Chrome सुरक्षित ब्राउझिंग तुमचा ब्राउझिंग डेटा कशाप्रकारे खाजगी ठेवते

तुमचा डेटा खाजगी ठेवण्यासाठी, पुढील गोष्टींपासून संरक्षण करण्याकरिता Google Chrome तुमचे सुरक्षित ब्राउझिंग वापरते:

  • गैरवर्तन करणाऱ्या वेबसाइट आणि एक्स्टेंशन
  • दुर्भावनापूर्ण आणि नको असलेल्या जाहिराती
  • मालवेअर
  • फिशिंग
  • सोशल इंजिनियरिंग
सुरक्षित ब्राउझिंग कसे काम करते

साधारण संरक्षण

साधारण संरक्षण वापरून, Chrome तुम्ही ज्या साइटवर जाता त्या साइट, तुम्ही इंस्टॉल केलेली एक्स्टेंशन आणि तुम्ही डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असलेल्या Google च्या असुरक्षित साइट व डाउनलोडच्या सूचीमधील फाइल तपासते. या सूचीतील साइट आणि डाउनलोड ही गैरवर्तन करणाऱ्या वेबसाइट व एक्स्टेंशन, दुर्भावनापूर्ण आणि नको असलेल्या जाहिराती, मालवेअर, फिशिंग आणि सोशल इंजिनिअरिंगशी संबंधित आहेत. Chrome वेळोवेळी या सूचीची सर्वात अलीकडील कॉपी तुमच्या डिव्हाइसवर डाउनलोड आणि स्टोअर करते. हे सुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साइटची सूचीदेखील स्टोअर करते.

तुम्ही वेबसाइटला भेट देता किंवा डाउनलोड करण्याचा प्रयत्न करता अशा प्रत्येक वेळी, Chrome सर्वप्रथम URL तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेल्या सुरक्षित साइटच्या सूचीमध्ये आहे का हे तपासते. ती नसल्यास, Chrome तुमचा आयपी अ‍ॅड्रेस लपवणार्‍या गोपनीयता सर्व्हरद्वारे URL चा क्लिष्ट भाग Google ला पाठवते. वेबसाइट किंवा डाउनलोड दुर्भावनापूर्ण असल्याचे Google ने कन्फर्म केल्यास, ते धोकादायक असू शकते अशी Chrome तुम्हाला चेतावणी देते. तुमच्याकडे गैरवर्तन किंवा दुर्भावनापूर्ण एक्स्टेंशन इंस्टॉल केलेले असल्यास, Chrome ते बंद करते. काही बाबींमध्ये, गोपनीयता सर्व्हरला केलेली विनंती पूर्ण न झाल्यास किंवा तुम्ही गुप्त मोडमध्ये ब्राउझ करत असल्यास, Google सह स्टोअर केलेल्या सूचीऐवजी तुमच्या डिव्हाइसवर स्टोअर केलेल्या असुरक्षित साइटच्या सूचीसह साइट तपासली जाते. अशा बाबींमध्ये, संशयास्पद वर्तनाचा पुरावा असल्यास, Chrome हे URL चा क्लिष्ट भाग Google ला पाठवते.

वर वर्णन केलेल्या संरक्षणांव्यतिरिक्त, संशयास्पद पेज वर्तन किंवा तुम्हाला संशयास्पद अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये फसवले गेले असल्याचे Chrome ला आढळल्यास, ते Google ला अहवाल पाठवेल. उदाहरणार्थ, तुम्ही नवीन साइटवर पूर्वी सेव्ह केलेला पासवर्ड एंटर करता, तेव्हा ते पेज फिशिंग असू शकते की नाही हे निर्धारित करण्यासाठी Chrome हे Google सोबत तपासते, हा अशा प्रकारचा सोशल इंजिनियरिंग हल्ला आहे जो तुमचा डेटा चोरण्यासाठी वापरला जातो. साइट फिशिंग करत असल्याचे निर्धारित केले गेल्यास, Chrome तुम्हाला तुमचा पासवर्ड तपासण्यास किंवा बदलण्यास सांगते.

फिशिंग आणि सोशल इंजिनियरिंग अटींसाठी साइट तपासल्या जातात. Chrome हे Google ला व्हिज्युअल वैशिष्ट्यांचा एक छोटा संच पाठवते आणि साइट दुर्भावनापूर्ण आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी धोकादायक साइटच्या सूचीशी तिची तुलना करते. Google कडे अतिरिक्त डेटा उघड करणे टाळण्यासाठी काही सुरक्षा वैशिष्ट्ये गुप्त मोडमध्ये बंद केली आहेत.

तुमच्यासाठी आणि सर्व Chrome वापरकर्त्यांसाठी सुरक्षेत सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी तुमचा अधिक डेटा Google सोबत शेअर करणार्‍या अतिरिक्त वैशिष्ट्यांची तुम्ही निवड करू शकता.

  • वेबवर सर्वांसाठी सुरक्षेत सुधारणा करण्यात मदत करा: "वेबवर सर्वांसाठी सुरक्षेत सुधारणा करण्यात मदत करा" सुरू असते, तेव्हा Chrome इंटरनेटवरील सुरक्षित ब्राउझिंग आणि सुरक्षा यांमध्ये सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी पेजवरील आशयाची हेडर आणि स्निपेटचा अहवाल देते. तुम्ही वर्धित संरक्षण निवडल्यास, हे सेटिंग आपोआप सुरू होते आणि ते बंद करता येऊ शकत नाही.
  • डेटा भंगामध्ये पासवर्ड उघड झाल्यास, तुम्हाला चेतावणी द्या: "डेटा भंगामध्ये पासवर्ड उघड झाल्यास, तुम्हाला चेतावणी द्या" हे सुरू असते, तेव्हा Chrome हे तुमच्या वापरकर्ता नावाची आणि पासवर्डची हॅश केलेली कॉपी Google ला पाठवते. ही माहिती गुप्त की वापरून एन्क्रिप्ट केलेली असून, पासवर्ड भंगामध्ये तुमचे पासवर्ड उघड झालेत की नाही हे तपासण्यासाठी ती फक्त Chrome ला माहीत असते. तुम्ही वर्धित संरक्षण निवडल्यास, हे सेटिंग आपोआप सुरू होते आणि ते बंद करता येऊ शकत नाही.

वर्धित संरक्षण

वर्धित संरक्षण अधिक सक्षम, आणखी कस्टमाइझ संरक्षण देऊ करण्यासाठी रीअल टाइममध्ये Google ला तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीविषयी अधिक माहिती पाठवते. तुम्ही भेट देता त्या URLs आणि पेज आशय, डाउनलोड, एक्स्टेंशन अ‍ॅक्टिव्हिटी व सिस्टीम माहिती यांचा लहान नमुना यांचा या माहितीमध्ये समावेश आहे.

वर्धित संरक्षणात साधारण संरक्षणामध्ये समाविष्ट केलेली डीफॉल्ट आणि पर्यायी वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. पुढील गोष्टींबाबत तुम्हाला चेतावणी देण्यासाठी वर्धित संरक्षण अतिरिक्त माहिती वापरते:

  • धोकादायक साइट: Google ला त्यांच्याबद्दल आधी माहिती नसली, तरीही संभाव्य धोकादायक साइट आणि आयफ्रेम डिटेक्ट करण्यासाठी व तुम्हाला त्याबद्दल चेतावणी देण्यासाठी Chrome तुम्ही भेट दिलेल्या साइटवरील डेटाचे विश्लेषण करते.
  • धोकादायक डाउनलोड: तुम्ही मालवेअर डिटेक्ट करण्यासाठी अतिरिक्त स्कॅनकरिता Google ला संशयास्पद फाइल पाठवणे निवडू शकता. हे स्कॅन नवीन साइटवर होस्ट केलेल्या नवीन मालवेअर किंवा धोकादायक फाइल शोधण्यात मदत करतात.
  • विश्वासार्ह नसणारी एक्स्टेंशन: तुम्हाला इंस्टॉल करायचे असलेले एक्स्टेंशन Chrome वेब स्टोअर यानुसार विश्वासार्ह नसेल, तेव्हा Chrome तुम्हाला चेतावणी देते.

तुम्ही साइन इन केले असल्यास, वर्धित संरक्षण आणखी बऱ्याच गोष्टी करते. तुमच्या Google खाते वर डेटा लिंक करून तुम्ही जेथे साइन इन केले आहे त्या इतर Google अ‍ॅप्सवर ते तुमचे संरक्षण करते. उदाहरणार्थ, आम्हाला तुमच्या Gmail मध्ये फिशिंगचे प्रयत्न आढळल्यास, तुम्ही Chrome मध्ये साइट आणि डाउनलोड उघडता, तेव्हा आम्ही तुमच्या संरक्षणात वाढ करतो. वर्धित संरक्षण तुमच्या ब्राउझिंग अनुभवाचा वेग कमी करत नाही.

आम्ही तुमच्या डेटाचे संरक्षण कसे करतो

संरक्षणाच्या साधारण आणि वर्धित पातळ्यांसह, सुरक्षित ब्राउझिंग डेटा फक्त तुमचे आणि इतर वेब वापरकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी व सुरक्षेत सुधारणा करण्याकरिता वापरला जातो.

साधारण संरक्षणासह:

  • तुम्ही तृतीय पक्ष गोपनीयता सर्व्हरद्वारे भेट दिलेल्या URLs Google ला फॉरवर्ड करण्यापूर्वी त्यांचा क्लिष्ट भाग पाठवून Chrome तुमचा आयपी अ‍ॅड्रेस लपवते. अशा प्रकारे, Google आणि गोपनीयता सर्व्हर ऑपरेट करणारा तृतीय पक्ष तुमच्या आयपी अ‍ॅड्रेसशी वास्तविक URL संलग्न करू शकत नाहीत.
  • सुरक्षेसंबंधित घटनेचा पुरावा असेल, तरच Chrome अतिरिक्त डेटा पाठवते.
    • संशयास्पद वर्तन डिटेक्ट केले गेल्यास, Chrome हे URLs चा क्लिष्ट भाग किंवा संपूर्ण URLs आणि पेज आशयाचे काही भाग Google सुरक्षित ब्राउझिंग ला पाठवते. उदाहरणार्थ, तुम्ही असामान्य साइटवर पूर्वी सेव्ह केलेला पासवर्ड पुन्हा वापरल्यास किंवा साइट फिशिंग-डिटेक्शन तपासणीमध्ये पास होत नसल्यास, अहवालासोबत संपूर्ण URL पाठवली जाऊ शकते.

वर्धित संरक्षणासह:

  • तुम्ही भेट देणार असलेल्या साइटविषयी Chrome कडे माहिती नसल्यास, Chrome अतिरिक्त डेटा पाठवते.
    • Chrome हे URLs आणि पेज आशयाचे काही भाग Google सुरक्षित ब्राउझिंग ला पाठवते.
    • दुर्भावनापूर्ण अ‍ॅक्टर, मालवेअर आणि फिशिंग हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी Chrome मध्ये उपलब्ध असलेली सर्वोच्च सुरक्षा तुम्हाला मिळते.
तुम्ही नियंत्रक आहात

तुम्ही तुमची सुरक्षित ब्राउझिंग ची पातळी आणि तुमच्या व इतर वेब वापरकर्त्यांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी तुमचा किती डेटा Google ला पाठवला जातो हे निवडू शकता. तुम्हाला Chrome कडून चेतावणी मिळाल्यानंतर, तुम्ही असुरक्षित साइटला भेट देणे किंवा धोकादायक फाइल डाउनलोड करणे कधीही निवडू शकता.

तुमची सुरक्षित ब्राउझिंग सेटिंग्ज बदला

महत्त्वाचे: तुम्ही सुरक्षित ब्राउझिंग बंद केल्यास, Chrome तुमचा डेटा चोरण्याचा किंवा धोकादायक सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेबसाइटपासून तुमचे संरक्षण करू शकत नाही. आम्ही संरक्षणाची एखादी पातळी वापरण्याची शिफारस करतो.

कॉंप्युटर

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षा निवडा.
  3. तुम्हाला वापरायची असलेली संरक्षणाची पातळी निवडा.

Android

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षित ब्राउझिंग यावर टॅप करा.
  3. तुम्हाला वापरायची असलेली संरक्षणाची पातळी निवडा.

iOS

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षित ब्राउझिंग वर टॅप करा.
  3. तुम्हाला वापरायची असलेली संरक्षणाची पातळी निवडा.

तुमची सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यात मदत करा सेटिंग्ज बदला

तुम्ही साधारण संरक्षण निवडल्यास, "सर्वांसाठी वेबवरील सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यात मदत करा" सुरू किंवा बंद असावे की नाही हे तुम्ही निवडू शकता. वर्धित संरक्षणासह, हे वैशिष्ट्य डीफॉल्टनुसार सुरू असते आणि ते बंद केले जाऊ शकत नाही.

कॉंप्युटर

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षा निवडा.
  3. "साधारण संरक्षण" या अंतर्गत, प्रत्येकासाठी वेबवरील सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यात मदत करा हे सुरू किंवा बंद करा.

Android

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षित ब्राउझिंग यावर टॅप करा.
  3. "साधारण संरक्षण" या अंतर्गत, प्रत्येकासाठी वेबवरील सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यात मदत करा हे सुरू किंवा बंद करा.

iOS

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षित ब्राउझिंग वर टॅप करा.
  3. साधारण संरक्षण View site information वर टॅप करा.
  4. प्रत्येकासाठी वेबवरील सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यात मदत करा हे सुरू किंवा बंद करा.

तुमचे शोध आणि ब्राउझिंग आणखी चांगले करा यासंबंधित सेटिंग्ज बदलणे

"शोध आणि ब्राउझिंग आणखी चांगले करा" हे सुरू केलेले असते, तेव्हा तुमचा ब्राउजिंग अनुभव आणि सुरक्षा यांमध्ये सुधारणा करण्यासाठी Chrome तुम्ही भेट दिलेल्या पेजच्या URLs पाठवते. खाजगी ब्राउझिंग अ‍ॅक्टिव्हिटी आणि गुप्त मोड यांमधील URLs बद्दल अधिक जाणून घ्या.

कॉंप्युटर

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर तुम्ही आणि Google आणि त्यानंतर सिंक आणि Google सेवा निवडा.
  3. शोध आणि ब्राउझिंग आणखी चांगले करा हे सुरू किंवा बंद करा.

Android

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर Google सेवा वर टॅप करा.
  3. शोध आणि ब्राउझिंग आणखी चांगले करा हे सुरू किंवा बंद करा.

iOS

  1. तुमच्या iPhone किंवा iPad वर, Chrome Chrome उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर Google सेवा वर टॅप करा.
  3. शोध आणि ब्राउझिंग आणखी चांगले करा हे सुरू किंवा बंद करा.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2071588825077006786
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false