Google Calendar मध्ये टास्क तयार आणि व्यवस्थापित करणे

Google Calendar मध्ये, तुम्ही टास्क तयार करू शकता, पाहू शकता आणि बदलू शकता.

महत्त्वाचे: Google Calendar मधील तुमच्या टास्क फक्त तुम्ही पाहू शकता.

टास्क तयार करा

Calendar मध्ये टास्क तयार करणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. तुमच्या कॅलेंडरवर, पर्याय निवडा:
    • रिकाम्या स्लॉटवर क्लिक करा.
    • सर्वात वरती डावीकडे, तयार करा वर क्लिक करा.
  3. टास्क वर क्लिक करा.
  4. तुमच्या टास्कचे तपशील एंटर करा.
  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही मागील ३६५ दिवसांमधील सर्व "प्रलंबित टास्क" ची सूची आजच्या दिवशी पाहू शकता.

Calendar मधील Tasks मधून टास्क तयार करणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, एक पर्याय निवडा:
    • Calendar मधील Tasks उघडा.
    • सर्वात वरती उजवीकडे, Tasks वर क्लिक करा.
  2. तयार करा वर क्लिक करा.
  3. तुमच्या टास्कचे तपशील एंटर करा.
  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

टिपा:

  • सद्य सूचीमध्ये टास्क जोडण्यासाठी, सर्वात वरती, टास्क जोडा वर क्लिक करा.
  • तारीख असलेल्या टास्क तुमच्या कॅलेंडरवरदेखील दिसतात.

टास्क पाहा, संपादित करा किंवा हटवा

टास्क तुमच्या कॅलेंडरवर दिसाव्यात, यासाठी त्यांमध्ये तारीख असणे आवश्यक आहे.

तुमचे टास्क पाहा
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. डाव्या पॅनलवर, "माझी कॅलेंडर" वर जा.
    • “माझी कॅलेंडर” पाहण्यासाठी, तुम्हाला मेनू मेनू वर क्लिक करावे लागू शकते.
  3. “Tasks” च्या चौकटीत खूण केली असल्याची खात्री करा.

महत्त्वाचे: तुम्ही मागील ३६५ दिवसांमधील सर्व "प्रलंबित टास्क" ची सूची आजच्या दिवशी पाहू शकता.

सर्व टास्क लपवणे
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. डावीकडील पॅनलमध्ये, “माझी कॅलेंडर” अंतर्गत, Tasks च्या बाजूला असलेल्या चौकटीमधील खूण काढून टाका.
    • “माझी कॅलेंडर” पाहण्यासाठी, तुम्हाला मेनू मेनू वर क्लिक करावे लागू शकते.
टास्क संपादित करा
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. तुम्हाला संपादित करायचे असलेले टास्क आणि त्यानंतर टास्क संपादित करा Edit task वर क्लिक करा.
  3. टास्कचे कोणतेही तपशील अपडेट करा.
  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

टिपा:

  • तुम्ही साइड पॅनलमधून किंवा Calendar मधील Tasks मधूनदेखील टास्क संपादित करू शकता.
  • तुम्हाला मालिकेतील रिपीट होणाऱ्या पुढील टास्कची तारीख आणि वेळ बदलायची असल्यास, तारखेवर क्लिक करा.
  • सर्व टास्कसाठी तारीख आणि वेळ संपादित करण्यासाठी, पुनरावृत्तीशी संबंधित माहितीवर क्लिक करा.
टास्क पूर्ण झाली म्हणून मार्क करणे
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. तुम्हाला अपडेट करायच्या असलेल्या टास्कवर क्लिक करा.
  3. तळाशी उजवीकडे, पूर्ण झाल्या म्हणून मार्क करा वर क्लिक करा.

टिपा:

पूर्ण केलेल्या टास्क लपवणे

तुमच्या कॅलेंडरमधील पूर्ण केलेल्या खोडलेल्या टास्क लपवण्यासाठी, तुम्ही तुमची सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट करू शकता.

  1. “सेटिंग्ज” च्या उजवीकडे, ड्रॉपडाउन वर क्लिक करा.
  2. पूर्ण केलेल्या टास्क दाखवा ची निवड रद्द करा.

तुमच्या सेटिंग्जमध्ये

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar वर जा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, पहा पर्याय वर क्लिक करा.
  4. पूर्ण झालेल्या टास्क दाखवा बंद करा.
असाइन केलेल्या टास्कची स्पॅम म्हणून तक्रार करणे
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. कॅलेंडर ग्रिडवर, तुम्हाला तक्रार करायच्या असलेल्या टास्कवर क्लिक करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, पर्याय आणखी वर क्लिक करा.
  4. स्पॅम म्हणून तक्रार करा आणि त्यानंतर स्पॅम म्हणून तक्रार करा वर क्लिक करा.

असाइन केलेल्या टास्कची स्पॅम म्हणून तक्रार कशी करायची ते जाणून घ्या

टास्क हटवणे
  1. Google Calendar उघडा.
  2. अपडेट करण्यासाठी टास्क आणि त्यानंतर हटवा Delete reminder वर क्लिक करा.
प्रलंबित टास्क शोधा आणि संपादित करा

मागील ३६५ दिवसांमधील सर्व प्रलंबित टास्क तपासण्यासाठी:

  1. Google Calendar उघडा.
  2. दिवसाचे शेड्यूल पाहताना, प्रलंबित टास्क वर क्लिक करा.
  3. पॉप-अप सूचीमध्ये, प्राधान्य असलेल्या टास्क कशा अपडेट कराव्यात हे निवडा:
    • टास्क संपादित करण्यासाठी, टास्कच्या उजवीकडे कर्सर फिरवा. संपादित करा Edit task वर क्लिक करा, तुमचे बदल करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
    • टास्क हटवण्यासाठी, टास्कच्या उजवीकडे कर्सर फिरवा. संपादित करा Edit task आणि त्यानंतर हटवा Delete reminder वर क्लिक करा.
    • टास्क पूर्ण करण्यासाठी, टास्कच्या बऱ्याच उजवीकडे कर्सर फिरवा. पूर्ण झाली म्हणून खूण करा वर क्लिक करा.

टीप: तुम्ही Google Calendar वरून तुमच्या टास्क लपवता, तेव्हा प्रलंबित टास्कची सूची डीॲक्टिव्हेट करू शकता. सर्व टास्क कशा लपवायच्या हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4378901893552991401
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false