Google Sheets मधील एरर मेसेज ट्रबलशूट करणे: “तुमचे बदल सेव्ह करू शकत नाही. कृपया तुमची अलीकडील संपादने कॉपी करा, त्यानंतर तुमचे बदल रिव्हर्ट करा.”

तुम्हाला, Google Sheets मध्ये “तुमचे बदल सेव्ह करू शकत नाही. कृपया तुमची अलीकडील संपादने कॉपी करा, त्यानंतर तुमचे बदल रिव्हर्ट करा,” हा मेसेज दिसल्यास, तो सर्व्हरला तुमचे बदल सेव्ह करण्यासाठी खूप वेळ लागल्यामुळे असू शकतो. तुमची प्रगती पुन्हा सुरू करण्यासाठी या काही सूचना आहेत.

इंटरनेट कनेक्शनसंबंधित समस्या

तुमचे बदल कॉपी करा आणि रीलोड करा

तुमच्या इंटरनेट कनेक्शनमधील बिघाडामुळे हा एरर मेसेज ट्रिगर होऊ शकतो. तुमचे कनेक्शन रिस्टोअर करण्यासाठी, या पायऱ्या वापरून पहा:

  1. तुमचे सेव्ह न केलेले सर्व बदल कॉपी करा.
  2. शीट रीलोड करा.
  3. तुमच्या आधीच्या बदलांमध्ये पेस्ट करा.
  4. पुन्हा एरर दिसल्यास, तुमचे इंटरनेट डिस्कनेक्ट करून पुन्हा कनेक्ट करा.

तुमच्या Chrome किंवा Microsoft Edge ब्राउझरवर ऑफलाइन मोड सुरू करा 

तुमचे काम पुढे सुरू ठेवण्यासाठी, तुम्ही ऑफलाइन मोडवर स्विच करू शकता. ऑफलाइन मोड हा तुमचे काम तुमच्या डिव्हाइसवर स्थानिकरीत्या सेव्ह करतो. तुमच्या डिव्हाइसवरील इंटरनेट कनेक्शन स्थिर झाल्यावर, तुमचे सर्व स्थानिक बदल क्लाउडवर अपलोड केले जातील. ऑफलाइन मोड कसा सुरू करायचा याबद्दल अधिक जाणून घ्या

मोठ्या प्रमाणावर डेटा किंवा इमेज इनपुट करणे

मोठ्या प्रमाणावर डेटा इंपोर्ट करण्यासाठी इंपोर्ट फंक्शन वापरा

तुम्ही मोठ्या प्रमाणावर डेटा इनपुट करता, तेव्हा कॉपी करून पेस्ट करण्याऐवजी अधिक परिणामकारक आणि विश्वासार्ह इंपोर्ट फंक्शन वापरा. Google Sheets हे इंपोर्टसंबंधित विविध आवश्यकतांना सपोर्ट करण्यासाठी इंपोर्ट फंक्शनची मोठी रेंज पुरवते.

  • IMPORTRANGE - नमूद केलेल्या स्प्रेडशीटमधून सेलची रेंज इंपोर्ट करते.
  • IMPORTDATA - दिलेल्या URL वरून .csv किंवा .tsv फॉरमॅटमध्ये डेटा इंपोर्ट करते.
  • IMPORTHTML - html पेजमध्‍ये सारणी किंवा सूचीमधून डेटा इंपोर्ट करते.
  • IMPORTFEED - RSS किंवा ATOM फीड इंपोर्ट करते.

महत्त्वाचे: ही इंपोर्ट फंक्शन Excel फाइल इंपोर्ट करण्यासाठी वापरली जाऊ शकत नाहीत. Google Sheets मध्ये Excel फाइलसोबत कसे काम करायचे याबद्दल अधिक जाणून घ्या.

थेट कॉपी करून पेस्ट करण्याऐवजी तुमच्या Excel फाइल या Google Drive वर इंपोर्ट करा

तुम्ही Excel फाइलमधून Google स्प्रेडशीटवर थेट कॉपी करून पेस्ट केल्यास, तुम्हाला एररदेखील येऊ शकते. आम्ही तुम्हाला तुमची Excel फाइल पुढील पद्धतीने इंपोर्ट करावी असे सुचवतो:

  1. Sheets मध्ये, एखादी नवीन स्प्रेडशीट तयार करा किंवा सध्या असलेली उघडा.
  2. फाइलआणि त्यानंतरइंपोर्ट करा वर क्लिक करा.
  3. Excel फाइल निवडा.
  4. निवडा वर क्लिक करा.
  5. इंपोर्ट करण्याचा पर्याय निवडा:
    • नवीन स्प्रेडशीट तयार करा
    • नवीन शीट घाला
    • स्प्रेडशीट बदला
  6. डेटा इंपोर्ट करा वर क्लिक करा.
  7. सूचित केल्यास, आता उघडा वर क्लिक करा.

Google Sheets मध्ये Excel फाइलसोबत कसे काम करायचे याबद्दल अधिक जाणून घ्या

थेट कॉपी करून पेस्ट करण्याऐवजी इमेज इंपोर्ट करण्यासाठी इमेज घाला हे वापरा

इमेज इंपोर्ट करण्यासाठी, इमेज कॉपी करून पेस्ट करण्याचा आणखी परिणामकारक मार्ग असलेले "इमेज घाला" हे वापरा.

तुम्ही Sheets मध्ये इमेज पेस्ट करण्याचा प्रयत्न करून एरर मेसेज ट्रिगर केल्यास, या पायऱ्या वापरून पहा:

  1. तुमचे बदल रिव्हर्ट करा.
  2. शीट रीलोड करा.
  3. तुम्हाला जेथे इमेज जोडायची आहे त्या सेलवर क्लिक करा.
  4. घाला आणि त्यानंतर इमेज वर क्लिक करा. 
  5. तुमची इमेज सेलच्या आत किंवा सेलच्या वर ठेवणे निवडा.
    • इमेज असलेल्या सेलमध्ये मजकूरदेखील असू शकत नाही.
  6. इमेज निवडा किंवा स्नॅपशॉट घ्या.
  7. उघडा किंवा निवडा वर क्लिक करा.
Sheets च्या मर्यादा ओलांडू नका

तुमचा इनपुट डेटा Sheets च्या मर्यादा ओलांडतो, तेव्हा तो हा एरर मेसेज ट्रिगर करू शकतो. Google Sheets मध्ये मर्यादांबद्दल अधिक जाणून घ्या

 

तुम्हाला "काहीतरी चूक झाली. रीलोड करा" किंवा "फाइल लोड करू शकत नाही," असा वेगळा एरर मेसेज दिसल्यास, Sheets एररचे ट्रबलशूटिंग करण्याबद्दल अधिक जाणून घ्या

true
Visit the Learning Center

Using Google products, like Google Docs, at work or school? Try powerful tips, tutorials, and templates. Learn to work on Office files without installing Office, create dynamic project plans and team calendars, auto-organize your inbox, and more.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17378531874801282556
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false