Google Docs, Sheets, Slides आणि Jamboard यांसह Google Meet वापरणे

Google Docs, Sheets, Slides किंवा Jamboard यांमधून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • Google Meet व्हिडिओ मीटिंगमध्ये सामील होणे
  • Google Meet व्हिडिओ मीटिंगवर थेट प्रेझेंट करणे

महत्त्वाचे: Google Meet व्हिडिओ मीटिंगमध्ये सामील होण्यासाठी किंवा Google Docs, Sheets, Slides अथवा Jamboard यांवरून प्रेझेंट करण्यासाठी, तुम्ही Chrome किंवा Edge ब्राउझर असलेला कॉंप्युटर वापरणे आवश्यक आहे.

Doc, Sheet, Slides किंवा Jamboard यांमधून Google Meet व्हिडिओ मीटिंगमध्ये सामील होणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, खालीलपैकी एका प्रोग्राममध्ये फाइल उघडा:
  2. सर्वात वरती उजवीकडे, Meet वर क्लिक करा.
  3. एखादा पर्याय निवडा:
    • शेड्युल केलेल्या मीटिंगमध्ये सामील होण्यासाठी, तुम्हाला सामील व्हायचे आहे त्या मीटिंगच्या नावावर क्लिक करा.
    • मीटिंग कोड वापरून मीटिंगमध्ये सामील होण्यासाठी, मीटिंग कोड वापरा आणि त्यानंतर कोड एंटर करा वर क्लिक करा.
  4. तुमचे दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा व्हाइटबोर्ड यांमध्ये मीटिंग जोडण्यासाठी, कॉलमध्ये सामील व्हा वर क्लिक करा. उजवीकडे, साइड पॅनलवर तुमची मीटिंग दिसते.​
    • तुम्ही “कॉलमध्ये सामील व्हा” वर क्लिक केले असल्यास, तुम्ही तुमची फाइल प्रेझेंट करू शकत नाही किंवा इतर सहभागी मीटिंग कशी पाहतात ते बदलू शकत नाही.
  5. तुमचा दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा व्हाइटबोर्ड प्रेझेंट करण्यासाठी, सर्वात खालती उजवीकडे, स्क्रीन शेअर करास्क्रीन शेअर करणे वर क्लिक करा, त्यानंतर तुम्ही असलेल्या टॅबमध्ये क्लिक करा, नंतर शेअर करा वर क्लिक करा.
    • महत्त्वाचे: तुम्ही तुमचा दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा व्हाइटबोर्ड यांवरून टॅब प्रेझेंट करता, तेव्हा कोणता टॅब प्रेझेंट कराल ते बदलू शकत नाही. तुम्ही प्रेझेंट करत असताना टॅब दरम्यान स्विच करण्यासाठी, त्याऐवजी Google Meet वरून प्रेझेंट करणे हे करू शकता.
  6. तुमचे प्रेझेंटेशन थांबवण्यासाठी, सर्वात खाली उजवीकडे, प्रेझेंट करणे थांबवा सादरीकरण रद्द करणे वर क्लिक करा.

तुमच्या फाइलमधून नवीन Google Meet व्हिडिओ मीटिंग सुरू करा

  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, फाइल Google Docs, Sheets, Slides किंवा Jamboard यांमध्ये उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, Meet वर क्लिक करा.
  3. नवीन मीटिंग सुरू करण्यासाठी, नवीन मीटिंग सुरू करा वर क्लिक करा. उजवीकडे, साइड पॅनलवर तुमची मीटिंग दिसते.
  4. तुमच्या मीटिंगमध्ये लोकांना आमंत्रित करण्यासाठी आणि:
    • इतर लोकांना कॉलमध्ये जोडण्याकरिता: “फक्त हा व्हिडिओ कॉल” च्या बाजूला, कॉपी करा वर क्लिक करा.
    • इतर लोकांना कॉलमध्ये जोडण्यासाठी आणि फाइलमध्ये सहयोग करण्याकरिता: “ही फाइल आणि व्हिडिओ कॉल” च्या बाजूला, कॉपी करा वर क्लिक करा.
  5. तुमचा दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा व्हाइटबोर्ड प्रेझेंट करण्यासाठी, सर्वात खाली उजवीकडे, स्क्रीन शेअर करा स्क्रीन शेअर करणे, वर क्लिक करा, त्यानंतर तुम्ही असलेल्या टॅबवर क्लिक करा, नंतर शेअर करा वर क्लिक करा.
    • तुमचे प्रेझेंटेशन थांबवण्यासाठी, सर्वात खाली उजवीकडे, प्रेझेंट करणे थांबवा सादरीकरण रद्द करणे वर क्लिक करा.
    • महत्त्वाचे: तुम्ही तुमचा दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा व्हाइटबोर्ड यांवरून टॅब प्रेझेंट करता, तेव्हा कोणता टॅब प्रेझेंट कराल ते बदलू शकत नाही. तुम्ही प्रेझेंट करत असताना टॅब दरम्यान स्विच करण्यासाठी, त्याऐवजी Google Meet वरून प्रेझेंट करणे हे करू शकता.
  6. तुमच्या व्हिडिओ मीटिंगमधून बाहेर पडण्यासाठी, सर्वात खाली उजवीकडे, कॉलमधून बाहेर पडा कॉल संपवा वर क्लिक करा.

तुमच्या फाइलमध्ये Google Meet व्हिडिओ मीटिंग ट्रान्सफर करणे

तुम्ही एकाच डिव्हाइसवर Google Meet व्हिडिओ मीटिंग तुमच्या दस्तऐवज, शीट किंवा स्लाइड टॅबवर थेट ट्रान्सफर करू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Meet वर जा.
  2. मीटिंगमध्ये सामील व्हा.
  3. तुम्हाला Google Docs, Sheets, Slides , किंवा Jamboard यांमधील ज्या फाइलवर Google Meet व्हिडिओ मीटिंग ट्रान्सफर करायची आहे ती फाइल उघडा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, Meet वर क्लिक करा.
  5. कॉल येथे जोडा वर क्लिक करा.
    • तुम्ही दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा व्हाइटबोर्ड यांमध्ये व्हिडिओ मीटिंग जोडता तेव्हा, तो तुमचा टॅब प्रेझेंट करत नाही.
    • तुमचा दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा व्हाइटबोर्ड प्रेझेंट करण्यासाठी, सर्वात खाली उजवीकडे, स्क्रीन शेअर करास्क्रीन शेअर करणे वर क्लिक करा, त्यानंतर तुम्ही असलेल्या टॅबमध्ये क्लिक करा, नंतर शेअर करा वर क्लिक करा.
      • महत्त्वाचे: तुम्ही तुमचा दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा व्हाइटबोर्ड यांवरून टॅब प्रेझेंट करता, तेव्हा कोणता टॅब प्रेझेंट कराल ते बदलू शकत नाही. तुम्ही प्रेझेंट करत असताना टॅब दरम्यान स्विच करण्यासाठी, त्याऐवजी Google Meet वरून प्रेझेंट करणे हे करू शकता.
  6. तुमच्या व्हिडिओ मीटिंगमधून बाहेर पडण्यासाठी, सर्वात खाली उजवीकडे, कॉलमधून बाहेर पडा कॉल संपवा वर क्लिक करा.
तुमच्या फाइलमधून Google Meet व्हिडिओ मीटिंगमध्ये प्रेझेंट करणे

 तुम्ही Google Docs, Sheets, Slides किंवा Jamboard मधील फाइलमधून थेट Google Meet व्हिडिओ मीटिंगमध्ये प्रेझेंट करू शकता. तुम्ही हा पर्याय वापरता, तेव्हा तुमचा माइक, स्पीकर आणि कॅमेरा उपलब्ध नसतो.

  1. Google Meet व्हिडिओ मीटिंगमध्ये सामील होणे.
  2. फाइल Docs, SheetsSlides किंवा Jamboard मध्ये उघडा.
  3. सर्वात वरती, Meet वर क्लिक करा.
  4. एखादा पर्याय निवडा:
    • शेड्युल केलेल्या मीटिंगमध्ये प्रेझेंट करण्यासाठी, तुम्हाला ज्या मीटिंगमध्ये सामील व्हायचे आहे त्या मीटिंगच्या नावावर क्लिक करा.
    • मीटिंग कोड असलेल्या मीटिंगमध्ये प्रेझेंट करण्यासाठी, मीटिंग कोड वापरा वर क्लिक करा, त्यानंतर मीटिंग कोड एंटर करा. हायब्रिड कोलॅबोरेशनसाठी Meet सोबत सहयोगी मोड वापरणे.
  5. फक्त हा टॅब प्रेझेंट करा वर क्लिक करा.
    • महत्त्वाचे: तुम्ही मीटिंग आधीपासून उघडलेली नसल्यास आणि तुम्ही फक्त हा टॅब प्रेझेंट करा वर क्लिक केल्यास, तुमची फाइल प्रेझेंट कराल, पण फाइल टॅबवर Google Meet व्हिडिओ मीटिंग पाहू शकणार नाही. तुम्ही प्रेझेंट करत असताना तुमचा दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा व्हाइटबोर्ड, आणि Google Meet व्हिडिओ मीटिंग हे सर्व एकाच टॅबवर पाहण्यासाठी, Docs, Sheets अथवा Slides वरून व्हिडिओ मीटिंगमध्ये सामील होणे हे करण्याकरिता पायऱ्या फॉलो करा.
  6. तुम्ही ज्या टॅबवर आहात तो निवडा.
  7. टॅब शेअर करण्यासाठी, शेअर करा वर क्लिक करा.
    • महत्त्वाचे: तुम्ही तुमचा दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा व्हाइटबोर्ड यांवरून टॅब प्रेझेंट करता तेव्हा, तुम्ही कोणता टॅब प्रेझेंट कराल ते बदलू शकत नाही. तुम्ही प्रेझेंट करत असताना टॅब दरम्यान स्विच करण्यासाठी, त्याऐवजी Google Meet वरून प्रेझेंट करणे हे करू शकता.
  8. Meet मध्ये, तुमचा प्रेझेंट केलेला आशय थेट मीटिंगमध्ये पहा.

तुमच्या फाइलमधून व्हिडिओ मीटिंगसाठी लिंक शेअर करा

तुम्ही Google Meet व्हिडिओ मीटिंगमध्ये असताना Google Docs, Sheets किंवा Slides फाइल वापरत असल्यास, तुम्ही मीटिंगमधील सर्व सहभागींना फाइलची लिंक शेअर करू शकता. तुम्ही व्हिडिओ मीटिंगसाठीची URL देखील शेअर करू शकता.

Docs, Sheets किंवा Slides च्या फाइलची लिंक शेअर करणे
तुम्ही Meet चॅटद्वारे मीटिंगमधील सर्व सहभागी व्यक्तींसोबत तुमच्या फाइलची लिंक शेअर करू शकता.
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, पुढीलपैकी एका प्रोग्राममध्ये फाइल उघडा:
  2. तुमच्या फाइलमधून Google Meet व्हिडिओ मीटिंगमध्ये सामील व्हा किंवा तुमच्या फाइलमधून व्हिडिओ मीटिंगमध्ये प्रेझेंट करा.
  3. जर तुम्ही:
    • आत्ताच व्हिडिओ मीटिंगमध्ये फाइल प्रेझेंट केली असल्यास, सर्वात वरती उजवीकडे, स्क्रीन शेअर करा स्क्रीन शेअर करणे वर क्लिक करा.
    • तुमच्या फाइलमधून कॉलमध्ये सामील झाले असल्यास, सर्वात वरती उजवीकडे,  वर क्लिक करा.
  4. मीटिंगमधील चॅट वर फाइल शेअर करा वर क्लिक करा.
  5. मीटिंगमधील सहभागी व्यक्तींना तुमच्या मालकीच्या किंवा तुम्हाला संपादन अ‍ॅक्सेस असलेल्या फाइलचा अ‍ॅक्सेस नसल्यास, पॉप-अप विंडो दिसू शकते. तुमच्या फाइलच्या बाबतीत लोकांची भूमिका काय असेल हे ठरवण्यासाठी, दर्शक, टिप्पणी करणारी व्यक्ती किंवा संपादक निवडा.
    • टीप: तुमच्याकडे Calendar इव्हेंटची मालकी किंवा त्यात फेरबदल करण्याचा अ‍ॅक्सेस असल्यास, ती फाइल Calendar इव्हेंटलादेखील अटॅच केली जाईल. तुम्हाला फाइल अटॅच करायची नसल्यास, "Calendar इव्हेंटला फाइल अटॅच करा" ची निवड रद्द करा.
  6. Meet चॅटमध्ये शेअर करा वर क्लिक करा.

व्हिडिओ मीटिंगसाठीची लिंक शेअर करा

  • व्हिडिओ मीटिंग शेअर करा:
    1. उजवीकडे, आणखी अधिक आणि त्यानंतर लोक वर क्लिक करा.
    2. “इतरांना जोडण्यासाठी लिंक शेअर करा” वरून, फक्त हा व्हिडिओ कॉल वर क्लिक करा.
  • व्हिडिओ मीटिंग आणि फाइल शेअर करा:
    1. उजवीकडे, आणखी अधिक आणि त्यानंतर लोक वर क्लिक करा.
    2. “इतरांना जोडण्यासाठी लिंक शेअर करा” वरून, ही फाइल आणि व्हिडिओ कॉल वर क्लिक करा.

ट्रबलशूटिंग टिपांबद्दल जाणून घ्या

"मला ऑडिओ किंवा व्हिडिओसंबंधित समस्या येत आहेत."

  • तुम्हाला तुमच्या दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा व्हाइटबोर्ड टॅबमध्ये ऑडिओ ऐकू येत नसल्यास, साइट म्यूट केली आहे का ते तपासा:
    1. सर्वात वरती, टॅबवर राइट-क्लिक करा.
    2. साइट अनम्यूट करा वर क्लिक करा.
  • तुमचा मायक्रोफोन किंवा कॅमेरा तुमचे दस्तऐवज, स्प्रेडशीट अथवा प्रेझेंटेशन यांमध्ये काम करत नसल्यास, "docs.google.com" साठी कॅमेरा किंवा मायक्रोफोनचा अ‍ॅक्सेस ब्लॉक करणे हे केले आहे का ते तपासा.

"मी माझ्या Google Meet ची सर्व वैशिष्ट्ये वापरू शकत नाही."

  • तुम्ही दस्तऐवज, स्प्रेडशीट किंवा प्रेझेंटेशन यांमध्ये Google Meet व्हिडिओ मीटिंग जोडता, तेव्हा Google Meet ची काही वैशिष्ट्ये उपलब्ध नसतात. उदाहरणार्थ, तुम्ही पुढील गोष्टी करू शकत नाही:
    • तुमचा बॅकग्राउंड बदलणे
    • मतचाचणी किंवा प्रश्नोत्तर सेशन तयार करा
  • ही वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, तुम्ही तुमची व्हिडिओ मीटिंग दस्तऐवज, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन किंवा व्हाइटबोर्ड यांवरून Google Meet मध्ये हलवू शकता. सर्वात वरती उजवीकडे, पॉप-आउट Open in new (pop out) वर क्लिक करा.

"मी वेगळा टॅब प्रेझेंट करू शकत नाही."

तुम्ही तुमचे दस्तऐवज, स्प्रेडशीट प्रेझेंटेशन किंवा व्हाइटबोर्ड यांवरून टॅब प्रेझेंट करता तेव्हा, त्या फाइलसाठी टॅब निवडणे आवश्यक आहे. तुम्ही दुसरी विंडो किंवा टॅब निवडल्यास, टॅब प्रेझेंट करू शकत नाही. तुम्ही प्रेझेंट करत असताना टॅब दरम्यान स्विच करण्यासाठी, त्याऐवजी Google Meet वरून प्रेझेंट करणे हे करू शकता.

संबंधित लेख

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3817021436168048182
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false