साइट सेटिंग्जसंबंधी परवानग्या बदलणे

तुम्ही तुमची डीफॉल्ट सेटिंग्ज न बदलता साइटसाठी परवानग्या सेट करू शकता.

सर्व साइटची सेटिंग्ज बदलणे

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. "प्रगत" अंतर्गत, साइट सेटिंग्ज वर टॅप करा.
  4. तुम्हाला अपडेट करायच्या असलेल्या परवानगीवर टॅप करा.
बदलल्या जाऊ शकतात अशा परवानग्यांबद्दल जाणून घ्या
  • सर्व साइट: विशिष्ट परवानग्या असलेल्या सर्व साइटचे पुनरावलोकन करा.
    • MIDI डिव्हाइस नियंत्रणे आणि रीप्रोग्राम: साइट या सामान्यपणे संगीत तयार करणे आणि संपादित करणे किंवा डिव्हाइसचे फर्मवेअर अपडेट करणे यांसाठी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस (MIDI) डिव्हाइस नियंत्रित करण्यास व रीप्रोग्राम करण्यास सांगतात. तुम्ही "सर्व साइट" अंतर्गत हे सुरू किंवा बंद करू शकता. MIDI डिव्हाइस आणि परवानग्यांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • तृतीय पक्ष कुकी: तुम्ही भेट देता ती साइट इतर साइटवरील आशय एंबेड करू शकते, उदाहरणार्थ, इमेज, जाहिराती आणि मजकूर. या इतर साइटद्वारे सेट केलेल्या कुकीना तृतीय पक्ष कुकी म्हणतात. कुकी कशा व्यवस्थापित कराव्या हे जाणून घ्या.
  • स्थान: तुम्ही ज्या साइटवर जाता त्यांनी बाय डीफॉल्ट तुमची अचूक स्थान माहिती मिळवण्यासाठी विचारणा करणे आवश्यक आहे. तुमचे स्थान कसे शेअर करावे हे जाणून घ्या.
  • कॅमेरा आणि मायक्रोफोन: साइट या तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरण्याबद्दल विचारू शकतात. तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोन कसा वापरावा हे जाणून घ्या.
  • मोशन सेन्सर: साइट या तुमच्या डिव्हाइसचे मोशन सेन्सर अ‍ॅक्सेस करण्याची विनंती करू शकतात.
  • सूचना: Google Calendar सारख्या काही साइट या सूचना दाखवू शकतात. तुम्ही ज्या साइटवर जाता त्यांनी बाय डीफॉल्ट सूचना दाखवण्याबद्दल विचारणे आवश्यक आहे. सूचनांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • JavaScript: JavaScript साइटना परस्परसंवादी बनवण्यात मदत करते.
  • पॉप-अप आणि रीडिरेक्ट: जाहिराती दाखवण्यासाठी साइट पॉप-अप पाठवू शकतात किंवा तुम्हाला टाळायच्या असलेल्या वेबसाइटवर नेण्यासाठी रीडिरेक्ट वापरू शकतात. पॉप-अप आणि रीडिरेक्‍ट यांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • नको असलेल्या जाहिराती: नको असलेल्या जाहिरातींचे अनुभव असलेल्या साइटवर जाहिराती मिळवायच्या आहेत का ते निवडा.
  • बॅकग्राउंड सिंक: चॅट मेसेज किंवा फोटो अपलोड यांसारख्या टास्कदरम्यान तुमचे डिव्हाइस ऑफलाइन गेल्यास, काही साइट या तुमचे डिव्हाइस परत ऑनलाइन आल्यानंतर टास्क पूर्ण करू शकतात. तुम्ही साइटमधून बाहेर पडल्यानंतरदेखील, बॅकग्राउंडमध्ये सिंक होईल.
  • ऑटोमॅटिक डाउनलोड: तुमचा वेळ वाचवण्यासाठी साइट संबंधित फाइल आपोआप एकत्रितपणे डाउनलोड करू शकतात. डाउनलोडबद्दल अधिक जाणून घ्या.
  • संरक्षित आशय: संगीत किंवा चित्रपट यांसारखा कॉपीराइट केलेला आशय तुम्हाला दाखवण्यापूर्वी काही साइटना तुमच्या डिव्हाइसशी संबंधित माहितीची आवश्यकता असते. तुमच्या डिव्हाइसच्या माहितीमध्ये तुम्ही साइटच्या अ‍ॅक्सेसला अनुमती देऊ शकता किंवा तो ब्लॉक करू शकता. संरक्षित आशयाबद्दल अधिक जाणून घ्या.
  • आवाज: साइटना बाय डीफॉल्ट आवाज प्ले करण्याची अनुमती असते.
  • स्टोअर केलेला डेटा: साइटने किती स्थानिक डिव्हाइस स्टोरेज वापरले आहे ते पहा.
  • NFC (निअर फील्ड कम्युनिकेशन) डिव्हाइस: साइट या NFC डिव्हाइसवरील माहिती पाहण्याची आणि बदलण्याची विनंती करू शकतात, अशी डिव्हाइस जी संपर्करहित पेमेंट यांसारख्या वैशिष्ट्यांसाठी डेटाची देवाणघेवाण करण्याकरिता वापरली जातात.
  • USB: तुम्ही साइट USB डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता, जे साइटला डिव्हाइसमधील माहिती नियंत्रित आणि रेकॉर्ड करू देते. USB डिव्हाइसशी साइट कशी कनेक्ट करावी हे जाणून घ्या.
  • क्लिपबोर्ड: साइट या क्लिपबोर्डवरील मजकूर आणि इमेज रीड करण्याची विनंती करू शकतात.
  • व्हर्च्युअल रीअ‍ॅलिटी: तुम्हाला VR सेशनमध्ये एंटर करू देण्यासाठी साइट बरेचदा तुमची व्हर्च्युअल रीअ‍ॅलिटी डिव्हाइस आणि डेटा वापरतात.
  • ऑगमेंटेड रीअ‍ॅलिटी: गेम यांसारख्या AR वैशिष्ट्यांसाठी साइट या सामान्यपणे तुमच्या कॅमेराचे स्थान ट्रॅक करतात.
  • तुमचा डिव्हाइसचा वापर: चॅट अ‍ॅप्सवर तुमची उपलब्धता सेट करण्यासाठी, तुम्ही तुमचे डिव्हाइस सक्रियपणे कधी वापरता हे साइट सामान्यपणे डिटेक्ट करतात.
  • तृतीय पक्ष साइन-इन: साइट या ओळखीशी संबंधित सेवांकडून मिळणारे साइन-इन प्रॉम्प्ट दाखवू शकतात. तृतीय पक्ष साइन-इन परवानग्या बदलणे.
  • डेस्कटॉप साइट: Chrome हे आपोआप साइटची मोबाइल आवृत्ती दाखवते. तुमची डेस्कटॉप सेटिंग्ज कशी व्यवस्थापित करावीत हे जाणून घ्या.
  • डिव्‍हाइसवरील साइट डेटा: तुम्ही भेट दिलेल्या साइट या तुमचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीची माहिती सेव्ह करू शकतात — उदाहरणार्थ, तुम्हाला साइटवर साइन इन केलेले ठेवण्यासाठी किंवा तुमच्या शॉपिंग कार्टमध्ये आयटम सेव्ह करण्यासाठी. डिव्‍हाइसवरील साइट डेटाविषयी जाणून घ्या.

साइटची सेटिंग्ज बदलणे

तुम्ही विशिष्ट साइटसाठी परवानग्यांना अनुमती देऊ शकता किंवा त्या ब्लॉक करू शकता. साइट ही डीफॉल्ट सेटिंग्जऐवजी तुम्ही सेट केलेल्या परवानग्या वापरेल.

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. साइटवर जा.
  3. अ‍ॅड्रेस बारच्या डावीकडे, साइटची माहिती पहा Default (Secure) आणि त्यानंतर परवानग्या वर टॅप करा.
  4. तुम्हाला अपडेट करायच्या असलेल्या परवानगीवर टॅप करा.
    • सेटिंग बदलण्यासाठी, ते निवडा.
    • साइटची सेटिंग्ज हटवण्यासाठी, परवानग्या रीसेट करा वर टॅप करा.
टीप: तुम्ही एखाद्या साइटवरील सेटिंग बदलता, तेव्हा साइटच्या नावाशेजारील आयकन हे थोड्या वेळासाठी सेटिंगच्या आयकनवर बदलते. उदाहरणार्थ, तुम्ही साइटचा स्थान अ‍ॅक्सेस बदलल्यास, साइटचे आयकन हे स्थानाची पिन वर बदलते.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17435862547226270540
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false