबसाइटवरून एखादी गोष्ट डाउनलोड केल्यास, ती दिसत नाही.

Google Play वर डिव्हाइस कशी लपवावीत

तुम्ही आता एखाद्या डिव्हाइसचे मालक नसल्यास किंवा ते वापरत नसल्यास तुम्ही ते लपवू शकता, जेणेकरून तुम्ही तुमच्या कॉंप्युटर किंवा मोबाइलच्या ब्राउझरमधून काही डाउनलोड करता तेव्हा ते दाखवले जाणार नाही:

  1. play.google.com वर जा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल आयकनवर क्लिक करा.
  3. लायब्ररी आणि डिव्हाइस वर क्लिक करा.
  4. डिव्हाइस टॅब निवडा.
  5. डिव्हाइसच्या बाजूला, मेनूमध्ये दाखवा वर क्लिक करा.

डिव्हाइसचे टोपणनाव कसे जोडावे

डिव्हाइस सहजरीत्या ओळखता यावीत यासाठी तुम्ही त्यांची टोपणनावे जोडू शकता ज्यामुळे तुमच्या खात्याशी संबंधित एकाहून अधिक डिव्हाइस असतील तेव्हा मदत होईल. डिव्हाइसचे टोपणनाव जोडण्यासाठी:

  1. play.google.com वर जा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल आयकनवर क्लिक करा.
  3. लायब्ररी आणि डिव्हाइस वर क्लिक करा. 
  4. डिव्हाइस टॅब निवडा.
  5. तुम्हाला बदलायचे असलेले डिव्हाइस शोधा.
  6. "टोपणनाव" अंतर्गत, नवीन नाव एंटर करा.
  7. अपडेट करा वर क्लिक करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3166693587379901001
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false