असुरक्षित साइटबद्दलच्या चेतावण्या व्यवस्थापित करा

तुम्ही भेट देण्याचा प्रयत्न करत असलेली साइट असुरक्षित असल्यास तुम्हाला चेतावणी मिळू शकते. या साइटना अनेकदा फिशिंग किंवा मालवेअर साइट म्हटले जाते.

असुरक्षित साइटबद्दल चेतावणी मिळवा

Chrome मध्ये फिशिंग आणि मालवेअर डिटेक्शन बाय डीफॉल्ट सुरू असते. तुम्हाला फिशिंग, मालवेअर, नकोसे सॉफ्टवेअर किंवा सोशल इंजिनियरिंग साइट आढळतात, तेव्हा "धोकादायक साइट" अशी लाल चेतावणी मिळू शकते. तुम्हाला ही चेतावणी दिसल्यास, तुम्ही साइटला भेट देऊ नका अशी आम्ही शिफारस करतो.

असुरक्षित वेबसाइटपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी, Google सुरक्षित ब्राउझिंग वेबसाइटची सूची राखते ज्यामुळे तुम्हाला मालवेअर, अपमानास्पद एक्स्टेंशन, फिशिंग, दुर्भावनापूर्ण आणि नको असलेल्या जाहिराती व सोशल इंजिनियरिंग हल्ल्यांचा धोका असू शकतो.

रीअल टाइममध्ये ज्ञात आणि नवीन असुरक्षित साइट शोधण्यासाठी व त्याबद्दल चेतावणी देण्यासाठी, तुम्ही वर्धित सुरक्षित ब्राउझिंग देखील सुरू करू शकता. Chrome मधील सुरक्षित ब्राउझिंग संरक्षण पातळीबद्दल जाणून घ्या.

टीप: सावधगिरीने डाउनलोड करा. हानिकारक सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे व्हायरस आहे, असे काही साइट तुम्हाला सांगू शकतात. कोणतेही हानिकारक सॉफ्टवेअर डाउनलोड न करण्याची सावधगिरी बाळगा.

असुरक्षित साइटबद्दल चेतावणी म्हणजे काय

असुरक्षित साइट या सामान्यतः अशा वेबसाइट असतात ज्या तुम्हाला ऑनलाइन काहीतरी धोकादायक करण्यासाठी फसवतात, जसे की तुम्हाला तुमचे पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या डिव्हाइसला हानी पोहोचवू शकतात किंवा तुम्ही ऑनलाइन ब्राउझ करता, तेव्हा समस्या निर्माण करू शकतात.

या साइट पुढील प्रकारच्या असू शकतात:

  • फिशिंग
  • सोशल इंजिनियरिंग
  • तुमच्या कॉंप्युटरवर मालवेअर किंवा नकोसे सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या असू शकतात
असुरक्षित साइटबद्दलच्या चेतावण्या व्यवस्थापित करा
तुम्हाला असुरक्षित साइटबद्दल चेतावणी नको असल्यास, तुम्ही Chrome मध्ये सुरक्षित ब्राउझिंग बंद करू शकता. यामुळे डाउनलोडसंबंधित चेतावण्या देखील बंद होतात.
महत्त्वाचे: सुरक्षित ब्राउझिंग बंद करण्याची आम्ही शिफारस करत नाही.
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, आणखी आणखीआणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षा वर क्लिक करा.
  4. "सुरक्षित ब्राउझिंग" अंतर्गत, संरक्षण नको (शिफारस केली जात नाही) निवडा.
टीप: तुम्ही ऑफिस किंवा शाळेमध्ये Chrome वापरत असल्यास, तुमचा नेटवर्क ॲडमिन तुमच्यासाठी फिशिंग आणि मालवेअर संरक्षण सेट करू शकतो व तुम्ही हे सेटिंग स्वतः बदलू शकत नाही.

तुम्ही असुरक्षित साइटला भेट देता, तेव्हा

तुम्हाला तुमच्या सुरक्षेला असणारे धोके समजत असल्यास, तुम्ही चेतावणी दाखवणाऱ्या पेजला भेट देऊ शकता. हे शिफारस केलेले नाही.

असुरक्षित पेजला भेट द्या

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. तुम्हाला चेतावणी दिसत असलेल्या पेजवरतपशील आणि त्यानंतर या असुरक्षित फाइलला भेट द्या निवडा.
  3. हे पेज लोड होईल.

असुरक्षित फाइल डाउनलोड करा
तुम्ही चेतावणी दाखवणारी फाइल डाउनलोड करू शकता. हे शिफारस केलेले नाही.
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर डाउनलोड वर क्लिक करा.
  3. तुम्हाला डाउनलोड करायची असलेली फाइल शोधा.
  4. आणखी आणखी आणि त्यानंतर धोकादायक फाइल डाउनलोड करा वर क्लिक करा.

तुम्हाला [साइटचे नाव] म्हणायचे होते का?

तुम्हाला हा मेसेज मिळाल्यास Chrome ला असे वाटत आहे, की तुम्हाला अपेक्षित असलेला वेब अ‍ॅड्रेस एका वेगळ्या साइटचा असू शकतो.

मेसेजमध्ये “ही योग्य साइट आहे का?” किंवा “पुढे फसवी साइट आहे" असेदेखील नमूद केलेले असू शकते.

तुम्हाला हा मेसेज मिळतो, जेव्हा तुम्ही साइटला भेट देण्याचा प्रयत्न करता ती:

  • तुम्ही सहसा भेट देता त्या सुरक्षित साइटसारखी दिसते.
  • माहीत असलेल्या सुरक्षित साइटमध्ये किंचित बदल केलेल्या URL ने तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करते.
  • तुमच्या ब्राउझिंग इतिहासामध्ये असलेल्या URL पेक्षा किंचित वेगळी URL असते.

पेज हे चुकून फ्लॅग केले होते असे तुम्हाला वाटत असल्यास आणि साइटवर जायचे असल्यास, होय, पुढे सुरू ठेवा निवडा.

माझी साइट किंवा सॉफ्टवेअर धोकादायक अथवा संशयास्पद म्हणून मार्क केले आहे

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15439854001695350317
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false