स्लाइड सादर करणे


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

तुम्ही Google Slides प्रेझेंट करू शकता जेणेकरून, त्या फुल-स्क्रीनवर दिसतील.

फुल-स्क्रीन प्रेझेंटेशन ही कॉंप्युटर, मोबाइल डिव्हाइस किंवा Chromecast अथवा AirPlay सह टिव्हीसोबत काम करते. तुम्ही प्रेझेंट करत असताना प्रेक्षकांचे प्रश्न स्वीकारणे हेदेखील करू शकता.

प्रेझेंटेशन पाहणे

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Slides ॲपमध्ये प्रेझेंटेशन उघडा.
  2. सर्वात वर असलेल्या, सादर करा प्ले कराआणि त्यानंतर या डिव्हाइसवर सादर करा वर टॅप करा.
  3. स्लाइड बदलण्यासाठी, डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा.
  4. बाहेर पडण्यासाठी, स्क्रीनवर दोनदा टॅप करा. बंद करा बंद करा वर टॅप करा.

Chromecast, Meet किंवा AirPlay वापरून सादर करणे

तुम्ही Google Chromecast वापरून तुमच्या टेलीव्हिजनवर, Google Meet किंवा AirPlay वापरून व्हिडिओ कॉलमध्ये स्लाइड सादर करू शकता.

Chromecast
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, तुमचे Chromecast ज्या वाय-फाय नेटवर्कशी जोडलेले आहे त्याच नेटवर्कशी कनेक्ट करा.
  2. Google Slides ॲपमध्ये एक प्रेझेंटेशन उघडा.
  3. कास्‍ट करा कास्‍ट करा वर टॅप करा.
  4. स्लाइड बदलण्यासाठी, उजवीकडे किंवा डावीकडे स्वाइप करा.
    • तुमच्या डिव्हाइसच्या व्‍हॉल्‍यूम बटणांनी आवाज नियंत्रित करा.
    • तुमच्या स्पीकर नोट दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी, स्पीकर नोट वर टॅप करा.
  5. कास्ट करणे थांबवण्यासाठी, बंद करा बंद करा वर टॅप करा.

टीप: Google Slides सादर करणे Chromecast अतिथी मोडमध्ये काम करत नाही. तुम्हाला तुमचे Chromecast दिसत नसल्यास, स्थानिक नेटवर्क अ‍ॅक्सेस सुरू केला आहे का ते तपासा.

तुमच्या iPhone किंवा iPad वर स्थानिक नेटवर्क अ‍ॅक्सेस सुरू करण्यासाठी:

  1. Settings अ‍ॅप वर जा.
  2. Slides अ‍ॅप शोधा.
  3. स्थानिक नेटवर्क सुरू करा.

तुम्हाला तुमचे Chromecast अजूनही दिसत नसल्यास, या अतिरिक्त ट्रबलशूटिंगच्या पायऱ्या फॉलो करून पहा.

Google Meet
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Slides ॲपमध्ये एक प्रेझेंटेशन उघडा.
  2. सादर करा प्ले करा वर टॅप करा. तुम्हाला कुठे सादर करायचे आहे ते निवडा.
  3. सादर करा वर टॅप करा.
  4. बाहेर पडण्यासाठी, सर्वात वरती, बंद करा बंद करा वर टॅप करा.
AirPlay
  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Slides ॲपमध्ये एक प्रेझेंटेशन उघडा.
  2. तुमच्या जवळपास Apple TV किंवा AirPlay चा रिसीव्हर असल्यास, तुमच्या स्क्रीनच्या तळापासून वर स्वाइप करा.
    1. AirPlay मिररिंगवर टॅप करा.
    2. तुम्हाला जो रिसिव्हर वापरायचा आहे त्यावर टॅप करा.
    3. "मिररिंग" याच्या बाजूला, स्विचवर टॅप करा.
  3. सादर करा प्ले करा वर टॅप करा.
    • स्लाइड बदलण्यासाठी, उजवीकडे किंवा डावीकडे स्वाइप करा.
    • तुमच्या डिव्हाइसच्या व्‍हॉल्‍यूम बटणांनी आवाज नियंत्रित करा.
    • तुमच्या स्पीकर नोट दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी, स्पीकर नोट वर टॅप करा.
  4. बाहेर पडण्यासाठी, सर्वात वरती, बंद करा बंद करा वर टॅप करा.

तुम्ही सादर करत असताना महत्त्वाचे मुद्दे ठळकपणे दाखवा.

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Google Slides ॲपमध्ये एक प्रेझेंटेशन उघडा.
  2. सर्वात वर असलेल्या सादर करा प्ले करा वर टॅप करा. तुम्हाला कुठे सादर करायचे आहे ते निवडा.
  3. सर्वात वर असलेल्या ड्रॉ करा संपादित करा वर टॅप करा.
  4. सादर केलेल्या स्लाइडवर ड्रॉ करण्यासाठी तुमचे बोट वापरा.
    • ड्रॉइंग काढून टाकण्यासाठी, तळाशी ड्रॉइंग साफ करा वर टॅप करा किंवा स्लाइड बदला.
    • स्लाइड बदलण्यासाठी, स्पीकर नोट विभागामध्ये, डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करा.
  5. ड्रॉइंग मोडमधून बाहेर पडण्यासाठी, ड्रॉ करा संपादित करा वर टॅप करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15534720951523934005
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false