Chrome मधील Gemini ला ऑटोमॅटिक ब्राउझिंग वापरून तुमची टास्क पूर्ण करण्यास सांगणे

तुम्ही Chrome मधील Gemini ला ऑटोमॅटिक ब्राउझिंगच्या मदतीने वेबवर तुमच्यासाठी एकाहून अधिक पायऱ्या असलेल्या टास्क पूर्ण करण्यास सांगू शकता. पर्सनलाइझ केलेले, उपयुक्त परिणाम मिळवण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी तुमची प्राधान्ये, सूचना आणि यापूर्वी शेअर केलेले तपशील यांचे पुनरावलोकन केले जाते. उदाहरणार्थ, तुम्ही त्याला पुढील गोष्टी करण्यास सांगू शकता:

  • उत्पादनांची तुलना करणे, डील शोधणे आणि तुमच्या कार्टमध्ये आयटम जोडणे
  • विशिष्ट निकषांच्या आधारावर प्रवासादरम्यानची निवासस्थाने शोधण्यात आणि बुक करण्यात तुम्हाला मदत करणे
  • रेस्टॉरंटमध्ये आरक्षणे करणे आणि अपॉइंटमेंट शेड्यूल करणे
  • तुम्हाला आणखी बऱ्याच टास्क करण्यात मदत करणे

तुम्हाला काय आवश्यक आहे

तुमच्या काँप्युटरवर ऑटोमॅटिक ब्राउझिंग वापरण्यासाठी, तुम्ही पुढील निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे:

महत्त्वाचे:

  • आम्ही Chrome मधील Gemini मध्ये ऑटोमॅटिक ब्राउझिंग हळूहळू रिलीझ करत आहोत, त्यामुळे ते कदाचित तुमच्यासाठी अद्याप उपलब्ध नसेल.
  • सध्या, हे वैशिष्ट्य Live चॅट मध्ये किंवा iPhone डिव्हाइसवरील Chrome मधील Gemini मध्ये उपलब्ध नाही.

Chrome मधील Gemini ला तुमच्यासाठी टास्क पूर्ण करण्यास सांगा

महत्त्वाचे: तुमच्यासाठी टास्क पूर्ण करण्याकरिता Chrome मधील Gemini वेबवरील साइटची विस्तृत रेंज वापरू शकते. तुम्ही संबंधित ॲप्स Gemini ॲप्सशी कनेक्ट केलेली नसली, तरीही हे खरे आहे. कनेक्ट केलेल्या ॲप्सबद्दल अधिक जाणून घ्या.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. तुमच्या ब्राउझरच्या सर्वात वरती, Gemini ला विचारा  वर क्लिक करा.
  3. तुम्हाला त्याच्याकडून जी टास्क पूर्ण करून घ्यायची आहे, त्या टास्कचे वर्णन टेक्स्ट बॉक्समध्ये करा.
  4. सबमिट करा वर क्लिक करा.
  5. टास्क पूर्ण करण्यासाठी Chrome मधील Gemini द्वारे वापरल्या जाणाऱ्या प्लॅनचे पुनरावलोकन करा.
    • त्याने तुमचा प्रॉम्प्ट, पेजचा संदर्भ आणि तुमची वैयक्तिक माहिती योग्यरीत्या समजून घेतली आहे का हे तपासा. 
    • टीप: टास्क पूर्ण करण्यासाठी कोणत्या साइट वापरायच्या हे Gemini निवडू शकते आणि ते त्या साइटसोबत तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू शकते.
  6. प्लॅन योग्य असल्यास, टास्क सुरू करा वर क्लिक करा.
    • Chrome मधील Gemini टास्क करत असताना, त्याद्वारे वापरल्या जाणाऱ्या टॅबवर ऑटोमॅटिक ब्राउझिंगचा आयकन दिसतो.
    • Chrome मधील Gemini ला एखादी पायरी पूर्ण करण्यासाठी तुमची आवश्यकता असेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या ब्राउझरच्या सर्वात वरती नोटिफिकेशन दिसेल.
  7. टास्क पूर्ण करण्यासाठी आवश्यक असल्यास:
    • कोणत्याही संवेदनशील पायऱ्यांचे पुनरावलोकन करून त्या कन्फर्म करा.
    • तुम्हाला स्वतः पूर्ण करायला लागणाऱ्या पायऱ्यांसाठी, टास्कचे नियंत्रण मिळवा.
    • Chrome मधील Gemini ला तुमच्यासाठी साइटमध्ये साइन इन करण्याची परवानगी द्या.

टिपा:

  • टास्क टॅबवर जाण्यासाठी: चॅटमधील टास्कच्या बाजूला, टॅब स्विच करा वर क्लिक करा.
    • टास्ककडे तुम्ही लक्ष देणे आवश्यक असल्यास, तुमच्या ब्राउझरच्या सर्वात वरती, तुमची टास्क तपासा वर क्लिक करा.
  • Chrome मधील Gemini कडून टास्कचे नियंत्रण मिळवण्यासाठी: टास्क टॅबवर, टास्कचे नियंत्रण मिळवा वर क्लिक करा.
  • टास्क पुन्हा सुरू करण्यासाठी: Chrome मधील Gemini मध्ये, पुन्हा सुरू करा किंवा टास्कचे नियंत्रण परत द्या वर क्लिक करा.
  • टास्क थांबवण्यासाठी: Chrome मधील Gemini मध्ये, थांबवा वर क्लिक करा. तुम्ही टास्क टॅब बंददेखील करू शकता.
  • Chrome मधील Gemini च्या संदर्भातील समस्येची तक्रार कशी करावी किंवा त्याबद्दल फीडबॅक कसा पाठवावा हे जाणून घ्या.

उदाहरणे

तुम्ही Chrome मधील Gemini ला पुढील गोष्टी करण्यास सांगू शकता:

  • विशिष्ट निकषांच्या आधारावर प्रवासादरम्यानची निवासस्थाने शोधणे आणि बुक करणे
  • डायनिंगसंबंधित आरक्षणे आणि खाद्यपदार्थांची डिलिव्हरी व्यवस्थापित करणे
  • इव्हेंटची आणि गट मनोरंजनासाठीची तिकिटे शोधणे
  • ऑनलाइन खरेदीसाठी उत्पादने शोधणे आणि त्यांची तुलना करणे
  • संवादांचा मसुदा तयार करा आणि कॅलेंडरवरील शेड्यूल संगतवार लावणे
  • जॉब मार्केट आणि व्यावसायिक नेटवर्किंगच्या संधी यांबाबत संशोधन करणे
  • पावत्या मिळवण्यासारख्या ऑनलाइन आर्थिक कामांमध्ये साहाय्य करणे
  • इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वेब टास्क करणे

टास्कचे नियंत्रण मिळवा

Chrome मधील Gemini टास्क परफॉर्म करत असताना, तुम्ही कधीही त्या टास्कचे नियंत्रण मिळवू शकता. तुम्हाला वैयक्तिकरीत्या पूर्ण करायच्या असलेल्या ठरावीक टास्कसाठी, Gemini तुम्हाला नियंत्रण घेण्यास सांगेल.

टास्कचे नियंत्रण मिळवण्यासाठी:

  1. Chrome मधील Gemini टास्कसाठी वापरत असलेल्या टॅबवर जा.
  2. टास्कचे नियंत्रण मिळवा वर क्लिक करा.
  3. तुम्हाला स्वतः करायच्या असलेल्या किंवा Gemini ने तुम्हाला करायला सांगितलेल्या पायऱ्या पूर्ण करा.
  4. टास्कचे नियंत्रण परत देण्यासाठी, Chrome मधील Gemini चॅटमध्ये, पुन्हा सुरू करा किंवा टास्कचे नियंत्रण परत द्या वर क्लिक करा.

Chrome मधील Gemini तुम्हाला ज्या साइटमध्ये साइन इन करते त्या साइट व्यवस्थापित करा

तुमच्या परवानगीने, Chrome मधील Gemini तुमच्यासाठी साइटवर साइन इन करण्याकरिता Google Password Manager कडून मदत मिळवू शकते. Google Password Manager हे Chrome मधील Gemini सोबत तुमचे पासवर्ड शेअर करत नाही. तुम्ही ही परवानगी कधीही काढून टाकू शकता.

तुमच्यासाठी साइटमध्ये साइन इन करण्याकरिता Chrome मधील Gemini ला दिलेली परवानगी काढून टाकण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणि त्यानंतर पासवर्ड आणि ऑटोफिल आणि त्यानंतर Google Password Manager वर क्लिक करा.
  3. डावीकडे, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. “Gemini तुमच्यासाठी साइन इन करू शकते” या अंतर्गत, तुम्ही Gemini ला ज्या साइटवर आपोआप साइन इन करण्याची अनुमती दिली आहे, त्या साइटचे पुनरावलोकन करा.
  5. साइट काढून टाकण्यासाठी, हटवा  वर क्लिक करा.

Chrome मधील Gemini तुमच्यासाठी ब्राउझ करू शकते का हे बदला

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. सेटिंग्ज मेनूमध्ये, AI प्रयोग आणि त्यानंतर Chrome मधील Gemini वर क्लिक करा.
    • मेनू लपवलेला असल्यास, सर्वप्रथम मेनू वर क्लिक करा.
  4. “परवानग्या” या अंतर्गत, Gemini ला तुमच्यासाठी ब्राउझ करू द्या हे बंद किंवा सुरू करा.

Chrome मधील Gemini च्या मर्यादांबद्दल

Chrome मधील Gemini मध्ये, पुढील गोष्टींच्या संख्येसाठी मर्यादा आहेत:

  • तुम्ही दररोज विनंती करू शकता अशा एकाहून अधिक पायऱ्या असलेल्या टास्क
    • Google AI Pro प्लॅनसह: प्रति दिवस कमाल २० विनंत्या
    • Google AI Ultra प्लॅनसह: प्रति दिवस कमाल २०० विनंत्या
  • Chrome मधील Gemini एकाच वेळी करू शकते अशा एकाहून अधिक पायऱ्या असलेल्या टास्क

तुम्ही तुमची मर्यादा गाठल्यावर, Chrome मधील Gemini तुम्हाला कळवते.

तुम्हाला आणि तुमच्या माहितीला सुरक्षित ठेवण्यासाठी Chrome मधील Gemini तुमच्यासोबत कसे काम करते

एजंट म्हणून काम करणारे Chrome मधील Gemini हे प्रायोगिक वैशिष्ट्य आहे. त्याच्या संरक्षक योजनांमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत असताना, अनपेक्षित आणि संभाव्यतः हानिकारक परिणाम टाळण्याकरिता Chrome मधील Gemini मधील ऑटोमॅटिक ब्राउझिंग काळजीपूर्वक व सुरक्षितपणे वापरा. चुका आणि खरेदीसारखे अनपेक्षित परिणाम यांसह, टास्कदरम्यान Gemini ने केलेल्या कृतींसाठी तुम्ही जबाबदार असता.

AI एजंट वापरण्याच्या संभाव्य धोक्यांबद्दल

Chrome मधील Gemini यातील ऑटोमॅटिक ब्राउझिंगसारखे AI एजंट ही उपयुक्त आणि प्रभावी टूल आहेत, मात्र, त्यांच्या संभाव्य धोक्यांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, की Chrome मधील Gemini हे चुका आणि अनपेक्षित गोष्टी करू शकते.

प्रॉम्प्ट इंजेक्शनविषयी

प्रॉम्प्ट इंजेक्शन म्हणजे Chrome मधील Gemini सारख्या जनरेटिव्ह AI टूलमधून अनपेक्षित किंवा हानिकारक प्रतिसाद मिळवण्याचा प्रयत्न होय. वेबसाइट, ईमेल, दस्तऐवज किंवा मल्टीमीडिया यांसारख्या आशयात दुर्भावनापूर्ण सूचना असतात, तेव्हा असे घडते. या सूचना तुमच्यापासून लपवलेल्या असू शकतात, पण AI एजंटसाठी त्या दृश्यमान असू शकतात.

टास्क करत असताना AI एजंटने या सूचना वाचल्यास, त्याला फसवून नको असलेल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, दुर्भावनापूर्ण सूचनेमध्ये एजंटला या गोष्टी करण्यास सांगितले जाऊ शकते:

  • तुमच्या ईमेलमधून किंवा दस्तऐवजांमधून तुमची खाजगी माहिती घेणे आणि ती सार्वजनिक वेबसाइटवर पोस्ट करणे
  • तुम्हाला न कळवता Gmail मधील तुमचे ईमेल बाह्य सेवेला पाठवणे
  • कनेक्ट केलेल्या ॲप्समधील तुमच्या डेटाच्या आधारे तुमच्याबद्दलच्या इनसाइट उघड करणे

Chrome मधील Gemini तुमची माहिती वेबसाइटसोबत शेअर करू शकते

ऑटोमॅटिक ब्राउझिंग हे तुमच्या वतीने कृती आणि कामे पूर्ण करण्यासाठी तुमच्या उघड्या टॅबवर काम करते. तुमच्या विनंतीची पूर्तता करण्यासाठी कोणत्या साइटना भेट द्यायची हे Gemini निवडू शकते. या टास्क अधिक अचूकपणे पूर्ण करण्यासाठी Gemini तुमची वैयक्तिक माहिती (जसे की Google Workspace सारखी कनेक्ट केलेली अ‍ॅप्स यामधील डेटा) वापरू शकते. एखाद्या वेबसाइटवर ऑटोमॅटिक ब्राउझिंगसंबंधित टास्क पूर्ण करताना, Gemini तुमची माहिती त्या साइटसोबत शेअर करू शकते.

टीप: तुम्ही तुमच्या Gemini सेटिंग्ज मध्ये तुमची डेटा शेअरिंग प्राधान्ये आणि कनेक्ट केलेली अ‍ॅप्स व्यवस्थापित करू शकता.

Chrome मधील Gemini चुका करू शकते

Chrome मधील Gemini हे त्याला तुम्ही करायला सांगितलेल्या कामाबद्दल किंवा ते ब्राउझ करत असलेल्या वेबसाइटबद्दल जाणून घेण्यात चुकू शकते. यामुळे, यांसारख्या अनपेक्षित कृती घडू शकतात:

  • सूचना चुकीच्या पद्धतीने फॉलो करणे किंवा चुकीच्या लिंकवर अथवा बटणावर क्लिक करणे
  • तुमची परवानगी नसताना खरेदी पूर्ण करणे किंवा एखादी गोष्ट ऑर्डर करणे
  • तुमच्या कार्टमध्ये चुकीच्या संख्येतील आयटम जोडणे किंवा आयटम जोडण्यास विसरणे
  • टास्क पूर्ण झाली नसताना किंवा त्यात अजून सुधारणा शक्य असतानाही ती पूर्ण झाली असे कन्फर्म करणे
  • ते पूर्ण करू शकणारी पायरी तुम्हाला नियंत्रणात घ्यायला सांगणे

Chrome मधील Gemini यातील हे धोके आम्ही कसे हाताळतो याबद्दल जाणून घ्या.

तुम्हाला आणि तुमच्या माहितीला सुरक्षित ठेवण्यासाठी Chrome मधील Gemini कसे डिझाइन केले आहे

Chrome मध्ये ऑटोमॅटिक ब्राउझिंगसाठी संरक्षक योजना आहेत, ज्यांचा उद्देश अनपेक्षित किंवा संभाव्य हानिकारक कृतींसोबतच, AI एजंटचे संभाव्य धोके कमी करणे हा आहे. या संरक्षक योजना सर्व धोक्यांपासून संरक्षणाची हमी देत नसल्या, तरीही त्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • “टास्कचे नियंत्रण मिळवणे”: Chrome मधील Gemini पुढील कृतींसारख्या ठरावीक कृती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला टास्कचे नियंत्रण मिळवण्यास सांगू शकते:
    • आर्थिक व्यवहार अंतिम करणे
    • सेवा अटी स्वीकारणे
    • खाते तयार करणे
  • वापरकर्ता कन्फर्मेशनच्या विनंत्या: यांसारख्या ठरावीक कृती पूर्ण करण्यापूर्वी, Chrome मधील Gemini हे तुम्हाला पुनरावलोकन आणि कन्फर्मेशन करण्याची विनंती करते:
    • टास्क सुरू करणे
    • संवाद पाठवणे
    • तुमच्या डेटामध्ये फेरबदल करणे
    • वेब फॉर्म सबमिट करणे
    • इव्हेंट शेड्यूल करणे
    • आर्थिक किंवा आरोग्यासंबंधित अत्यंत संवेदनशील डेटा असलेल्या साइट ॲक्सेस करणे
  • परवानगीच्या विनंत्या: Chrome मधील Gemini हे तुमच्यासाठी साइटमध्ये साइन इन करण्याकरिता, Google Password Manager कडून मदत मिळवण्यापूर्वी तुमची परवानगी मागते. Google Password Manager हे Chrome मधील Gemini सोबत तुमचे पासवर्ड शेअर करत नाही. तुम्ही ही परवानगी कधीही काढून टाकू शकता.
  • प्रतिबंधित केलेली टास्क ओळखणे: Chrome मधील Gemini मध्ये अशा संरक्षक योजना समाविष्ट आहेत, ज्या त्याला हानिकारक किंवा त्याच्या उद्देशाबाहेरील विनंत्या ओळखण्यास आणि त्यांवर कृती न करण्यास मदत करतात; ज्यांमध्ये जनरेटिव्ह AI प्रतिबंधित वापर धोरण याचे उल्लंघन करणाऱ्या टास्कचाही समावेश आहे.
  • साइट आणि कृती यांवरील निर्बंध: Chrome मधील Gemini हे त्याच्या ॲक्टिव्हिटीला तुमच्या टास्कशी सुसंबद्ध असलेल्या वेबसाइट व कृती यांपुरतेच मर्यादित ठेवते. यामुळे इतर असंबद्ध साइटवरील तुमच्या डेटाचे संरक्षण करण्यात आणि तुमच्या टास्कशी संबंधित नसलेल्या कृती रोखण्यात मदत होते. प्रॉम्प्ट इंजेक्शनपासून संरक्षण करण्याचे हे काही मार्ग आहेत.

ऑटोमॅटिक ब्राउझिंगसाठी Chrome मधील संरक्षक योजनांबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमच्या टास्कवर लक्ष ठेवणे का महत्त्वाचे आहे आणि Chrome मधील Gemini कसे थांबवावे

वर वर्णन केलेल्या Chrome च्या ऑटोमॅटिक ब्राउझिंगसाठीच्या संरक्षक योजना सर्व धोक्यांपासून संरक्षणाची हमी देत नाहीत.

महत्त्वाच्या आणि संवेदनशील टास्कवर लक्ष ठेवा

ऑटोमॅटिक ब्राउझिंग वापरताना सुरक्षित राहण्यासाठी, तुम्ही तुमच्या टास्कवर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कन्फर्मेशनसंबंधित विनंत्यांचे आणि स्पष्टीकरणाची विचारणा करणाऱ्या प्रश्नांचे लक्षपूर्वक पुनरावलोकन करा. ऑटोमॅटिक ब्राउझिंग लक्षपूर्वक आणि सुरक्षितपणे वापरा व Chrome मधील Gemini ला फक्त तुम्हाला योग्य वाटणाऱ्या टास्क द्या. Chrome मधील Gemini पुढील गोष्टी करत असताना विशेष लक्ष ठेवा:

  • महत्त्वाची टास्क हाताळणे
  • त्याने आर्थिक, कायदेशीर आणि वैद्यकीय माहिती यांसारख्या संवेदनशील माहिती असलेल्या वेबसाइटवर साइन इन केलेले असणे
  • चुकांमुळे समस्या येऊ शकते असे काहीही करणे
  • एकाच चॅटमध्ये Google Workspace सारखी कनेक्ट केलेली ॲप्स वापरणे

नियंत्रण तुमच्याकडे आहे

Chrome मधील Gemini ने तुम्हाला आवडत नसलेली एखादी गोष्ट केल्यास, तुम्ही Chrome मधील Gemini मध्ये थांबवा वर किंवा Chrome मधील Gemini द्वारे वापरल्या जाणाऱ्या टॅबवर टास्कचे नियंत्रण मिळवा वर क्लिक करून ते थांबवू शकता. Chrome मधील Gemini च्या संरक्षक योजना या तुम्ही लक्ष ठेवण्याला पर्याय म्हणून मानल्या जाऊ नयेत.

तुमचा डेटा आणि Chrome मधील Gemini यांबद्दल

तुम्ही Gemini ॲप्स ॲक्टिव्हिटी मध्ये Chrome मधील Gemini सोबतच्या तुमच्या चॅटचे पुनरावलोकन करू शकता. तुमची Gemini ॲप्स ॲक्टिव्हिटी कशी व्यवस्थापित करावी आणि हटवावी हे जाणून घ्या.

तुम्ही Chrome मधील Gemini ने भेट दिलेल्या साइटचे तुमच्या Chrome इतिहासामध्ये पुनरावलोकन करू शकता. या साइटच्या बाजूला Gemini कृती आयकन दिसतो. तुमचा Chrome चा ब्राउझिंग इतिहास कसा पाहावा आणि हटवावा हे जाणून घ्या.

तुम्ही Chrome मधील Gemini वापरता, तेव्हा तुमच्या डेटाचे काय होते याबद्दल अधिक जाणून घ्या.

संबंधित स्रोत

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2198039158427750211
true
मदत केंद्र शोधा
false
true
true
true
true
true
237
false
false
false
false
false