स्‍क्रीन रीडरसह स्‍प्रेडशीट संपादित करा

तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर स्क्रीन रीडरचा वापर करून स्प्रेडशीट संपादित करू शकता.

प्रथम तुम्ही स्क्रीन रीडर सपोर्ट सुरु केल्याचे सुनिश्चित करा.

तुम्ही जर Windows कॉंप्युटर किंवा टच इनपुट असलेले Chromebook वापरत असाल तर स्क्रीन रीडरसह टच इनपुट वापरण्यासाठी टिप्सचे अनुसरण करा.

तुमच्या स्प्रेडशीटमध्ये फिरवा

जेव्हा तुम्ही स्प्रेडशीट उघडता तेव्हा तुमचे लक्ष पहिल्या सेलवर केंद्रित होते. जसे तुम्ही संपूर्ण स्प्रेडशीटमध्ये संचार करू लागता, स्क्रीन रीडर प्रत्येक सेलचा पत्ता आणि आशय तुम्हाला सांगते. उदाहरणार्थ, जर सेल C4 मध्ये "मुंबई शहर" असे असल्यास, स्क्रीन रीडर "मुंबई शहर C4" असे वाचेल.

कीबोर्ड शॉर्टकट वापरा

सामान्‍य वेबसाइटपेक्षा शीट्स वेगळ्या आहेत, म्‍हणून काही मानक स्‍क्रीन रीडर शॉर्टकट लागू करू नका. सर्वोत्‍तम अनुभवासाठी, स्प्रेडशीट संपादित करताना शीट्स शॉर्टकटवापरा

तुमच्‍या स्प्रेडशीटमध्‍ये शॉर्टकटची यादी उघडण्‍यासाठी, Ctrl + / (Windows, Chrome OS) किंवा ⌘ + / (Mac) दाबा. तुम्ही मूव्हकिंवास्तंभ यांसारख्या कृतींचा शोध घेऊ शकता. स्प्रेडशीट परत मिळविण्यासाठी, एस्केपदाबा.

मेनूज मध्ये शोध घेऊन झटपट कृती करा.

  1. Alt + / (विंडो, Chrome OS) किंवा पर्याय + / (Mac) दाबा.
  2. नाव बदला किंवाइन्सर्टसारख्या कमांड टाईप करा. 
  3. शोध परिणाम ऐकण्यासाठी डाऊन ॲरो दाबा. उदाहरणार्थ, तुम्ही जर इन्सर्ट टाईप केलत, तर पर्यायांमध्ये पंक्ती, टिप्पणी आणि इतर पर्याय समाविष्ट असतील.
  4. कृती निवडण्यासाठी एंटरदाबा.

मेनूज, वरची बटणे, आणि टूलबारचा वापर करा.

टीप: वरच्या बाजूला जर कोणतीही बटणे किंवा मेनू नसतील तर,Ctrl + Shift + f (Windows Chrome OS, किंवा Mac) दाबा.

मेनूमध्ये ब्राउझ करण्यासाठी:

  1. तुमच्या ब्राउझरसाठी शॉर्टकट बटण वापरून फाईल मेनू उघडा:
    • Chrome ब्राउझर असलेले Windows: Alt + f
    • इतर ब्राउझर्स असलेले Windows: Alt + Shift + f
    • Chrome OS: Alt + f
    • Macमध्ये: प्रथम पास-थ्रू बटणे दाबा Ctrl + Option + Tab, नंतर Ctrl + Option + f
  2. संपादित करा, पहा, इन्सर्ट करा, फॉरमॅट करा, डेटा, टूल्स, अॅड-ऑन, मदत आणि अॅक्सेसिबिलिटी सारखे इतर मेनू जाणून घेण्यासाठी उजवीकडील ॲरो बटण दाबा.

टीप: मदत मिळविण्यासाठी मदत मेनू उघडा आणि शीट्स मदतनिवडा. सर्च बॉक्समध्ये पोहोचण्यासाठी Tab दाबा, नंतर तुमचा शोध टाईप करा, जसे सूत्र, आणिएंटर दाबा. मदत एका बॉक्समध्ये उघडेल जेथे तुम्ही इतर विषय वाचू किंवा नेव्हिगेट करू शकता. स्प्रेडशीट परत मिळविण्यासाठी, एस्केपदाबा.

मेनूमधून तुम्ही इतर दोन नियंत्रक संचामध्ये जाऊ शकता:

  • वरच्या पातळीतील बटणे:ही बटणे स्प्रेडशीट पातळीवरील कृतींसाठी असतात जसे नाव बदल, तारांकित करणे, शेअर करणे किंवा स्प्रेडशीटला दुसऱ्या फोल्डरमध्ये हलवणे. मेनूमध्ये Shift + Tabदाबा.
  • Toolbar: टूलबारमध्ये संपादित करण्यासाठी आणि फॉरमॅटिंग करण्यासाठी फॉन्ट आणि अलाइनमेंट यासारखे पर्याय असतात. मेनूमधूनटॅबदाबा.

तुमच्या स्प्रेडशीटमध्ये कार्य करण्यासाठी किंवा वाचण्यासाठी अॅक्सेसिबिलिटी मेनू वापरा.

  1. तुमच्या ब्राउझरसाठी शॉर्टकट बटण वापरून अॅक्सेसिबिलिटी मेनू उघडा:
    • Chrome ब्राउझर असलेले Windows: Alt + a
    • इतर ब्राउझर्स असलेले Windows: Alt + Shift + a
    • Chrome OS: Alt + a
    • Macमध्ये: प्रथम पास-थ्रू बटणे दाबा Ctrl + Option + Tab, नंतर Ctrl + Option + a
  2. बोला, रेंजमध्ये जा आणि यांसारखे इतर अनेक पर्याय ऐकण्यासाठी डाऊन ॲरो दाबा.
  3. सब-मेनू उघडण्यासाठी उजवा अॅरो दाबा आणि सब-मेनू मधील पर्याय उलगडण्यासाठी डाउन अॅरो दाबा.
  4. एक पर्याय निवडण्यासाठी एंटरदाबा.

मूलभूत पर्यायांना संपादित आणि फॉरमॅटिंग करा

सेलमधील आशय संपादित करण्यासाठी केंद्रित सेलवर एंटरदाबा. तुमचे इच्छित बदल टाईप करा आणि नंतर तो बदल करण्यासाठी एंटरदाबा किंवा तो रद्द करण्यासाठीएस्केपदाबा.

सेल फॉरमॅटिंग आणि आशय ऐका

जसे तुम्ही संपूर्ण स्प्रेडशीटमध्ये संचार करू लागता, सेलमधील आशयाशी सुसंगत अशा सूचना तुम्हाला ऐकू येतील. उदाहरणार्थ, सेलमध्ये लिंक्स, टिपा, माहितीची वैधता किंवा फिल्टरिंग असल्यास स्क्रीन रीडर तसे तुम्हाला सांगते.

  • लिंक्स: लिंक फॉलो करण्यासाठीAlt + Enter दाबा (Windows) किंवा Option + Enter (Mac).
  • टिपा: केंद्रित सेलवरील टीप जोडण्या किंवा संपादित करण्यासाठीShift + F2 दाबा (Windows, Mac) किंवाShift + Search + 2 (Chrome OS). दिसून येणार्‍या विंडोमध्‍ये, तुमची टीप टाईप करा, आणि नंतर Escapeदाबा. टीप हटवण्यासाठी, टिपेत असलेला संपूर्ण मजकूर हटवा.
  • माहितीची वैधता : सेलमध्माये अवैध आशय असल्यास माहिती वैधतेचा परिणाम म्हणून तुम्हाला तसे ऐकू येईल.
  • फिल्टरिंग: तुम्ही जर फिल्‍टर न केलेल्या श्रेणीतील सेल्स फिल्टर श्रेणीत हलवले तर तुम्ही फिल्टर क्षेत्रात प्रवेश केला आहे असे तुम्हाला ऐकू येईल.

स्पीक मेनू वापरा

तुम्ही निवडलेल्या सेलच्या फॉरमॅटिंगसंबधी माहिती मिळविण्यासाठी किंवा पंक्ती किंवा स्तंभातील आशय ऐकण्यासाठी तुम्ही स्पीक मेनू वापरू शकता. तुम्ही तुमच्या स्प्रेडशीटला नेहमी बोला अशा फॉरमॅटिंगमध्ये सेट करू शकता.

  1. तुमच्या ब्राउझरसाठी शॉर्टकट बटण वापरून अॅक्सेसिबिलिटी मेनू उघडा:
    • Chrome ब्राउझर असलेले Windows: Alt + a
    • इतर ब्राउझर्स असलेले Windows: Alt + Shift + a 
    • Chrome OS: Alt + a
    • Macमध्ये: प्रथम पास-थ्रू बटणे दाबा Ctrl + Option + Tab, नंतर Ctrl + Option + a
  2. बोला निवडा.
  3. मेनूमध्ये संचारण करण्यासाठी डाउन अॅरो दाबा, आणि नंतर पर्याय निवडण्यासाठीएंटर दाबा.

सेल फॉरमॅटिंग बदला

तुम्ही संपूर्ण सेलचे अथवा सेलच्या काही विशिष्ट भागांचे फॉरमॅटिंग बदलू शकता.

  • संपूर्ण सेलचे फॉरमॅटिंग बदलण्यासाठी तो सेल निवडा. 
  • काही विशिष्ट भागांत बदल करण्यासाठी (जसे, एखादा शब्द ठळक करण्यासाठी), एंटर दाबा, नंतर शिफ्ट दाबून ॲरो बटणांच्या सहाय्याने तुम्हाला बदलावयाच्या भागाला निवडा. 

फॉरमॅटिंग शैली एक्सप्लोर करा

  1. तुमच्या ब्राउझरसाठी असलेली शॉर्टकट की वापरून फॉरमॅट मेनू उघडा:
    • Chrome ब्राउझर असलेले Windows: Alt + o
    • इतर ब्राउझर्स असलेले Windows: Alt + Shift + o  
    • Chrome OS: Alt + o
    • Macमध्ये: प्रथम पास-थ्रू बटणे दाबा Ctrl + Option + Tab, नंतर Ctrl + Option + o 
  2. पर्याय ऐकण्यासाठी दाबा डाउन अॅरो, आणि नंतर निवडण्यासाठीएंटर दाबा.
  3. निवडलेल्या सेलची फॉरमॅटिंग हटवण्यासाठी Ctrl + \ (Windows) दाबा किंवा ⌘ + \ (Mac).

सेल्स संपादित आणि फॉरमॅटिंग याबद्दल अधिक जाणून घ्या.

शीटला कॉपी, डुप्लिकेट किंवा नाव बदल करा

शीट मेनू तुम्हाला अॅक्टिव्ह शीटवर डुप्लिकेट, कॉपी किंवा नावात बदल यांसारख्या विविध कृती करू देते . 
  1. Alt + Shift + s दाबा (Windows) किंवा Option + Shift + s (Mac).
  2. पर्यायांमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी डाउन अॅरो दाबा, आणि एक पर्याय निवडण्यासाठी Enter दाबा.

स्प्रेडशीटमध्ये एकाधिक शीट्सवर काम करा

  1. Alt + Shift + k दाबा (Windows, Chrome OS) किंवा Option + Shift + k (Mac).
  2. सूचीमध्ये हालचाल करण्यासाठी अप आणि डाऊन ॲरो वापरा.
  3. शीटमध्ये जाण्यासाठी एंटर दाबा. 

सेलच्या श्रेणीअंतर्गत निवडा आणि काम करा

  1. तुम्हाला श्रेणीमध्ये समाविष्ट करावयाच्या पहिल्या सेलमध्ये जा.
  2. सेल्सची श्रेणी निवडण्यासाठी शिफ्ट दाबून ॲरो बटणांचा वापर करा.

श्रेणी निवडल्यानंतर, आपले लक्ष श्रेणीत केंद्रित करण्यासाठी खालील शॉर्टकट्स वापरा:

  • Enter: वरून खाली जाण्यासाठी.
  • Shift + Enter: खालून वर जाण्यासाठी.
  • Tab: डावीकडून उजवीकडे जाण्यासाठी.
  • Shift + Tab: उजवीकडून डावीकडे जाण्यासाठी.

श्रेणी निवड रद्द केल्याशिवाय सेल संपादित करण्यासाठीF2 दाबा (Windows, Mac) किंवा Search + 2 (Chrome OS).

स्तंभ आणि पंक्ती जोडा, हटवा किंवा दुसऱ्या जागी हलवा.

पंक्ती किंवा स्तंभ निवडा

  1. तुम्ही निवडू इच्छिणाऱ्या सेलमधील पंक्ती किंवा स्तंभामध्ये जा.
  2. पंक्ती निवडण्यासाठी Shift + Spaceदाबा . स्तंभ निवडण्यासाठी Ctrl + Spaceदाबा.
  3. अतिरिक्त पंक्ती किंवा स्तंभ निवडण्यासाठी Shift सह ॲरो बटणे दाबा.

पंक्ती किंवा स्तंभ जोडा

  1. तुम्ही ज्या सेलला नवीन पंक्ती किंवा स्तंभ जोडू इच्छिता तो सेल निवडा.
    • टीप: एकावेळी अनेक पंक्ती किंवा स्तंभ जोडायचे असल्यास तुम्ही जोडू इच्छित असलेल्या पंक्ती किंवा स्तंभांच्या संख्येएवढीच सेल्सची संख्या निवडा. उदाहरणार्थ, वरच्या बाजूला दोन पंक्ती जोडण्यासाठी प्रथम पंक्ती १ आणि २ मधील प्रत्येकी एक सेल निवडा.
  2. तुमच्या ब्राउझरसाठी असलेली शॉर्टकट की वापरून इन्सर्ट मेनू उघडा:
    • Chrome ब्राउझर असलेले Windows: Alt + i
    • इतर ब्राउझर्स असलेले Windows: Alt + Shift + i
    • Chrome OS: Alt + i
    • Macमध्ये: प्रथम पास-थ्रू बटणे दाबा Ctrl + Option + Tab, नंतर Ctrl + Option + i
  3. पंक्ती किंवा स्तंभ इन्सर्ट करण्यासाठी एक पर्याय निवडा.
  4. तुम्ही पहिल्या टप्प्यात एकाधिक सेल्स निवडल्यास, इन्सर्ट मेनूमध्ये एकाधिक पंक्ती किंवा स्तंभ समाविष्ट करण्याचे पर्याय आहेत.

पंक्ती किंवा स्तंभ हटवा.

  1. तुम्ही हटवू इच्छित असलेल्या पंक्ती किंवा स्तंभांमधील एक किंवा अधिक सेल निवडा. तुम्ही एकापेक्षा जास्त सेल निवडल्यास एकाच वेळी एकाधिक पंक्ती किंवा स्तंभ हटवू शकता.
  2. तुमच्या ब्राउझरसाठी शॉर्टकट बटण वापरून एडिट मेनू उघडा:
    1. Chrome ब्राउझर असलेले Windows: Alt + e
    2. इतर ब्राउझर्स असलेले Windows: Alt + Shift + e  
    3. Chrome OS: Alt + e
    4. Macमध्ये: प्रथम पास-थ्रू बटणे दाबा Ctrl + Option + Tab, नंतर Ctrl + Option + e
  3. पंक्ती किंवा स्तंभ हटविण्यासाठी एक पर्याय निवडा.

पंक्ती किंवा स्तंभ हलवा.

  1. तुम्ही हलवू इच्छित असलेल्या पंक्ती किंवा स्तंभातील एक सेल निवडा.
  2. तुम्ही हलवू इच्छित असलेला स्तंभ (Ctrl + Space) किंवा पंक्ती (Shift + Space) निवडा. एकाहून अधिक स्तंभ किंवा पंक्ती निवडण्यासाठी, शिफ्ट सह अ‍ॅरो की दाबा.
  3. तुमच्या ब्राउझरसाठी शॉर्टकट बटण वापरून एडिट मेनू उघडा:
    1. Chrome ब्राउझर असलेले Windows: Alt + e
    2. इतर ब्राउझर्स असलेले Windows: Alt + Shift + e  
    3. Chrome OS: Alt + e
    4. Macमध्ये: प्रथम पास-थ्रू बटणे दाबा Ctrl + Option + Tab, नंतर Ctrl + Option + e
  4. पंक्ती किंवा स्तंभ हलविण्यासाठी एक पर्याय निवडा.

स्तंभ आणि पंक्ती लपवा, दर्शवा किंवा फ्रीझ करा

पंक्ती किंवा स्तंभ लपवा.

  1. तुम्ही लपवू इच्छित असलेल्या पंक्ती किंवा स्तंभातील एक सेल निवडा.
  2. तुम्ही लपवू इच्छित असलेला स्तंभ (Ctrl + Space) किंवा पंक्ती (Shift + Space) निवडा. एकाहून अधिक स्तंभ किंवा पंक्ती निवडण्यासाठी, शिफ्ट सह अ‍ॅरो की दाबा.
  3. Ctrl + Shift + \ ला दाबून कॉंटेक्स्ट मेनू उघडा.
  4. स्तंभ लपवा किंवा पंक्ती लपवाइथवर पोहोचेपर्यंत डाउन अॅरो दाबा आणि नंतर एंटरदाबा.

पंक्ती किंवा स्तंभ दर्शवा

  1. लपलेल्या स्तंभ किंवा पंक्तींच्या आसपासचे स्तंभ किंवा पंक्ती निवडा.
  2. Ctrl + Shift + \ ला दाबून कॉंटेक्स्ट मेनू उघडा.
  3. स्तंभ दर्शवा किंवा पंक्ती निवडा.

पंक्ती किंवा स्तंभ फ्रीझ करा

तुम्ही कोणत्याही शीटमध्ये दहा पंक्ती किंवा पाच स्तंभ फ्रीझ करू शकता. पंक्ती आणि स्तंभ फ्रीझ केल्याने ज्यावेळी तुम्ही उर्वरित स्प्रेडशीटवर स्क्रोल केल्याता तेव्हा काही डेटा अगदी वर किंवा अगदी डावीकडे ठेवू शकता

  1. तुमच्या ब्राउझरसाठी शॉर्टकट बटण वापरून व्ह्यू' मेनू उघडा:
    • Chrome ब्राउझर असलेले Windows: Alt + v
    • इतर ब्राउझर्स असलेले Windows: Alt + Shift + v  
    • Chrome OS: Alt + v
    • Macमध्ये: प्रथम पास-थ्रू बटणे दाबा Ctrl + Option + Tab, नंतर Ctrl + Option + v
  2. पंक्ती फ्रीझ करा किंवा स्तंभ फ्रीझ करा निवडा. 
  3. शून्य ते १० पर्यंत पर्याय ऐकण्यासाठी डाउन अॅरो दाबा, आणि नंतर निवड करण्यासाठी एंटरदाबा.

तुम्ही तुमचे लक्ष फ्रीझ केलेल्या भागावर केंद्रित केल्यास स्क्रीन रीडर तुम्हाला तुम्ही फ्रीझ केलेल्या पंक्ती किंवा स्तंभांच्या आत आहात असे सांगते.

सूत्रे, चार्ट्स किंवा इमेजेस सोबत काम करा

सूत्र जोडा किंवा संपादित करा

सेलमध्ये फॉर्म्युला जोडण्यासाठी कार्याच्या नावानंतर बरोबर चिन्ह (=) टाइप करा. टाईप करीत असताना तुम्हाला सूत्राचे वाचन ऐकू येईल. कार्य आणि सूत्रयाबद्दल अधिक जाणून घ्या.

सूत्र बदलण्यासाठी किंवा हटविण्यासाठी आणि सेल संपादित करण्यासाठी एंटरदाबा, नंतर आपले बदल टाइप करा. सुत्रामध्ये एरर असल्यास तुम्हाला सेलमधील आशयासह त्या एररचे स्पष्टीकरण ऐकू येईल.

सूत्र वाचा

सेलमध्ये एखादे सूत्र असल्यास, तुम्हाला सूत्राचे मूल्य ऐकू येईल. सूत्रे वाचण्याचे काही मार्ग आहेतः

  • पर्याय १: सेल संपादित करण्यासाठी आणि त्यातील आशय वाचण्यासाठी एंटरदाबा.
  • पर्याय २: कोणताही मेनू उघडून फॉर्म्युला बारमध्ये जा, त्यानंतर फॉर्म्युला बारला टॅब करा. फॉर्म्युला बार अदृश्य असल्यास व्ह्यू मेनू उघडा आणि फॉर्म्युला बारनिवडा.
  • पर्याय ३: सर्व सूत्रे नेहमी पाहण्यासाठी शीट सेट करा. Ctrl + back quote (`) दाबा, किंवा व्ह्यू मेनूवर जा आणि Show formulasनिवडा.

चार्ट, इमेजेस किंवा रेखाचित्रे शोधा

तुमच्या स्प्रेडशीटमध्ये एम्बेड केलेले चार्ट, रेखाचित्र किंवा इमेजेस यांसारखी डेटा ग्रिडचा भाग नसलेली माहिती समाविष्ट असू शकते.

तुम्ही एम्बेडेड चार्ट, इमेज किंवा रेखाचित्रांनी कव्हर केलेल्या सेलवर नेव्हिगेट केल्यास स्क्रीन रिडर तो सेल कव्हर असल्याचे सांगतो.

जेव्हा तुम्ही स्प्रेडशीटमध्ये चार्ट निवडता तेव्हा स्क्रीन रीडर चार्टचे शीर्षक, ऑल्ट टेक्स्ट सांगतो आणि तुम्हाला चार्टचा सारांश वाचण्याचा पर्याय देतो.

चार्ट, इमेजेस, किंवा रेखाचित्रे संपादित करा

  1. तुमच्या ब्राउझरसाठी शॉर्टकट बटण वापरून अॅक्सेसिबिलिटी मेनू उघडा:
    • Chrome ब्राउझर असलेले Windows: Alt + a
    • इतर ब्राउझर्स असलेले Windows: Alt + Shift + a  
    • Chrome OS: Alt + a
    • Macमध्ये: प्रथम पास-थ्रू बटणे दाबा Ctrl + Option + Tab, नंतर Ctrl + Option + a
  2. सिलेक्ट निवडण्यासाठी, e दाबा त्यानंतर चार्ट, रेखाचित्र किंवा इमेजेस यांसारखे तुम्ही निवडू शकाल असे ऑब्जेक्ट्स ब्राउझ करण्यासाठी डाउन अॅरो दाबा. ऑब्जेक्ट निवडण्यासाठीएंटरदाबा.
  3. एम्बेडेड ऑब्जेक्ट आता निवडले आहे. येथून, एक पर्याय निवडा:
    • ऑब्जेक्ट हलविण्यासाठी ॲरो की दाबा.
    • पर्याय बटणावर हलविण्यासाठी टॅबदाबा आणि नंतर पर्याय मेनू उघडण्यासाठी एंटर तुम्ही ऑब्जेक्टवर लागू करू शकणार्‍या इतर क्रिया ब्राउझ करण्यासाठी डाउन ॲरो दाबा आणि निवडण्यासाठी एंटर दाबा.

चार्ट किंवा आलेखबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमच्या स्प्रेडशीट डेटाविषयी असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा

तुम्ही तुमच्या स्प्रेडशीटमधील डेटाबद्दल प्रश्न विचारू शकता. तुम्हाला तुमच्या डेटावर आधारित सूत्र, फॉरमॅटिंग किंवा चार्ट सूचनादेखील मिळू शकतात.

  1. Alt + Shift +xउघडा (Windows, Chrome OS) किंवा Option + Shift + x (Mac).
  2. एक्सप्लोर भागात नेव्हिगेट करण्यासाठी आपल्या स्क्रीन रीडर कीस्ट्रोकचा वापर करा आणि उत्तरे, फॉरमॅटिंग आणि विश्लेषण यासारखे मथळे ऐका.
  3. उत्तरे अनुच्छेदात, आपल्या डेटाबद्दल प्रश्न टाका आणि नंतर एंटरदाबा. तुम्ही खाली नमुना प्रश्न शोधू शकता. (टीप : उत्तर हे वैशिष्ट्य केवळ इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.)
    • उत्तर ऐकण्यासाठी, मोठ्याने वाचा आणि आन्सर कार्डद्वारे नेव्हिगेट करण्यासाठी आपल्या स्क्रीन रीडर कीस्ट्रोकचा वापर करा.
    • तुम्हाला उत्तर देण्यासाठी कोणते सूत्र वापरले गेले आहे हे शोधण्यासाठी, सूत्र बघानिवडा. क्लिपबोर्डवर सूत्र कॉपी करण्यासाठी एंटरदाबा. नंतर तुम्ही स्प्रेडशीटमध्ये सूत्र समाविष्ट करू शकता.

नमुना प्रश्न

  • "कोणत्या व्यक्तीचा स्कोअर सर्वात अधिक आहे?" (येथे "व्यक्ती" आणि "स्कोअर" तुमच्या स्प्रेडशीटमध्ये आहेत)
  • "सप्टेंबर २०१६ मधील एकूण विक्री" (येथे "विक्री" आणि "तारीख" स्तंभ तुमच्या स्प्रेडशीटमध्ये आहेत)

कार्य करत नाहीत अशा प्रश्नांची उदाहरणे:

  • "मी या सेलला ठळक कसे करू?" यासारखे मदत प्रश्न.
  • "हवामान कसे आहे?" यासारखे वेब शोध प्रश्न.

सूचित चार्ट आणि विश्लेषण च्या वापराविषयी अधिक जाऊन घ्या.

कॅलेंडर, कीप आणि टास्क्स पाहा

डॉक्स, शीट्स आणि स्लाईड्स वापरताना साइड पॅनेलमध्ये Google कॅलेंडर, कीप आणि टास्क्स वापरू शकता. साइड पॅनेलमध्ये असलेले टूल बाय डीफॉल्ट कोलॅप्स होतात. साइड पॅनेलमध्ये जाण्यासाठी आणि एखाद्या टूलचा विस्तार करण्यासाठी पुढील पायऱ्या वापरा:

  1. साइड पॅनेलमध्ये जाण्यासाठी हे शॉर्टकट वापरा:
    • Windows: Ctrl + Alt + . (पूर्णविराम)किंवा Ctrl + Alt + , (स्वल्पविराम)
    • Chromebook: Alt + Shift + . (पूर्णविराम) किंवा Alt + शिफ्ट ,(स्वल्पविराम)
    • Mac: ⌘ + Option + . (पूर्णविराम) or ⌘ + पर्याय + , (स्वल्पविराम)
  2. साइड पॅनेलमध्ये, टूल्स सूची, कॅलेंडर, कीप आणि टास्क्समध्ये जाण्यासाठी अप आणि डाऊन ॲरो दाबा.
  3. तुम्हाला वापरावयाच्या टूल्सचा विस्तार करण्यासाठी एंटरदाबा.
  4. तुम्ही आता साइड पॅनेलमध्ये, स्प्रेडशीट न सोडता पुढील कृती करु शकता:
    • कॅलेंडरः तुमचे दैनिक वेळापत्रक पहा, कार्यक्रम संपादित करण्यासाठी त्यावर क्लिक करा, नवीन कार्यक्रम तयार करा आणि आगामी कार्यक्रमांवर जा.
    • कीप: चेकलिस्ट तयार करा आणि टिपा घ्या.
    • टास्क्स: कार्य आणि पूर्ण करण्याची वेळ जोडा.
  5. साइड पॅनेल उघडे असताना तुमच्या स्प्रेडशीटवर परत जाण्यासाठी, हे शॉर्टकट वापरा:
    • Windows: Ctrl + Alt + . (पूर्णविराम)किंवा Ctrl + Alt + , (स्वल्पविराम)
    • Chromebook: Alt + Shift + . (पूर्णविराम) किंवा Alt + शिफ्ट ,(स्वल्पविराम)
    • Mac: ⌘ + Option + . (पूर्णविराम) or ⌘ + पर्याय + , (स्वल्पविराम)
  6. साइड पॅनेल बंद करण्यासाठी तुम्ही Close वर पोहोचेपर्यंत Shift + Tabदाबा आणि नंतर एंटर दाबा.

डॉक्स, शीट्स आणि स्लाईड्स सहकॅलेंडर, कीप आणि टास्क्सकसे वापरावेत याबद्दल अधिक जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13205715096940564166
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false