Chrome तुमची वापरविषयक आकडेवारी आणि क्रॅश अहवाल कशाप्रकारे खाजगी ठेवते

वैशिष्ट्ये, सेवा व परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्यासाठी, Chrome कडे वापरविषयक आकडेवारी आणि क्रॅश अहवाल गोळा करून ती Google कडे पाठवण्याचा पर्याय आहे.

Chrome वापरकर्त्यांकडील काही आकडेवारी Chrome वापरकर्ता अनुभव अहवाल यामध्ये आढळू शकते.

वापरविषयक आकडेवारी आणि क्रॅश अहवाल कशाप्रकारे काम करतात

वापरविषयक आकडेवारी

वापरविषयक आकडेवारी ब्राउझरची वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्सचा प्रभावीपणा मोजते. गोळा केलेल्या डेटामध्ये तुम्ही तुमचा ब्राउझर कसा वापरता, तुमच्या सिस्टीमची माहिती, तुमच्या ब्राउझरचा परफॉर्मन्स, सेटिंग्ज आणि प्राधान्ये यांचा समावेश असतो. "Chrome च्या वैशिष्ट्यांमध्ये आणि परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्यात मदत करा" हे सेटिंग सुरू केलेले असल्यास, Chrome वेळोवेळी Google ला वापरविषयक आकडेवारी पाठवेल.

"शोध आणि ब्राउझिंग आणखी चांगले करा (तुम्ही भेट दिलेल्या पेजच्या URLs Google कडे पाठवते)" हे सेटिंग सुरू केले असल्यास, Chrome हे तुम्ही भेट दिलेल्या साइट व तुम्ही त्या कशाप्रकारे वापरता याबद्दलची आकडेवारी Google सोबत शेअर करते. Chrome हे तुम्ही Chrome वेब स्टोअर वरून इंस्टॉल केलेल्या सिंक केलेल्या एक्स्टेंशनबद्दलची आकडेवारी शेअर करू शकते.

क्रॅश अहवाल

क्रॅश अहवालांमध्ये क्रॅशच्या वेळेपासूनची सिस्टीमसंबंधित माहिती असते. या अहवालांमध्ये साइटच्या URLs, क्रॅश होण्यापूर्वीची तुमची अ‍ॅक्टिव्हिटी आणि क्रॅश होतेवेळी मेमरीचा आशय यांचा समावेश असू शकतो.

आम्ही तुमच्या डेटाचे संरक्षण कशाप्रकारे करतो

वापरविषयक आकडेवारी तुमच्या Google खाते शी संबंधित नसते आणि त्यात वैयक्तिकरीत्या ओळखण्यायोग्य माहितीचा समावेश नसतो. वापरविषयक आकडेवारी सुरू केलेली असते, तेव्हा:

  • Chrome हे तुमच्या डिव्हाइसवरून पाठवलेल्या अहवालांसाठी रँडम युनिक आयडेंटिफायर जनरेट करते. हा आयडेंटिफायर आकडेवारीला तुमच्या वैयक्तिक माहितीशी न जोडता ती संगतवार लावण्यात आम्हाला मदत करतो. प्रत्येक वेळी तुम्ही हे वैशिष्ट्य बंद किंवा सुरू करता, तेव्हा नवीन आयडेंटिफायर जनरेट होईल.
  • तुम्ही Chrome मध्ये साइन इन करून सिंक सुरू केले असल्यास, वापरविषयक आकडेवारीमध्ये तुमच्या Google खाते वर एंटर केलेले वय आणि लिंग यांसारख्या माहितीचा समावेश असू शकतो. ही माहिती तुमच्या लोकसंख्याशास्त्रविषयक तपशिलांसाठी आणखी चांगली उत्पादने तयार करण्यात मदत करण्यासाठी वापरली जाते.

"शोध आणि ब्राउझिंग आणखी चांगले करा" किंवा एक्स्टेंशन सिंक यांसारख्या पर्यायी सेटिंग्ज Chrome ला URLs व एक्स्टेंशनबद्दलची माहिती गोळा करण्याची अनुमती देतात. हा डेटा पाठवण्यासाठी Chrome द्वारे जनरेट केलेला स्वतंत्र आणि रँडम युनिक आयडेंटिफायर वापरला जातो. हा आयडेंटिफायर वापरविषयक आकडेवारीच्या आयडेंटिफायरशी संबंधित नसतो किंवा त्याच्याशी थेट जोडलेला नसतो. Google च्या सर्व्हरकडे आकडेवारी पोहोचल्यावर, Google ला ज्ञात असलेल्या URLs स्टोअर केल्या जातात आणि अज्ञात URLs काढून टाकल्या जातात.

Chrome चा परफॉर्मन्स आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सुधारणेसंबंधित प्राधान्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी Google वापरकर्त्यांकडून मिळालेला एकत्रित डेटा वापरते. यापैकी काही एकत्रित आकडेवारी Chrome वापरकर्ता अनुभव अहवाल मध्ये उपलब्ध असते.

तुम्ही नियंत्रक आहात

Chrome हे बाय डीफॉल्ट वापरविषयक आकडेवारी आणि क्रॅश अहवाल पाठवते. तुम्ही तुमच्या सेटिंग्जमध्ये हे वैशिष्ट्य सुरू किंवा बंद करू शकता.

वापरविषयक आकडेवारी आणि क्रॅश अहवालांची सेटिंग्ज बदलणे

हे सेटिंग बाय डीफॉल्ट सुरू केलेले असते. तुम्ही Chrome इंस्टॉल करताना किंवा त्यानंतर ते तुमच्या सेटिंग्जमध्ये बंद करू शकता. तुम्ही हे वैशिष्ट्य बंद करता, तेव्हा Chrome हे Google ला वापरविषयक आकडेवारी पाठवत नाही.

कॉंप्युटर

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर तुम्ही आणि Google आणि त्यानंतर सिंक आणि Google सेवा निवडा.
  3. Chrome च्या वैशिष्ट्यांमध्ये आणि परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्यात मदत करा हे सुरू किंवा बंद करा.
    1. टीप: तुम्ही ChromeOS डिव्हाइस वापरत असल्यास, ही पायरी त्याऐवजी तुम्हाला ChromeOS सुरक्षा आणि गोपनीयता सेटिंग्ज या पेजवर जाण्यासाठी मार्गदर्शन करेल. तिथून, गोपनीयता नियंत्रणे आणि त्यानंतर ChromeOS च्या वैशिष्ट्यांमध्ये आणि परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्यात मदत करा सुरू किंवा बंद करा हे निवडा.

Android

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर Google सेवा वर टॅप करा.
  3. Chrome च्या वैशिष्ट्यांमध्ये आणि परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्यात मदत करा हे सुरू किंवा बंद करा.

iOS

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome ॲप Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर Google सेवा वर टॅप करा.
  3. Chrome च्या वैशिष्ट्यांमध्ये आणि परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्यात मदत करा हे सुरू किंवा बंद करा.

"शोध आणि ब्राउझिंग आणखी चांगले करा" हे सेटिंग बदला

तुम्ही "शोध आणि ब्राउझिंग आणखी चांगले करा" व "Chrome च्या वैशिष्ट्यांमध्ये आणि परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्यात मदत करा" हे सुरू केल्यावरच URLs बद्दलची मेट्रिक Google ला पाठवली जातात.

कॉंप्युटर

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर तुम्ही आणि Google आणि त्यानंतर सिंक आणि Google सेवा निवडा.
  3. शोध आणि ब्राउझिंग आणखी चांगले करा हे सुरू किंवा बंद करा.

Android

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome अ‍ॅप Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर Google सेवा वर टॅप करा.
  3. शोध आणि ब्राउझिंग आणखी चांगले करा हे सुरू किंवा बंद करा.

iOS

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome ॲप Chrome उघडा.
  2. आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर Google सेवा वर टॅप करा.
  3. शोध आणि ब्राउझिंग आणखी चांगले करा हे सुरू किंवा बंद करा.

टीप: तुम्ही "शोध आणि ब्राउझिंग आणखी चांगले करा" किंवा "Chrome च्या वैशिष्ट्यांमध्ये आणि परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्यात मदत करा" हे बंद केल्यास, Google ला पाठवलेला आयडेंटिफायर रीसेट केला जाईल.

एक्स्टेंशन सिंकशी संबंधित सेटिंग्ज बदलणे

एक्स्टेंशन सिंक सुरू केलेले असते, तेव्हाच एक्स्टेंशनबद्दलचे मेट्रिक Google कडे पाठवले जातात.

कॉंप्युटर

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर तुम्ही आणि Google आणि त्यानंतर सिंक आणि Google सेवा निवडा.
  3. तुम्ही सिंक केलेल्या गोष्टी व्यवस्थापित करा आणि त्यानंतर सिंक कस्टमाइझ करा निवडा.
  4. एक्स्टेंशन सुरू किंवा बंद करा.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
671310755310324083
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false