Chrome मध्‍ये आपोआप फॉर्म भरणे

तुम्ही Chrome ला तुमचे पत्ते किंवा पेमेंट माहिती यांसारखी सेव्ह केलेली माहिती वापरून फॉर्म आपोआप भरू देऊ शकता. याशिवाय, तुम्ही नवीन फॉर्ममध्ये माहिती ऑनलाइन एंटर करता, तेव्हा तुम्हाला ती तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करायची आहे का, असे Chrome विचारू शकते.
Chrome तुमची माहिती तुमच्या परवानगीशिवाय कधीही शेअर करत नाही. Google Chrome हे क्रेडिट कार्डची माहिती कसे सेव्ह आणि संरक्षित करते ते जाणून घ्या.
तुम्हाला तुमची पासवर्डसंबंधित माहिती Chrome मध्ये सेव्ह करायची असल्यास, सेव्ह केलेले पासवर्ड कसे व्यवस्थापित करायचे ते जाणून घ्या. 
तुमच्या सेव्ह केलेल्या माहितीसंबंधित तुम्हाला समस्या येत असल्यास, Chrome मध्ये सेव्ह केलेल्या माहितीसंबंधित समस्यांचे निराकरण कसे करायचे ते जाणून घ्या.

तुम्ही Chrome मध्ये सेव्ह केलेली पेमेंट आणि पत्त्याची माहिती जोडणे, संपादित करणे किंवा हटवणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल Profile आणि त्यानंतर पेमेंट पद्धती Payment methods किंवा पत्ते आणि आणखी बरेच काही Addresses and more निवडा.
  3. माहिती जोडा, संपादित करा किंवा हटवा: 
    • जोडा: "पेमेंट पद्धती" किंवा "पत्ते" च्या बाजूला जोडा निवडा. 
    • संपादित करा: कार्ड किंवा पत्त्याच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर संपादित करा निवडा.
    • हटवा: कार्ड किंवा पत्त्याच्या बाजूला, आणखी आणखी आणि त्यानंतरहटवा निवडा. 

तुम्ही एखादा पत्ता जोडल्यास, संपादित केल्यास किंवा हटवल्यास आणि तुम्ही तुमचे Google खाते वापरून Chrome मध्ये साइन इन केले असल्यास, तुम्ही तेच खाते वापरून Chrome मध्ये साइन इन केलेल्या इतर डिव्हाइसवर तुमचे बदल दिसतात.

तुमची पेमेंट पद्धत Google Pay मध्ये सेव्ह केली असल्यास, तुम्हाला ती Google Pay मध्ये संपादित करणे किंवा हटवणे हे करावे लागेल.

Chrome मध्ये तुमच्या पेमेंट पद्धतीचे टोपणनाव ठेवा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल Profile आणि त्यानंतर पेमेंट पद्धती Payment methods निवडा.
  3. "पेमेंट पद्धती" च्या बाजूला, अस्तित्वात असलेल्या कार्डच्या बाजूला जोडा किंवा संपादित करा निवडा.
  4. तळाशी, कार्डचे टोपणनाव निवडा. 
  5. कार्डचे टोपणनाव एंटर करा. तुम्ही फॉर्म निवडता, तेव्हा टोपणनाव दिसेल आणि त्या फॉर्ममध्ये तुम्ही सेव्ह केलेली पेमेंट पद्धत वापराल.

टिपा:

  • तुम्ही पेमेंट पद्धतीचे नाव बदलल्यास, तुम्ही सेव्ह केलेली पेमेंट पद्धत वापरणारा फॉर्म निवडता, तेव्हा ते नाव दिसते.
  • Chrome च्या पेमेंट पद्धतीची टोपणनावे Google Pay मध्ये ट्रान्सफर होत नाहीत. तुम्ही Google Pay मध्ये तुमची पेमेंट माहिती सेव्ह केल्यास, तुम्ही ती स्वतंत्रपणे अपडेट करणे आवश्यक आहे.

तुमची पेमेंट माहिती Google Pay मध्ये सेव्ह करा

तुम्ही Chrome मध्ये साइन इन करता आणि तुमची पेमेंट पद्धत ऑनलाइन फॉर्ममध्ये एंटर करता तेव्हा, Chrome तुम्हाला तुमची पेमेंट माहिती Google Pay वर सेव्ह करायची आहे का ते विचारू शकते. तुम्ही स्वीकारल्यास, तुमची पेमेंट माहिती Google Pay वर सेव्ह केली जाते. तुमच्या पेमेंट पद्धतीला Google Pay सपोर्ट करत नसल्यास, ती माहिती तुमच्या डिव्हाइसवर किंवा स्थानिक नेटवर्कवर सेव्ह करण्याबाबत Chrome विचारू शकते.

Google Pay मध्ये सेव्ह केलेल्या पेमेंट पद्धती या बहुतेक ऑनलाइन फॉर्ममध्ये सूचना म्हणून दिसतात.

Chrome तुम्हाला तुमची पेमेंट माहिती Google Pay मध्ये सेव्ह करू देत नसल्यास, सेव्ह केलेल्या पेमेंट माहितीशी संबंधित समस्यांचे निराकरण कसे करायचे ते जाणून घ्या.

Tip: If you enroll a virtual card in autofill in Chrome, it appears as a suggested payment method in forms. You can either enter the virtual card CVV or verify your identity with your phone, such as with your fingerprint.
Google Pay मध्ये क्रेडिट कार्ड संपादित करणे किंवा हटवणे
  1. pay.google.com वर जा.
  2. डावीकडे, पेमेंट पद्धती वर क्लिक करा.
  3. तुम्हाला संपादित करायचे किंवा हटवायचे असलेले कार्ड शोधा.
    • संपादित करणे: कार्डच्या खाली, संपादित करा वर क्लिक करा.
    • हटवणे: कार्डच्या खाली, काढून टाका वर क्लिक करा. 
टीप: तुम्ही Google Pay मधील तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड माहितीसाठी कस्टम टोपणनाव जोडू शकता. पेमेंट पद्धतीला टोपणनाव कसे द्यायचे ते जाणून घ्या.
Google Pay वर पेमेंट माहिती सेव्ह करणे थांबवणे

Google Pay वर पेमेंट माहिती सिंक करणे थांबवण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, आणखी आणखीआणि त्यानंतरसेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. तुम्ही आणि Google आणि त्यानंतर सिंक आणि Google सेवा वर क्लिक करा.
  4. “सिंक” अंतर्गत, तुम्ही काय सिंक करता ते व्यवस्थापित करा वर क्लिक करा.
  5. सर्व काही सिंक करा बंद करा.
  6. Google Pay वापरून पेमेंट पद्धती आणि पत्ते बंद करा.

तुम्ही साइन-इन केले असल्यास, पण सिंक सुरू केले नसल्यास, Chrome तरीही तुम्हाला Google Pay मध्ये तुमची पेमेंट माहिती सेव्ह करण्यासाठी विचारू शकते.

तुम्ही Gmail सारख्या Google सेवेद्वारे तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करता तेव्हा, तुम्हाला Chrome मध्ये आपोआप साइन इन केले जाईल. तुम्हाला Chrome मध्ये कधीही साइन इन करायचे नसल्यास, तुम्हीChrome साइन-इन बंद करणे हे करू शकता.

Chrome ने कार्ड सेव्ह करण्याबाबत यापुढे न विचारल्यास, Chrome मध्ये सेव्ह केलेल्या माहितीसंबंधित समस्यांचे निराकरण कसे करायचे ते जाणून घ्या.
"GOOGLE *तात्पुरता होल्ड" माझ्या कार्डवर दिसणे
तुम्ही Chrome मध्ये कार्ड आपोआप एंटर किंवा सेव्ह करता, तेव्हा Google हे कमी मूल्याचे ऑथोरायझेशन करू शकते. तुम्ही कार्डचे कायदेशीर मालक आहात याची खात्री करण्यासाठी हा सुरक्षेशी संबंधित उपाय आहे. ऑथोरायझेशन Google द्वारे लवकरच रद्द केले जाते.

Chrome मध्ये पेमेंट आणि संपर्क माहिती सेव्ह करण्याबाबत विचारणे थांबवा

तुम्ही Chrome ला तुमची पेमेंट व संपर्क माहिती तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह न करण्यास आणि तुमची माहिती सेव्ह करण्याबाबत न विचारण्यास सांगू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती "लोक" या अंतर्गत, पेमेंट पद्धती Payment methods किंवा पत्ते आणि आणखी बरेच काही Addresses and more निवडा.
    • पेमेंट माहिती सेव्ह करणे थांबवण्यासाठी, पेमेंट पद्धती सेव्ह करा आणि भरा बंद करा.
    • पत्ते आणि संपर्क माहिती सेव्ह करणे थांबवण्यासाठी, पत्ते सेव्ह करा आणि भरा बंद करा.
तुम्हाला Chrome मध्ये पासवर्ड सेव्ह करणे थांबवायचे असल्यास, सेव्ह केलेले पासवर्ड कसे व्यवस्थापित करायचे ते जाणून घ्या.

Chrome मध्ये कार्डचे सुरक्षा कोड व्यवस्थापित करणे

तुम्ही पहिल्यांदा व्यापारी साइटवर तुमची पेमेंट माहिती एंटर करता, तेव्हा तुमच्या पेमेंट माहितीच्या व्यतिरिक्त, तुम्हाला तुमचा सुरक्षा कोड सेव्ह करायचा आहे की नाही हे विचारले जाईल. सेव्ह केल्यावर, तुम्ही ऑनलाइन खरेदी कराल, तेव्हा सुरक्षा कोड हा पेमेंट माहितीसोबत आपोआप भरला जाईल.

सुरक्षा कोड सेव्ह करणे बंद करा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.

  2. सर्वात वर उजवीकडे, सेटिंग्ज आणि त्यानंतर ऑटोफिल आणि त्यानंतर पेमेंट पद्धती Payment methods वर क्लिक करा.
  3. “सुरक्षा कोड सेव्ह करा” च्या बाजूला, सुरू किंवा बंद करा.

टीप: तुम्ही ही सेटिंग बंद करता, तेव्हा सर्व कार्डसाठीचे सेव्ह केलेले सर्व सुरक्षा कोड तुमच्या Google खाते आणि डिव्हाइसमधून काढून टाकले जातील व कोणतेही नवीन सुरक्षा कोड सेव्ह केले जाणार नाहीत.

सुरक्षा कोड संपादित करणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, सेटिंग्ज आणि त्यानंतर ऑटोफिल आणि त्यानंतर पेमेंट पद्धती Payment methods वर क्लिक करा.
    • तुमच्या Google खाते वर स्टोअर केलेल्या कार्डसाठी, तुम्ही दोन मार्गांनी तुमच्या कार्डचा सुरक्षा कोड अपडेट करू शकता:
      1. तुम्ही Chrome मधून कोणत्याही व्यापारी वेबसाइटवर खरेदी करता, तेव्हा तुमची कार्ड माहिती आणि नवीन सुरक्षा कोड एंटर करा. Chrome हे अपडेट केलेला सुरक्षा कोड डिटेक्ट करेल, आणि तुम्हाला "सुरक्षा कोड सेव्ह करणे" हे करायचे आहे की नाही असे विचारणारी सूचना दाखवेल. "सेव्ह करा" निवडा.
      2. pay.google.com मधून कार्ड काढून टाका आणि त्यानंतर Chrome मधून कोणत्याही व्यापारी वेबसाइटवर खरेदी करण्यासाठी तेच कार्ड वापरा. सूचना मिळेल, तेव्हा कार्ड पुन्हा सेव्ह करा. या वेळेला, ते कार्ड सुरक्षा कोडसह सेव्ह केले जाईल.
    • तुमच्या डिव्हाइसपैकी फक्त एका डिव्हाइसवर सेव्ह केलेल्या कार्डसाठी, तुमचा सुरक्षा कोड अपडेट करण्याकरिता, कार्डच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर संपादित करा वर क्लिक करा.

टीप: सुरक्षा कोड संपादित करण्यासाठी, "सुरक्षा कोड सेव्ह करणे" सेटिंग सुरू असल्याची खात्री करा.

सुरक्षा कोड हटवणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, सेटिंग्ज आणि त्यानंतर ऑटोफिल आणि त्यानंतर पेमेंट पद्धती Payment methods वर क्लिक करा.

तुमच्या डिव्हाइस आणि Google खाते मधून सर्व कार्डसाठीचे सुरक्षा कोड हटवण्यासाठी:

  1. सेव्ह केलेले सुरक्षा कोड हटवा आणि त्यानंतर हटवा वर क्लिक करा.

तुमच्या डिव्हाइसपैकी फक्त एकावर सेव्ह केलेल्या कार्डचे सुरक्षा कोड हटवण्यासाठी:

  1. कार्डच्या बाजूला, आणखी आणखी आणि त्यानंतर संपादित करा वर क्लिक करा.
  2. सुरक्षा कोड हटवा.
  3. सेव्ह करा वर क्लिक करा.

तुम्ही सुरक्षा कोड जोडल्यास, संपादित केल्यास किंवा हटवल्यास आणि तुम्ही Chrome मध्ये तुमचे Google खाते वापरून साइन इन केले असल्यास, तुम्ही केलेला कोणताही बदल तुमच्या इतर डिव्हाइसमध्ये दिसेल जिथे समान खाते वापरून तुम्ही Chrome मध्ये साइन इन केले आहे.

“ऑटोफिल वापरत असताना नेहमी पडताळणी करा” सेटिंग व्यवस्थापित करणे

महत्त्वाचे: हे डिव्हाइस पातळीवरील सेटिंग आहे. तुम्हाला ज्या डिव्हाइसवर हे सेटिंग सुरू ठेवायचे आहे त्या प्रत्येक डिव्हाइसवर तुम्ही ते सुरू करणे आवश्यक आहे.

तुम्ही तुमचे डिव्हाइस शेअर करता, तेव्हा इतरांना तुमची पेमेंट पद्धत वापरण्यापासून रोखण्यासाठी, तुम्ही ऑटोफिल वापरता, तेव्हा पडताळणी सुरू करू शकता. हे सेटिंग वापरून, तुम्ही तुमच्या सुरक्षेमध्ये वाढ करू शकता आणि कपटपूर्ण अ‍ॅक्टिव्हिटीपासून स्वतःचे संरक्षण करू शकता.

“ऑटोफिल वापरत असताना नेहमी पडताळणी करा” सुरू किंवा बंद करणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, प्रोफाइल Profile आणि त्यानंतर पेमेंट पद्धती Payment methods निवडा.
  3. ऑटोफिल वापरत असताना नेहमी पडताळणी करा सुरू करा.
“ऑटोफिल वापरत असताना नेहमी पडताळणी करा” सेटिंग ट्रबलशूट करणे

सेटिंग्ज राखाडी रंगामध्ये असल्यास आणि तुम्हाला ते सुरू करता येत नसल्यास, पुढील गोष्टी असल्याचे तपासा:

  • तुमच्या डिव्हाइसवर स्क्रीन लॉक आहे. हे सेटिंग वापरण्यासाठी, तुम्ही स्क्रीन लॉक सेट केले असल्याची खात्री करा.
  • “पेमेंट पद्धती सेव्ह करा आणि भरा” सुरू आहे.
टीप: सेटिंग बंद असेल, तेव्हा सुरक्षेच्या उद्देशांसाठी तुमच्या पेमेंट पद्धतीची अधूनमधून पडताळणी केली जाते.

Chrome हे तुमची सेव्ह केलेली माहिती सुचवत नसल्याशी संबंधित तुम्हाला समस्या असल्यास,

  • तुम्ही आपोआप भरली जात नाही अशी माहिती सेव्ह केली आहे हे कन्फर्म करण्यासाठी: आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज निवडा.
  • Chrome कडून माहिती मिळवण्याइतकी वेबसाइट सुरक्षित नसू शकते.
  • वेबसाइट सुरक्षित असल्यास, Chrome फॉर्ममधील काही फील्ड डिटेक्ट करू शकत नसेल.

Chrome मधील तुमची सेव्ह केलेली ऑटोफिल फॉर्म माहिती हटवणे

Chrome मध्ये तुमचे पत्ते, पेमेंट पद्धती आणि सेव्ह केलेली इतर माहिती एकाचवेळी हटवण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी निवडा.
  3. ब्राउझिंग डेटा साफ करा निवडा.
  4. वेळेची रेंज निवडा, जसे की "मागील तास" किंवा "नेहमी".
  5. "प्रगत" या अंतर्गत, फॉर्म डेटा ऑटोफिल करा निवडा.

या पद्धतीमुळे Google Pay मध्ये स्टोअर केलेली कार्ड आणि पत्ते हटवले जात नाहीत. Google Pay मधून पेमेंट पद्धत काढून टाकणे कसे करावे हे जाणून घ्या.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3259509345748455298
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false