Android वर Play Store आणि अ‍ॅप्स अपडेट कशी करायची

तुम्ही तुमची Android अ‍ॅप्स आणि Play Store अ‍ॅप एका वेळी, सर्व एकत्र किंवा आपोआप अपडेट करू शकता. तुमचे अ‍ॅप्स नवीनतम आवृत्तीवर अपडेट केल्यामुळे तुम्हाला नवीनतम वैशिष्ट्यांचा अ‍ॅक्सेस मिळतो आणि अ‍ॅप सुरक्षितता आणि स्थिरता सुधारते.

महत्त्वाचे:

  • एखादे अ‍ॅप अपडेट सुरक्षा जोखमीचे निराकरण करेल असे Google ने निर्धारित केल्यास, आम्ही काही अ‍ॅप अपडेट करू शकतो. अ‍ॅपमधील किंवा तुमच्या डिव्हाइसवरील अपडेट सेटिंग्ज काहीही असली तरी ही अपडेट होऊ शकतात. अधिक माहितीसाठी, Google Play सेवा अटी वाचा.
  • तुम्ही Chromebook वर Google Play वापरत असल्यास, अ‍ॅप अपडेटविषयी येथे जाणून घ्या.

एखादे Android अ‍ॅप अपडेट कसे करायचे

  1. Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. ॲप्स व डिव्हाइस व्यवस्थापित करा आणि त्यानंतर व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  4. तुम्हाला अपडेट करायच्या असलेल्या अ‍ॅपवर टॅप करा.
    • टीप: अपडेट उपलब्ध असलेल्या अ‍ॅप्‍सना “अपडेट उपलब्ध आहे” असे लेबल लावले जाते.
  5. अपडेट करा वर टॅप करा.

Google Play Store कसे अपडेट करायचे

  1. Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर याविषयी आणि त्यानंतर Play Store आवृत्ती वर टॅप करा.
  4. तुम्हाला प्ले स्टोअर अप टू डेट आहे की नाही हे सांगणारा मेसेज मिळेल. समजले वर टॅप करा.
    • अपडेट उपलब्ध असल्यास, ते काही मिनिटांमध्ये आपोआप डाउनलोड आणि इंस्टॉल होईल.

सर्व Android अ‍ॅप्स आपोआप कशी अपडेट करायची

  1. Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर नेटवर्क प्राधान्ये आणि त्यानंतर अ‍ॅप्स ऑटो-अपडेट करा वर टॅप करा.
  4. पर्याय निवडा:
    • कोणत्याही नेटवर्कवरून, वाय-फाय किंवा मोबाइल डेटा वापरून अ‍ॅप्स अपडेट करण्यासाठी.
    • फक्त वाय-फायवरून, वाय-फायशी कनेक्ट केलेले असतानाच अ‍ॅप्स अपडेट करण्यासाठी.

टीप: तुमच्या डिव्हाइसवरील खात्यामध्ये साइन-इन एरर येत असल्यास, अ‍ॅप्स कदाचित आपोआप अपडेट होणार नाहीत.

मर्यादित मोबाइल डेटा वापरून अ‍ॅप्स अपडेट करणे

महत्त्वाचे: हा पर्याय मर्यादित गटासाठी उपलब्ध आहे.
  1. Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. सेटिंग्ज आणि त्यानंतर नेटवर्क प्राधान्ये आणि त्यानंतर अ‍ॅप्स ऑटो-अपडेट करा वर टॅप करा.
  4. मर्यादित मोबाइल डेटा वापरून अपडेट करा वर टॅप करा.
हे कसे काम करते
तुमची ॲप्‍स आपोआप अपडेट करण्यासाठी Google Play तुमच्या मासिक मोबाइल डेटाचा मर्यादित भाग वापरू शकते. Google Play हे अनेक घटकांचा वापर करून अ‍ॅप अपडेटना प्राधान्य देते, जसे की नवीन वैशिष्ट्ये असलेली अ‍ॅप्स किंवा तुम्ही सर्वाधिक वापर कराल असे आम्हाला वाटणारी अ‍ॅप्स. Google Play नेहमी सर्वप्रथम वाय-फाय वर अ‍ॅप्स अपडेट करण्याचा प्रयत्न करते.
हे सेटिंग किती मोबाइल डेटा वापरते
हे सेटिंग सुरू असते, तेव्हा Google Play हे अनेक घटकांच्या आधारे बजेट निवडते. उदाहरणार्थ:
  • तुम्ही मोबाइल डेटा वापरून मागील ३० दिवसांमध्ये अ‍ॅप्स मॅन्युअली अपडेट केली असल्यास, Google Play तो एकूण मोबाइल डेटा बजेट म्हणून वापरते.
  • तुम्ही मोबाइल डेटा वापरून अ‍ॅप्स अपडेट करत नसल्यास, Google Play हे तुमच्या देश/प्रदेशामध्ये बहुतांश लोक वापरत असलेला सरासरी प्रमाणातील मोबाइल डेटा वापरते, ज्यामुळे तुमची वारंवार वापरली जाणारी अ‍ॅप्स तरीही तुम्हाला ऑटो-अपडेट करता येतात.

सर्व माहिती Google चे गोपनीयता धोरण यानुसार वापरली जाते.

तुम्ही Play Store डेटा साफ केल्यास, तुमची सेटिंग्ज आणि मागील बजेट रीसेट केले जाईल.

स्वतंत्र Android अ‍ॅप्स आपोआप अपडेट कशी करायची

  1. Google Play Store ॲप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. अ‍ॅप्स आणि डिव्हाइस व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  4. व्यवस्थापित करा वर टॅप करा, त्यानंतर तुम्हाला आपोआप अपडेट करायचे असलेले अ‍ॅप शोधा.
  5. अ‍ॅपचे "तपशील" पेज उघडण्यासाठी, अ‍ॅपवर टॅप करा.
  6. अ‍ॅपच्या "तपशील" पेजवर, आणखी More वर टॅप करा.
  7. ऑटो अपडेट सुरू करा हे सुरू करा.

अपडेट उपलब्ध असतील तेव्हा, अ‍ॅप आपोआप अपडेट केले जाईल. ऑटोमॅटिक अपडेट बंद करण्यासाठी, ऑटो अपडेट सुरू करा हे बंद करा.

टिपा:

  • काही ॲप्स अपडेट होतात, तेव्हा त्यांना नवीन परवानग्या आवश्यक असतात. तुम्ही नवीन परवानग्या स्वीकारता का हे विचारणारी सूचना तुम्हाला मिळू शकते.
  • ॲप अपडेट करण्यासाठी, तुम्हाला डिव्हाइस रीस्टार्ट करावे लागू शकते.
  • विशिष्ट ॲप शोधण्यासाठी, ॲप्स आणि डिव्हाइस व्यवस्थापित करा आणि त्यानंतर व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  • ॲपचे अपडेट उपलब्ध असल्यास, ॲपच्या "तपशील" पेजवर "अपडेट करा" बटण दिसते.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3672561002723777750
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false