Google Drive for desktop वापरा

तुमच्या सर्व डिव्हाइस आणि क्लाउड वर आशय सहजपणे व्यवस्थापित व शेअर करण्यासाठी, Google चा डेस्कटॉप सिंक क्लायंट: Drive for desktop वापरा.

Windows File Explorer किंवा macOS Finder वापरून तुमच्या कॉंप्युटरवर तुमच्या Drive फाइल आणि फोल्डर शोधण्यासाठी Drive for desktop वापरा.

तुम्ही क्लाउड वर फाइल संपादित केल्यास, हटवल्यास किंवा हलवल्यास, तोच बदल तुमच्या कॉंप्युटर आणि डिव्हाइसवर होतो व कॉंप्युटर आणि डिव्हाइसवर बदल केल्यास तो क्लाउड वरदेखील होतो. अशाप्रकारे, तुमच्या फाइल नेहमी अप टू डेट राहतात आणि कोणत्याही डिव्हाइसवरून अ‍ॅक्सेस करता येतात.

तुम्ही पुढील गोष्टी करण्यासाठी Drive for desktop वापरू शकता:

  • क्लाउड वर स्टोअर केलेल्या फाइल थेट तुमच्या कॉंप्युटरवर उघडणे.
  • तुमच्या काँप्युटरच्या फाइल सिस्टीममध्ये स्टोरेज जागा न वापरता तुमच्या फाइल पाहणे आणि व्यवस्थापित करणे.
  • तुमच्या कॉंप्युटरवरील फोल्डर Google Drive वर सिंक करणे.
    • तुम्ही सिंक करता, तेव्हा तुमच्या फाइल क्लाउड वरून डाउनलोड होतात आणि तुमच्या कॉंप्युटरच्या हार्ड ड्राइव्हवरून अपलोड होतात.
    • तुम्ही सिंक केल्यानंतर, तुमच्या कॉंप्युटरवरील फाइल क्लाउडमधील फाइलशी जुळतात.
    • तुमच्या फाइल अप टू डेट आणि अ‍ॅक्सेस करण्यायोग्य राहतात, तुम्ही केलेले कोणतेही बदल सर्व डिव्हाइसवर लागू होतात.
  • ऑफलाइन वापरासाठी फाइल आणि फोल्डर सेव्ह करणे. यामध्ये Shared Drive वरील फाइल समाविष्ट असतात.
  • रीअल टाइममध्ये Microsoft Office फाइलवर सहयोग करणे.
  • तुम्ही ऑफिस किंवा शाळेचे खाते वापरून Windows वर Outlook वापरत असल्यास, Microsoft Outlook वापरून फाइल पाठवणे आणि सेव्ह करणे हे करा.

Drive for desktop इंस्टॉल आणि सेट करणे

Drive for desktop डाउनलोड करणे

महत्त्वाचे: तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी, तुमची ऑपरेटिंग सिस्टीम Drive for desktop सह कंपॅटिबल आहे हे तपासा.

  1. Drive for desktop डाउनलोड करा:

    WINDOWS साठी डाउनलोड करा MAC साठी डाउनलोड करा

  2. तुमच्या कॉंप्युटरवर, हे उघडा:
    • Windows: GoogleDriveSetup.exe
    • Mac: GoogleDrive.dmg
  3. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

टीप: तुम्ही ऑफिस किंवा शाळेचे खाते वापरत असल्यास, तुम्ही कदाचित Drive for desktop वापरू शकत नाही अथवा तुमच्या संस्थेला तुमच्यासाठी ते इंस्टॉल करावे लागू शकते. तुम्हाला प्रश्न असल्यास, तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटरला विचारणे हे करा.

Drive for desktop उघडणे
तुम्ही Drive for desktop वापरता, तेव्हा तुम्ही Drive for desktop मेनू ड्राइव्ह फाइल स्ट्रीम पाहू शकता:
  • Windows: तळाशी, सिस्टीम ट्रेमध्ये.
    • टीप: लपवलेले आयकन दाखवा यासाठी तुम्हाला ॲरोवर क्लिक करावे लागू शकते.
  • Mac: सर्वात वरती उजवीकडे, मेनू बारमध्ये.

Drive for desktop बंद असताना ते शोधणे आणखी सोपे करण्यासाठी, तुम्ही ते पिन करू शकता:

  • Windows:
    • स्टार्ट मेनूमध्ये Drive जोडण्यासाठी: तुमच्या स्टार्ट मेनूमध्ये, Drive आणि त्यानंतर स्टार्ट वर पिन करा वर राइट-क्लिक करा.
    • टास्कबारवर Drive जोडण्यासाठी: तुमच्या स्टार्ट मेनूमध्ये, Drive आणि त्यानंतर टास्कबार वर पिन करा वर राइट-क्लिक करा.
  • Mac:
    • तुमच्या डॉक वर Drive जोडण्यासाठी: “अ‍ॅप्लिकेशन” फोल्डरमध्ये, अलीकडे वापरलेल्या अ‍ॅप्सना वेगळे करणाऱ्या ओळीच्या डाव्या बाजूला Drive अ‍ॅप ड्रॅग करा.

Google Drive for desktop वापरण्यास सुरुवात करणे

Drive for desktop मध्ये साइन इन करणे
तुम्ही पहिल्यांदा किंवा तुमचे खाते डिस्कनेक्ट केल्यानंतर Drive for desktop उघडता, तेव्हा लॉग इन करण्यासाठी:
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Drive for desktop ड्राइव्ह फाइल स्ट्रीम उघडा.
  2. ब्राउझरवरून साइन इन करा वर क्लिक करा.
  3. तुम्हाला Drive for desktop सह वापरायच्या असलेल्या Google खाते मध्ये साइन इन करा.

टीप: तुम्ही Drive for desktop सह एका वेळेला कमाल ४ खाती वापरू शकता. एकावेळी एकाहून अधिक खाती कशी वापरावी हे जाणून घ्या.

तुमच्या Google Drive फाइल Drive for desktop मध्ये वापरणे

तुम्ही Drive for desktopइंस्टॉल करता, तेव्हा तुमच्या फाइल Windows File Explorer किंवा macOS Finder मधील “Google Drive'' स्थानामध्ये दिसतात. तुमच्या कॉंप्युटरवर, Drive for desktop ड्राइव्ह फाइल स्ट्रीम उघडा.

  1. तुमचे नाव आणि त्यानंतर Google Drive वर क्लिक करा.
    • तुमच्या किंवा तुमच्या संस्थेच्या Drive च्या मागील वापरावर आधारित, तुम्ही पुढील गोष्टीदेखील उघडू शकता:
      • माझे ड्राइव्ह
      • Shared Drive
      • इतर कॉंप्युटर
  2. फोल्डरमध्ये, तुमच्या फाइलवर डबल-क्लिक करा.
    • Google Docs, Sheets, Slides किंवा Forms द्वारे तयार केलेल्या फाइल तुमच्या ब्राउझरमध्ये उघडतात.
    • इतर फाइल तुमच्या कॉंप्युटरवरील त्यांच्या नेहमीच्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये उघडतात.

टीप: तुमच्या Drive मध्ये कोणताही आशय नसल्यास:

  • "माझे ड्राइव्ह" फोल्डर रिक्त आहे.
  • “Shared drives” किंवा “इतर कॉंप्युटर” ही दृश्ये दिसणार नाहीत.

फाइल Google Drive सह सिंक करणे किंवा Google Photos वर बॅकअप घेणे

Google Drive किंवा Google Photos सह फोल्डर सिंक करणे

तुम्ही तुमच्या कॉंप्युटरवरील फाइल Google Drive सह सिंक करू शकता आणि Google Photos वर बॅकअप घेऊ शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Drive for desktop ड्राइव्ह फाइल स्ट्रीम उघडा.
  2. सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर प्राधान्ये वर क्लिक करा.
  3. डावीकडे, तुमच्या कॉंप्युटरवरील फोल्डर वर क्लिक करा.
  4. या मेनूमधून, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • Drive सह सिंक करण्यासाठी फोल्डर जोडणे.
    • Photos वर बॅकअप घेण्यासाठी फोल्डर जोडणे.
    • आधीच कॉंफिगर केलेल्या फोल्डरची प्राधान्ये संपादित करणे.

तुम्ही Google Drive सह सिंक केल्यास:

  • फोल्डरमधील सर्व काही मिरर केले जाते. तुमच्या कॉंप्युटर आणि Google Drive दरम्यान बदल सिंक होतात.
  • तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवरून ऑनलाइन किंवा Google Drive मोबाइल अ‍ॅपवरून तुमच्या फाइल वापरू शकता. सिंक केलेली फोल्डर "कॉंप्युटर" च्या खाली दिसतात.
  • तुम्ही या फोल्डरमध्ये आयटम जोडल्यास, ते संपादित केल्यास, हलवल्यास किंवा हटवल्यास, बदल तुमच्या कॉंप्युटरवरदेखील दिसतात.

तुम्ही Google Photos वर बॅकअप घेतल्यास:

  • फक्त फोटो आणि व्हिडिओ अपलोड होतात.
  • तुमच्या कॉंप्युटरवरून हटवलेले फोटो आणि व्हिडिओ Google Photos मध्ये राहतात व Google Photos मधून हटवलेले फोटो आणि व्हिडिओ तुमच्या कॉंप्युटरवर राहतात.
  • बदल हे नवीन इमेज म्हणून अपलोड केले जातात. जुनी इमेज Google Photos मध्ये राहते.
  • तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडिओ कोणत्याही डिव्हाइसवरून ऑनलाइन किंवा Google Photos मोबाइल अ‍ॅपवर पाहू शकता.

टीप: तुम्ही फक्त फोटो आणि व्हिडिओ स्टोअर करत असल्यास, आम्ही तुम्हाला Google Photos वर बॅकअप घेण्याची शिफारस करतो. तुम्ही तुमच्या फाइल दोन्ही ठिकाणी स्टोअर करत असल्यास, फोटो आणि व्हिडिओ दोनदा अपलोड होतात, ज्यामुळे तुमचे Google स्टोरेज जास्त वापरले जाते.

तुमच्या macOS सिस्टीम फोटो लायब्ररीचा बॅकअप घेणे

महत्त्वाचे: सिस्टीम फोटो लायब्ररी ही एकमेव Apple फोटो लायब्ररी आहे जी Google Photos सह सिंक केली जाऊ शकते. याउलट, सर्व Apple फोटो लायब्ररी Drive सह सिंक केल्या जाऊ शकतात.

तुम्ही Drive सह Apple फोटो लायब्ररी सिंक केल्यास, थंबनेल आणि इतर मेटाडेटा यांसह सर्व काही सिंक होते. दुसऱ्या कॉंप्युटरवरून किंवा क्लाउड वरून या फाइलमध्ये बदल करण्याची शिफारस केली जात नाही, त्यामुळे तुमची लायब्ररी करप्ट होऊ शकते.

तुमची सिस्टीम फोटो लायब्ररी ही एकमेव लायब्ररी आहे जी iCloud फोटो, शेअर केलेले अल्बम आणि माझे फोटो स्ट्रीम यांसह वापरली जाऊ शकते. तुमच्याकडे फक्त एक फोटो लायब्ररी असल्यास, ती सिस्टीम फोटो लायब्ररी आहे. अन्यथा, तुम्ही Photos मध्ये तयार केलेली किंवा उघडलेली पहिली फोटो लायब्ररी ही तुमची सिस्टीम फोटो लायब्ररी असते.

तुमच्या iCloud मधील फोटो आणि व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी व ते Google Photos वर अपलोड करण्यासाठी हार्ड ड्राइव्हमधील जागा तात्पुरती वापरली जाते. फोटो आणि व्हिडिओचा बॅकअप घेण्याविषयी अधिक जाणून घ्या.

Drive for desktop मधील वैशिष्ट्यांविषयी जाणून घ्या

तुमची Drive for desktop सेटिंग्ज कस्टमाइझ करणे
प्रगत सेटिंग्ज वापरून तुमच्या Drive for desktop अनुभवामध्ये सुधारणा करा. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
  • सिंक करण्याशी संबंधित प्राधान्ये कस्टमाइझ करणे.
  • Microsoft Office सह रीअल-टाइम उपस्थिती सुरू किंवा बंद करणे.
  • Google Photos ची सेटिंग्ज कस्टमाइझ करणे.
  • सर्वसाधारण सेटिंग्ज, जसे की ऑटोमॅटिक लाँच, हॉटकी आणि प्रॉक्सी सेटिंग्ज कस्टमाइझ करणे.
तुमची Drive for desktop सेटिंग्ज कशी कस्टमाइझ करावी हे जाणून घ्या.
फाइल आणि फोल्डर ऑफलाइन उघडणे

तुम्ही Drive for desktop वापरून फाइल आणि फोल्डर ऑफलाइन वापरासाठी सेव्ह करू शकता. Drive for desktop सह फाइल ऑफलाइन कशा वापराव्या हे जाणून घ्या.

तुमच्या Drive फाइल शोधणे

Drive मध्ये तुमच्या फाइल शोधण्यासाठी, Drive for desktop मध्ये शोधा. तुम्ही Windows Search किंवा macOS Spotlight ऐवजी Drive for desktop मध्ये शोधता, तेव्हा तुमच्या शोधामध्ये Drive स्ट्रीम करण्याच्या स्थानावरील सर्व फाइल समाविष्ट केल्या असल्याची खात्री केली जाते.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Drive for desktop ड्राइव्ह फाइल स्ट्रीम उघडा.
  2. शोधा Search वर क्लिक करा.
  3. तुमच्या शोध संज्ञा एंटर करा.
  4. तुमची फाइल उघडा. फाइल तुमच्या कॉंप्युटरवर असल्यास, ती संलग्न अ‍ॅप्लिकेशनसह उघडते. अन्यथा, ती Drive वेबमध्ये उघडते.

टीप: शोध विंडो उघडण्यासाठी, तुम्ही शोध हॉटकी काँबिनेशनदेखील वापरू शकता.

MS Outlook आणि Office फाइलवर काम करणे

तुम्ही Drive for desktop वापरता, तेव्हा तुम्ही Office फाइलवर रीअल-टाइम उपस्थितीमध्ये काम करू शकता. ऑफिस किंवा शाळेचे खाते असलेल्या Windows वापरकर्त्यांसाठी, तुम्ही Microsoft Outlook वापरून फाइल पाठवू आणि सेव्हदेखील करू शकता. Drive for desktop सह Microsoft Office फाइल कशा वापराव्या हे जाणून घ्या.

macOS सह Drive for desktop वापरणे
माझे ड्राइव्ह मिरर करणे

मिररिंग आणि स्ट्रीमिंग हे तुमच्या फाइल सिंक करण्याचे दोन मार्ग आहेत.

  • तुमच्या कॉंप्युटरवरील फोल्डर फक्त मिरर केली जाऊ शकतात.
  • Shared drives आणि इतर कॉंप्युटर फक्त स्ट्रीम केले जाऊ शकतात.
  • माझे ड्राइव्ह हे मिरर किंवा स्ट्रीम केले जाऊ शकते.
  • Drive for desktop इंस्टॉल केल्यानंतर, "माझे ड्राइव्ह" फोल्डर स्ट्रीम केले जाते. इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही तुमची प्राधान्ये अपडेट करू शकता आणि माझे ड्राइव्ह मिरर किंवा स्ट्रीम करण्याचे निवडू शकता.

Drive for desktop वापरून स्ट्रीम आणि मिरर करण्याच्या पर्यायांविषयी जाणून घ्या.

ट्रबलशूटशी संबंधित एरर
Drive for desktop मध्ये, "ॲक्टिव्हिटी" या अंतर्गत, "काही एरर उद्भवल्या" हा बॅनर दिसतो. एररची सूची दाखवण्यासाठी, तुम्ही पुढीलपैकी एक गोष्ट करू शकता:
  • बॅनरमधील लिंकवर क्लिक करणे.
  • सेटिंग्ज आणि त्यानंतर एररची सूची वर क्लिक करणे.

एररचे निराकरण कसे करावे याविषयी अधिक जाणून घ्या.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8615917685870927853
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
99950
false
false