Chrome ची सुरक्षितता आणि सुरक्षा व्यवस्थापित करणे

अधिक खाजगी आणि सुरक्षित ब्राउझिंग अनुभवासाठी, तुम्ही सुरक्षितता तपासणी आणि सुरक्षित ब्राउझिंग यांसारखी Chrome ची सुरक्षितता वैशिष्ट्ये वापरू शकता.
धोक्यात असलेले पासवर्ड

तुम्हाला तुमच्या खात्यावर अनोळखी अ‍ॅक्टिव्हिटी आढळल्यास किंवा तुमचा पासवर्ड धोक्यात आला आहे असे वाटत असल्यास, तुमचा पासवर्ड त्वरित बदला. धोक्यात आलेले Google खाते कसे सुरक्षित करावे ते जाणून घ्या.

दुसऱ्या साइटवरील तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी, Chrome मधील सूचना फॉलो करा. पासवर्ड कसे व्यवस्थापित करावेत ते जाणून घ्या.

सुरक्षित ब्राउझिंग च्या संरक्षण पातळ्या
Google सुरक्षित ब्राउझिंग सह तुम्हाला मालवेअर, धोकादायक एक्स्टेंशन, फिशिंग किंवा संभाव्य असुरक्षित साइटच्या Google च्या सूचीमधील साइटबद्दल सूचना मिळतात. सुरक्षित ब्राउझिंग ची संरक्षण पातळी कशी निवडावी त्याबद्दल जाणून घ्या.
ऑटोमॅटिक Chrome अपडेट
तुम्ही नवीनतम सुरक्षा अपडेटद्वारे संरक्षित आहात याची खात्री करण्यासाठी, उपलब्ध असेल, तेव्हा Chrome हे ब्राउझरच्या नवीनतम आवृत्तीवर आपोआप अपडेट होऊ शकते. Chrome कसे अपडेट करावे ते जाणून घ्या.
पासवर्डसाठी डिव्हाइसवरील एन्क्रिप्शन
महत्त्वाचे: तुम्ही आधीच डिव्हाइसवरील एन्क्रिप्शन सेट केले असल्याची खात्री करा. डिव्हाइसवरील एन्क्रिप्शन कसे सेट करावे हे जाणून घ्या.

डिव्हाइसवरील एन्क्रिप्शन सेट केल्यानंतर, तुम्ही तुमचा पासवर्ड अनलॉक करण्यासाठी कंपॅटिबल फोन किंवा टॅबलेटकरिता तुमचा Google पासवर्ड अथवा स्क्रीन लॉक वापरू शकता. या प्रकारचे एन्क्रिप्शन म्हणजे तुमचे पासवर्ड अनलॉक करण्याची की फक्त तुमच्याकडे आहे.

तुमच्या कॉंप्युटरवरील सुरक्षितता तपासणीचे पुनरावलोकन करा

तुम्हाला गोपनीयता आणि सुरक्षितता समस्या शोधण्यात आणि त्यांचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी Chrome आपोआप सुरक्षितता तपासणी रन करते.

तुम्ही सुरक्षितता तपासणी सह तुमच्या Chrome च्या गोपनीयता आणि सुरक्षिततेचे पुनरावलोकन करू शकता. कॉंप्युटरवर, सुरक्षितता तपासणी पुढील गोष्टी शोधते:

  • धोक्यात आलेले, पुन्हा वापरलेले किंवा कमकुवत पासवर्ड: तुमच्या ऑनलाइन सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, Google Password Manager मध्ये स्टोअर केलेले वापरकर्ता नाव अथवा पासवर्ड हा डेटा भंगामध्ये सामील असल्यास सुरक्षितता तपासणी तुम्हाला चेतावणी देऊ शकते. Chrome तुमच्या पासवर्डचे संरक्षण कसे करते याबद्दल अधिक जाणून घ्या.
  • सुरक्षित ब्राउझिंग स्टेटस: तुम्ही मालवेअर, फिशिंग आणि इतर धोक्यांपासून संरक्षित आहात याची खात्री करण्यासाठी, सुरक्षितता तपासणी तुम्हाला कधीकधी तुमच्या सुरक्षित ब्राउझिंग सेटिंग्जचे पुनरावलोकन करण्याची आठवण करून देऊ शकते. Chrome मधील सुरक्षित ब्राउझिंग संरक्षणाबद्दल अधिक जाणून घ्या.
  • उपलब्ध Chrome अपडेट: तुम्ही नवीनतम सुरक्षा अपडेटद्वारे संरक्षित आहात याची खात्री करण्यासाठी, सुरक्षितता तपासणी तुम्हाला कधीकधी Chrome अपडेट करण्याची आठवण करून देऊ शकते.
  • संभाव्य नको असलेल्या सूचना: वेळोवेळी, Chrome तुम्हाला तुम्ही दिलेल्या सूचना परवानग्यांचे पुनरावलोकन करण्याची आठवण करून देईल.
  • न वापरलेल्या साइट परवानग्या: तुमचा डेटा संरक्षित करण्यासाठी, Chrome तुम्ही अलीकडे न वापरलेल्या साइटवरील परवानग्या काढून टाकते.
  • संभाव्य हानिकारक एक्स्टेंशन: तुमच्या सुरक्षिततेमध्ये सुधारणा करण्यासाठी, सुरक्षितता तपासणी तुम्हाला सुरक्षेसंबंधित धोके निर्माण करू शकणाऱ्या एक्स्टेंशनबद्दल चेतावणी देऊ शकते. 
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी संगतवार ठेवाआणि त्यानंतर सेटिंग्जवर क्लिक करा.
  3. डावीकडे, गोपनीयता आणि सुरक्षा निवडा.
  4. “सुरक्षितता तपासणी” या अंतर्गत, सुरक्षितता तपासणी वर जा निवडा.
  5. Chrome ला कोणत्याही समस्या आढळल्यास:
    1. समस्या असलेला आयटम निवडा.
    2. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.
टीप: सुरक्षितता तपासणी कृती करते, तेव्हा तुम्ही लक्ष देण्याची आवश्यकता असलेल्या समस्या असल्यास Chrome तुम्हाला सूचित करेल. तुम्ही आणखी संगतवार ठेवा निवडल्यावर हे मेसेज दिसतील. तुम्ही समस्या असलेला आयटम निवडू शकता आणि स्क्रीनवरील सूचना फॉलो करू शकता.

प्रगत सुरक्षा सेटिंग्ज व्यवस्थापित करणे

नेहमी सुरक्षित कनेक्शन वापरा सुरू करा

वेबसाइटच्या URL मध्ये HTTPS असते, तेव्हा ते सुरक्षित कनेक्शन सूचित करू शकते. HTTPS वापरत असलेल्या साइटची कनेक्शन ही ती वापरत नसलेल्या कनेक्शनपेक्षा अधिक सुरक्षित असतात.

तुम्ही नेहमी सुरक्षित कनेक्शन वापरा सुरू करता, तेव्हा Chrome हे HTTPS वापरण्यासाठी URLs अपग्रेड करते आणि तुम्ही त्याला सपोर्ट न करणाऱ्या साइटला भेट देण्यापूर्वी चेतावणी दाखवते.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षा निवडा.
  4. “प्रगत” या अंतर्गत नेहमी सुरक्षित कनेक्शन वापरा. सुरू करा.
टीप: तुम्ही URL मध्ये HTTPS वापरत नसेलली एखादी साइट लोड करणार असता, तेव्हा तुम्हाला ॲड्रेस बारमध्ये “सुरक्षित नाही” अशी चेतावणी दिसेल.
साइटचा आयपी अ‍ॅड्रेस शोधण्यासाठी सुरक्षित कनेक्शन वापरा

तुम्ही साइटला भेट देता तेव्हा Chrome हे साइटच्या होस्ट सर्व्हरचा आयपी अ‍ॅड्रेस शोधते. तुमची गोपनीयता आणि सुरक्षा यांचे संरक्षण करण्यासाठी, सुरक्षित DNS लुकअप सुरू असल्यास, लुकअप प्रक्रियेदरम्यान Chrome तुमची माहिती एंक्रिप्ट करते.

बाय डीफॉल्ट, ऑटोमॅटिक मोडमध्ये Chrome मधील सुरक्षित DNS सुरू केलेली असते. Chrome ला या मोडमध्ये साइट शोधण्यात समस्या येत असल्यास, ते एंक्रिप्ट न केलेल्या मोडमध्ये साइट शोधेल.

तुम्ही कस्टम पुरवठादार निवडू शकता. तुम्ही कस्टम पुरवठादार निवडता तेव्हा Chrome एंक्रिप्ट न केलेल्या मोडवर डीफॉल्ट होणार नाही. तुम्हाला एरर मेसेज यांसारख्या समस्या येत असल्यास, तुम्ही तुमचे पुरवठादार सेटिंग तपासू शकता किंवा सुरक्षित DNS बंद करू शकता. सर्व्हरचा आयपी अ‍ॅड्रेस शोधता आला नाही, असा एरर मेसेज येऊ शकतो.

महत्त्वाचे: तुमचे डिव्हाइस व्यवस्थापित केलेले असल्यास किंवा पालक नियंत्रणे सुरू असल्यास, तुम्ही Chrome चे सुरक्षित DNS वैशिष्ट्य वापरू शकत नाही.

सुरक्षित DNS सुरू किंवा बंद करण्यासाठी:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षा निवडा.
  4. "प्रगत" या अंतर्गत, सुरक्षित DNS वापरा सुरू किंवा बंद करा.
  5. तुमचा सद्य सेवा पुरवठादार निवडा.
    • किंवा ड्रॉप डाउन मेनूमधून, कस्टम सेवा पुरवठादार निवडा.
V8 सुरक्षा सेटिंग्ज व्यवस्थापित करणे

महत्त्वाचे: साइट परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्यासाठी, बाय डीफॉल्ट V8 सुरू आहे. 

अतिरिक्त सुरक्षिततेसाठी, पण साइट परफॉर्मन्स कमी करण्यासाठी, तुम्ही ते पुढील गोष्टी करून बंद करू शकता:

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षा आणि त्यानंतर V8 सुरक्षा व्यवस्थापित करा निवडा.
  4. तुम्ही तुमची प्राधान्य असलेली परवानगी निवडू शकता:
    • साइट V8 ऑप्टिमायझर वापरू शकतात:परफॉर्मन्स वाढवते आणि जी वैशिष्ट्ये JavaScript वापरतात, ती अपेक्षेप्रमाणे काम करतात. याची शिफारस केली जाते.
    • साइटना V8 ऑप्टिमायझर वापरण्याची परवानगी देऊ नका:परफॉर्मन्स कमी करते, पण V8 अधिक सुरक्षित करते.

टीप:कोणत्या URLs V8 ऑप्टिमायझर वापरू शकतात आणि वापरू शकत नाहीत हेदेखील तुम्ही नमूद करू शकता. V8 ऑप्टिमायझर वापरण्याची परवानगी असलेल्या किंवा परवानगी नसलेल्या वेबसाइटची URL जोडण्यासाठी, जोडा निवडा.

सिक्युरिटी की व्यवस्थापित करणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा. 
  3. डावीकडे, गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षा निवडा.
  4. "प्रगत" या अंतर्गत, सिक्युरिटी की व्यवस्थापित करा निवडा.
  5. तुम्ही तुमची सिक्युरिटी की कशी व्यवस्थापित कराल ते निवडा:
    • फोन व्यवस्थापित करा:तुम्ही सिक्युरिटी की म्हणून कोणते फोन वापरता ते नियंत्रित करा.
    • वैयक्तिक ओळख क्रमांक:तुमची सिक्युरिटी की पिनने संरक्षित करा. 
    • साइन-इन डेटा: तुमच्या सिक्युरिटी कीवर स्टोअर केलेला साइन इन डेटा व्यवस्थापित करा.
    • फिंगरप्रिंट: तुमच्या सिक्युरिटी कीमध्ये सेव्ह केलेल्या फिंगरप्रिंट जोडा आणि हटवा.
    • तुमची सिक्युरिटी की रीसेट करा: तुमच्या सिक्युरिटी कीवरील पिनसह सर्व डेटा हटवा.

सर्टिफिकेट व्यवस्थापित करणे

तुम्ही तुमची HTTPS किंवा SSL सर्टिफिकेट आणि सेटिंग्ज तपासू व बदलू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षा निवडा.
  4. "प्रगत" या अंतर्गत, सर्टिफिकेट व्यवस्थापित करा निवडा. 
Google प्रगत संरक्षण प्रोग्राम
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर सेटिंग्ज निवडा.
  3. डावीकडे, गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर सुरक्षा निवडा.
  4. "प्रगत" या अंतर्गत, प्रगत संरक्षण प्रोग्राम निवडा.
टीप: Google च्या प्रगत संरक्षण प्रोग्राम विषयी अधिक जाणून घ्या.

Related articles

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
470300420234775452
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false