Chrome चे साइड पॅनल व्यवस्थापित करणे

तुमच्या काँप्युटरच्या साइड पॅनलमध्ये, तुम्ही पुढील गोष्टी शोधू शकता:

  • वाचन सूची
  • बुकमार्क
  • इतिहास
  • Google Search आणि आणखी बरेच काही
साइड पॅनल व्यवस्थापित करणे
  • साइड पॅनलचा आकार बदलण्यासाठी: पॅनलच्या बाजूला, ड्रॅग करा निवडून धरून ठेवा.
  • साइड पॅनलचे स्थान बदलण्यासाठी:
    1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
    2. आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर स्वरूप निवडा.
    3. "साइड पॅनल" या अंतर्गत, तुम्हाला ज्या बाजूला पॅनल उघडावे असे वाटते ती बाजू निवडा.
  • साइड पॅनल बंद करण्यासाठी: सर्वात वरती उजवीकडे, बंद करा Close निवडा.
विशिष्ट साइड पॅनल पिन किंवा अनपिन करणे

तुम्ही Chrome मध्ये विशिष्ट साइड पॅनल पिन करू शकता. तुम्ही पुढील गोष्टी पिन करू शकता:

  • शोधा
  • वाचन सूची
  • बुकमार्क
  • इतिहास
  • वाचन मोड

विशिष्ट साइड पॅनल पिन करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. वेबसाइटवर जा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी निवडा.
  4. पिन करण्यासाठी:
    • Google Search: Google वापरून हे पेज शोधा निवडा.
    • वाचन सूची: बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर वाचन सूची आणि त्यानंतर वाचन सूची दाखवा निवडा.
    • बुकमार्क: बुकमार्क आणि सूची आणि त्यानंतर सर्व बुकमार्क दाखवा निवडा.
    • इतिहास: इतिहास आणि त्यानंतर गटबद्ध केलेला इतिहास निवडा.
    • वाचन मोड: आणखी टूल आणि त्यानंतर वाचन मोड निवडा.
  5. आयकनच्या नावाच्या बाजूला, टूलबारवर पिन करा Pin वर क्लिक करा.
    • प्रोफाइल Profile च्या डावीकडे, Google Search , बुकमार्क , वाचन मोड , वाचन सूची किंवा इतिहास  उपलब्ध होतो.

विशिष्ट साइड पॅनल अनपिन करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. प्रोफाइल Profile च्या डावीकडे, तुम्ही पुढील गोष्टी निवडू शकता:
    • शोधा
    •  वाचन सूची 
    •  बुकमार्क 
    •  इतिहास 
    •  वाचन मोड 
  3. आयकनच्या नावाच्या बाजूला, टूलबारवरून अनपिन करा  निवडा.

टीप: तुम्ही आयकनवर राइट-क्लिकदेखील करू शकता आणि अनपिन करा निवडू शकता.

Google Search साइड पॅनल वापरून वेब पेज शोधणे

Google Search साइड पॅनल वापरून, तुम्ही ब्राउझ करत असलेल्या साइटबद्दलची अधिक माहिती आणि तुम्ही वापरत असलेली शोध साधने हे सर्व अ‍ॅक्सेस करू शकता.

साइटवर असताना, लेख आणि इतर वेब पेजमधील महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी Google Search साइड पॅनल उघडा:

Google Search साइड पॅनल वापरून वेब पेज शोधण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. वेबसाइटवर जा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर Google वापरून हे पेज शोधा निवडा.
    • तुम्ही शोधत असलेल्या मजकूर आणि इमेजबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, वेब पेजवरील कीवर्ड एंटर करा.

टिपा:

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6308735598784243850
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false