Google Docs मध्ये नवीन काय आहे ते जाणून घ्या

Google Docs मधील नवीनतम अपडेटसह अप-टू-डेट रहा:

जून २०२३

पर्यायी मजकूर

इमेज, ड्रॉइंग आणि इतर ग्राफिकसाठीचा पर्यायी मजकूर हा स्क्रीन रीडर वापरणाऱ्या लोकांना स्क्रीनवर काय आहे याचे ऑडिओ वर्णन पुरवतो.

अन्यथा, वापरकर्त्याला फक्त "इमेज" हा शब्द ऐकू येतो आणि तो कोणतेही सुसंबद्ध व्हिज्युअल तपशील चुकवू शकतो. पर्यायी मजकुराबद्दल अधिक जाणून घ्या.

Google Docs मध्ये ओळ क्रमांक वापरणे
Google Docs मधील ओळ क्रमांक हे वैशिष्ट्य दस्तऐवजाच्या निवडलेल्या भागासाठी ओळीच्या स्थानाची आपोआप गणना करते आणि ते दाखवते. ओळ क्रमांकांबद्दल अधिक जाणून घ्या.

एप्रिल २०२३

इमोजी वापरून टिप्पण्यांवर प्रतिक्रिया द्या
तुम्ही Google Docs मध्ये टिप्पण्या किंवा हायलाइट केलेल्या आशयावर इमोजी प्रतिक्रिया जोडू शकता. टिप्पण्या, ॲक्शन आयटम आणि इमोजी प्रतिक्रिया कशा वापराव्यात ते जाणून घ्या.
तृतीय पक्ष स्मार्ट चिप घाला
निवडक ॲप्लिकेशनमधील URLs चे स्मार्ट चिपमध्ये रूपांतर करा ज्या अतिरिक्त माहिती प्रदर्शित करतात. इतर ॲप्लिकेशनमधून तृतीय पक्ष स्मार्ट चिप कशा घालाव्यात ते जाणून घ्या.

मार्च २०२३

आशय सारणी संपादित करा
तुमची आशय सारणी अपडेट करा किंवा फॉरमॅट बदला. दस्तावेजात शीर्षक, हेडिंग किंवा आशय सारणी जोडा.
कीवर्ड वापरून टिप्पण्या शोधा
कीवर्ड किंवा ईमेल ॲड्रेस वापरून टिप्पणी आणि तिचे स्थान शोधा. टिप्पण्या, ॲक्शन आयटम आणि इमोजी प्रतिक्रिया कशा वापराव्यात ते जाणून घ्या.

जानेवारी २०२३

प्रिंट न होणारी वर्ण दाखवा किंवा लपवा
तुमचा दस्तऐवज कसा फॉरमॅट केला आहे हे जाणून घेण्यासाठी प्रिंट न होणारे वर्ण वापरा. प्रिंट न होणारे वर्ण निळ्या रंगात दाखवले जातात आणि तुम्हाला तुमच्या दस्तऐवजात खंड, टॅब किंवा मोकळ्या जागा कुठे आहेत हे पाहू देतात. दस्तऐवज आउटलाइन, सारांश, रुलर आणि प्रिंट न होणारी वर्ण कशी पाहावीत ते जाणून घ्या.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14379260607919506384
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false