फाइलमध्‍ये काय बदलले ते शोधा

तुम्‍ही Google Docs, Sheets किंवा Slides मध्‍ये दस्‍तऐवजात काय बदल केले आहेत ते पाहू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2.  फाइल अपडेट करणारी शेवटची व्यक्ती कोण होती आणि त्यांनी शेवटचे बदल कधी केले होते हे पाहण्यासाठी, सर्वात वरती उजवीकडे,  शेवटचे संपादन Version history वर कर्सर फिरवा.
टीप: शेवटचे संपादन Version history आयकनवर निळा बिंदू असल्यास, त्याचा अर्थ तुम्ही शेवटचे पाहिल्यानंतर कोणीतरी फाइल अपडेट केली आहे.

फाइलच्या आधीच्या आवृत्त्यांवर काम करणे

महत्त्वाचे: फाइलच्या आधीच्या आवृत्त्या ब्राउझ करण्यासाठी, तुमच्याकडे ती फाइल संपादित करायची परवानगी असणे आवश्यक आहे.

आधीची आवृत्ती पाहणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. एखादा पर्याय निवडा:
    • सर्वात वरती, फाइल आणि त्यानंतर आवृत्ती इतिहास आणि त्यानंतर आवृत्ती इतिहास पहा वर क्लिक करा.
    • सर्वात वरती उजवीकडे, शेवटचे संपादन Version history वर क्लिक करा.
  3. नवीनतम आवृत्ती निवडा. फाइल कोणी अपडेट केली हे आणि त्यातील बदल तुम्ही पाहू शकता.
  4. (पर्यायी) तुम्हाला हे करायचे असल्यास:
    • गटबद्ध केलेल्या आवृत्त्या पाहणे: उजव्या पॅनलमध्ये, विस्तार करा डाउन ॲरो वर क्लिक करा.
    • सध्याच्या मूळ आवृत्तीवर परत जाणे: सर्वात वरती डावीकडे, मागे जा  वर क्लिक करा.

आधीची आवृत्ती रिस्टोअर करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2.  एखादा पर्याय निवडा:
    • सर्वात वरती, फाइल आणि त्यानंतर आवृत्ती इतिहास आणि त्यानंतर आवृत्ती इतिहास पहा वर क्लिक करा.
    • सर्वात वरती उजवीकडे, शेवटचे संपादन Version history वर क्लिक करा.
  3. उजव्‍या पॅनलमध्‍ये, आधीची आवृत्ती निवडा.
  4. सर्वात वरती, ही आवृत्‍ती रिस्‍टोअर करा आणि त्यानंतररिस्‍टोअर करा वर क्लिक करा.

आधीच्‍या आवृत्‍तीची प्रत बनवा

तुम्‍ही फाइलची प्रत बनवू शकता आणि आधीच्‍या आवृत्‍त्‍या संपादित करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2. एखादा पर्याय निवडा:
    • सर्वात वरती, फाइल आणि त्यानंतर आवृत्ती इतिहास आणि त्यानंतर आवृत्ती इतिहास पहा वर क्लिक करा.
    • सर्वात वरती उजवीकडे, शेवटचे संपादन Version history वर क्लिक करा.
  3. उजव्‍या पॅनलमध्‍ये, तुम्‍हाला कॉपी करायच्‍या असलेल्या आवृत्तीच्या शेजारी, आणखी अधिक आणि त्यानंतरकॉपी तयार करा वर क्लिक करा.
  4. तुमच्‍या प्रतीचे नाव एंटर करा.
  5. फाइल कुठे सेव्‍ह करायची ते निवडा.
    • त्‍याच लोकांसोबत फाइल शेअर करण्‍यासाठी, त्‍याच लोकांसोबत ती शेअर करा वर क्लिक करा.
  6. ओके वर क्लिक करा.

नाव दिलेली आवृत्ती तयार करणे

तुमचा आवृत्ती इतिहास ट्रॅक करण्यासाठी आणि तुमच्या आवृत्त्या मर्ज केलेल्या नाहीत याची खात्री करण्याकरिता तुम्ही नाव दिलेली आवृत्ती तयार करू शकता. 
  1. तुमच्या काँप्युटरवर, दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन उघडा.
  2.  एखादा पर्याय निवडा:
    • सर्वात वरती, फाइल आणि त्यानंतर आवृत्ती इतिहास आणि त्यानंतर आवृत्ती इतिहास पहा वर क्लिक करा.
    • सर्वात वरती उजवीकडे, शेवटचे संपादन Version history वर क्लिक करा.
  3. मागील आवृत्ती निवडा. फाइल आणि त्यातील बदल कोणी अपडेट केले हे तुम्ही पाहू शकता.
  4. आणखी  आणि त्यानंतर या आवृत्तीला नाव द्या वर क्लिक करा.
    • तुम्ही प्रति दस्तऐवज कमाल ४० नाव दिलेल्या आवृत्त्या जोडू शकता. 
    • तुम्ही प्रति स्प्रेडशीट कमाल १५ नाव दिलेल्या आवृत्त्या जोडू शकता. 
    • फक्त नाव दिलेल्या आवृत्त्या दाखवण्यासाठी, फक्त नाव दिलेल्या आवृत्त्या दाखवा Toggle on हे सुरू करा.
Google Docs मध्ये दस्तऐवजामधील भाग कोणी बदलला आहे हे पाहणे

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य फक्त Google Workspace Business Standard, Business Plus, Enterprise Standard, Enterprise Plus आणि Education Plus च्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, docs.google.com येथे दस्‍तऐवज उघडा.
  2. दस्तऐवजाचा भाग निवडून राइट-क्लिक करा आणि त्यानंतर संपादक दाखवा हे निवडा.
Google Sheets मध्‍ये विशिष्‍ट सेल कुणी बदलली ते पहा
  1. तुमच्‍या काँप्युटरवर, sheets.google.com वर स्‍प्रेडशीट उघडा. 
  2. सेलवर उजवीकडे क्लिक करा आणि त्यानंतर संपादन इतिहास दाखवा

टीप: काही बदल संपादन इतिहासात कदाचित दिसणार . काही उदाहरणे: 

  • जोडलेल्‍या किंवा हटवलेल्‍या पंक्‍ती आणि स्‍तंभ 
  • सेलच्‍या फॉरमॅटमधील बदल 
  • सूत्रांमधील बदल

तुमच्‍या फाइलची आधीची आवृत्ती दिसत नाही का?

स्टोरेज जागा वाचवण्यासाठी तुमच्या फाइलच्या पुनरावृत्त्या कधीकधी मर्ज केल्या जाऊ शकतात.

महत्त्वाचे: तुमच्‍याकडे फाइल संपादित करण्‍याची परवानगी नसल्‍यास, तुम्‍ही आवृत्ती इतिहास पाहू शकणार नाही.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6407462147377071954
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false