पासवर्ड व्यवस्थापित करणे

तुम्ही Chrome ला वेगवेगळ्या साइटसाठी तुमचे पासवर्ड सेव्ह करायला लावू शकता.

Chrome तुमच्या पासवर्डचे संरक्षण कसे करते याबद्दल अधिक जाणून घ्या.

पासवर्डसाठी डिव्हाइसवरील एन्क्रिप्शनबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही साइटवर नवीन पासवर्ड एंटर केल्यास, Chrome तो सेव्ह करायला सांगेल. स्वीकारण्यासाठी सेव्ह करा वर क्लिक करा.

  • सेव्ह केला जाणारा पासवर्ड पाहण्यासाठी, पूर्वावलोकन Preview वर क्लिक करा.
  • पेजवर एकाहून अधिक पासवर्ड असल्यास, डाउन अ‍ॅरो Down arrow वर क्लिक करा. तुम्हाला सेव्ह करायचा असलेला पासवर्ड निवडा
  • तुमचे वापरकर्ता नाव रिकामे किंवा चुकीचे असल्यास, "वापरकर्ता नाव" च्या बाजूला असलेल्या मजकूर बॉक्सवर क्लिक करा. तुम्हाला सेव्ह करायचे असलेले वापरकर्ता नाव एंटर करा.
  • तुम्हाला वेगळा पासवर्ड सेव्ह करायचा असल्यास, "पासवर्ड" च्या बाजूला असलेल्या मजकूर बॉक्सवर क्लिक करा. तुम्हाला सेव्ह करायचा असलेला पासवर्ड एंटर करा.
नवीन पासवर्ड मॅन्युअली जोडणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर पासवर्ड आणि ऑटोफिल आणि त्यानंतर Google Password Manager आणि त्यानंतर जोडा वर क्लिक करा.
  3. वेबसाइट, वापरकर्ता नाव आणि पासवर्ड एंटर करा.
  4. सेव्ह करा निवडा.
तुमच्या सेव्ह केलेल्या पासवर्डमध्ये टिपा जोडणे
खात्याविषयीची माहिती लक्षात ठेवण्यासाठी किंवा लॉग इनचे तपशील सेव्ह करण्यासाठी तुम्ही सेव्ह केलेल्या पासवर्डमध्ये टिपा जोडू शकता. तुम्ही टीप जोडल्यावर, त्यात पासवर्डसारखेच सुरक्षा संरक्षण असते.
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर पासवर्ड आणि ऑटोफिल आणि त्यानंतर Google Password Manager वर क्लिक करा.
  3. "पासवर्ड" या अंतर्गत, तुम्हाला टीप जोडायचा असलेला पासवर्ड निवडा.
  4. संपादित करा निवडा.
  5. तुमची टीप एंटर करा.
  6. तुमचे पूर्ण झाल्यावर, सेव्ह करा निवडा.
सेव्ह केलेल्या पासवर्डने साइन इन करा
तुम्ही वेबसाइटला यापूर्वी दिलेल्या भेटीच्या वेळी तुमचा पासवर्ड Chrome मध्ये सेव्ह केला असल्यास, साइन इन करण्यात Chrome तुम्हाला मदत करू शकते.
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, तुम्ही यापूर्वी भेट दिलेल्या साइटवर जा.
  2. साइटच्या साइन-इन फॉर्मवर जा.
    • तुम्ही साइटसाठी एकच वापरकर्ता नाव आणि पासवर्ड सेव्ह केला असल्यास: Chrome साइन-इन फॉर्म आपोआप भरेल.
    • तुम्ही एकाहून अधिक वापरकर्ता नावे आणि पासवर्ड सेव्ह केले असल्यास: वापरकर्ता नाव फील्ड निवडा आणि तुम्हाला वापरायची असलेली साइन-इन माहिती निवडा.
पासवर्डसह बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन वापरणे

बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरू केल्यावर, तुम्ही पासवर्ड ऑटोफिल करता, तेव्हा गोपनीयता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या डिव्हाइसचे फिंगरप्रिंट सेन्सर वापरू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर पासवर्ड आणि ऑटोफिल आणि त्यानंतर Google Password Manager निवडा.
  3. सेटिंग्ज निवडा.
  4. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरू करण्यासाठी:
    • PC वर: पासवर्ड एंटर करता, तेव्हा Windows Hello वापरा सुरू करा.
    • Mac वर: पासवर्ड एंटर करता, तेव्हा TouchID वापरा सुरू करा.
  5. तुमची निवड कंफर्म करण्यासाठी स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

टिपा:

  • तुमच्या कॉंप्युटरवर बायोमेट्रिक क्षमता असल्यास, तुम्ही पुढील गोष्टी करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनदेखील वापरू शकता:
    • तुमचे पासवर्ड दाखवणे.
    • तुमचे पासवर्ड कॉपी करणे.
    • तुमचे पासवर्ड संपादित करणे.
  • बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन हे बाय डीफॉल्ट सुरू असते.
सेव्ह केलेले पासवर्ड पाहा, हटवा किंवा एक्सपोर्ट करा
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल Profile आणि त्यानंतर पासवर्ड Passwords निवडा.
    • तुम्हाला पासवर्ड आयकन सापडत नसल्यास, सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर पासवर्ड आणि ऑटोफिल आणि त्यानंतर Google Password Manager निवडा.
  3. पासवर्ड दाखवणे, संपादित करणे, हटवणे किंवा एक्सपोर्ट करणे:
    • दाखवणे: तुमच्या पासवर्डच्या उजवीकडे, अ‍ॅरो आणि त्यानंतर पासवर्ड दाखवा Preview निवडा.
    • संपादित करणे: पासवर्डच्या उजवीकडे, अ‍ॅरो आणि त्यानंतर संपादित करा निवडा.
    • हटवणे: वेबसाइटच्या उजवीकडे, अ‍ॅरो आणि त्यानंतर हटवा निवडा.
    • एक्सपोर्ट करा: डावीकडे, सेटिंग्ज निवडा.
      • "पासवर्ड एक्सपोर्ट करा" या अंतर्गत, फाइल डाउनलोड करा निवडा.

तुमचे सेव्ह केलेले सर्व पासवर्ड साफ करण्यासाठी, ब्राउझिंग डेटा साफ करणे हे करा आणि पासवर्ड निवडा.

पासवर्ड सेव्ह करणे सुरू करा किंवा थांबवा

बाय डीफॉल्ट, Chrome तुमचा पासवर्ड सेव्ह करण्याची ऑफर देते. हा पर्याय तुम्ही कधीही बंद किंवा सुरू करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल Profile आणि त्यानंतर पासवर्ड Passwords निवडा.
    • तुम्हाला पासवर्ड आयकन सापडत नसल्यास, सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर पासवर्ड आणि ऑटोफिल आणि त्यानंतर Google Password Manager निवडा.
  3. डावीकडे, सेटिंग्ज निवडा.
  4. पासवर्ड सेव्ह करण्याची ऑफर सुरू किंवा बंद करा.
साइट आणि अ‍ॅप्समध्ये आपोआप साइन इन करा
तुम्ही "ऑटो साइन-इन" वापरून तुमची माहिती सेव्ह केली आहेत अशा साइट आणि अ‍ॅप्समध्ये आपोआप साइन इन करू शकता. तुम्ही "ऑटो साइन इन" सुरू करता, तेव्हा तुमचे वापरकर्ता नाव आणि पासवर्डची खात्री करण्याची आवश्यकता नाही.
तुम्ही साइन इन करता, तेव्हा तुमच्या सेव्ह केलेल्या माहितीची खात्री करण्यासाठी, तुम्ही "ऑटो साइन-इन" बंद करू शकता.
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल Profile and then पासवर्डPasswords निवडा.
  3. डावीकडे, सेटिंग्ज निवडा.
  4. आपोआप साइन इन करा सुरू किंवा बंद करा.
तुमच्या होम स्क्रीनवर Google Password Manager जोडणे

झटपट अ‍ॅक्सेससाठी, तुम्ही शॉर्टकट म्हणून Google Password Manager जोडू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर पासवर्ड आणि ऑटोफिल आणि त्यानंतर Google Password Manager निवडा.
  3. डावीकडे, सेटिंग्ज आणि त्यानंतर शॉर्टकट जोडा निवडा.
  4. इंस्टॉल करा निवडा.
प्रोग्रेसिव्ह वेब अ‍ॅप्स वापरण्याविषयी अधिक जाणून घ्या.
तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड तपासणे

तुमचे पासवर्ड हे डेटा भंगामध्ये उघड झाले आहेत का किंवा ते संभाव्यरीत्या कमकुवत आणि ओळखण्यास सोपे आहेत का हे जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमचे सेव्ह केलेले सर्व पासवर्ड लगेच तपासू शकता.

तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड तपासण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल Profile आणि त्यानंतर पासवर्ड Passwords निवडा.
    • तुम्हाला पासवर्ड आयकन सापडत नसल्यास, सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणि त्यानंतर पासवर्ड आणि ऑटोफिल आणि त्यानंतर Google Password Manager निवडा.
  3. डावीकडे, तपासणी निवडा.

डेटा भंगात उघड झालेल्या कोणत्याही पासवर्डबद्दल आणि कमकुवत, अंदाज लावायला सोपे पासवर्डचे तपशील तुम्हाला मिळतील.

पासवर्ड बदलण्याशी संबंधित सूचना व्यवस्थापित करा

तुम्ही तृतीय पक्ष वेबसाइट किंवा अ‍ॅपवरील डेटा लीकमध्ये धोक्यात आलेला पासवर्ड आणि वापरकर्ता नाव यांचे काँबिनेशन वापरल्यास, तुम्हाला Chrome कडून सूचना मिळू शकते. धोक्यात असलेला पासवर्ड आणि वापरकर्ता नाव यांची काँबिनेशन ऑनलाइन प्रकाशित केली गेली असल्यामुळे ती असुरक्षित असतात.

धोक्यात असलेले कोणतेही पासवर्ड तुम्ही शक्य तितक्या लवकर बदलावेत अशी आम्ही शिफारस करतो. तुमचा पासवर्ड तुम्ही ज्या साइटवर वापरला होता त्या साइटवर तो पासवर्ड बदलण्यासाठी, तुम्ही Chrome मधील सूचना फॉलो करू शकता आणि ज्या साइटवर पासवर्ड सेव्ह केलेले असू शकतील अशा इतर कोणत्याही साइटसाठी तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड तपासू शकता.

तुमचे पासवर्ड आणि वापरकर्ता नाव Google ला रीड करता येऊ नयेत यासाठी ते संरक्षित केलेले असतील याची Chrome खात्री करते.

सूचना सुरू करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षा आणि त्यानंतर साधारण संरक्षण वर क्लिक करा.
  4. डेटा भंगामध्ये पासवर्ड उघड झाल्यास, तुम्हाला चेतावणी द्या सुरू किंवा बंद करा.
टीप: "सुरक्षित ब्राउझिंग" हा पर्याय सुरू केला असेल तरच हे वैशिष्ट्य उपलब्ध असते.

विशिष्ट साइटसाठी सूचना डिसमिस करा:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.

  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर पासवर्ड आणि ऑटोफिल आणि त्यानंतर Google Password Manager निवडा.
  3. तुमचे सेव्ह केलेले कोणते पासवर्ड धोक्यात आले आहेत हे पाहण्यासाठी, तपासणी निवडा.
  4. "धोक्यात आलेले पासवर्ड" च्या उजवीकडे, अ‍ॅरो निवडा.
  5. तुम्हाला सूचना थांबवायची असलेली साइट पहा.
  6. आणखी आणखी आणि त्यानंतर चाचणी डिसमिस करा निवडा.
टीप: साइट चेतावण्या रिस्टोअर करण्यासाठी, "डिसमिस केलेल्या चेतावण्या" अंतर्गत, तुम्हाला सूचना पुन्हा सुरू करायच्या आहेत अशा साइटच्या बाजूला, आणखी संगतवार ठेवा निवडा. त्यानंतर चेतावणी रिस्टोअर करा निवडा.
पासवर्डसंबंधी समस्यांचे निराकरण करा
Chrome पासवर्ड सेव्ह करत नसल्यास किंवा सेव्ह करण्याचे ऑफर करत नसल्यास सेव्ह केलेल्या माहितीसंबंधित समस्यांचे निराकरण कसे करावे ते जाणून घ्या.
Chrome पासवर्ड सेव्ह आणि सिंक कसे करते

Chrome तुमचे पासवर्ड कसे सेव्ह करते हे तुम्हाला ते सर्व डिव्हाइसवर स्टोअर करायचे आणि वापरायचे आहेत का यावर अवलंबून असते. तुम्ही Chrome मध्ये साइन इन केले असेल तेव्हा, तुमचे पासवर्ड तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करू शकता. त्यानंतर, तुमच्या सर्व डिव्हाइसवरील Chrome आणि तुमच्या Android डिव्हाइसवरील काही अ‍ॅप्सवर पासवर्ड वापरले जाऊ शकतात.

अन्यथा, तुम्ही फक्त तुमच्या कॉंप्युटरमध्ये स्थानिकरीत्या पासवर्ड स्टोअर करू शकता.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18326764765900280210
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false