Chrome मध्ये बुकमार्क तयार करणे, शोधणे आणि संपादित करणे

बुकमार्क तयार करा, जेणेकरून Chrome तुमच्या आवडत्या आणि वारंवार भेट दिलेल्या वेबसाइट लक्षात ठेवू शकेल.

तुम्ही तुमचे Google खाते वापरून Chrome मध्ये साइन इन करता, तेव्हा तुमच्या सर्व डिव्हाइसवर बुकमार्क आणि इतर माहिती वापरू शकता.

बुकमार्क जोडणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. भविष्यात तुम्हाला पुन्हा भेट द्यायच्या असलेल्या साइटवर जा.
  3. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, बुकमार्क Bookmark this page निवडा.

बुकमार्क शोधणे

महत्त्वाचे: सोप्या मार्गाने बुकमार्क उघडण्यासाठी, तो बुकमार्क बारमध्ये निवडा. बुकमार्क बार सुरू किंवा बंद करण्यासाठी, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर बुकमार्क बार दाखवा निवडा.

तुमचा बुकमार्क बार सुरू केलेला नसल्यास किंवा तुमचा बुकमार्क तेथे नसल्यास, तुमचे बुकमार्क शोधण्याचे तीन मार्ग आहेत.

अ‍ॅड्रेस बारवरून
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारमध्ये, @bookmarks एंटर करा.
  3. टॅब किंवा स्पेस प्रेस करा.
    • तुम्ही सूचनांमध्ये बुकमार्क शोधा Search वरदेखील निवडू शकता.
  4. तुम्हाला हव्या असलेल्या बुकमार्कसाठी कीवर्ड एंटर करा.
  5. सूचीमधून तुमचा बुकमार्क निवडा.
मेनूमधून
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर बुकमार्क व्यवस्थापक निवडा.
  3. बुकमार्क निवडा.
नेव्हिगेशन पॅनलमध्ये
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर सर्व बुकमार्क दाखवा निवडा.
  3. बुकमार्क निवडा.
टीप: बुकमार्क व्हिज्युअलवरून संक्षिप्त दृश्यावर स्विच करण्यासाठी, निवडा.

बुकमार्क संपादित करणे

मेनूमधून
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर बुकमार्क व्यवस्थापक निवडा.
  3. उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर संपादित करा निवडा.
नेव्हिगेशन पॅनलमध्ये
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर सर्व बुकमार्क दाखवा निवडा.
  3. एक बुकमार्क संपादित करण्यासाठी, बुकमार्कवर कर्सर फिरवा.
  4. आणखी आणखी आणि त्यानंतर संपादित करा निवडा.
    • बल्कमध्ये संपादित करण्यासाठी, संपादित करा निवडा.

बुकमार्क हटवा

महत्त्वाचे: बुकमार्क हटवल्यानंतर, तुम्ही तो परत मिळवू शकत नाही. मेनूमधून
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर बुकमार्क व्यवस्थापक निवडा.
  3. उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर हटवा निवडा.
नेव्हिगेशन पॅनलमध्ये
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर सर्व बुकमार्क दाखवा निवडा.
  3. बुकमार्कच्या विशिष्ट फोल्डरवर किंवा लिंकवर कर्सर फिरवा.
  4. आणखी आणखी आणि त्यानंतर हटवा निवडा.

नवीन बुकमार्क फोल्डर तयार करा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर बुकमार्क व्यवस्थापक निवडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी निवडा आणखी आणि त्यानंतर नवीन फोल्डर जोडा.

तुम्ही फोल्डर जोडण्यासाठी बुकमार्क बार वापरत असल्यास, बुकमार्क बारवर राइट-क्लिक करून फोल्डर जोडा निवडा.

टीप: उत्पादन पेजसाठी, खरेदीच्या सूचीशी संबंधित फोल्डरबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमचे बुकमार्क क्रमाने लावा

मेनूमधून
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर बुकमार्क व्यवस्थापक निवडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर नावानुसार क्रमाने लावा निवडा.
नेव्हिगेशन पॅनलमध्ये
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर सर्व बुकमार्क दाखवा निवडा.
  3. तुमचे बुकमार्क क्रमाने लावण्यासाठी, संगतवार लावा निवडा.
  4. संगतवार लावण्यासाठी तुमचा प्राधान्य दिलेला क्रम निवडा:
    • सर्वात नवीन यानुसार क्रमाने लावा
    • सर्वात जुना यानुसार क्रमाने लावा
    • शेवटचा उघडलेला यानुसार क्रमाने लावा
    • A ते Z यानुसार क्रमाने लावा
    • Z ते A यानुसार क्रमाने लावा

तुमचे बुकमार्क हलवा

मेनूमधून
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर बुकमार्क व्यवस्थापक निवडा.
  3. बुकमार्क वर किंवा खाली ड्रॅग करा अथवा बुकमार्क डावीकडील फोल्डरमध्ये ड्रॅग करा. तुमचे बुकमार्क तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या क्रमानेदेखील कॉपी करून पेस्ट करू शकता.

तुम्ही बुकमार्क बार वापरत असल्यास, तुम्हाला हव्या असलेल्या क्रमामध्ये तुमचे बुकमार्क ड्रॅग करू शकता.

नेव्हिगेशन पॅनलमध्ये
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर सर्व बुकमार्क दाखवा निवडा.
  3. तुम्हाला हलवायचा असलेला बुकमार्क निवडा आणि त्यानंतर आणखीआणखी आणि त्यानंतर संपादित करा निवडा.
  4. तुम्हाला ज्यावर बुकमार्क हलवायचा आहे ते फोल्डर आणि त्यानंतरसेव्ह करा निवडा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14903926009045289549
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false