दस्तावेजात शीर्षक, मथळा किंवा आशय सारणी जोडा


               

तुमच्या व्यवसायासाठी Google Workspace ची प्रगत वैशिष्ट्ये हवी आहेत का?

आजच Google Workspace वापरून पहा!

 

 

आता आपण आपला दस्तावेज शीर्षके,हेडिंग्ज आणि मजकूर सारणी या सारख्य़ा शैलींसह व्यवस्थापित करू शकता. आपण मजकूर शैलींचा फॉंट आणि आकार कस्टमाईझ करू शकता आणि आपल्या शैली डिफॉल्ट्स म्हणून सेट करू शकता.

आशय सारणीत जोडा,ती बदला किंवा हटवा.

आशय सारणी सह आपण आपल्या दस्तावेजाची संरचना पाहू शकता. आशयांच्या टेबलमधील प्रत्येक आयटम तुमच्या दस्तऐवजामधील शीर्षक किंवा हेडरशी लिंक होतो.

आशय सारणीत जोडा किंवा हटवा
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docsमध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. आपल्याला आशय सारणी जिथे पाहिजे तिथे क्लिक करा
  3. आणि त्यानंतर आशय सारणीघाला तिथे क्लिक करा.
  4. आपल्याला आशय सारणी कशी दिसायला हवी ते निवडा.

ती हटवण्यासाठी, राइट क्लिक करा आणि आशय सारणी हटवा वर क्लिक करा.

तुमची आशय सारणी संपादित किंवा रिफ्रेश करणे

तुम्ही तुमच्या आशय सारणीचे फॉरमॅटिंग बदलू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, आशय सारणी असलेला Google दस्तऐवज उघडा.
  2. आशय सारणीवर क्लिक करा.
  3. आशय सारणीच्या डावीकडे, आशय सारणीचे आणखी पर्यायअधिक आणि त्यानंतर आणखी पर्याय वर क्लिक करा.
  4. उजवीकडील पॅनलमध्ये, तुम्ही तुमच्या आशय सारणीचा आणि शीर्षकामधील इंडेंटचा फॉरमॅट बदलू शकता.

महत्त्वाचे: दस्तऐवज हा पेजलेस फॉरमॅट मध्ये असल्यास, तुम्ही तुमच्या आशय सारणीचे फॉरमॅटिंग बदलू शकणार नाही.

तुम्ही तुमच्या दस्तऐवजामध्ये नवीन शीर्षके आणि हेडिंग जोडल्यास, तुम्ही तुमची आशय सारणी अपडेटदेखील करू शकता.

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docsमध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. आपल्या दस्तावेजास एक हेडींग जोडा.
  3. रिफ्रेश करा वर क्लिक करारिफ्रेश करा. हा बदल आपल्या आशय सारणीस अपडेट करेल.

शीर्षक किंवा हेडिंग बनवा

मजकूराची शैली बदला
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docsमध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. आपल्याला बदलायचा आहे तो मजकूर निवडा.
  3. फॉर्मॅट आणि त्यानंतर परिच्छेद शैलीवर क्लिक करा
  4. एका मजकूर शैली वर क्लिक करा:
    • सामान्य मजकूर
    • शीर्षक
    • सबटायटल
    • हेडिंग १-६
  5. ’मजकुराची शैली’ लागू करा वर क्लिक करा.'
कस्टम मजकूर शैली वापरा
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docsमध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.
  2. आपल्याला वापरायच्या शैलीसह मजकूर निवडा.
  3. फॉर्मॅट आणि त्यानंतर परिच्छेद शैली आणि त्यानंतर सामान्य मजकूरकिंवाहेडिंग1-6 आणि त्यानंतर जुळवण्य़ासाठी ’हेडिंग’अपडेट करावर क्लिक करा.
  4. आपल्या दस्तवेजातील समान मजकूर प्रकारातील मजकूर,उदा-"मजकूर 4" or "किंवा सामान्य मजकूर," आपल्या सुरुवातीच्या निवडीशी जुळण्यासाठी अपडेट केला जाईल.

टीप:आपण सामान्य मजकूराची शैली बदललयास, हेडिंग फॉन्ट्स सुध्दा नव्या शैलीत बदलतील.

सेट करा आणि डिफॉल्ट शैली बदला

तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, Google Docsमध्‍ये एक दस्‍तऐवज उघडा.

  • डिफॉल्ट शैली सेट करा:फॉर्मॅट आणि त्यानंतर परिच्छेद शैली आणि त्यानंतर पर्याय आणि त्यानंतर माझ्या डिफॉल्ट शैली म्हणून सेव्ह करावर क्लिक करा.
  • डिफॉल्ट शैली सेट करा: फॉर्मॅट आणि त्यानंतर परिच्छेद शैली आणि त्यानंतर पर्याय आणि त्यानंतर माझ्या डिफॉल्ट शैली वापरावर क्लिक करा.
  • मूळ दस्तऐवज Google शैलीमध्ये रिस्टोअर करा:फॉरमॅट आणि त्यानंतर परिच्छेद शैली आणि त्यानंतर पर्याय आणि त्यानंतर शैली रिसेट करा वर क्लिक करा.

तुमच्या Google दस्तऐवज मध्ये कोलॅप्स करता येणारी शीर्षके वापरणे

तुमचा दस्तऐवज पेजलेस मोड मध्ये असल्यास, तुमचा आशय व्यवस्थापित करण्यासाठी किंवा विशिष्ट विभाग लपवण्याकरिता, तुम्ही तुमच्या टाइल आणि शीर्षके ही विस्तार व कोलॅप्स करू शकता.

टीप: Google दस्तऐवजाचा संपादन, टिप्पणी किंवा पाहण्याचा अ‍ॅक्सेस असलेली कोणतीही व्यक्ती ही शीर्षके विस्तार आणि कोलॅप्स करू शकते.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, पेजलेस मोडमध्ये असलेला Google दस्तऐवज उघडा.
  2. तुम्हाला विस्तार किंवा कोलॅप्स करायच्या असलेल्या शीर्षकावर कर्सर फिरवा.
  3. शीर्षकाच्या डावीकडे, शीर्षक विस्तार करा आणि त्यानंतर किंवा शीर्षक कोलॅप्स करा Collapse वर क्लिक करा.

एकाहून अधिक शीर्षके विस्तार किंवा कोलॅप्स करणे

तुमच्याकडे दस्तऐवजामध्ये अनेक शीर्षके असल्यास, तुम्ही एकाच शैलीची सर्व शीर्षके कोलॅप्स करणे किंवा विस्तार करणे निवडू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, पेजलेस मोडमध्ये असलेला Google दस्तऐवज उघडा.
  2. शिर्षकावर राइट क्लिक करा.
  3. एकाच शैलीची सर्व शीर्षके विस्तार करा Expand all किंवा एकाच शैलीची सर्व शीर्षके कोलॅप्स करा Collapse all वर क्लिक करा.

संबंधित लिंक्स

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8567712101055802031
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false