वेबसाइटला ब्लूटूथ डिव्हाइसशी कनेक्ट करणे

Chrome तुम्हाला तुमच्या ब्लूटूथ डिव्हाइसशी वेबसाइट कनेक्ट करू देते. उदाहरणार्थ, तुमच्याकडे ब्लूटूथ सुरू केलेला हार्ट मॉनिटर असल्यास, तुम्ही वेबसाइटला त्याच्याशी कनेक्ट करू देऊ शकता. त्यानंतर, पेज मॉनिटरबद्दलची माहिती रेकॉर्ड करू आणि दाखवू शकते.

ब्लूटूथ हे डिव्हाइसमधील एक मानक शॉर्ट-रेंज वायरलेस संवाद आहे. ब्लूटूथ "क्लासिक" हा बायनरी प्रोटोकॉलचा एक संच आहे, जो कमाल २४ Mbps पर्यंतच्या गतीला सपोर्ट करतो. ब्लूटूथ 4.0 ने एक नवीन "ब्लूटूथ कमी ऊर्जा (BLE)" मोड सादर केला आहे, जो एक Mbps पर्यंत मर्यादित आहे, पण डिव्हाइसना त्यांचे ट्रान्समीटर बंद ठेवण्याची अनुमती देतो.

महत्त्वाचे: सध्या, Chrome फक्त ब्लूटूथ कमी ऊर्जा डिव्हाइसशी कनेक्ट करण्याला सपोर्ट करते.

तुमच्या डिव्हाइसचा अ‍ॅक्सेस कधी द्यावा

फक्त विश्वसनीय साइटला डिव्हाइसचा अ‍ॅक्सेस द्या. तुम्ही एखादी वेबसाइट तुमच्या डिव्हाइसशी पेअर केल्यास, साइटला डिव्हाइसवरील सर्व माहिती मिळते आणि ती डिव्हाइस रीप्रोग्रामदेखील करू शकते. तुम्ही तुमच्या कॉंप्युटरवरील डीफॉल्ट परवानगी सेटिंग निवडू शकता.

Chrome मधील वेबपेज तुमच्या डिव्हाइसशी पेअर करणे

महत्त्वाचे: तुम्ही कॉंप्युटर किंवा Android डिव्हाइसवर Chrome वापरता, तेव्हा वेबपेज पेअर करू शकता. iPhone आणि iPad Chrome मध्ये ब्लूटूथ डिव्‍हाइस आणि वेबसाइटमधील कनेक्‍शनला सपोर्ट करत नाहीत.

  1. तुमच्या काँप्युटरवर किंवा फोनवर, ब्लूटूथ सुरू केले आहे याची खात्री करा. ब्लूटूथ डिव्हाइसवर, डिव्हाइस शोधसुलभ असल्याची खात्री करा.
  2. Chrome मध्ये, तुमच्या डिव्हाइसशी कनेक्ट करू शकणारे वेबपेज उघडा.
  3. पेजवर क्लिक किंवा टॅप करा. तुम्हाला डिव्हाइस जोडण्यास सांगितले जाईल.
  4. सूचीमधून डिव्हाइस निवडा.
  5. पेअर करा किंवा कनेक्ट करा निवडा.

ब्लूटूथ पेअरींगसंबंधित समस्या ट्रबलशूट करा

साइटला तुमचे डिव्हाइस न आढळल्यास, पुन्हा शोधा वर क्लिक करा.

साइटला तुमचे डिव्हाइस न आढळल्यास, तुमच्या कॉंप्युटरवर ब्लूटूथ सुरू असल्याची खात्री करा:

दोन्ही डिव्‍हाइसमध्‍ये ब्लूटूथ सुरू असताना, तुमच्‍या डिव्‍हाइससाठी पुन्‍हा स्कॅन करा.

टीप: तुम्ही Windows कॉंप्युटर वापरत असल्यास आणि तरीही ब्लूटूथशी कनेक्ट करू शकत नसल्यास, अ‍ॅप्सना डिव्हाइस रेडिओ नियंत्रित करण्याची अनुमती देण्यासाठी तुम्हाला तुमची गोपनीयता सेटिंग्ज बदलण्याची आवश्यकता असू शकते. सिस्टम सेटिंग्जबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, Microsoft मदत केंद्रावर जा.

Chrome शी कनेक्ट केलेली डिव्हाइस काढून टाकणे

तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील वेबसाइटचा अ‍ॅक्सेस काढून टाकू शकता.

तुमच्या ब्लूटूथ डिव्‍हाइसवरील वेबसाइटचा अ‍ॅक्सेस काढून टाकण्यासाठी, सर्वात वरती डावीकडे, रीलोड करा रीलोड करा वर टॅप करा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
860307296692019000
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false