तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरणे

तुम्ही Chrome मधील साइटसाठी तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरू शकता. 

महत्त्वाचे: २०२१ मध्ये Adobe हे Flash Player प्लगइनला सपोर्ट करणार नाही. ऑडिओ आणि व्हिडिओच्या समावेशासह Flash आशय हा यापुढे Chrome च्या कोणत्याही आवृत्तीमध्ये प्ले केला जाणार नाही. अधिक जाणून घेण्यासाठी Chrome ब्लॉग ला भेट द्या.

  1. Chrome Chrome उघडा.
  2. तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरायचा असलेल्या साइटवर जा.
  3. सूचित केल्यावर, अनुमती द्या किंवा ब्लॉक करा निवडा.
    • अनुमती दिलेल्या साइट: तुम्ही साइटवर असता तेव्हा साइट रेकॉर्ड करण्यास सुरुवात करू शकतात. तुम्ही वेगळा Chrome टॅब किंवा वेगळे अ‍ॅप वापरत असल्यास, साइट रेकॉर्डिंग सुरू करू शकत नाही.
    • ब्लॉक केलेल्या साइट: तुम्ही काही साइट ब्लॉक केल्यास, त्या काम करणार नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही व्हिडिओ कॉंफरन्समध्ये सहभागी होऊ शकणार नाही

साइटवरील कॅमेराच्या आणि मायक्रोफोनच्या परवानग्या बदला

  1. Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज आणि त्यानंतर कॅमेरा किंवा मायक्रोफोन वर क्लिक करा.
  4. तुम्हाला तुमचे डीफॉल्ट सेटिंग म्हणून हवा असलेला पर्याय निवडा.
    • तुमच्या ब्लॉक केलेल्या आणि अनुमती असलेल्या साइटचे परीक्षण करा.
    • सध्याचे एक्सेप्शन किंवा परवानगी काढून टाकण्यासाठी: साइटच्या उजवीकडे, हटवा हटवा वर क्लिक करा.
    • तुम्ही आधीच ब्लॉक केलेल्या साइटला अनुमती देण्यासाठी:"अनुमती नाही" अंतर्गत, साइटचे नाव निवडा आणि कॅमेरा किंवा मायक्रोफोनची परवानगी "अनुमती द्या" वर बदला.

तुम्ही ऑफिस किंवा शाळेमध्ये Chrome डिव्हाइस वापरत असल्यास, तुमचा नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेटर तुमच्यासाठी कॅमेरा आणि मायक्रोफोनची सेटिंग्ज सेट करू शकतो. अशावेळी, तुम्हाला त्या येथे बदलता येणार नाहीत. व्यवस्थापित केलेले Chrome डिव्हाइस वापरण्याबद्दल जाणून घ्या.

कॉंप्युटर सेटिंग्जमध्ये परवानग्या सुरू करा
Chrome तुमचा कॅमेरा किंवा मायक्रोफोन वापरण्यासाठी परवानगी मागू शकते. Chrome मध्ये तुमचा कॅमेरा किंवा मायक्रोफोन वापरण्यासाठी:
  1. डायलॉगमध्ये, प्राधान्ये उघडा निवडा.
  2. कॅमेरा किंवा माइक परवानग्या सुरू करण्यासाठी:
    • कॅमेरा: कॅमेराआणि त्यानंतर वर क्लिक करा, "Google Chrome" च्या बाजूला असलेल्या चेकबॉक्समध्ये खूण करा.
    • मायक्रोफोन: मायक्रोफोन आणि त्यानंतरवर क्लिक करा, "Google Chrome" च्या बाजूला असलेल्या चेकबॉक्समध्ये खूण करा.
  3. बदल सेव्ह करण्यासाठी तुम्हाला बाहेर पडायचे आहे का असे तुमचा कॉंप्युटर विचारू शकतो. बदल सेव्ह करण्यासाठी, आता बाहेर पडा वर क्लिक करा.
डीफॉल्ट मायक्रोफोन निवडा

तुम्ही वेगवेगळ्या साइटवर वापरण्यासाठी डीफॉल्ट मायक्रोफोन निवडू शकता.

  1. Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज आणि त्यानंतर मायक्रोफोन वर क्लिक करा.
  4. डीफॉल्ट मायक्रोफोन निवडण्यासाठी, डाउन अ‍ॅरो Down arrow वर क्लिक करा.

माइकसंबंधित समस्यांचे निराकरण करा

तुमचा मायक्रोफोन काम करत नसल्यास, पुढील पायऱ्या वापरून पाहा:

पहिली पायरी: तुम्हाला म्यूट केले नसल्याची खात्री करा

तुम्ही हेडसेट वापरत असल्यास, कॉर्डवरील म्यूट स्विच बंद असल्याची खात्री करा. आणि तुम्हाला वेबसाइट (जसे की, Google Meet किंवा Skype) वरदेखील म्यूट केले नसल्याची खात्री करा.

दुसरी पायरी: तुमची सिस्टीम सेटिंग्ज तपासा

तुमचा मायक्रोफोन डीफॉल्ट रेकॉर्ड करणारे डिव्हाइस असल्याची आणि रेकॉर्डिंग पातळी योग्य असल्याची खात्री करा:

तिसरी पायरी: तुमच्या निर्मात्याशी संपर्क साधा

तुम्हाला तरीही समस्या येत असल्यास, तुमच्या मायक्रोफोनच्या निर्मात्याशी संपर्क साधा.

कॅमेरासंबंधित समस्यांचे निराकरण करा

पहिली पायरी: Chrome मध्ये तुमच्या साइटशी संबंधित परवानग्या तपासा

तुम्हाला वापरायच्या असलेल्या साइटवर तुम्ही कॅमेराच्या अ‍ॅक्सेसला अनुमती दिल्याची खात्री करा. तुम्ही सर्व साइटना किंवा फक्त तुम्ही वापरत असलेल्या विशिष्ट साइटला तुमचा कॅमेरा वापरण्याची अनुमती देऊ शकता.

साइट परवानग्यांबद्दल अधिक जाणून घ्या.

दुसरी पायरी: तुमची सिस्टीम सेटिंग्ज तपासा

तुम्हाला वापरायचा असलेला कॅमेरा निवडल्याची आणि त्याच्या पातळ्या योग्य असल्याची खात्री करा:

तिसरी पायरी: Google Meet शी संबंधित समस्या ट्रबलशूट करा

तुम्हाला समस्या येत असल्यास, Google Meet शी संबंधित समस्या कशा ट्रबलशूट करायच्या ते जाणून घ्या.

चौथी पायरी: तुमचा कॉल आणि कॉंप्युटर रीस्टार्ट करा

  1. व्हिडिओ कॉलमधून बाहेर पडा आणि पुन्हा सामील व्हा.
  2. तुमचा कॉंप्युटर रीस्टार्ट करा.

पाचवी पायरी: तुमच्या निर्मात्याशी संपर्क साधा

तुमच्या कॅमेराच्या निर्मात्याशी संपर्क साधा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17349223896992028527
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false