कनेक्शनशी संबंधित एररचे निराकरण करणे

तुम्ही वेबसाइटला भेट देण्याचा प्रयत्न करत असताना तुम्हाला एरर मेसेज मिळाल्यास, ही निराकरणे वापरून पाहा.

तुमची एरर खाली सूचीबद्ध केलेली नसल्यास, पेज लोड करताना येणाऱ्या एरर किंवा डाउनलोड करताना येणाऱ्या एरर यांचे निराकरण कसे करायचे ते जाणून घ्या.

कनेक्शनसंबंधित बऱ्याच एररचे निराकरण करा

तुम्हाला एखाद्या वेबसाइटवर गेल्यावर एरर आल्यास, सर्वप्रथम या ट्रबलशूटिंग पायऱ्या वापरा:

  1. वेब अ‍ॅड्रेसमध्ये टायपिंगच्या चुका आहेत का ते तपासा.
  2. तुमचे इंटरनेट कनेक्शन सामान्यपणे काम करत असल्याची खात्री करा.
  3. वेबसाइटच्या मालकाशी संपर्क साधा.

विशिष्ट एरर मेसेजविषयी मदत मिळवा

"या वेबपेजला रीडिरेक्ट करणारे लूप आहे" किंवा "ERR_TOO_MANY_REDIRECTS"

पेजने तुम्हाला खूप जास्त वेळा रीडिरेक्ट करायचा प्रयत्न केला असल्यास, तुम्हाला ही एरर दिसेल.

काही वेळा, कुकी योग्यरीत्या काम करत नसल्याने पेज उघडत नाहीत. एररचे निराकरण करण्यासाठी, तुमच्या कुकी साफ करण्याचा प्रयत्न करा.

"ही साइट सुरक्षित कनेक्शन पुरवू शकत नाही; नेटवर्क एररने अवैध प्रतिसाद पाठवला" किंवा "ERR_SSL_FALLBACK_BEYOND_MINIMUM_VERSION"

Chrome ला समजत नसलेली एरर पेजवर असल्यास, तुम्हाला ही एरर दिसेल. एररचे निराकरण करण्यासाठी, वेबसाइटच्या मालकाशी संपर्क साधा.

ही वेबसाइट तुमच्या मालकीची असल्यास, ERR_SSL_FALLBACK_BEYOND_MINIMUM_VERSION एररचे निराकरण कसे करायचे ते जाणून घ्या.

"ERR_CERT_SYMANTEC_LEGACY"
एररमध्ये Symantec चा उल्लेख असल्यास, साइटच्या मालकाला साइटचे सर्टिफिकेट अपडेट करण्यास सांगा. Symantec ने जारी केलेल्या सर्टिफिकेट ना सपोर्ट का केला जात नाही, याबद्दल अधिक जाणून घ्या.
"तुमचे कनेक्शन खाजगी नाही," "NET::ERR_CERT_AUTHORITY_INVALID," "ERR_CERT_COMMON_NAME_INVALID," "NET::ERR_CERT_WEAK_SIGNATURE_ALGORITHM," “ERR_CERTIFICATE_TRANSPARENCY_REQUIRED," किंवा "SSL सर्टिफिकेट एरर"

एररमध्ये HSTS, गोपनीयता सर्टिफिकेट किंवा चुकीच्या नावांचा उल्लेख असल्यास, पुढील पायर्‍या वापरून पाहा:

पहिली पायरी: पोर्टलमध्ये साइन इन करा

कॅफे किंवा विमानतळे यांसारख्या ठिकाणी वाय-फाय नेटवर्कसाठी तुम्ही साइन इन करण्याची आवश्यकता आहे. साइन इन पेज पाहण्यासाठी, http:// वापरत असलेल्या पेजला भेट द्या.

  1. http://example.com यांसारख्या http:// ने सुरू होणाऱ्या कोणत्याही वेबसाइटवर जा.
  2. जे साइन इन पेज उघडेल, त्यावर इंटरनेट वापरण्यासाठी साइन इन करा.

दुसरी पायरी: गुप्त मोडमध्ये पेज उघडा (फक्त कॉंप्युटर)

तुम्ही भेट देत असलेले पेज गुप्त विंडो मध्ये उघडा.

पेज उघडल्यास, Chrome एक्स्टेंशन योग्यरीत्या काम करत नाही. एररचे निराकरण करण्यासाठी, एक्स्टेंशन बंद करा. Chrome एक्स्टेंशन कशी बंद करायची ते जाणून घ्या.

तिसरी पायरी: तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करा

तुमचे डिव्हाइस Windows, Mac किंवा दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टमवर अप-टू-डेट असल्याची खात्री करा.

चौथी पायरी: तुमचा अँटिव्हायरस तात्पुरता बंद करा

तुमच्याकडे "HTTPS संरक्षण" किंवा "HTTPS स्कॅनिंग" पुरवणारे अँटिव्हायरस सॉफ्टवेअर असल्यास, तुम्हाला ही एरर दिसेल. अँटिव्हायरस Chrome ला सुरक्षा पुरवण्यापासून रोखत आहे.

समस्येचे निराकरण करण्यासाठी, तुमचे अँटिव्हायरस सॉफ्टवेअर बंद करा. सॉफ्टवेअर बंद केल्यावर पेज काम करत असल्यास, तुम्ही सुरक्षित साइट वापरत असताना हे सॉफ्टवेअर बंद करा.

तुमचे काम झाल्यावर तुमचा अँटिव्हायरस प्रोग्राम पुन्हा सुरू करण्याचे लक्षात ठेवा.

पाचवी पायरी: अतिरिक्त मदत मिळवा

तुम्हाला तरीही एरर दिसत असल्यास, वेबसाइटच्या मालकाशी संपर्क साधा. तुम्ही Chrome मदत फोरम वरदेखील अधिक मदत मिळवू शकता.

"नेटवर्कशी कनेक्ट करा"

तुम्ही ऑनलाइन येण्यापूर्वी तुम्हाला साइन इन करावे लागेल असे वाय-फाय पोर्टल तुम्ही वापरत असल्यास, तुम्हाला ही एरर दिसेल.

एररचे निराकरण करण्यासाठी, तुम्ही उघडायचा प्रयत्न करत असलेल्या पेजवर कनेक्ट करा वर क्लिक करा.

"तुमचे घड्याळ मागे आहे" किंवा "तुमचे घड्याळ पुढे आहे" किंवा "NET::ERR_CERT_DATE_INVALID"

तुमच्या कॉंप्युटर किंवा मोबाइल डिव्हाइसची तारीख आणि वेळ चुकीची असल्यास, तुम्हाला ही एरर दिसेल.

एररचे निराकरण करण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसचे घड्याळ उघडा. वेळ आणि तारीख योग्य असल्याची खात्री करा.

"सर्व्हरकडे कमकुवत तात्पुरती Diffie-Hellman सार्वजनिक की आहे" किंवा "ERR_SSL_WEAK_EPHEMERAL_DH_KEY"

तुम्ही कालबाह्य झालेला सुरक्षा कोड असलेल्या वेबसाइटवर जाण्याचा प्रयत्न केल्यास, तुम्हाला ही एरर दिसेल. तुम्हाला या साइटशी कनेक्ट करू न देऊन, Chrome तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करते.

ही वेबसाइट तुमच्या मालकीची असल्यास, ECDHE ला सपोर्ट करण्यासाठी तुमचा सर्व्हर अपडेट करण्याचा प्रयत्न करा आणि DHE बंद करा. ECDHE उपलब्ध नसल्यास, तुम्ही सर्व DHE सायफर संच बंद करू शकता आणि साधारण RSA वापरू शकता.

"हे वेबपेज उपलब्ध नाही" किंवा "ERR_SSL_VERSION_OR_CIPHER_MISMATCH"

तुम्ही कालबाह्य झालेला सुरक्षा कोड वापरत असलेल्या वेबसाइटवर जाण्याचा प्रयत्न केल्यास, तुम्हाला ही एरर दिसेल. तुम्हाला या साइटशी कनेक्ट करू न देऊन, Chrome तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करते.

ही वेबसाइट तुमच्या मालकीची असल्यास, RC4 ऐवजी TLS 1.2 आणि TLS_ECDHE_RSA_WITH_AES_128_GCM_SHA256 वापरण्यासाठी तुमचा सर्व्हर सेट करण्याचा प्रयत्न करा. RC4 ला आता सुरक्षित मानले जात नाही. तुम्ही RC4 बंद करू शकत नसल्यास, इतर RC4 नसलेले सायफर सुरू असल्याची खात्री करा.

"तुमच्या कॉंप्युटरवरील सॉफ्टवेअर Chrome ला सुरक्षितपणे वेबशी कनेक्ट करण्यापासून थांबवत आहे" (फक्‍त Windows कॉंप्युटर)

तुमच्या Windows कॉंप्युटरवर Superfish सॉफ्टवेअर असल्यास, तुम्हाला ही एरर दिसेल. तुमच्या कॉंप्युटरमधून हे सॉफ्टवेअर काढून टाकण्यासाठी:

  1. तुमच्या Windows कॉंप्युटरवर, Chrome उघडा.
  2. या समस्येसाठी Lenovo च्या सपोर्ट पेज वर जा.
  3. SuperFish काढून टाकण्याचे टूल डाउनलोड करा वर क्लिक करा.
  4. तळाशी, फाइलनाव (Lenovo.SuperFishRemovalTool.exe) वर क्लिक करा.
  5. ऑनस्क्रीन सूचना फॉलो करा.
“एक्सपायर झालेली DigiCert सर्टिफिकेट हटवा” (फक्त Mac कॉंप्युटर)

पेज तुमच्या कॉंप्युटरवर योग्यरीत्या सेटअप न केलेले सर्टिफिकेट वापरत असल्यास, तुम्हाला ही एरर दिसेल.

एररचे निराकरण करण्यासाठी, या टिपा वापरून पाहा:

  1. तुमच्या Mac कॉंप्युटरवर, सर्वात वरती उजवीकडे, स्पॉटलाइट शोधSearch वर क्लिक करा.
  2. "Keychain Access" एंटर करा.
  3. परिणामांमध्ये, Keychain Access वर क्लिक करा.
  4. तुमच्या कॉंप्युटर स्क्रीनच्या सर्वात वरती, पाहा आणि त्यानंतर एक्सपायर झालेली सर्टिफिकेट दाखवा वर क्लिक करा.
  5. सर्वात वरती उजवीकडे, शोधा Search वर क्लिक करा.
  6. "DigiCert High" एंटर करा आणि तुमच्या कीबोर्डवरील एंटर दाबा.
  7. एक्सपायर झाले आहे Expired अशी खूण केलेले "DigiCert High Assurance EV Root CA" शोधा. सर्टिफिकेटवर क्लिक करा.
  8. तुमच्या कीबोर्डवरील डिलीट दाबा.

तुम्हाला [साइटचे नाव] म्हणायचे होते का?

तुम्ही नेहमी भेट देत असलेल्या साइटपेक्षा, तुम्ही उघडलेली लिंक थोडे वेगळे नाव असलेल्या साइटवर गेल्यास, तुम्हाला हा मेसेज दिसेल. तुम्ही नेहमी भेट देत असलेल्या साइटवर तुम्हाला जायचे असल्यास, Chrome तुम्हाला विचारेल.

  • साइटच्या नावावर क्लिक करा किंवा Chrome ने सुचवलेल्या साइट वर जाणे पुढे सुरू ठेवा.
  • तुम्ही उघडलेल्या लिंक वर पुढे सुरू ठेवण्यासाठी, दुर्लक्ष करा वर क्लिक करा.

 

अजूनही काम करत नाही? वरील टिपांची मदत होत नसल्यास, तुमचे कनेक्शन धोक्यात आलेले असू शकते. तुम्हाला Chrome मदत फोरम वर आणखी मदत मिळू शकते.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8277171004878380221
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false