Google Docs, Sheets आणि स्लाइडवर ऑफलाइन कार्य करा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट केलेले नसल्यास तुम्ही अजूनही फायली तयार करू, पाहू आणि संपादित करू शकताः

  • Google Docs
  • Google Sheets
  • Google Slides

Open Google Docs, Sheets आणि Slides ऑफलाइन वापरा

तुम्ही तुमच्या  कॉंप्युटरवर सर्वात अलीकडे उघडलेले दस्तऐवज सेव्ह करू शकता.

तुम्ही ऑफलाइन अ‍ॅक्सेस सुरू करण्याआधी

  • तुम्ही इंटरनेटशी कनेक्‍ट केलेले असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही Google Chrome किंवा Microsoft Edge ब्राउझर वापरणे आवश्यक आहे.
  • खाजगी ब्राउझिंग वापरू नका.
  • Google Docs ऑफलाइन Chrome एक्स्टेंशन इंस्टॉल करा आणि सुरू करा.
  • तुमच्या फाइल सेव्ह करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसमध्ये पुरेशी जागा उपलब्ध असल्याची खात्री करा.

ऑफलाइन अ‍ॅक्सेस कसा सुरू करायचा

  1. Google Drive उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज  सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. ऑफलाइन सेटिंग सुरू करा. 
    1. तुम्ही Microsoft Edge वापरत असल्यास, तुम्हाला Google Docs ऑफलाइन एक्स्टेंशन डाउनलोड करण्यासाठी, Chrome वेब स्टोअर वर रीडिरेक्ट केले जाईल.
  4. ऑफलाइन काम करण्यासाठी, Google Docs, Sheets किंवा Slides उघडा. 

टीप:

  • तुम्ही Docs, Sheets किंवा Slides सेटिंग्जमधून ऑफलाइन अ‍ॅक्सेस सुरू करू शकता. तुम्ही Docs, Sheets, Slides किंवा Drive साठी ऑफलाइन अ‍ॅक्सेस सुरू केल्यास, उर्वरितदेखील ऑफलाइन उपलब्ध असतील.
  • याव्यतिरिक्त, ऑफलाइन अ‍ॅक्सेस सुरू करण्यासाठी, कोणताही Google दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा. सर्वात वरती, फाइल शीर्षकाच्या शेजारी, दस्तऐवजाचे स्टेटस पहा Cloud done आणि त्यानंतर सुरू करा आणि त्यानंतर सुरू करा वर क्लिक करा.
  • तुम्हाला दुसर्‍या Google खाते साठी ऑफलाइन अ‍ॅक्सेस वापरायचा असल्यास, तुम्ही योग्य Chrome किंवा Edge प्रोफाइलमध्ये साइन इन केले असल्याची खात्री करा. Chrome प्रोफाइल कशा स्विच करायच्या ते जाणून घ्या.

ऑफलाइन प्रवेश बंद करा

  1. Google Docs, Sheets किंवा Slides होम स्क्रीन उघडा.
  2. मेनू मेनूआणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. उजव्या बाजूला, ऑफलाइन बंद करा.
    • टीप: तुम्ही Docs, Sheets किंवा Slides साठी ऑफलाइन अ‍ॅक्सेस बंद केल्यास, तुम्ही उर्वरितांसाठीदेखील ऑफलाइन अ‍ॅक्सेस बंद कराल.

विशिष्ट फाइल ऑफलाइन उपलब्ध करा

तुमच्याकडे पुरेसे स्टोरेज असल्यास तुमच्या सर्वात अलीकडील फायली आपोआप ऑफलाइन सेव्ह केल्या जातील. ऑफलाइन सेव्ह करण्यासाठी फायली व्यक्तिचलितपणे निवडण्यासाठी:

  1. Google ड्राइव्हमध्ये ऑफलाइन अॅक्सेस चालू करण्यासाठी वरील पायरींना फॉलो करा.
  2. Google Docs, Sheets किंवा Slides उघडा.
  3. तुम्ही ऑफलाइन वापरू इच्छित असलेल्या फाईलवर, आणखी क्लिक करा अधिक.
  4. ऑफलाइन उपलब्ध आहे वर क्लिक करा. फाइल ऑफलाइन उपलब्ध आहे हे दर्शवण्यासाठी खाली डाव्या कोपर्‍यात एक बरोबरची खूण दिसेल.

टीप: तुम्ही Google दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडून आणि फाइल आणि त्यानंतर ऑफलाइन उपलब्ध करा वर क्लिक करूनदेखील फाइल ऑफलाइन उपलब्ध करू शकता.

ऑफलाइन वापरासाठी दस्तऐवज तयार आहे का ते तपासा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Docs, Sheets किंवा Slides मध्ये फाइल उघडा.
  2. सर्वात वरती, फाइल शीर्षकाच्या बाजूला, दस्तऐवजाचे स्टेटस पहा Cloud done वर क्लिक करा.

टीप: तुमचा दस्तऐवज ऑफलाइन संपादित करण्यासाठी तयार नसल्यास, त्याबद्दलचे स्पष्टीकरण दिसेल.

फायली ऑफलाइन वापरुन अडचणी दूर करा

तुम्हाला Google Docs, Sheets किंवा स्लाइड्स ऑफलाइनसह कार्य करण्यात समस्या येत असल्यास, या पायरिंचा प्रयत्न करा.

तुमचे ब्राउझर चेक करा

  • तुम्ही Google Chrome किंवा Microsoft Edge ब्राउझरवर फाइल ऑफलाइन वापरू शकता.
  • खाजगी किंवा गुप्त ब्राउझिंग वापरू नका. 
  • तुम्ही Google Docs ऑफलाइन Chrome एक्स्टेंशन हे इंस्टॉल आणि सुरू केलेले असल्याची खात्री करा.
  • तुमचा ब्राउझर अप टू डेट असल्याची खात्री करा.

एरर मेसेज: "ऑफलाइन संकालनाची स्थिती तपासत आहे. प्रतीक्षा करा."

त्रुटी संदेश: " तुमच्या प्रशासकाद्वारे ऑफलाइन संकालन अक्षम केले आहे."

तुम्ही या खात्यासह ऑफलाइन वापरू शकत नाही. तुमच्या प्रशासकाशी कसा संपर्क साधावा ते शिका.

एरर मेसेज: "दुसर्‍या वापरकर्त्याने या कॉंप्युटरवर आधीपासून ऑफलाइन प्रवेश सुरु केला आहे."

प्रत्येक ब्राउझर प्रोफाइलच्या फक्त एका खात्यामध्ये ऑफलाइन सुरू केलेले असू शकते. तुम्हाला ऑफलाइन अ‍ॅक्सेससाठी एकाहून अधिक खाती सुरू करायची असल्यास, ती स्वतंत्र ब्राउझर प्रोफाइलवर तयार करा. नवीन प्रोफाइल कशी जोडायची ते जाणून घ्या, त्यानंतर प्रत्येक प्रोफाइलमध्ये एका खात्यासाठी ऑफलाइन सुरू करा. 

ऑफलाइन सेटअप अयशस्वी झाले

ऑफलाईन बंद करा आणि पुन्हा सुरु करा 

तुमचा साइट डेटा साफ करा 

  1. chrome://settings/cookies/detail?site=docs.google.com उघडा.
    1. तुम्ही Microsoft Edge वापरत असल्यास, edge://settings/cookies/detail?site=docs.google.com उघडा
  2. सर्व काढून टाका वर क्लिक करा. 

ऑफलाइन आधीपासून चालू आहे

तुम्ही ChromeOS वापरकर्ते असल्यास, Chrome प्रोफाइल तयार करताना तुमचे दस्तऐवज आणि ड्राइव्ह सिंक करणे निवडल्यास किंवा तुमच्या डिव्हाइसवर Drive for desktop इंस्टॉल केलेले असल्यास, ऑफलाइन आपोआप सुरू केले जाईल.

ऑफलाइन बंद कसे करावे ते जाणून घ्या.

एरर मेसेज: दस्तऐवज सिंक करता आला नाही किंवा सिंक करताना समस्या आली

पायरी 1: तुमचे नेटवर्क कनेक्शन तपासा

तुमच्या नेटवर्क कनेक्शनमध्ये समस्या असू शकते. आधी तुमचे नेटवर्क कनेक्शन तपासा. त्यानंतर, ऑफलाइन अॅक्सेस बंद करा आणि पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करा.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Doc, Sheet, किंवा Slide उघडा.
  2. वरच्या बाजूला फाईल आणि त्यानंतर ऑफलाईन उपलब्ध करा वर क्लिक करा. चेक मार्क अदृश्य व्हायला हवा.
  3. वरच्या बाजूला फाईल आणि त्यानंतर ऑफलाईन उपलब्ध करा वर क्लिक करा.

एरर राहिल्यास, तुमची फाईल खूप मोठी आहे. 

पायरी 2: तुमची फाईल छोटी बनवा

  1. तुमच्या फाइलचा आकार लहान करा.
    • टीप: नवीन दस्तऐवजांमध्ये मूळ दस्तऐवजाचे लहान विभाग कॉपी करा.
  2. तुमच्या नव्या लहान दस्तऐवजाच्या सर्वात वरती फाइल आणि त्यानंतर ऑफलाइन उपलब्ध करा वर क्लिक करा.

ऑफलाइन अॅक्सेस सुधारणा करण्यात आम्हाला मदत करा

Google Docs, पत्रके आणि स्लाइडचा तुमचा ऑफलाइन अनुभव समजून घेण्यात आम्हाला मदत करण्यासाठी हे सर्वेक्षण करा.

true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16151460666933784200
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false