Google उत्पादने एकाच वेळी वापरा

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

तुम्ही Gmail आणि Calendar यांसारखी Google उत्पादने एकाच विंडोमध्ये वापरू शकता. यामुळे टॅबदरम्यान स्विच न करता उत्पादनक्षमता वाढवण्यात तुम्हाला मदत होते.

एकाच विंडोमध्ये दोन Google उत्पादने उघडणे

  1. Gmail, Calendar, Chat, Drive किंवा Google Docs, Sheets, अथवा Slides मधील फाइलवर जा.
  2. तळाशी उजवीकडे, साइड पॅनल दाखवा साइड पॅनेल दाखवा वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, तुम्हाला उघडायचे असलेले उत्पादन निवडा:
    • Calendar Calendar: तुमचे शेड्युल तपासा आणि इव्हेंट जोडा किंवा संपादित करा.
    • Keep Keep: टीप किंवा सूची तयार करा.
    • Tasks Tasks: ज्यांवर काम करायचे आहे ते आयटम आणि ते पूर्ण करण्याच्या वेळा जोडा.
    • Contacts contacts: तुमचे संपर्क अ‍ॅक्सेस करा.
    • Voice : Google Voice कॉल करा.
    • Maps Maps: Google Maps मध्ये शोधा.
  4. अ‍ॅप पॅनल बंद करण्यासाठी, उजवीकडे, बंद करा रद्द करा वर क्लिक करा.

टीप: तुमच्या साइड पॅनलवर आणखी पर्याय जोडण्यासाठी तुम्ही Google Workspace मधून अ‍ॅड-ऑन मिळवू शकता.

अधिक जाणून घ्या:

उजव्या बाजूचे पॅनल बंद करा किंवा लपवा

तुम्ही Google Workspace साइड पॅनल बंद करू किंवा लपवू शकता.

  • उजव्या बाजूचे साइड पॅनल बंद करण्यासाठी: उजवीकडे, बंद करा रद्द करा वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूचे साइड पॅनल लपवण्यासाठी: पॅनलचा विस्तार केला गेला असल्यास, अ‍ॅप पॅनलच्या सर्वात वरती उजवीकडे, बंद करा रद्द करा वर क्लिक करा. त्यानंतर, तळाशी उजवीकडे, साइड पॅनल लपवा साइड पॅनेल लपवा वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूचे साइड पॅनल दाखवण्यासाठी: तळाशी उजवीकडे, साइड पॅनल दाखवा साइड पॅनेल दाखवा वर क्लिक करा.

कॅलेंडर इव्हेंट तयार करा

  1. Gmail, Calendar, Chat, Drive किंवा Google Docs, Sheets, अथवा Slides मधील फाइलवर जा.
  2. साइड पॅनल दाखवलेले नसल्यास, तळाशी उजवीकडे, साइड पॅनल साइड पॅनेल दाखवा दाखवा वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, Google Calendar Calendar वर क्लिक करा.
  4. कॅलेंडरमध्ये एखाद्या वेळेवर क्लिक करा.
  5. इव्हेंटचे तपशील एंटर करा.
  6. सेव्ह करा वर क्लिक करा.

Google Calendar बद्दल अधिक जाणून घ्या.

कॅलेंडर इव्हेंटमध्ये दस्तऐवज जोडणे
  1. Google Drive वर जा किंवा Docs, Sheets, Slides, अथवा Drawings मध्ये फाइल उघडा.
  2. साइड पॅनल दाखवलेले नसल्यास, तळाशी उजवीकडे, साइड पॅनल साइड पॅनेल दाखवा दाखवा वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, Google Calendar Calendar वर क्लिक करा.
  4. कॅलेंडरमध्ये एखाद्या वेळेवर क्लिक करा.
  5. इव्हेंटचे तपशील एंटर करा.
  6. "वर्णन जोडा" च्या खाली, [तुमच्या दस्तऐवजाचे नाव] अटॅच करा वर क्लिक करा.
  7. सेव्ह करा वर क्लिक करा.

एखादे ठिकाण शोधणे किंवा Google Calendar मध्ये दिशानिर्देश मिळवणे

  1. काँप्युटरवर, Google Calendar Calendar वर जा.
  2. साइड पॅनल दाखवलेले नसल्यास, तळाशी उजवीकडे, साइड पॅनल दाखवा साइड पॅनेल दाखवा वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, Maps Maps वर क्लिक करा.
  4. ठिकाण शोधा.
  5. ठिकाणाबद्दलचे तपशील पहा किंवा दिशानिर्देश मिळवण्यासाठी दिशानिर्देश वर क्लिक करा.

टिपा:

  • Google Maps ला Google Calendar मध्ये उघडण्यापासून थांबवण्यासाठी: Maps पॅनलच्या सर्वात वरती उजवीकडे, बंद करा रद्द करा वर क्लिक करा. त्यानंतर, तळाशी उजवीकडे, साइड पॅनल लपवा साइड पॅनेल लपवा वर क्लिक करा. तुमची स्थाने नवीन टॅबमध्ये उघडतील.
  • थेट Google Calendar मध्ये इव्हेंटवर प्रवासाची वेळ जोडण्यासाठी: प्रवासाचा मोड आणि प्रवास निवडा, त्यानंतर Calendar वर जोडा वर क्लिक करा.

इव्हेंटच्या स्थानाचे पूर्वावलोकन करणे

  1. काँप्युटरवर, Google Calendar Calendar वर जा.
  2. इव्हेंट तयार करा आणि स्थानाशी संबंधित माहिती एंटर करा किंवा ज्यामध्ये स्थान आहे अशा सध्याच्या इव्हेंटवर क्लिक करा.
  3. पर्यायी: तुम्ही तयार करत असलेल्या इव्हेंटच्या स्थानाचे पूर्वावलोकन करण्यासाठी, Maps maps outline मध्ये पूर्वावलोकन करा वर क्लिक करा.
  4. स्थानावर क्लिक करा.
  5. उजवीकडे ठिकाणाशी संबंधित माहिती पहा.

टिपा:

  • Google Maps ला Google Calendar मध्ये उघडण्यापासून थांबवण्यासाठी: Maps पॅनलच्या सर्वात वरती उजवीकडे, बंद करा रद्द करा वर क्लिक करा. त्यानंतर, तळाशी उजवीकडे, साइड पॅनल लपवा साइड पॅनेल लपवा वर क्लिक करा. तुमची स्थाने नवीन टॅबमध्ये उघडतील.
  • थेट Google Calendar मध्ये इव्हेंटवर प्रवासाची वेळ जोडण्यासाठी: प्रवासाचा मोड आणि प्रवास निवडा, त्यानंतर Calendar वर जोडा वर क्लिक करा.

टीप किंवा सूची तयार करणे

  1. Gmail, Calendar, Chat, Drive किंवा Google Docs, Sheets, अथवा Slides मधील फाइलवर जा.
  2. साइड पॅनल दाखवलेले नसल्यास, तळाशी उजवीकडे, साइड पॅनल साइड पॅनेल दाखवा दाखवा वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, Keep Keep वर क्लिक करा.
  4. पर्याय निवडा:
    • टीप घ्या
    • नवीन सूची new note
  5. तुम्हाला हवा असलेला मजकूर जोडा.
  6. पूर्ण झाले वर क्लिक करा.

Google Keep बद्दल अधिक जाणून घ्या.

दस्तऐवज किंवा सादरीकरणामध्ये Keep टीप जोडणे
  1. Google Docs किंवा Slides मध्ये, दस्तऐवज किंवा सादरीकरण उघडा.
  2. साइड पॅनल दाखवलेले नसल्यास, तळाशी उजवीकडे, साइड पॅनल दाखवा साइड पॅनेल दाखवा वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, Keep Keep वर क्लिक करा.
  4. तुम्हाला हवी असलेली टीप किंवा सूची शोधा, त्यानंतर ती दस्तऐवज किंवा सादरीकरणावर ड्रॅग करा.
दस्तऐवज किंवा सादरीकरणामधील मजकूर Keep मध्ये सेव्ह करणे
  1. Google Docs किंवा Slides मध्ये, दस्तऐवज अथवा सादरीकरण उघडा.
  2. तुम्हाला टीपमध्ये जोडायचा असलेला मजकूर हायलाइट करा.
  3. मजकूरावर राइट-क्लिक करा, त्यानंतर Keep मध्ये सेव्ह करा निवडा.

टास्क तयार करा

  1. Gmail, Calendar, Chat, Drive किंवा Google Docs, Sheets, अथवा Slides मधील फाइलवर जा.
  2. साइड पॅनल दाखवलेले नसल्यास, तळाशी उजवीकडे, साइड पॅनल साइड पॅनेल दाखवा दाखवा वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, Tasks Tasks वर क्लिक करा.
  4. टास्क जोडा वर क्लिक करा.
  5. माहिती एंटर करा.
  6. पर्यायी: तपशील किंवा शेवटची तारीख जोडण्यासाठी, संपादित करा संपादित करा वर क्लिक करा.
  7. तुमचे पूर्ण झाल्यावर, Tasks बंद करा रद्द करा वर क्लिक करा.

टीप: तुमच्या टास्क पुन्हा क्रमवारीने लावण्यासाठी, तुम्हाला हलवायची असलेली टास्क ड्रॅग करा.

Google Tasks कसे वापरायचे ते जाणून घ्‍या.

ईमेल हे टास्क म्हणून सेव्ह करणे
  1. Gmail वर जा.
  2. साइड पॅनल दाखवलेले नसल्यास, तळाशी उजवीकडे, साइड पॅनल साइड पॅनेल दाखवा दाखवा वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, Tasks Tasks वर क्लिक करा.
  4. तुमच्या इनबॉक्समध्ये तुम्हाला टास्क म्हणून सेव्ह करायचा असलेला ईमेल शोधा.
  5. ईमेल उजव्या बाजूच्या पॅनलवर ड्रॅग करा.
तुमच्या टास्क सूचीमध्ये संगतवार लावा

तुमचे ऑफिसचे आणि वैयक्तिक आयटम यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या टास्क तुम्ही वेगळ्या करू शकता.

  1. Gmail, Calendar, Chat, Drive किंवा Google Docs, Sheets, अथवा Slides मधील फाइलवर जा.
  2. साइड पॅनल दाखवलेले नसल्यास, तळाशी उजवीकडे, साइड पॅनल दाखवा साइड पॅनेल दाखवा वर क्लिक करा.
  3. उजवीकडे, Tasks Tasks वर क्लिक करा.
  4. “माझी सूची” किंवा “टीम” च्या बाजूला सर्वात वरती, डाउन अ‍ॅरो ड्रॉप-डाउन अॅरो आणि त्यानंतर नवीन सूची तयार करा वर क्लिक करा.
  5. सूचीसाठी नाव एंटर करा, त्यानंतर पूर्ण झाले वर क्लिक करा.
  6. वेगळ्या सूचीवर जा, सर्वात वरती, तुमच्या सूचीच्या शीर्षकाच्या बाजूला, डाउन अ‍ॅरो ड्रॉप-डाउन अॅरो वर क्लिक करा. दुसरी सूची निवडा.

Gmail सह इतर अ‍ॅप्स वापरा

तुम्ही Asana, Trello, Intuit, Docusign आणि इतर टूल यांच्या समावेशासह Google Workspace उत्पादनांसह वापरण्यासाठी इतर अ‍ॅप्स जोडू शकता.

Google Workspace अ‍ॅड-ऑन इंस्टॉल करा

  1. Gmail, Calendar, Chat, Drive किंवा Google Docs, Sheets, अथवा Slides मधील फाइलवर जा.
  2. साइड पॅनल दाखवलेले नसल्यास, तळाशी उजवीकडे, साइड पॅनल साइड पॅनेल दाखवा दाखवा वर क्लिक करा.
  3. अ‍ॅड-ऑन मिळवा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला वापरायची असलेली टूल शोधा आणि ती निवडा. 
  5. इंस्टॉल करा आणि त्यानंतर पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
  6. तुमचे खाते निवडा, त्यानंतर स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.

Google Workspace अ‍ॅड-ऑन अनइंस्टॉल करा

  1. Gmail, Calendar, Chat, Drive किंवा Google Docs, Sheets, अथवा Slides मधील फाइलवर जा.
  2. साइड पॅनल दाखवलेले नसल्यास, तळाशी उजवीकडे, साइड पॅनल साइड पॅनेल दाखवा दाखवा वर क्लिक करा.
  3. तुम्हाला अनइंस्टॉल करायची असलेली अ‍ॅड-ऑन आणखी आणि त्यानंतर अ‍ॅड-ऑन व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  4. दिसत असलेल्या विंडोमध्ये, अ‍ॅड-ऑन निवडा.
  5. अनइंस्टॉल करा आणि त्यानंतर अ‍ॅप अनइंस्टॉल करा वर क्लिक करा.

तुमची संस्था Marketplace अ‍ॅप्स कशी शोधू शकते

Google Workspace च्या Google Drive किंवा Gmail यांसारख्या मुख्य सेवांचा विस्तार करण्यासाठी तुम्ही आणि तुमचे वापरकर्ते हे अ‍ॅप्स शोधण्याकरिता व इंस्टॉल करण्याकरिता Google Workspace Marketplace वापरू शकतात, तसेच Google Workspace च्या सध्याच्या क्षमता वर्धित करणारी स्टँडअलोन अ‍ॅप्स वापरू शकतात.

Google हे Marketplace अ‍ॅप्सचे पुनरावलोकन कसे करते

ते सार्वजनिकरित्या उपलब्ध व्हावे यासाठी डेव्हलपर एखादे अ‍ॅप सबमिट करतो, तेव्हा ते अ‍ॅप आमच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते याची खात्री करणे यासाठी Google सबमिशनचे पुनरावलोकन करते. वापरकर्त्यांना वापरण्यास सुरुवात करण्यात किंवा सपोर्टसाठी डेव्हलपरशी संपर्क साधण्यात मदत करण्यासाठी लिंक पुरवण्यासोबतच, डेव्हलपरने अ‍ॅपची वैशिष्ट्ये आणि ते कसे काम करते याबाबत माहिती पुरवणे आवश्यक आहे. Google हे सर्वात लोकप्रिय अ‍ॅप्ससाठी नियमित पुनरावलोकनेदेखील करते. अधिक माहितीसाठी, अ‍ॅपच्या पुनरावलोकनाबद्दल हे पहा.
याव्यतिरिक्त, वापरकर्त्याचा डेटा अ‍ॅक्सेस करण्यासाठी Google APIs वापरणाऱ्या अ‍ॅप्सना Marketplace वर अ‍ॅप उपलब्ध करून देण्यापूर्वी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागू शकते. अ‍ॅप कोणत्या प्रकारचा वापरकर्ता डेटा अ‍ॅक्सेस करत आहे आणि किती डेटा ॲक्सेस करत आहे यांवर पडताळणीची आवश्यकता आहे की नाही हे अवलंबून असते. अधिक माहितीसाठी, मी पडताळणीसाठी कसे सबमिट करू? पहा

अ‍ॅप्स कशी संगतवार लावलेली आणि रँक केलेली आहेत

Marketplace हे वापरकर्त्याची स्वारस्ये आणि गरजा यांवर आधारित उपयुक्त अ‍ॅप्स दाखवते. अ‍ॅप्स ही पुढील गोष्टींच्या आधारे रँक केली जातात:
  • अ‍ॅप वापरण्याशी संबंधित अनुभवाची गुणवत्ता आणि संपादकीय मूल्य: संपादकाची निवड या वर्गवारीमधील अ‍ॅप्स ही Google ने निवडलेली आहेत. अधिक माहितीसाठी, संपादकाची निवड हे पहा.
  • उपयुक्तता: शोध परिणाम हे अ‍ॅपचे नाव आणि शोध संज्ञेचे वर्णन हे अ‍ॅपची लोकप्रियता व त्याचे वापरकर्ता अनुभवाशी संबंधित रेटिंग यांच्याशी किती सुसंगत आहे यांवर आधारित असतात. लोकप्रियता आणि वापरकर्ता अनुभव याला सारखेच महत्त्व आहे.
  • लोकप्रियता: रॅंकिंग हे ॲप इंस्टॉल केलेल्या वापरकर्त्यांच्या संख्येवर आधारित असते. सर्वाधिक इंस्टॉल केलेली ॲप्स ही सर्वात लोकप्रिय वर्गवारीमध्ये असतात.
  • वापरकर्ता अनुभव: रेटिंगची संख्या आणि सरासरी रेटिंग ही अ‍ॅप्सउत्तम रेटिंग मिळालेली या वर्गवारीमध्ये क्रमाने लावण्यासाठी वापरली जातात. Google हे वापरकर्त्याची पुनरावलोकने आणि रेटिंगची पडताळणी करत नाही. मात्र, पुनरावलोकनाने आमच्या धोरणांचे उल्लंघन केल्यास, ते काढून टाकले जाईल. वापरकर्ते हे गैरवर्तनासंबंधित पुनरावलोकनांची तक्रार करणे हे करू शकतात.

एकाहून अधिक Google खाती शी संबंधित समस्या

तुम्ही एकाच वेळी एकाहून अधिक Google खाती मध्ये लॉग इन केल्यास, तुम्हाला तुमचे Apps Script प्रोजेक्ट, अ‍ॅड-ऑन आणि वेब अ‍ॅप्स यांच्या अ‍ॅक्सेसशी संबंधित समस्या येऊ शकतात.

मल्टी-लॉगिन किंवा एकाच वेळी एकाहून अधिक Google खाती मध्ये लॉग इन करणे याला Apps Script प्रोजेक्ट, अ‍ॅड-ऑन किंवा वेब अ‍ॅप्स यांसाठी सपोर्ट नाही.

मल्टी-लॉगिनशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी, पुढीलपैकी एखादे निराकरण वापरून पहा:

  • तुमच्या सर्व Google खाती मधून लॉग आउट करा, त्यानंतर तुम्हाला वापरायचे असलेले Apps Script प्रोजेक्ट, अ‍ॅड-ऑन किंवा वेब अ‍ॅप असलेल्या खात्यामध्ये साइन इन करा.
  • Google Chrome मध्ये गुप्त विंडो किंवा दुसरी खाजगी ब्राउझिंग विंडो उघडा आणि तुम्हाला वापरायचे असलेले Apps Script प्रोजेक्ट, अ‍ॅड-ऑन अथवा वेब अ‍ॅप असलेल्या Google खाते मध्ये साइन इन करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7920114547032931219
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
99950
false
false