Chrome मध्ये तुमचे Google खाते वापरून साइन-इन करणे कसे काम करते

तुमच्या Google खाते वापरून साइन इन करणे कसे काम करते

तुम्ही Chrome पहिल्यांदा वापरता किंवा Chrome सेटिंग्जद्वारे नंतर कधीही वापरता, तेव्हा तुमचे Google खाते वापरून विविध मार्गांनी Chrome मध्ये साइन इन करू शकता. तुमच्या कॉंप्युटरवर, तुम्ही Gmail सारख्या Google वेब सेवेद्वारे Chrome मध्ये साइन इनदेखील करू शकता. तुमच्या कॉंप्युटर, Android आणि iOS डिव्हाइसवर, तुम्ही Chrome मध्ये साइन इन केल्यानंतर, इतर Google वेब सेवांमध्येदेखील साइन इन करता.

तुम्ही Chrome मध्ये साइन इन करण्याचे निवडल्यास, तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये बुकमार्क, पासवर्ड आणि इतर Chrome डेटा सेव्ह करू शकता आणि तो वापरू शकता. हे तुम्हाला तुम्ही साइन इन केले असेल त्या सर्व डिव्हाइसवर तुमचा Chrome डेटा वापरण्याची अनुमती देते. तुम्ही साइन इन केले नाही, तरीही तुम्ही तुमचे बुकमार्क, पासवर्ड आणि बरेच काही सेव्ह करू शकता, परंतु ते तुमच्या डिव्हाइसवरच सेव्ह केले जातात.

तुम्ही Chrome मध्ये साइन इन केले असल्यास आणि तुमचे टॅब व Chrome इतिहास सिंक करायचा असल्यास, तुम्ही Chrome सेटिंग्जमध्ये ते सुरू करू शकता.

तुमच्या खात्यासाठी Chrome च्या सबसेटिंगचा समावेश असलेली “वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी” सुरू केली जाते, तेव्हा तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला Chrome इतिहास हा संपूर्ण Google उत्पादनांवरील आणि सेवांवरील तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यात मदत व्हावी यासाठी वापरला जाऊ शकतो. यामध्ये जलद शोध आणि मदतपर आशयाशी संबंधित शिफारशी यांचा समावेश आहे. तुम्ही तुमची अ‍ॅक्टिव्हिटी माझी Google अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये व्यवस्थापित करू शकता.

तुम्ही Chrome गुप्त मोडमध्ये ब्राउझ करता, तेव्हा तुम्ही Chrome मध्ये साइन इन करू शकत नाही. तुम्ही तरीही Google वेब सेवांमध्ये साइन इन करू शकता.

आम्ही तुमच्या डेटाचे संरक्षण कसे करतो

तुम्ही तुमच्या स्वतःच्या पासफ्रेझसह विशिष्ट डेटा एन्क्रिप्ट करणे निवडू शकता, जेणेकरून Google ला हा डेटा वाचता येणार नाही. Google ला पाठवलेली माहिती ही ट्रांझिटमध्ये एन्क्रिप्ट केली जाते. हे Google गोपनीयता धोरण यानुसार वापरले आणि संरक्षित केले जाते.

तुम्ही नियंत्रक आहात

तुम्ही Chrome वरून तुमचा डेटा व्यवस्थापित करू शकता आणि तो कसा वापरला जातो हे कधीही नियंत्रित करू शकता.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1370307115853812002
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false