Google Classroom मार्फत Play Books मधील पुस्तके विद्यार्थ्यांसोबत शेअर करणे

शिक्षक Google Classroom मार्फत Google Play Books मधील पुस्तके विद्यार्थ्यांसोबत शेअर करू शकतात.

शिक्षकांनी पुस्तक शेअर केल्यावर, विद्यार्थी पुढील गोष्टी करू शकतात:

  • काँप्युटर, टॅबलेट किंवा फोनवर पुस्तक वाचणे.
  • मजकूर हायलाइट करणे आणि पुस्तकामध्ये टिपा लिहिणे.
  • टिपा संग्रहांमध्ये संगतवार लावणे.
  • असाइनमेंट पूर्ण करणे.

सुरुवात करताना तुम्हाला कशाची गरज आहे

अ‍ॅड-ऑन वापरण्यासाठी:

हा पर्याय फक्त ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, मेक्सिको, स्पेन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समध्ये उपलब्ध आहे. शिक्षक आणि विद्यार्थी एकाच देशातील असणे आवश्यक आहे. भविष्यात आणखी देश उपलब्ध होऊ शकतात.

विद्यार्थ्यांसोबत पुस्तके शेअर करा

गटांसाठी पुस्तके खरेदी करणे

महत्त्वाचे: पुस्तके खरेदी करणारे शिक्षक किंवा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर आणि पुस्तके वाचणारे विद्यार्थी हे एकाच देशामध्ये असणे आवश्यक आहे.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, play.google.com/store/books वर जा.
  2. तुम्ही शाळेसाठी वापरत असलेले खाते वापरून साइन इन करा.
  3. तुम्हाला खरेदी करायचे असलेले पुस्तक शोधा.
  4. पुस्तकाच्या तपशिलांच्या पेजवर, गटांसाठी खरेदी करा निवडा.
  5. किती पुस्तके खरेदी करायची आहेत ते निवडा:
    • पुस्तक विनाशुल्क असल्यास आणि तुमच्याकडे Workspace for Education चे के-१२ शाळेसाठीचे खाते असल्यास, तुम्ही किती प्रती घेऊ शकता यावर मर्यादा नसते.
    • पुस्तकाला किंमत असल्यास, तुम्ही एका वेळी दहा प्रती खरेदी करू शकता. १० पेक्षा जास्त प्रती खरेदी करण्यासाठी, दुसरी खरेदी करा.
    • १०० पेक्षा जास्त प्रती खरेदी करण्यासाठी, हा फॉर्म भरा. पुस्तकाचे शीर्षक, पुस्तकाची Google Play वरील लिंक, तुम्हाला हव्या असलेल्या प्रतींची संख्या आणि तुमचे Classroom खाते यांचा समावेश करा.
  6. तुमची खरेदी पूर्ण करा.
इतर कर्मचार्‍यांना पुस्तकांच्या वितरणाची परवानगी देणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, तुमची Play Books लायब्ररी यावर जा.
  2. “तुमची इन्व्हेंटरी” यामधून, तुम्हाला शेअर करायचे असलेले पुस्तक निवडा.
  3. आणखी आणखी आणि त्यानंतर व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  4. ईमेल अ‍ॅड्रेस एंटर करा. तुम्ही व्यक्ती किंवा गटासोबत पुस्तक शेअर करू शकता.
  5. पूर्ण झाले वर क्लिक करा.

एकाच वेळी एकाहून अधिक पुस्तकांसाठी व्यवस्थापक जोडण्याकरिता:

  1. सर्व पुस्तके निवडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, व्यवस्थापक जोडा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही पुस्तकासंबंधी परवानगी दिल्यानंतर, शिक्षक ते पुस्तक Google Classroom असाइनमेंटवर जोडू शकतात.

पुस्तक असाइनमेंटवर जोडणे

महत्त्वाचे: फक्त पुस्तक शेअर करण्याची परवानगी असलेले कर्मचारी ते असाइनमेंटवर जोडू शकतात.

  1. classroom.google.com वर जा.
  2. वर्ग आणि त्यानंतर वर्गपाठ वर क्लिक करा.
  3. सर्वात वरती, तयार करा आणि त्यानंतर असाइनमेंट वर क्लिक करा.
  4. तळाशी उजवीकडे, "अ‍ॅड-ऑन" अंतर्गत, Google Play Books निवडा.
  5. तुम्हाला असाइनमेंटवर जोडायचे असलेले पुस्तक निवडा.
  6. सर्वात वर, जोडा वर क्लिक करा.

टीप: विद्यार्थ्यांना Google Classroom मध्ये असाइनमेंटसाठी पुस्तक सापडू शकते. शीर्षकावर दावा करण्यासाठी त्यांना पुस्तकावर क्लिक करावे लागते. त्यानंतर पुस्तक विद्यार्थ्याच्या Play Books लायब्ररीमध्ये दिसते.

पुस्तके शेअर करण्यासाठी लिंक तयार करणे

महत्त्वाचे: विनाशुल्क पुस्तकांसाठी परवान्याची कोणतीही मर्यादा नसते. ही पुस्तके रिडीम करण्याची लिंक ही फक्त Google खाते असलेल्या किंवा Google Groups मध्ये असलेल्या व्यक्तींना पाठवली जाऊ शकते.

  1. तुमच्या काँप्युटरवर, play.google.com/books वर जा.
  2. “तुमची इन्व्हेंटरी” यामधून, तुम्हाला शेअर करायचे असलेले पुस्तक निवडा.
  3. आणखी More  आणि त्यानंतर प्रती देण्यासाठी लिंक तयार करा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला ज्या व्यक्ती किंवा गटांसोबत पुस्तक शेअर करायचे आहे त्यांना जोडा. 
  5. लिंक तयार करा  आणि त्यानंतर लिंक कॉपी करा वर क्लिक करा.
  6. लिंक व्यक्ती किंवा गटांना पाठवा. 

लिंकवर क्लिक केल्याने पुस्तकाचा परवाना वापरला जाईल आणि “तुमची इन्व्हेंटरी” यामधील उपलब्ध परवान्यांची संख्या आपोआप कमी होईल. लिंकचा वापर पहिल्यासारखा केला जाऊ शकत नाही. आम्ही शिफारस करतो, की लिंक शेअर करण्यापूर्वी मिळवणाऱ्याच्या संपर्क माहितीची पडताळणी करणे यासह पुस्तके इतरांना पाठवताना काळजी घ्यावी.

परवान्याचा इतिहास (खरेदी, जोडलेले व्यवस्थापक आणि रिडेंप्शन) पाहणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, play.google.com/books वर जा.
  2. “तुमची इन्व्हेंटरी” यामधून, तुम्हाला ज्या पुस्तकाचा इतिहास पाहायचा आहे ते पुस्तक निवडा.
  3. आणखी More आणि त्यानंतर इतिहास पहा वर क्लिक करा. 

टीप: सर्व परवाने रिडीम केले गेल्यास, परवाना इतिहासाच्या विंडोमध्ये ते पुस्तक निकामी आणि इनॅक्टिव्ह होईल.

Google Classroom वरील Play Books अ‍ॅड-ऑनबाबत अधिक मदतीसाठी, आमच्याशी संपर्क साधा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17355961227334075471
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false