वेब अ‍ॅप्स वापरणे

वेब अ‍ॅप हे वेबसाठी तयार केलेले ॲप आहे, जे तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवर अ‍ॅक्सेस करू शकता. वेबसाइटने ॲप म्हणून काम करावे यासाठी तुम्ही वेब ॲप्स वापरू शकता आणि लाँचर किंवा होम स्क्रीनद्वारे तुमच्या कॉंप्युटरवर अथवा मोबाइल डिव्हाइसवर ती अ‍ॅक्सेस करू शकता. काही वेब ॲप्समध्ये आशय ऑफलाइन ब्राउझ करणे, अधिक स्टोरेज, नोटिफिकेशन, फाइल सिस्टीम अ‍ॅक्सेस आणि आयकन बॅज यांसारख्या अतिरिक्त वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

टीप: वेब ॲप्स ऑफलाइन काम करत असली, तरी काही वेब ॲप्स इंटरनेट कनेक्शनशिवाय पूर्णपणे काम करू शकत नाहीत.

वेब अ‍ॅप इंस्टॉल करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. तुम्हाला इंस्टॉल करायच्या असलेल्या वेबसाइटवर जा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेव्ह करा आणि शेअर करा आणि त्यानंतर अ‍ॅप म्हणून पेज इंस्टॉल करा निवडा.
    • काही वेबसाइटवर, अ‍ॅड्रेस बारच्या सर्वात वरती, इंस्टॉल करा निवडा.
  4. वेब अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी, स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

टीप: काही अ‍ॅप्स वैशिष्ट्यांचे शॉर्टकट देऊ करतात. अ‍ॅप्स शॉर्टकटची सूची शोधण्यासाठी, टास्कबारवरील वेब अ‍ॅपवर राइट-क्लिक करा. Chrome मध्ये वेबसाइटसाठी शॉर्टकटबद्दल अधिक जाणून घ्या.

वेब अ‍ॅप अनइंस्टॉल करणे

Windows, Mac किंवा Linux काँप्युटरवरून अनइंस्टॉल करा
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. तुम्हाला अनइंस्टॉल करायचे असलेले वेब अ‍ॅप उघडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर अनइंस्टॉल करा [अ‍ॅपचे नाव] आणि त्यानंतर काढून टाका निवडा.
    • Chrome मधून अ‍ॅप डेटा हटवण्यासाठी, "Chrome मधून डेटादेखील हटवा" निवडा.

टीप: तुम्ही chrome://apps याद्वारेदेखील वेब अ‍ॅप्स व्यवस्थापित करू शकता.

Chromebook वरून अनइंस्टॉल करणे
  1. तुमच्या लाँचरमध्ये, वेब अ‍ॅपच्या आयकनवर राइट-क्लिक करा.
  2. अनइंस्टॉल करा निवडा.
  3. डेटा हटवण्यासाठी, ब्राउझिंग डेटादेखील हटवा निवडा.
    • तुम्ही ब्राउझिंग डेटा हटवल्यास, Chrome मधील वेबसाइटशी संबंधित सर्व डेटादेखील काढून टाकला जातो. पुढच्या वेळी तुम्ही वेबसाइटला भेट द्याल, तेव्हा तुम्हाला पुन्हा साइन इन करावे लागेल.
  4. अनइंस्टॉल करा निवडा.

अ‍ॅपच्या नावाशी संबंधित अपडेट स्वीकारा किंवा त्यांना नकार द्या

अ‍ॅपला तुमच्या स्क्रीनवरील त्याच्या आयकन खालील त्याचे नाव अपडेट करायचे असते, तेव्हा Google Chrome हे तुम्हाला अ‍ॅपशी संबंधित अपडेटबद्दल सूचित करते.

तुम्हाला अपडेट स्वीकारायचे आहे की अ‍ॅप अनइंस्टॉल करायचे आहे ते तुम्ही निवडू शकता.

महत्त्वाचे: दुसर्‍या एखाद्या अ‍ॅपसारखे दिसावे यासाठी नाव बदलणे यासारखा एखादा आमूलाग्र बदल असल्यास, तो डेव्हलपरने केलेला दुर्भावनापूर्ण बदल असू शकतो. हे तसे आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, अ‍ॅप अनइंस्टॉल करा.

  • बदल स्वीकारण्यासाठी: ओके वर क्लिक करा.
  • अ‍ॅप अनइंस्टॉल करण्यासाठी: अ‍ॅप अनइंस्टॉल करा वर क्लिक करा.

Chrome मध्ये तुमची अ‍ॅप्स व्यवस्थापित करा

अ‍ॅप्ससाठी शॉर्टकट तयार करणे

तुम्ही Windows, Mac किंवा Linux वर असल्यास, अ‍ॅप्स आणखी जलद उघडण्यासाठी शॉर्टकट तयार करू शकता. तुम्ही हे शॉर्टकट तुमच्या डेस्कटॉप किंवा मेनूवर ठेवू शकता.

  1. नवीन टॅबमध्ये, chrome://apps उघडा.
  2. तुम्हाला ज्यासाठी शॉर्टकट तयार करायचा आहे त्या अ‍ॅपवर राइट-क्लिक करा.
  3. शॉर्टकट तयार करा निवडा.
  4. तुमच्या कॉंप्युटरवर तुम्हाला शॉर्टकट कुठे पाहायचे आहेत ते निवडा.
  5. तयार करा वर क्लिक करा.
साइन इन कराल तेव्हा ॲप्स सुरू करणे

तुम्ही Windows, Mac किंवा Linux मध्ये साइन इन करता, तेव्हा तुमची अ‍ॅप्स आपोआप लाँच होण्यासाठी सेट करू शकता.

  1. chrome://apps वर नेव्हिगेट करा.
  2. मेनू उघडण्यासाठी, Google Maps सारख्या अ‍ॅपवर राइट-क्लिक करा.
  3. स्टार्टअपवर लाँच करा निवडा.

टीप: हे वैशिष्ट्य बंद करण्यासाठी, अ‍ॅपवर राइट-क्लिक करा आणि स्टार्टअपवर लाँच करा ची निवड रद्द करा .

वेब अ‍ॅप सेटिंग्ज व्यवस्थापित करणे

  1. तुमच्या डॉक किंवा डेस्कटॉपमध्ये अ‍ॅपवर क्लिक करा.
  2. अ‍ॅप विंडोच्या सर्वात वरती उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा निवडा.
  3. अ‍ॅपची माहिती आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  4. तुम्हाला अपडेट करायचे असलेले सेटिंग निवडा.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12540141076729922288
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false