तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमचे बुकमार्क, पासवर्ड आणि बरेच काही मिळवणे

तुम्ही Chrome मध्ये साइन इन करता, तेव्हा तुमच्या Google खाते मध्ये माहिती सेव्ह करू शकता. त्यानंतर तुम्ही जिथे त्याच खात्याने साइन इन केले आहे, तिथे तुमची माहिती तुमच्या सर्व डिव्हाइसवर वापरू शकता.

तुम्ही सिंक करणे सुरू करणे हे करता, तेव्हा खालीलप्रमाणे तुम्हाला तुमच्या सर्व डिव्हाइसवर समान माहिती दिसेल:

  • बुकमार्क
  • इतिहास आणि उघडे टॅब
  • पासवर्ड
  • पेमेंट माहिती
  • पत्ते, फोन नंबर आणि आणखी बरेच काही
  • सेटिंग्ज आणि प्राधान्ये
तुम्ही तुमचे Google खाते वापरून Chrome मध्ये साइन इन केलेले असते, पण सिंक सुरू केलेले नसते, तेव्हा तुम्ही तरीही Google Pay वर सेव्ह केलेली पेमेंट माहिती अ‍ॅक्सेस करू शकता.

कोणती माहिती सिंक केली जावी हे निवडणे

तुम्ही सिंक करणे सुरू करता तेव्हा, तुमच्या प्रोफाइलची सर्व माहिती तुमच्या Google खाते वर सेव्ह केली जाते. तुम्हाला सर्व काही सिंक करायचे नसल्यास, जी माहिती सेव्ह केली आहे ती तुम्ही बदलू शकता.

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर सिंक करा वर टॅप करा.
  3. सर्व काही सिंक करा बंद करा.
  4. काय सिंक करायचे ते निवडा.
Google पर्सनलाइझ करण्यासाठी तुमचा Chrome इतिहास वापरणे

बाय डीफॉल्ट, तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला Chrome इतिहासदेखील वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये जोडला जातो. तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी, Search किंवा Ads यासारख्या इतर Google उत्पादनांवर तुमची अ‍ॅक्टिव्हिटी वापरली जाऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या Chrome इतिहासावर आधारित शिफारस केलेली बातमी तुमच्या फीडमध्ये दिसू शकते.

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी कधीही नियंत्रित करू शकता. तुमची वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी पाहणे व नियंत्रित करणे हे कसे करावे हे जाणून घ्या.

तुम्हाला तुमची Google उत्पादने पर्सनलाइझ करायची नसल्यास, तुमचा Chrome इतिहास Google ला वाचू न देता तुमचा Chrome डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्ही अद्याप Google च्या क्लाउडचा वापर करू शकता. तुमची माहिती खाजगी ठेवणे याविषयी अधिक जाणून घ्या.

पासफ्रेझ वापरून तुमची माहिती खाजगी ठेवणे

पासफ्रेझ वापरून, तुमचा Chrome वरील डेटा Google ला वाचू न देता स्टोअर आणि सिंक करण्यासाठी तुम्ही Google चे क्लाउड वापरू शकता. तुमच्या Google Pay वरील पेमेंट पद्धती आणि अ‍ॅड्रेस पासफ्रेझने एन्क्रिप्ट केलेले नसतात.

पासफ्रेझ पर्यायी आहेत. डेटा भंगाचा धोका कमी करण्यासाठी, तुमच्या सिंक केलेल्या डेटाचे नेहमी उद्योगातील आघाडीचे एन्क्रिप्शन याद्वारे संरक्षण केले जाते.

तुमचा स्वतःचा पासफ्रेझ तयार करणे

तुमच्याकडे पासफ्रेझ असतो, तेव्हा:

  • तुम्ही कधीही कुठेही नव्याने सिंक सुरू केल्यास, तुम्हाला तुमचा पासफ्रेझ आवश्यक असतो.
  • तुम्ही आधीच सिंक सुरू केलेल्या तुमच्या डिव्हाइसवर तुमचा नवीन पासफ्रेझ एंटर करणे आवश्यक आहे.
  • तुम्ही Chrome वर ब्राउझ करत असलेल्या साइटच्या आधारावर तुमचे फीड सूचना दाखवणार नाही.
  • तुम्ही तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड passwords.google.com वर तपासू शकत नाही किंवा पासवर्डसाठी Smart Lock वापरू शकत नाही.
  • तुमचा सर्व इतिहास सर्व डिव्हाइसवर सिंक होणार नाही. तुम्ही Chrome च्या अ‍ॅड्रेस बारमध्ये टाइप केलेले वेब अ‍ॅड्रेस फक्त सिंक होतील.

पासफ्रेझ तयार करणे

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर सिंक करा वर टॅप करा.
  3. तुमच्या Google खाते शी सिंक करणे सुरू करा.
  4. तळाशी, एन्क्रिप्शन वर टॅप करा.
  5. तुमच्या Google खाते मधील सर्व डेटा एन्क्रिप्ट करण्यासाठी तुमचा स्वतःचा पासफ्रेझ वापरा हे निवडा.
  6. एंटर करा आणि पासफ्रेझ कन्फर्म करा.
  7. सेव्ह करा वर टॅप करा.
तुमचा पासफ्रेझ बदलणे किंवा काढून टाकणे

महत्त्वाचे: तुम्ही तुमचा पासफ्रेझ रीसेट केल्यानंतर Chrome मध्ये तुमचे पासवर्ड वापरणे सुरू ठेवण्यासाठी, पासवर्ड रीसेट करण्यापूर्वी आणि पुन्हा इंपोर्ट करण्यापूर्वी तुम्ही ते एक्सपोर्ट करू शकता.

तुम्ही तुमचा पासफ्रेझ बदलता, तेव्हा तुमच्या पासफ्रेझद्वारे एन्क्रिप्ट केलेला डेटा Google च्या सर्व्हरवरून हटवला जातो आणि जिथे तुम्ही साइन इन केले आहे, त्या तुमच्या सर्व डिव्हाइसवरून तुम्हाला साइन आउट केले जाते. तुमच्या Google Pay मधील पेमेंट पद्धती आणि तुमचे पत्ते पासफ्रेझद्वारे एन्क्रिप्ट केले जात नाहीत, त्यामुळे ते हटवले जाणार नाहीत.

तुमचे पासवर्ड आणि इतर माहिती तुमचे Google खाते व तुमचे डिव्हाइस यांवरून हटवली जाईल.

पायरी १: पासफ्रेझ काढून टाका

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. Google Dashboard वर जा.
  3. तळाशी, डेटा साफ करा आणि त्यानंतर ओके वर टॅप करा.

टिपा:

  • तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये डेटा सेव्ह करणे पुन्हा सुरू करू शकता, पण तुमच्याकडे यापुढे पासफ्रेझ नसेल.
  • तुम्ही सिंक सुरू करू शकता. ॲड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर सिंक सुरू करा वर टॅप करा.

पायरी २: नवीन पासफ्रेझ तयार करा (पर्यायी)

  1. सिंक करा वर टॅप करा.
  2. तळाशी, एन्क्रिप्शन वर टॅप करा.
  3. तुमच्या Google खाते मधील सर्व डेटा एन्क्रिप्ट करण्यासाठी तुमचा स्वतःचा पासफ्रेझ वापरा हे निवडा.
  4. एंटर करा आणि पासफ्रेझ कन्फर्म करा.
  5. सेव्ह करा वर टॅप करा.

तुमच्या सर्व डिव्हाइसवर Chrome वरील तुमची माहिती पाहणे

तुम्ही सिंक सुरू करणे हे केल्यानंतर इतर डिव्हाइसवर सेव्ह केलेली माहिती शोधू शकता. तुम्ही Chrome मध्ये साइन इन केलेले असताना, Google Pay वरून तुमची पेमेंट माहिती अ‍ॅक्सेस करू शकता.

तुमचे बुकमार्क शोधणे आणि व्यवस्थापित करणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी संगतवार ठेवाआणि त्यानंतर बुकमार्क वर टॅप करा.
  3. फोल्डर बदलण्यासाठी, मागे जा Back वर टॅप करा.
  4. ज्यामध्ये तुम्हाला हवा असलेला बुकमार्क आहे ते फोल्डर निवडा.
तुम्ही यापूर्वी भेट दिलेल्या साइट पाहणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखीसंगतवार ठेवाआणि त्यानंतर इतिहास वर टॅप करा.

तुम्ही पासफ्रेझ वापरत असल्यास, इतर डिव्हाइसवर तुम्ही भेट दिलेल्या साइटचे वेब अ‍ॅड्रेस हे अ‍ॅड्रेस बारमध्ये टाइप केले, तरच त्या साइट तुम्हाला दिसतील. पासफ्रेझबद्दल अधिक जाणून घ्या.

इतर डिव्हाइसवर खुले असलेले टॅब पाहणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर अलीकडील टॅब वर टॅप करा.
तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड पाहणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर Password Manager वर टॅप करा.
  3. "पासवर्ड मॅनेजर" या अंतर्गत, तुमचे सर्व पासवर्ड पहा.

तुम्ही Chrome मध्ये तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड सिंक करता, तेव्हा तुम्ही जिथे तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले आहे अशा Android डिव्हाइसवर साइट आणि ॲप्समध्ये साइन इन करण्यासाठी वापरू शकता. तुमच्या सर्व डिव्हाइसवर पासवर्ड कसे वापरावेत हे जाणून घ्या.

तुमचे सेव्ह केलेले ॲड्रेस आणि क्रेडिट कार्ड शोधणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. ॲड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर ऑटोफिल आणि पेमेंट वर टॅप करा.

फॉर्म आपोआप भरणे याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमच्या सेटिंग्जमधील बदल तुमच्या सर्व डिव्हाइसवर अपडेट होतील.

सिंकशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे

तुम्ही Chrome ची जुनी आवृत्ती वापरत असल्यास, तिला सिंक करण्यात समस्या येऊ शकतात. Chrome च्या नवीनतम आवृत्तीवर अपडेट करणे.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4150076012437243583
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false