Chrome बुकमार्क आणि सेटिंग्ज इंपोर्ट करणे

तुमची सेटिंग्ज आणि तुमच्या पसंतीच्या वेबसाइटचे बुकमार्क न गमावता तुम्ही ब्राउझर स्विच करू शकता. तुमच्या ब्राउझरनुसार, तुमच्या सेटिंग्जमध्ये पुढील माहिती असू शकते:

  • ब्राउझिंग इतिहास
  • डीफॉल्ट होमपेज
  • बुकमार्क
  • डीफॉल्ट शोध इंजीन
  • सेव्ह केलेले पासवर्ड

Chrome वर बुकमार्क जोडा

Firefox किंवा Safari सारख्या बर्‍याच ब्राउझरमधून बुकमार्क इंपोर्ट करण्यासाठी, HTML फाइल म्हणून बुकमार्क सेव्ह किंवा एक्सपोर्ट करण्याकरिता त्या ब्राउझरच्या सूचना फॉलो करा, त्यानंतर:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर बुकमार्क व सेटिंग्ज इंपोर्ट करा निवडा.
  3. फाइल निवडा निवडा.
  4. फाइल निवडा आणि उघडा आणि त्यानंतर पूर्ण झाले निवडा.

टीप: तुम्ही Chrome वर Google Password Manager सह इतर ॲप्सवरून पासवर्ड इंपोर्ट करू शकता. Chrome सह पासवर्ड कसे इंपोर्ट करावे ते जाणून घ्या.

Chromebook वर

महत्त्वाचे:

  • तुम्ही Chrome मध्ये कोणतेही बुकमार्क तयार केले नसल्यास, बुकमार्क हे बुकमार्क बारमध्ये दिसतात.
  • तुमच्याकडे Chrome मध्ये आधीपासूनच बुकमार्क असल्यास, बुकमार्क हे "इंपोर्ट केलेले" हे लेबल असलेल्या नवीन फोल्डरमध्ये असतात.
  1. Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर बुकमार्क व्यवस्थापक निवडा.
  3. सर्वात वरती डावीकडे, संगतवार लावा वर क्लिक करा.
  4. ड्रॉप-डाउन मेनूमधून, HTML फाइलवरून बुकमार्क इंपोर्ट करा निवडा.
  5. सेव्ह केलेली HTML अपलोड करा.

तुमचे बुकमार्क उघडणे

  1. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर बुकमार्क व्यवस्थापक निवडा.
  2. तुमच्याकडे Chrome मध्ये आधीपासूनच बुकमार्क असल्यास, "इतर बुकमार्क" नावाचे नवीन फोल्डर शोधा.

टीप: तुम्ही साइड पॅनलमध्ये तुमचे बुकमार्क पुन्हा क्रमाने लावू शकता, संपादित करू शकता आणि हटवूदेखील शकता.

बुकमार्क कसे इंपोर्ट केले जातात

तुमच्याकडे Chrome मध्ये कोणतेही बुकमार्क नसल्यास, इंपोर्ट केलेले बुकमार्क हे बुकमार्क बारमध्ये दिसतात.

तुमच्याकडे Chrome मध्ये आधीपासूनच बुकमार्क असल्यास, इंपोर्ट केलेले बुकमार्क हे बुकमार्क बारच्या शेवटी "इतर बुकमार्क" फोल्डरमध्ये जोडले जातात.

बुकमार्क बारबद्दल अधिक जाणून घ्या.

बुकमार्क दुसर्‍या ब्राउझरवर हलवणे किंवा एक्सपोर्ट करणे

तुम्ही वेगळा ब्राउझर वापरण्याचे ठरवल्यास, तुम्ही तुमचे Chrome बुकमार्क तुमच्यासोबत नेऊ शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर बुकमार्क व्यवस्थापक निवडा.
  3. सर्वात वरती, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क एक्सपोर्ट करा निवडा.

Chrome तुमचे बुकमार्क HTML फाइल म्हणून एक्सपोर्ट करते. तुमचे बुकमार्क दुसर्‍या ब्राउझरवर इंपोर्ट करण्यासाठी ही फाइल वापरा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1220449423333492787
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false