तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर Chrome झटपट उघडणे

तुम्ही Chrome इंस्टॉल केल्यानंतर, ते अ‍ॅप तुमच्या होम स्क्रीनवर किंवा आवडत्या अ‍ॅप्समध्ये जोडता, तेव्हा त्यावर झटपट जाऊ शकता.

तुमच्या होम स्क्रीनवर Chrome अ‍ॅप जोडणे
  1. तुमच्या होम स्क्रीनच्या तळापासून वरती स्‍वाइप करा.
  2. Chrome अ‍ॅप Chrome ला स्‍पर्श करून धरून ठेवा.
  3. अ‍ॅप तुम्हाला हवे तिथे ड्रॅग करा आणि ते रिलीझ करा.

Chrome ला तुमचा डीफॉल्ट ब्राउझर कसे बनवावे ते जाणून घ्या.

तुमच्या आवडत्या अ‍ॅप्समध्ये Chrome जोडणे

तुमच्या होम स्क्रीनच्या तळाशी, तुम्हाला आवडत्या अ‍ॅप्सची पंक्ती दिसेल.

  1. जागा साफ करण्यासाठी तुम्हाला एखादे आवडते अ‍ॅप काढून टाकावे लागू शकते.
    1. अ‍ॅप काढून टाकण्यासाठी, तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या अ‍ॅपला स्‍पर्श करून धरून ठेवा.
    2. अ‍ॅप तुमच्या होम स्क्रीनवर ड्रॅग करा आणि ते रिलीझ करा.
  2. Chrome अ‍ॅप Chrome ला स्‍पर्श करून धरून ठेवा.
  3. तुमच्या आवडत्यामधील एखाद्या रिकाम्या जागेवर ते ड्रॅग करा आणि रिलीझ करा.

टीप: नवीन टॅब, गुप्त टॅब उघडण्यासाठी किंवा तुमच्या होम स्क्रीनवर विजेट जोडण्यासाठी, Chrome अ‍ॅप Chrome दाबून धरून ठेवा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12231477122543164366
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false