स्क्रीन रीडरसह सादरीकरणे संपादित करा

तुम्ही तुमच्या कॉंप्युटरवर टेक्स्ट-टू-स्पीच फीडबॅक, जसे की ChromeVox, NVDA, JAWS किंवा VoiceOver यासाठी स्क्रीन रीडर वापरून प्रेझेंटेशन संपादित करू शकता.

प्रथम तुम्ही स्क्रीन रीडर सपोर्ट सुरु केल्याचे सुनिश्चित करा.

तुम्ही Windows कॉंप्युटर किंवा टच इनपुट असलेले Chromebook वापरत असल्यास, स्क्रीन रीडरसह टच इनपुट वापरणे हे करण्यासाठी टिपा फॉलो करा.

शिफारस केलेला ब्राउझर आणि स्क्रीन रीडर

Docs संपादक Chrome आणि पुढील गोष्टींची शिफारस करतात:

  • Windows वर NVDA किंवा JAWS
  • ChromeOS वर ChromeVox
  • macOS वर VoiceOver

तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये कुठेही जा

जेव्हा तुम्ही Google Slides मध्ये प्रेझेंटेशन उघडता तेव्हा तुमच्या प्रेझेंटेशनची पहिली स्लाइड ठळकपणे पुढे येते.

कीबोर्ड शॉर्टकट वापरा

सामान्‍य वेबसाइटपेक्षा स्लाइड वेगळ्या आहेत, म्‍हणून काही मानक स्‍क्रीन रीडर शॉर्टकट लागू होत नाहीत. सर्वोत्‍तम अनुभवासाठी, सादरीकरण संपादित करताना स्लाइड शॉर्टकटवापरा

उदाहरणार्थ, सादरीकरण संपादकात जाण्यासाठी खालील शॉर्टकट वापरा:

  • स्लाइड कॅन्व्हास: इतर कोणत्याही भागातून स्लाइड कॅनव्हासवर जाण्यासाठी Ctrl + Alt + Shift + cदाबा (Windows, Chrome OS) किंवा⌘ + Option + Shift + c (Mac).
  • फिल्म स्ट्रिप: सादरीकरण संपादकात सादरीकरणात सर्व स्लाइड सूचीबद्ध करण्यासाठी एक फिल्म स्ट्रिप असते. फिल्म स्ट्रिपवर लक्ष केंद्रित करण्यासाठी Ctrl + Alt + Shift + fदाबा (Windows, Chrome OS) किंवा ⌘ + Option + Shift + f (Mac). एकदा फिल्म स्ट्रिपमध्ये आल्यावर अप आणि डाऊन ॲरो वापरून स्लाइड दरम्यान हालचाल करू शकता.
  • अ‍ॅनिमेशन पेन: स्लाइडमध्ये अ‍ॅनिमेशन जोडण्यासाठी,Ctrl + Alt + Shift + bदाबून अ‍ॅनिमेशन पेन उघडा. (Windows, Chrome OS) किंवा⌘ + Option + Shift + b (Mac). आकार आणि घटकांमध्ये अ‍ॅनिमेशन जोडण्यासाठी किंवा आपल्या स्लाइडमध्ये ट्रान्झिशन जोडण्यासाठी तुमचे स्क्रीन रीडर पर्याय सांगते.
  • स्पीकर्स नोट: स्पीकर नोट हलवण्यासाठी Ctrl + Alt + Shift + sदाबा (Windows, Chrome OS) किंवाCtrl + ⌘ + Shift + s (Mac). तुम्ही स्पीकर नोट्स टाइप करता तेव्हा तुम्ही स्क्रीन रीडर फीडबॅक ऐकू शकता.

तुमच्‍या प्रेझेंटेशनमध्‍ये शॉर्टकटची यादी उघडण्‍यासाठी Ctrl + / दाबा (Windows, Chrome OS) किंवा ⌘ + / (Mac) दाबा. तुम्ही इन्सर्ट किंवास्लाइडयांसारख्या कृती शोधू शकता. तुमचे सादरीकरण परत मिळविण्यासाठी एस्केपदाबा.

मेनूज मध्ये शोध घेऊन झटपट कृती करा.

  1. Alt + / (Windows, Chrome OS) किंवा पर्याय + / (Mac) दाबा.
  2. नाव बदलणे किंवा घालणे सारखी कमांड टाइप करा. 
  3. शोध परिणाम ऐकण्‍यासाठी डाउन अ‍ॅरो दाबा. उदाहरणार्थ, तुम्‍ही घालाटाइप केल्‍यास, पर्यायांमध्‍ये इमेज, टिप्‍पणी आणि इतर निवडी जोडण्‍याचा समावेश असेल. 
  4. कृती निवडण्यासाठी एंटरदाबा.

तुमच्या स्लाइड सादर करा

पुढील ब्राउझर्स आणि स्क्रीन रीडर्स स्लाइड सादर करण्यासाठी आणि वाचण्यासाठी उत्कृष्ट कार्य करतात: 

  • Chrome OS वर Chrome सह ChromeVox वापरा.
  • Windows वर Chrome सह NVDA किंवा JAWS वापरा.
  • Mac वर Chrome सह VoiceOver वापरा.

तुमच्या स्लाइड सादर करण्यासाठी:

  1. सादरीकरण सुरु करण्यासाठी तुमच्या ब्राउझरची शॉर्टकट की वापरा: 
    • Chrome OS: Ctrl + Search + 5 
    • Windows: Ctrl + F5 
    • Mac: ⌘ + Shift + Enter 
  2. तुमच्या स्लाइडचा आशय नॅव्हिगेट करण्यासाठी, स्लाइडच्या आशयावर फोकस होईपर्यंत टॅब दाबा.
  3. पुढील किंवा मागील स्लाइडमध्ये जाण्यासाठी डाउन किंवा अप अ‍ॅरो दाबा.
  4. सादरीकरण मोडमधून बाहेर पडण्यासाठी एस्केप दाबा.
टीप: तुम्ही तुमचे सादरीकरण नेव्हिगेट करण्यायोग्य असे एकमेव, स्क्रोलेबल पेज म्हणून सदर करू शकता जसे तुम्ही सामान्य वेबपेजच्या बाबतीत करता. HTML व्ह्यू वर स्विच करण्यासाठी Ctrl + Alt + Shift + p दाबा (Windows, Chrome OS) किंवा ⌘ + Option + Shift + p (Mac).

मेनूज, वरची बटणे, आणि टूलबारचा वापर करा.

टीप: वरच्या बाजूला जर कोणतीही बटणे किंवा मेनू नसतील तर,Ctrl + Shift + f (Windows Chrome OS, किंवा Mac) दाबा.

मेनूमध्ये ब्राउझ करण्यासाठी:

  1. तुमच्या ब्राउझरसाठी शॉर्टकट बटण वापरून फाईल मेनू उघडा:
    • Chrome ब्राउझर असलेले Windows: Alt + f
    • इतर ब्राउझर्स असलेले Windows: Alt + Shift + f
    • Chrome OS: Alt + f
    • Mac: आधी पास-थ्रू की Ctrl + Option + Tab की, यानंतर Ctrl + Option + f दाबा
  2. संपादित करा, पहा, इन्सर्ट करा, स्लाइड करा, फॉरमॅट करा, मांडणी करा, टूल, सारणी, मदत आणि अ‍ॅक्सेसिबिलिटी यांसारखे इतर मेनू एक्सप्लोर करण्यासाठी राइट अ‍ॅरो दाबा.

टीप: मदत मिळविण्यासाठी मदत मेनू उघडा आणि Slides मदतनिवडा. सर्च बॉक्समध्ये पोहोचण्यासाठीटॅबदाबा आणि नंतर तुमचा शोध टाईप करा, जसे इमेजेस, आणि एंटरदाबा. मदत एका बॉक्समध्ये उघडेल जेथे तुम्ही इतर विषय वाचू किंवा नेव्हिगेट करू शकता. प्रेझेंटेशनवर परत जाण्यासाठी Escapeदाबा.

मेनूमधून तुम्ही इतर दोन नियंत्रक संचामध्ये जाऊ शकता:

  • वरच्या पातळीतील बटणे:ही बटणे सादरीकरण पातळीवरील कृतींसाठी असतात जसे नाव बदल, तारांकित करणे, शेअर करणे किंवा सादरीकरणाला दुसऱ्या फोल्डरमध्ये हलवणे. मेनूमध्ये Shift + Tabदाबा.
  • टूलबार: रंग व बॉर्डरसारखे संपादित आणि फॉरमॅट करण्‍यासाठी टूलबारमध्‍ये पर्याय आहेत. मेनूमधूनटॅबदाबा.

तुमच्या सादरीकरणामध्ये कार्य करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी अॅक्सेसिबिलिटी मेनू वापरा.

  1. तुमच्या ब्राउझरसाठी शॉर्टकट बटण वापरून अॅक्सेसिबिलिटी मेनू उघडा:
    • Chrome ब्राउझर असलेले Windows: Alt + a
    • इतर ब्राउझर्स असलेले Windows: Alt + Shift + a
    • Chrome OS: Alt + a
    • Mac: अगोदर पास-थ्रू की Ctrl + Option + Tab की, यानंतर Ctrl + Option + a  दाबा
  2. स्क्रीन रीडर, टिप्पण्या आणि आणखी बरेच काही मोठ्याने वाचणे यांसारखे पर्याय ऐकण्यासाठी डाउन अ‍ॅरो दाबा.
  3. उप-मेनू उघडण्यासाठी राइट अ‍ॅरो दाबा आणि उप-मेनू मधील पर्याय उघडण्यासाठी डाउन अ‍ॅरो दाबा.
  4. पर्याय निवडण्‍यासाठी Enter दाबा.

मूलभूत पर्यायांना संपादित आणि फॉरमॅटिंग करा

तुम्ही तुमच्या सादरीकरणात आशय आणि फॉरमॅटिंग जोडू किंवा बदलू शकता.

टेक्स्ट बॉक्स, इमेज किंवा सारणी जोडा

  1. तुम्ही ज्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स, इमेज किंवा सारणी जोडू इच्छिता त्यावर जा.
  2. मेनू शोधण्यासाठी Alt + /दाबा (Windows, Chrome OS) किंवा पर्याय + / (Mac) दाबा.
  3. तुम्‍ही जोडू शकाल अशा आयटमची सूची मिळवण्‍यासाठी घाला टाइप करा.
  4. सूची एक्‍सप्‍लोर करण्‍यासाठी अ‍ॅरो की वापरा.
  5. निवड करण्यासाठी Enterदाबा.

फॉरमॅटिंग घोषित करा किंवा बदला

तुमच्या कर्सरच्या सध्याच्या स्थानावर मजकूर किंवा परिच्छेद फॉरमॅटिंग घोषित करण्यासाठी Ctrl + Alt + a यानंतर f (Windows, Chrome OS) किंवा Ctrl + ⌘ + a यानंतर f (Mac) दाबा. 

तुम्ही लागू करू शकणार्‍या फॉरमॅटिंग शैली एक्सप्लोर करण्यासाठी मेनू बारमधील फॉरमॅट मेनू उघडा:

  1. तुमच्‍या ब्राउझरसाठी शॉर्टकट की वापरून फॉरमॅट मेनू उघडा:
    • Chrome ब्राउझर असलेले Windows: Alt + o
    • इतर ब्राउझर्स असलेले Windows: Alt + Shift + o 
    • Chrome OS: Alt + o
    • Mac: अगोदर पास-थ्रू की Ctrl + Option + Tab की, यानंतर Ctrl + Option + o  दाबा
  2. पर्याय ऐकण्यासाठी डाउन अ‍ॅरो दाबा आणि यानंतर निवडण्यासाठीएंटर दाबा.

स्लाइड्सची निर्मिती, संपादन आणि कस्टमाइझ कसे करावेत याबद्दल अधिक जाणून घ्या.

स्लाइडचे लेआउट बदला

स्लाइड लेआउट तुमच्या सादरीकरणातील प्रत्येक स्वतंत्र स्लाइडचे फॉरमॅट आहेत, जसे "शीर्षक आणि मुख्यपृष्ठ" किंवा "शीर्षक आणि दोन स्तंभ." जसे तुम्ही संपूर्ण फिल्म स्ट्रिप व्ह्यूमध्ये संचार करू लागता, तुमच्या सादरीकरणातील प्रत्येक स्लाइडच्या लेआउट बद्दल माहिती ऐकू शकता. 

  1. फिल्म स्ट्रिपमधील तुम्ही लेआउट बदलू इच्छिता ती स्लाइड निवडा.
  2. तुमच्या ब्राउझरसाठी शॉर्टकट की वापरून स्लाइड मेनू उघडा:
    • Chrome ब्राउझर असलेले Windows: Alt + s
    • इतर ब्राउझर्स असलेले Windows: Alt + Shift + s
    • Chrome OS: Alt + s
    • Mac: आधी पास-थ्रू की Ctrl + Option + Tab, यानंतर Ctrl + Option + s दाबा
  3. लेआउट लागू करा निवडा, त्यानंतर लेआउट पर्याय ऐकण्यासाठी राइट अ‍ॅरो दाबा. सध्या उघड्या असलेल्या स्लाइड लेआउट साठी तुम्हाला "निवडलेले" असे ऐकू येईल आणि इतर लेआउट पर्यायांसाठी तुम्हाला "न निवडलेले" असे पर्याय ऐकू येतील.
  4. सध्या सुरु असलेल्या स्लाइडमध्ये दुसरा लेआउट पर्याय निवडण्यासाठी एंटर दाबा.

स्लाइड्सचा क्रम बदला.

  1. फिल्म स्ट्रिपवर जाण्यासाठी Ctrl + Alt + Shift + fदाबा (Windows, Chrome OS) किंवा ⌘ + Option + Shift + f (Mac).
  2. तुम्ही हलवू इच्छिणारी स्लाइड शोधण्याकरिता अप आणि डाऊन ॲरो दाबा. एकाहून अधिक स्लाइड्स निवडण्यासाठी, शिफ्ट दाबून अ‍ॅरो कीज वापरा.
  3. निवडलेल्या स्लाइड्सना वर किंवा खाली हलविण्यासाठी, Ctrl दाबून (Windows, Chrome OS) किंवा (Mac) आणि नंतर अप आणि डाऊन ॲरो दाबा.

सादरीकरण स्पेल चेक करा

स्लाइड्स तुमच्या सादरीकरणात आपोपाप चुकीचे स्पेलिंग्ज शोधते.

  1. पुढील चुकीच्या स्पेलिंगवर जाण्यासाठी Ctrl + apostropheदाबा (Windows, Chrome OS) किंवा ⌘ + apostrophe (Mac).
  2. मागील चुकीच्या स्पेलिंगवर जाण्यासाठी Ctrl + semicolon दाबा (Windows, Chrome OS) किंवा ⌘ + semicolon (Mac).
  3. चुकीचे स्पेलिंग दुरुस्त करण्यासाठी कॉंटेक्स्ट मेनू Ctrl + Shift + x दाबून उघडा (Windows, Chrome OS) किंवा⌘ + Shift + x (Mac). कॉंटेक्स्ट मेनू मधून योग्य स्पेलिंग असलेल्या सूचना निवडा, आणिएंटरदाबा.

स्पेल चेक आणि स्वयं दुरुस्ती याबद्दल अधिक जाणून घ्या.

इमेज अथवा रेखांकनासाठी अॉल्ट टेक्स्ट जोडा

  1. इमेज किंवा रेखांकन निवडा.
  2. Ctrl + Alt + y दाबा (Windows, Chrome OS) किंवा ⌘ + Option + y (Mac).
  3. अॉल्ट टेक्स्ट डायलॉगमध्ये, इमेज किंवा रेखांकनासाठी वर्णन एंटर करा आणि नंतर एंटरनिवडा.

सादरीकरणा मध्ये सूचित आशय शोधा

  1. तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये एक्सप्लोर भाग उघडण्यासाठीCtrl + Alt + Shift + i दाबा (Windows, Chrome OS) किंवा ⌘ + Option + Shift + i (Mac).
  2. सूचक लेआऊट्स शोधण्यासाठी एक्सप्लोर भागाद्वारे नेव्हिगेट करण्यासाठी आपल्या स्क्रीन रीडर कीस्ट्रोकचा वापर करा.
  3. आपले दस्तऐवज आणि वेब शोधण्यासाठी, शोध बारमध्ये शोध प्रविष्ट करा आणि एंटर दाबा.

कॅलेंडर, कीप आणि Google टास्क्स पाहा

डॉक्स, शीट्स आणि स्लाईड्स वापरताना साइड पॅनेलमध्ये Google कॅलेंडर, कीप आणि टास्क्स वापरू शकता. साइड पॅनेलमध्ये असलेले टूल्स बाय डीफॉल्ट कोलॅप्स होतात. साइड पॅनेलमध्ये जाण्यासाठी आणि एखाद्या टूलचा विस्तार करण्यासाठी, पुढील पायऱ्या वापरा:

  1. साइड पॅनेलमध्ये जाण्यासाठी हे शॉर्टकट वापरा:
    • Windows: Ctrl + Alt + . (पूर्णविराम) किंवा Ctrl + Alt + , (स्वल्पविराम)
    • Chromebook: Alt + Shift + . (पूर्णविराम) किंवा Alt + Shift + , (स्वल्पविराम)
    • Mac: ⌘ + Option + . (पूर्णविराम) किंवा ⌘ + Option + , (स्वल्पविराम)
  2. साइड पॅनलमध्ये, Calendar, Keep आणि Tasks सारख्या टूल सूचीमध्ये जाण्यासाठी अप आणि डाऊन ॲरो दाबा.
  3. तुम्हाला वापरावयाच्या टूल्सचा विस्तार करण्यासाठी एंटरदाबा.
  4. तुम्ही आता साइड पॅनेलमध्ये, सादरीकरण न सोडता पुढील कृती करु शकता:
    • कॅलेंडरः तुमचे दैनिक वेळापत्रक पहा, कार्यक्रम संपादित करण्यासाठी त्यावर क्लिक करा, नवीन कार्यक्रम तयार करा आणि आगामी कार्यक्रमांवर जा.
    • Keep: चेकलिस्ट तयार करा आणि टिपा घ्या.
    • Tasks: कामे आणि पूर्ण करण्याच्या वेळा जोडा.
  5. साइड पॅनेल उघडे असताना तुमच्या प्रेझेंटेशनवर परत जाण्यासाठी, हे शॉर्टकट वापरा:
    • Windows: Ctrl + Alt + . (पूर्णविराम) किंवा Ctrl + Alt + , (स्वल्पविराम)
    • Chromebook: Alt + Shift + . (पूर्णविराम) किंवा Alt + Shift + , (स्वल्पविराम)
    • Mac: ⌘ + Option + . (पूर्णविराम) किंवा ⌘ + Option + , (स्वल्पविराम)
  6. साइड पॅनेल बंद करण्यासाठी, तुम्ही बंद करा वर पोहोचेपर्यंत Shift + Tab दाबा आणि यानंतर एंटर दाबा.

डॉक्स, शीट्स आणि स्लाइडसहकॅलेंडर, कीप आणि टास्क्सकसे वापरावेत याबद्दल अधिक जाणून घ्या.

 

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17759034592207919282
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false