Chrome मध्ये वेबवर शोधणे

तुम्ही शोधत असलेल्या गोष्टी इंटरनेटवर, तुमच्या बुकमार्कमध्ये आणि तुमच्या ब्राउझिंग इतिहासामध्ये त्वरित शोधू शकता. तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन एखाद्या Chrome वैशिष्ट्याला सपोर्ट करत नसल्यास, ते कदाचित उपलब्ध होणार नाही.
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती असलेल्या अ‍ॅड्रेस बारमध्ये, तुमचा शोध एंटर करा.
  3. परिणाम निवडा किंवा एंटर प्रेस करा.

टीप: तुम्ही तुमचा शोध एंटर केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटीवर आधारित सूचना मिळू शकतात. तुम्ही तुमच्या शोध इतिहासामधून सूचना हटवू शकता किंवा तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीवर आधारित सूचनांचे विभाग दिसतात, तेव्हा ते लपवू शकता. तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीबद्दल अधिक जाणून घ्या.

पेजमध्ये शोधणे

तुम्ही तुमच्या कॉंप्युटरवरील वेब पेजवर विशिष्ट शब्द किंवा वाक्य शोधू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Chrome मध्ये पेज उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर शोधा आणि संपादित करा आणि त्यानंतर शोधा....
  3. शोध विंडोमध्ये, तुमची शोध संज्ञा एंटर करा.
  4. पेज शोधण्यासाठी एंटर प्रेस करा.
    • जुळण्या या पिवळ्या रंगात हायलाइट केलेल्या असतात. पेजवर जुळण्या कुठे आहेत हे उजवीकडील स्क्रोलबारवरील पिवळ्या मार्करमुळे कळते.

टीप: एखादा शब्द किंवा वाक्य झटपट शोधण्यासाठी, तुम्ही Ctrl + f (Windows, Linux आणि ChromeOS) किंवा + f (Mac) हे कीबोर्ड शॉर्टकटदेखील वापरू शकता.
शब्द शोधणे

तुम्ही पेजवर विशिष्ट शब्द किंवा वाक्याबद्दल आणखी माहिती शोधू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Chrome मध्ये पेज उघडा.
  2. एखादा शब्द किंवा वाक्य हायलाइट करा.
    • PC वर: हायलाइट केलेल्या आशयावर राइट-क्लिक करा.
    • Mac वर: कंट्रोल की धरून ठेवा आणि हायलाइट केलेल्या आशयावर क्लिक करा.
  3. तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन वापरून शोधण्यासाठी, पर्यायावर क्लिक करा. उदाहरणार्थ, तुम्हाला "Google मध्ये एम्परर पेंग्विन शोधा" यासारखा एखादा पर्याय दिसू शकतो.

टिपा:

  • तुम्ही एखादा शब्द अथवा वाक्य निवडता, तेव्हा तुम्ही त्याचे तुमच्या प्राधान्य दिलेल्या भाषेमध्ये भाषांतर करू शकता किंवा त्याची व्याख्या मिळवू शकता.
  • तुम्ही संख्या निवडता, तेव्हा त्या संख्येच्या एककांचे रूपांतर करू शकता.
इमेज वापरून वेबवर शोधणे

तुम्ही Google Lens वापरून एखाद्या इमेजबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या ड्रेसची इमेज तो कुठून विकत घ्यावा हे शोधण्यासाठी, त्याच्याशी जुळणारा ड्रेस शोधण्यासाठी किंवा ती इमेज वेबवर इतर ठिकाणी शोधण्यासाठी वापरू शकता.

महत्त्वाचे: Google ला तुमचे डीफॉल्ट शोध इंजीन म्हणून सेट करणे.

इमेजबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. वेबसाइटवर जा.
  3. इमेजवर राइट-क्लिक करा.
  4. मेनूमध्ये, Google वापरून इमेज शोधा निवडा.
    • तुम्ही इमेजच्या बाहेर कुठेही राइट-क्लिक केल्यास, मेनूमधून तुम्ही Google वापरून इमेज शोधा निवडू शकता आणि इमेज निवडण्यासाठी ती ड्रॅग करू शकता.

टिपा:

  • शोध परिणाम हे साइड पॅनलवर दिसतात. ते परिणाम नवीन टॅबवर दाखवण्यासाठी, उघडा वर क्लिक करा.
  • साइड पॅनलमधून इमेज शोधण्यासाठी, इमेजनुसार शोधा किंवा या पेजवरील इमेज शोधाअंतर्गत सुचवलेल्या इमेजवर क्लिक कर. सुचवलेल्या इमेज तुमच्या डिव्हाइसवरच राहतात. त्या Google सह शेअर केल्या जात नाहीत. सुचवलेल्या इमेजवर क्लिक केल्यावर, Google त्या इमेजबद्दलची माहिती गोळा करू शकते.
Google Search साइड पॅनल वापरून वेब पेज शोधणे

Google Search साइड पॅनल वापरून, तुम्ही ब्राउझ करत असलेल्या साइटबद्दलची अधिक माहिती आणि तुम्ही वापरत असलेली शोध साधने हे सर्व अ‍ॅक्सेस करू शकता.

साइटवर असताना, लेख आणि इतर वेब पेजमधील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी Google Search साइड पॅनल उघडा:

Google Search साइड पॅनल वापरून वेब पेज शोधण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. वेबसाइटवर जा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर Google वापरून हे पेज शोधा निवडा.
    • तुम्ही शोधत असलेल्या मजकूर आणि इमेजबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, वेब पेजवरील कीवर्ड एंटर करा.

टिपा:

Chrome वर जनरेटिव्ह AI बद्दल अधिक जाणून घ्या

तुम्हाला Chrome चा पुरेपूर वापर करण्यात मदत करण्यासाठी, Google Search साइड पॅनल अधिक कार्यक्षम आणि गुंतवून ठेवणाऱ्या शोधाकरिता आता AI द्वारे सक्षम केलेले अनुभव ऑफर करते. तुम्ही पुढील गोष्टी सहज करू शकता:

  • लेख आणि इतर वेब पेजमधून महत्त्वाचे मुद्दे जनरेट करा.

साइड पॅनलमधील AI द्वारे सक्षम केलेल्या अनुभवांच्या समावेशासह Chrome वर शोधा मध्ये प्रयोग करून पाहण्यासाठी, Search Labs करिता कसे साइन अप करावे हे जाणून घ्या.

टीप: पात्रता निकष लागू होऊ शकतात. ब्राउझ करता करता AI टूलविषयी जाणून घ्या.

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4838304434575501227
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false