Google Workspace ॲड-ऑन

Google Workspace अ‍ॅड-ऑन तुम्हाला Docs, Sheets आणि Slides यांसह आणखी बरेच काही करू देते. 

अ‍ॅड-ऑन इंस्‍टॉल करा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर दस्तऐवज, पत्रक किंवा स्लाइड उघडा.
  2. उजवीकडे, ॲड-ऑन मिळवा जोडा वर क्लिक करा.
  3. ॲड-ऑनचे वर्णन पाहण्यासाठी, त्यावर क्लिक करा.
  4. इंस्टॉल करा आणि त्यानंतर पुढे सुरू ठेवा वर क्लिक करा.
  5. अ‍ॅड-ऑनना काम करण्याची अनुमती देण्यासाठी, “ॲक्सेसची विनंती करा” मेसेज वाचा आणि अनुमती द्या वर क्लिक करा.
  6. अ‍ॅड-ऑन इंस्टॉल झाल्यानंतर, पूर्ण झाले आणि त्यानंतर वर क्लिक करा. 

महत्त्वाचे:

  • उजव्या साइडबारवर Google Workspace अ‍ॅड-ऑन शोधा आणि वापरा.
  • इतर अ‍ॅड-ऑन शोधण्यासाठी, मेनूमध्ये, एक्स्टेंशन आणि त्यानंतर अ‍ॅड-ऑन वर क्लिक करा. 
  • तुम्ही ॲड-ऑन इंस्टॉल केल्यानंतर ते तुम्हाला न दिसल्यास, तुमच्या साइडबारवर ते जोडण्यासाठी तुमचा दस्तऐवज, शीट किंवा स्लाइड रिफ्रेश करा.
  • ॲड-ऑन कशी वापरायची याविषयी अधिक जाणून घ्या.  

अ‍ॅड-ऑन अनइंस्‍टॉल करा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर दस्तऐवज, पत्रक किंवा स्लाइड उघडा.
  2. उजवीकडे, तुम्हाला अनइंस्टॉल करायच्या असलेल्या अ‍ॅड-ऑनवर क्लिक करा.
  3. आणखी आणखी आणि त्यानंतर ॲड-ऑन व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  4. तुम्हाला अनइंस्टॉल करायच्या असलेल्या अ‍ॅड-ऑनच्या बाजूला, पर्याय आणखी आणि त्यानंतर अनइंस्टॉल करा वर क्लिक करा.

अ‍ॅड-ऑन अनइंस्टॉल करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे एक्स्टेंशन आणि त्यानंतर अ‍ॅड-ऑन आणि त्यानंतर अ‍ॅड-ऑन व्यवस्थापित करा वर क्लिक करणे. तुम्ही अशा पद्धतीने Google Workspace ॲड-ऑन अनइंस्टॉल केल्यास, ते तुमच्या साइडबारवरून काढून टाकण्यासाठी तुमचा दस्तऐवज, शीट किंवा स्लाइड रीलोड करा.

महत्त्वाचे:  काही ऑफिस आणि शाळेच्या खात्यांमध्ये त्यांच्या संस्थेने इंस्टॉल केलेली अ‍ॅड-ऑन असतात. ही ॲड-ऑन अनइंस्टॉल करण्यासाठी, तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11875873695002199269
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
35
false
false