Chrome ची सुरक्षितता आणि सुरक्षा व्यवस्थापित करणे

अधिक खाजगी आणि सुरक्षित ब्राउझिंग अनुभवासाठी, तुम्ही सुरक्षितता तपासणी आणि सुरक्षित ब्राउझिंग यांसारखी Chrome ची सुरक्षितता वैशिष्ट्ये वापरू शकता.
धोक्यात असलेले पासवर्ड

तुम्हाला तुमच्या खात्यावर अनोळखी अ‍ॅक्टिव्हिटी आढळल्यास किंवा तुमचा पासवर्ड धोक्यात आला आहे असे वाटत असल्यास, तुमचा पासवर्ड त्वरित बदला. धोक्यात आलेले Google खाते कसे सुरक्षित करावे ते जाणून घ्या.

दुसऱ्या साइटवरील तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी, Chrome मधील सूचना फॉलो करा. पासवर्ड कसे व्यवस्थापित करावेत ते जाणून घ्या.

सुरक्षित ब्राउझिंग च्या संरक्षण पातळ्या
Google सुरक्षित ब्राउझिंग सह तुम्हाला मालवेअर, धोकादायक एक्स्टेंशन, फिशिंग किंवा संभाव्य असुरक्षित साइटच्या Google च्या सूचीमधील साइटबद्दल सूचना मिळतात. सुरक्षित ब्राउझिंग ची संरक्षण पातळी कशी निवडावी त्याबद्दल जाणून घ्या.
ऑटोमॅटिक Chrome अपडेट
तुम्ही नवीनतम सुरक्षा अपडेटद्वारे संरक्षित आहात याची खात्री करण्यासाठी, उपलब्ध असेल, तेव्हा Chrome हे ब्राउझरच्या नवीनतम आवृत्तीवर आपोआप अपडेट होऊ शकते. Chrome कसे अपडेट करावे ते जाणून घ्या.
पासवर्डसाठी डिव्हाइसवरील एन्क्रिप्शन
महत्त्वाचे: तुम्ही आधीच डिव्हाइसवरील एन्क्रिप्शन सेट केले असल्याची खात्री करा. डिव्हाइसवरील एन्क्रिप्शन कसे सेट करावे हे जाणून घ्या.

डिव्हाइसवरील एन्क्रिप्शन सेट केल्यानंतर, तुम्ही तुमचा पासवर्ड अनलॉक करण्यासाठी कंपॅटिबल फोन किंवा टॅबलेटकरिता तुमचा Google पासवर्ड अथवा स्क्रीन लॉक वापरू शकता. या प्रकारचे एन्क्रिप्शन म्हणजे तुमचे पासवर्ड अनलॉक करण्याची की फक्त तुमच्याकडे आहे.

Android device वर सुरक्षितता तपासणी रन करा

तुम्ही सुरक्षितता तपासणी वापरून Chrome ची सुरक्षितता आणि सुरक्षा व्यवस्थापित करू शकता. सुरक्षितता तपासणी पुढील गोष्टी शोधते:
  • धोक्यात असलेले पासवर्ड
  • सुरक्षित ब्राउझिंग स्टेटस
  • Chrome ची उपलब्ध असलेली अपडेट
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, अधिक संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3.  सुरक्षितता तपासणी आणि त्यानंतर आता तपासा वर टॅप करा.
  4. Chrome ला कोणत्याही समस्या आढळल्यास:
    1. समस्या असलेल्या आयटमवर टॅप करा.
    2. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.
नेहमी सुरक्षित कनेक्शन वापरा सुरू करा

वेबसाइटच्या URL मध्ये HTTPS असते, तेव्हा ते सुरक्षित कनेक्शन सूचित करू शकते. HTTPS वापरत असलेल्या साइटची कनेक्शन ही ती वापरत नसलेल्या कनेक्शनपेक्षा अधिक सुरक्षित असतात.

तुम्ही नेहमी सुरक्षित कनेक्शन वापरा सुरू करता, तेव्हा Chrome हे HTTPS वापरण्यासाठी URLs अपग्रेड करते आणि तुम्ही त्याला सपोर्ट न करणाऱ्या साइटला भेट देण्यापूर्वी चेतावणी दाखवते.

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर गोपनीयता आणि सुरक्षा वर टॅप करा.
  3. “सुरक्षा” या अंतर्गत नेहमी सुरक्षित कनेक्शन वापरा सुरू करा.

टीप: तुम्ही URL मध्ये HTTPS वापरत नसेलली एखादी साइट लोड करणार असता, तेव्हा तुम्हाला ॲड्रेस बारमध्ये “सुरक्षित नाही” अशी चेतावणी दिसेल.

साइटचा आयपी अ‍ॅड्रेस शोधण्यासाठी सुरक्षित कनेक्शन वापरा

तुम्ही साइटला भेट देता तेव्हा Chrome हे साइटच्या होस्ट सर्व्हरचा आयपी अ‍ॅड्रेस शोधते. तुमची गोपनीयता आणि सुरक्षा यांचे संरक्षण करण्यासाठी, सुरक्षित DNS लुकअप सुरू असल्यास, लुकअप प्रक्रियेदरम्यान Chrome तुमची माहिती एंक्रिप्ट करते.

बाय डीफॉल्ट, ऑटोमॅटिक मोडमध्ये Chrome मधील सुरक्षित DNS सुरू केलेली असते. Chrome ला या मोडमध्ये साइट शोधण्यात समस्या येत असल्यास, ते एंक्रिप्ट न केलेल्या मोडमध्ये साइट शोधेल.

तुम्ही कस्टम पुरवठादार निवडू शकता. तुम्ही कस्टम पुरवठादार निवडता तेव्हा Chrome एंक्रिप्ट न केलेल्या मोडवर डीफॉल्ट होणार नाही. तुम्हाला एरर मेसेज यांसारख्या समस्या येत असल्यास, तुम्ही तुमचे पुरवठादार सेटिंग तपासू शकता किंवा सुरक्षित DNS बंद करू शकता. सर्व्हरचा आयपी अ‍ॅड्रेस शोधता आला नाही, असा एरर मेसेज येऊ शकतो.

महत्त्वाचे: तुमचे डिव्हाइस व्यवस्थापित केलेले असल्यास किंवा पालक नियंत्रणे सुरू असल्यास, तुम्ही Chrome चे सुरक्षित DNS वैशिष्ट्य वापरू शकत नाही.

सुरक्षित DNS सुरू किंवा बंद करण्यासाठी:
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर गोपनीयता आणि सुरक्षा वर टॅप करा.
  3. “सुरक्षा” या अंतर्गत, सुरक्षित DNS वापरा वर टॅप करा.
  4. सुरक्षित DNS वापरा सुरू किंवा बंद करा.
  5. तुमचा सद्य किंवा दुसरा सेवा पुरवठादार निवडा.

Related articles

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15123367904286308453
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false