स्क्रीन रीडरसह Google Calendar वापरणे

तुम्ही Google Calendar मध्ये स्क्रीन रीडर वापरत असल्यास, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • इव्‍हेंट तयार करणे आणि त्यांचा माग ठेवणे
  • इतरांना आमंत्रणे पाठवणे
  • आमंत्रणे स्वीकारणे किंवा त्यांना नकार देणे

खालीलपैकी एक पर्याय निवडा:

तुम्ही सुरुवात करण्याआधी

Google Calendar हे वेब अ‍ॅप्लिकेशन म्हणून वापरणे

Google Calendar हे "वेबपेज" याऐवजी "वेब अ‍ॅप्लिकेशन" म्हणून नेव्हिगेट करण्यासाठी, तुम्ही तुमचे स्क्रीन रीडर सेट करावे अशी शिफारस आम्ही करतो.

तुम्ही Google Calendar हे वेब अ‍ॅप्लिकेशन म्हणून वापरता, तेव्हा आणखी सुलभतेने नेव्हिगेट करण्यासाठी तुम्ही Google Calendar कीबोर्ड शॉर्टकट वापरू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही इव्हेंट तयार करण्यासाठी सी की, कॅलेंडर शोध सुरू करण्यासाठी स्लॅश की आणि आजच्या तारखेवर जाण्यासाठी टी की दाबू शकता. आणखी शॉर्टकटबद्दल खाली वर्णन केले आहे.

शिफारस केलेला ब्राउझर आणि स्क्रीन रीडर

Google Calendar हे Chrome आणि पुढील गोष्टींची शिफारस करते:

  • Windows वर NVDA किंवा JAWS
  • ChromeOS वर ChromeVox
  • MacOS वर VoiceOver

सुरुवात करणे

Google Calendar सह वापरण्यासाठी, तुमचे स्क्रीन रीडर सेट करा

Google Calendar हे वेब अ‍ॅप्लिकेशन म्हणून वापरण्यासाठी, तुमचे स्क्रीन रीडर सेट करा.

  • JAWS: व्हर्च्युअल कर्सर बंद करण्यासाठी, JAWS + z दाबा.
  • NVDA: फोकस मोडवर स्विच करण्यासाठी, NVDA + Space दाबा.
  • ChromeVox: स्टिकी मोड बंद असल्याची खात्री करा. स्टिकी मोड बंद करण्यासाठी, शोध की दोनदा दाबा.
  • VoiceOver: QuickNav बंद असल्याची खात्री करा. VoiceOver ने “QuickNav बंद केला आहे” असे म्हणेपर्यंत लेफ्ट आणि राइट अ‍ॅरो की दाबा.

Google Calendar उघडणे

  1. calendar.google.com वर जा.
  2. सूचित केल्यास, तुमच्या खात्यामध्ये साइन इन करा.
  3. तुमचे कॅलेंडर उघडण्यासाठी, "थेट मुख्य आशयावर जा" हे बटण वापरा.
  4. कीबोर्ड शॉर्टकटचे पुनरावलोकन करण्यासाठी, "कीबोर्ड शॉर्टकट" हे बटण वापरा.

Google Calendar इंटरफेसबद्दल जाणून घ्या

Google Calendar मध्ये, चार मुख्य भाग आहेत:

  • बॅनरचा भाग: या भागामध्ये पुढील गोष्टी करण्यासाठी बटणे आणि लिंक आहेत:
    • मुख्य ड्रॉवरची दृश्यमानता टॉगल करणे
    • इव्हेंटचा व्ह्यू एरिया नियंत्रित करणे
    • शोध क्वेरी परफॉर्म करणे
      • स्लॅश हा कीबोर्ड शॉर्टकट वापरणे. बॅनर च्या भागावर परत जाण्यासाठी, एस्केप दाबा.
    • सपोर्ट मिळवणे
    • सेटिंग्ज मेनू उघडणे
    • व्ह्यू स्विचर मेनू उघडणे
    • इतर अ‍ॅप्लिकेशन उघडणे
    • अ‍ॅक्टिव्ह खाते बदलणे
  • इव्हेंटचा भाग: हा मुख्य भाग आहे. येथे शेड्युल, दिवस, आठवडा, महिना किंवा वर्ष या व्ह्यूमध्ये इव्हेंट दाखवले जातात. आम्ही स्क्रीन रीडरसह शेड्युल व्ह्यू, ज्याला अजेंडा व्ह्यूदेखील म्हणतात, तो वापरण्याची शिफारस करतो.
    • कीबोर्ड शॉर्टकट किंवा तुमच्या प्राधान्य दिलेल्या व्ह्यूसाठी असलेला शॉर्टकट वापरा.
  • मुख्य ड्रॉवरचा भाग: विस्तारित केल्यावर, या भागामध्ये तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • इव्हेंट, कार्यालयाबाहेर, टास्क आणि आणखी बरेच काही तयार करणे
    • इव्हेंटच्या मुख्य भागाच्या डावीकडे लहान कॅलेंडर पाहणे
    • भेटण्यासाठी लोकांना शोधणे
      • प्लस हा कीबोर्ड शॉर्टकट वापरणे.
    • इव्हेंटच्या मुख्य भागामध्ये इतर कॅलेंडर जोडणे
  • उजवा साइडबार: विस्तारित केल्यावर, हा भाग Keep, Tasks आणि Contacts यांसारख्या साइड पॅनलमध्ये दिसणाऱ्या इतर Google अ‍ॅप्सचा झटपट अ‍ॅक्सेस देते.
    • Windows: Ctrl + Alt + period दाबा.
    • ChromeOS: Shift + Alt + period दाबा.
    • MacOS: ⌘ + Option + period दाबा.

Google Calendar मधील शॉर्टकट

तुमच्या कॅलेंडरवर नेव्हिगेट करण्यासाठी आणि टास्क परफॉर्म करण्यात मदत करण्यासाठी, तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट वापरू शकता.

कीबोर्ड शॉर्टकटची सूची मिळवण्याचे दोन मार्ग आहेत:

  • कीबोर्ड शॉर्टकट वापरणे:
    • Windows किंवा ChromeOS वर, Ctrl + Slash दाबा.
    • MacOS वर, ⌘ + Slash दाबा.
  • टॅब की आणि बटणे वापरणे: पेजच्या सर्वात वरती असलेल्या "थेट मुख्य आशयावर जा" या बटणाच्या पुढे "कीबोर्ड शॉर्टकट" बटणावर पोहोचण्यासाठी टॅब करत रहा आणि एंटर दाबा.

Google Calendar मधील सामान्य शॉर्टकट

कृती शॉर्टकट
नवीन इव्हेंट तयार करणे c
एखादा इव्‍हेंट संपादित करणे e
इव्‍हेंट दृश्य आज वर हलवणे t
इव्हेंट हटवणे

Windows आणि ChromeOS: डिलिट किंवा बॅकस्पेस दाबा

macOS: डिलिट
दिवसाचा व्ह्यू 1 किंवा डी
आठवडा दृश्य 2 किंवा डब्ल्यू
महिना दृश्य 3 किंवा एम
कस्टम व्ह्यू 4 किंवा एक्स
शेड्युल व्ह्यू 5 किंवा ए
वर्षाचा व्ह्यू 6 किंवा वाय
इव्हेंट सेव्ह करणे

Windows आणि ChromeOS: Ctrl + s किंवा Ctrl + Enter

MacOS: ⌘ + s किंवा ⌘ + Enter

स्क्रीन रीडर वापरून Google Calendar मध्ये सामान्य टास्क पूर्ण करणे

इव्हेंटच्या भागावर नेव्हिगेट करणे

कॅलेंडरमध्ये शेड्युल व्ह्यूवर नेव्हिगेट करणे

आम्ही तुम्हाला शेड्युल दृश्य वापरण्याची शिफारस करतो. शेड्युल दृश्यामध्ये :

कृती शॉर्टकट
दिवसांदरम्यान हलवणे

लेफ्ट किंवा राइट अ‍ॅरो की

दिवसातील इव्हेंटच्या संख्येचा व्ह्यूवर परिणाम होतो. व्ह्यूमध्ये एका किंवा अनेक दिवसांच्या इव्हेंटचा समावेश असू शकतो.

दिवसातील इव्हेंटदरम्यान हलवणे

अप किंवा डाउन अ‍ॅरो की

दिवसातील इव्हेंटच्या संख्येचा व्ह्यूवर परिणाम होतो. व्ह्यूमध्ये एका किंवा अनेक दिवसांच्या इव्हेंटचा समावेश असू शकतो.

व्ह्यू पुढील दिवसावर हलवणे एन
दृश्य मागील दिवसावर हलवणे पी

कॅलेंडर दिवसाच्या व्ह्यूवर नेव्हिगेट करणे

महत्त्वाचे: तुम्ही इतर व्ह्यूमध्ये एखाद्या दिवसावर एंटर दाबता, तेव्हा तुम्ही दिवसाच्या व्ह्यूवर स्विच करता.

कृती शॉर्टकट
दिवसाचा व्ह्यू इव्हेंटना दोन विभागांमध्ये गटबद्ध करतो: संपूर्ण दिवसाचे इव्हेंट आणि नियमित होणारे इव्हेंट.

संपूर्ण दिवसाचे इव्हेंट किंवा नियमित होणारे इव्हेंट यांदरम्यान स्विच करण्यासाठी, अप अथवा डाउन अ‍ॅरो की वापरा.

सध्याच्या दिवसामध्ये कोणतेही इव्हेंट नसतात, तेव्हा हा शॉर्टकट काम करत नाही.

संपूर्ण दिवसाच्या इव्हेंटच्या भागामधील किंवा नियमित होणार्‍या इव्हेंटच्या भागामधील इव्हेंटदरम्यान हलवणे

टॅब की

सध्याच्या दिवसामध्ये कोणतेही इव्हेंट नसतात, तेव्हा हा शॉर्टकट काम करत नाही.

पुढील दिवस एन
मागील दिवस पी

कॅलेंडर आठवड्याच्या दृश्यावर नेव्हिगेट करा

कृती शॉर्टकट
आठवड्याचा व्ह्यू इव्हेंटना दोन विभागांमध्ये गटबद्ध करतो: संपूर्ण दिवसाचे इव्हेंट आणि नियमित होणारे इव्हेंट. संपूर्ण दिवसाचे इव्हेंट किंवा नियमित होणारे इव्हेंट यांदरम्यान स्विच करण्यासाठी, अप अथवा डाउन अ‍ॅरो की वापरा.
आठवड्यातील दिवसांदरम्यान हलवणे लेफ्ट किंवा राइट अ‍ॅरो की
संपूर्ण दिवसाच्या इव्हेंटच्या भागामधील किंवा नियमित होणार्‍या इव्हेंटच्या भागामधील इव्हेंटदरम्यान हलवणे टॅब की
व्ह्यू पुढील आठवड्यावर स्क्रोल करणे

एन

फोकस नवीन आठवड्याच्या सुरुवातीला हलवण्यासाटी डब्ल्यू की दाबा.

व्ह्यू मागील आठवड्यावर स्क्रोल करणे

पी

फोकस नवीन आठवड्याच्या सुरुवातीला हलवण्यासाटी डब्ल्यू की दाबा.

कॅलेंडर महिन्याच्या व्ह्यूवर नेव्हिगेट करणे

कृती शॉर्टकट
आठवड्यांदरम्यान हलवणे अप किंवा डाउन अ‍ॅरो की
दिवसांदरम्यान हलवणे लेफ्ट किंवा राइट अ‍ॅरो की
महिन्यातील इव्हेंटदरम्यान हलवणे

टॅब की

स्क्रीनवर कदाचित एकाहून अधिक इव्हेंट दाखवणार नाही. सर्व इव्हेंट अ‍ॅक्सेस करण्यासाठी, आणखी या बटणावर नेव्हिगेट करा आणि त्यानंतर एंटर किंवा स्पेस दाबा.

व्ह्यू पुढील महिन्यावर स्क्रोल करणे

एन

फोकस नवीन महिन्याच्या सुरुवातीला हलवण्यासाटी एम की दाबा.

व्ह्यू मागील महिन्यावर स्क्रोल करणे

पी

फोकस नवीन महिन्याच्या सुरुवातीला हलवण्यासाटी एम की दाबा.

कॅलेंडर वर्षाच्या व्ह्यूवर नेव्हिगेट करणे

कृती शॉर्टकट
मागील किंवा पुढील आठवड्याच्या एकाच दिवसादरम्यान हलवणे अप किंवा डाउन अ‍ॅरो की
दिवसांदरम्यान हलवणे लेफ्ट किंवा राइट अ‍ॅरो की
दिवसाच्या इव्हेंटची टॅब करण्यायोग्य सूची असलेला डायलॉग उघडणे एंटर की
महिन्याच्या व्ह्यूमध्ये एंटर करणे स्पेस की
व्ह्यू पुढील वर्षावर स्क्रोल करणे

एन

फोकस नवीन वर्षाच्या सुरुवातीला हलवण्यासाठी वाय की दाबा.

व्ह्यू मागील वर्षावर स्क्रोल करणे

पी

फोकस नवीन वर्षाच्या सुरुवातीला हलवण्यासाठी वाय की दाबा.

विशिष्ट तारखेवर जा

व्ह्यू विशिष्ट तारखेवर बदलण्यासाठी, “तारखेवर जा” हा शॉर्टकट वापरा:

  1. "तारखेवर जा" हा डायलॉग उघडण्यासाठी, जी की दाबा.
  2. हवी असलेली तारीख एंटर करा. उदाहरणार्थ, ०५/०६/२०२१.
  3. एंटर दाबा.

टिपा:

  • तुम्ही आजची तारीख वापरता, तेव्हा “तारखेवर जा” यासाठी असलेला जी हा शॉर्टकट "आजवर जा" यासाठी असलेल्या टी या शॉर्टकटप्रमाणेच काम करतो.
  • आठवडा, महिना आणि वर्षाच्या व्ह्यूमध्ये, नवीन तारखेचा समावेश असलेला सुरुवातीचा कालावधी व्ह्यूमध्ये स्क्रोल होतो, पण फोकस हलणार नाही. अचूक नवीन तारखेवर फोकस हलवण्यासाठी, शेड्युल व्ह्यूसाठी ए की दाबा किंवा दिवसाच्या व्ह्यूसाठी डी की दाबा.

कॅलेंडरचा लहान व्ह्यू वापरणे

मुख्य ड्रॉवर भागामध्ये लहान कॅलेंडर आहे. सध्याच्या व्ह्यूमधील तारखा बदलण्यासाठी किंवा महिन्यातील सर्व दिवसांचे पुनरावलोकन करण्यासाठी, तुम्ही लहान कॅलेंडर वापरू शकता.

लहान कॅलेंडर शोधा
  • मुख्य ड्रॉवर भागामध्ये, "लोकांचा शोध" यासाठी प्लस दाबा.
  • महिन्याच्या सारणीवर फोकस ठेवण्यासाठी एकदा Shift + Tab दाबा.

महत्त्वाचे: तुम्हाला लहान कॅलेंडर दिसत नसल्यास, ते मुख्य ड्रॉवर भाग कोलॅप्स केलेला असल्यामुळे असू शकते. "मुख्य ड्रॉवर" बटण विस्तारित करण्यासाठी, बॅनर च्या सुरुवातीच्या भागावर नेव्हिगेट करा आणि एंटर दाबा.

लहान कॅलेंडरवर नेव्हिगेट करा
  • हवी असलेली तारीख शोधण्यासाठी, ॲरो की वापरा. तुम्हाला हवी असलेली तारीख सापडल्यावर, एंटर दाबा. कॅलेंडरचा मुख्य व्ह्यू हा तुम्ही निवडलेली तारीख समाविष्ट करण्यासाठी अपडेट होतो.
  • कॅलेंडरच्या मुख्य भागावर परत नेव्हिगेट करण्यासाठी, नवीन तारखेवर फोकस ठेवून अजेंडा व्ह्यूवर परत जाण्याकरिता ए की दाबा.

इव्हेंट तयार आणि व्यवस्थापित करणे

इव्हेंट तयार करणे

  1. इव्हेंट तयार करण्याचे तीन मार्ग आहेत:
    • सी की दाबा. नियमित होणारा इव्हेंट तयार करण्यासाठी पेज उघडते.
    • Shift + c दाबा. डायलॉग उघडतो. तुम्हाला तयार करायचा असलेला इव्हेंटचा प्रकार निवडा. तुम्ही नियमित होणारा इव्हेंट, कार्यालयाबाहेरचा इव्हेंट, टास्क किंवा रिमाइंडर तयार करू शकता.
    • मुख्य ड्रॉवर भागामधील "तयार करा" मेनू बटण वापरा. तुम्ही "इव्हेंट", "फोकस वेळ", "कार्यालयाबाहेर", "टास्क" किंवा "अपॉइंटमेंट शेड्युल" निवडू शकता.
  2. इव्हेंट शीर्षकासाठी सुरुवातीचा फोकस हा एंट्री फील्डवर असतो.
  3. तुम्ही "तारीख आणि वेळेची फिल्ड" यावर पोहोचेपर्यंत टॅब दाबा व तारीख आणि वेळेशी संबंधित माहिती एंटर करा.
  4. पर्यायी: अतिथींना इव्हेंटसाठी आमंत्रित करण्याकरिता, तुम्ही “अतिथी” संपादित करण्याच्या फील्डवर पोहोचेपर्यंत टॅब दाबा आणि त्यानंतर तुमच्या अतिथीचा ईमेल अ‍ॅड्रेस एंटर करा.
    • तुम्ही नाव किंवा ईमेल अ‍ॅड्रेस एंटर केल्यावर, सूचना घोषित केली जाते. ती तुम्हाला आमंत्रित करायची असलेली व्यक्ती असल्यास, एंटर दाबा.
    • संपादित करण्याच्या फील्डच्या खाली आणखी सूचना सूचीबद्ध केलेल्या आहेत. नावे ऐकण्यासाठी, डाउन अ‍ॅरो की दाबा. तुम्हाला हवी असलेली व्यक्ती सापडल्यानंतर, एंटर दाबा.
    • व्यक्ती सूचवली गेली नसल्यास, तिचे नाव एंटर करणे सुरू ठेवा आणि त्यानुसार सूचना सूची बदलेल.
  5. पर्यायी: इतर फिल्ड भरा, जसे की:
    • रूम किंवा मीटिंगशी संबंधित माहिती
    • सूचना
    • अटॅचमेंट
    • मीटिंगचे वर्णन
  6. इव्‍हेंट सेव्ह करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत:
    • ChromeOS किंवा Windows: Ctrl + s किंवा Ctrl + Enter दाबा.
    • MacOS: ⌘ + s किंवा ⌘ + Enter दाबा.
    • कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर, तुम्ही “सेव्ह करा” या बटणावर पोहोचेपर्यंत टॅब की दाबू शकता. त्यानंतर, एंटर दाबा.
  7. इव्हेंट काढून टाकण्यासाठी, एस्केप दाबा.

आवर्ती इव्हेंट तयार करणे

  1. इव्हेंट शोधा किंवा नवीन इव्हेंट तयार करा:
    • Calendar व्ह्यूमध्ये इव्हेंटवर नेव्हिगेट करा. इव्हेंटचे तपशील उघडण्यासाठी, इ की दाबा.
    • नवीन इव्हेंट तयार करण्यासाठी, सी की दाबा.
  2. तुम्ही "रिपीट होत नाही" या ड्रॉप-डाउनवर पोहोचेपर्यंत टॅब दाबा आणि त्यानंतर एंटर किंवा स्पेस दाबा. ड्रॉप-डाउन उघडते.
  3. पर्याय निवडा:
    • प्रीसेट इव्हेंटची वारंवारता निवडण्यासाठी, वारंवारतेच्या पर्यायांची सूची पाहण्याकरिता, ॲरो की वापरा. तुम्हाला तुमच्या इव्हेंटसाठी हवी असलेली पुनरावृत्तीची वारंवारता ऐकू येते, तेव्हा एंटर किंवा स्पेस दाबा.
    • कस्टम इव्हेंट वारंवारता सेट करण्यासाठी:
      1. कस्टम बटणाकडे ॲरो करा आणि त्यानंतर एंटर किंवा स्पेस दाबा. इव्हेंट कितीवेळा रिपीट होतो ते एंटर करा.
      2. “यासाठी प्रत्येकवेळी रिपीट करा” या बटणावर जाण्यासाठी टॅब दाबा. आठवड्याचे दिवस पाहण्यासाठी, टॅब की वापरा. दिवस निवडण्यासाठी, स्पेस दाबा.
      3. पर्यायी: तुम्ही सुरू होण्याची आणि संपण्याची तारीख शोधू शकता. सूची पाहण्यासाठी आणि निवडण्यासाठी, टॅब दाबा.
      4. तुमचा आवर्ती इव्हेंट सेट-अप सेव्ह करण्यासाठी, “पूर्ण झाले” या बटणावर जाण्याकरिता, टॅब दाबा आणि त्यानंतर एंटर किंवा स्पेस दाबा.

इव्हेंटचे पुनरावलोकन करणे

  1. Calendar व्ह्यूमध्ये इव्हेंटवर नेव्हिगेट करा.
  2. एंटर दाबा.
  3. फोकस न हलवता इव्हेंट फील्डचे पुनरावलोकन करण्यासाठी:
    • Windows: Alt + {number} दाबा
    • ChromeOS: Alt + Shift + {number} दाबा
    • MacOS: Option + {number} दाबा
    • {number} हा नंबर इव्हेंट फील्ड निवडतो:
      • 1 शीर्षक
      • 2 तारीख आणि वेळ
      • 3 अतिथी
      • 4 रूम आणि स्थान
      • 5 वर्णन
      • 6 अटॅचमेंट
      • 7 सूचना
  4. तुम्ही बदलू शकाल अशा फील्डशी संवाद साधण्यासाठी, टॅब दाबा.
    • टीप: तुम्ही टॅब की वापरून सर्व माहिती अ‍ॅक्सेस करू शकत नाही. काही माहिती ऐकण्यासाठी, तुम्हाला स्क्रीन रीडर कमांड वापराव्या लागू शकतात. तुमच्या स्क्रीन रीडरसह स्क्रीन रीडर कमांड वापरण्यासाठी:
      • JAWS: व्हर्च्युअल कर्सर सुरू करा.
      • NVDA: ब्राउझ मोड सुरू करा.
      • ChromeVox: स्टिकी मोड सुरू करा.
      • VoiceOver: QuickNav सुरू करा.
  5. इव्हेंटचे पुनरावलोकन पूर्ण झाल्यानंतर, एस्केप दाबा.

इव्हेंटमध्ये उपस्थितांना जोडणे किंवा काढून टाकणे

  1. इव्हेंट शोधा किंवा नवीन इव्हेंट तयार करा:
    • Calendar व्ह्यूमध्ये इव्हेंटवर नेव्हिगेट करा. इव्हेंटचे तपशील संपादित करण्यासाठी, इ की दाबा.
    • नवीन इव्हेंट तयार करण्यासाठी, सी की दाबा.
  2. अतिथींना इव्हेंटसाठी आमंत्रित करण्याकरिता, तुम्ही “अतिथी” संपादित करण्याच्या फील्डवर पोहोचेपर्यंत टॅब दाबा आणि त्यानंतर तुमच्या अतिथीचा ईमेल अ‍ॅड्रेस एंटर करा.
    • तुम्ही नाव किंवा ईमेल अ‍ॅड्रेस एंटर केल्यावर, सूचना घोषित केली जाते. ती तुम्हाला आमंत्रित करायची असलेली व्यक्ती असल्यास, एंटर दाबा.
    • संपादित करण्याच्या फील्डच्या खाली आणखी सूचना सूचीबद्ध केलेल्या आहेत. नावे ऐकण्यासाठी, डाउन अ‍ॅरो की दाबा. तुम्हाला हवी असलेली व्यक्ती सापडल्यानंतर, एंटर दाबा.
    • व्यक्ती सूचवली गेली नसल्यास, तिचे नाव एंटर करणे सुरू ठेवा आणि त्यानुसार सूचना सूची बदलेल.
  3. पर्यायी: तुम्ही अतिथीची उपस्थिती पर्यायी म्हणून मार्क करू शकता.
    1. अतिथीला पर्यायी म्हणून मार्क करण्यासाठी, तुम्ही आमंत्रित केलेल्या अतिथींच्या सूचीवर पोहोचेपर्यंत टॅब दाबा.
    2. तुम्हाला पर्यायी म्हणून मार्क करायच्या असलेल्या अतिथीवर जाण्यासाठी, ॲरो की दाबा.
    3. “पर्यायी म्हणून मार्क करा” या बटणावर जाण्यासाठी, टॅब दाबा आणि त्यानंतर एंटर किंवा स्पेस दाबा.
  4. पर्यायी: तुम्ही अतिथीला काढून टाकू शकता.
    1. अतिथीला काढून टाकण्यासाठी, आमंत्रित अतिथींच्या सूचीपर्यंत जाण्याकरिता टॅब दाबा.
    2. तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या अतिथीवर जाण्यासाठी, ॲरो की वापरा.
    3. तुम्ही “काढून टाका" या बटणावर पोहोचेपर्यंत टॅब दाबा आणि त्यानंतर एंटर दाबा.
  5. इव्हेंट सेव्ह करा.

इव्हेंटसाठी रूम जोडणे किंवा काढून टाकणे

तुमचे Google खाते हे तुमच्या ऑफिस किंवा शाळेचे असल्यास, तुम्ही इव्हेंटमध्ये रूम जोडू शकता किंवा त्या काढून टाकू शकता.

  1. इव्हेंट शोधा किंवा नवीन इव्हेंट तयार करा:
    • Calendar व्ह्यूमध्ये इव्हेंटवर नेव्हिगेट करा. इव्हेंटचे तपशील संपादित करण्यासाठी, इ की दाबा.
    • नवीन इव्हेंट तयार करण्यासाठी, सी की दाबा.
  2. तुम्ही “अतिथी” यांच्या टॅबलिस्टवर पोहोचेपर्यंत टॅब दाबा. रूम टॅब फील्डवर जाण्यासाठी, राइट अ‍ॅरो की वापरा.
  3. तुम्ही “रूमची सूची” वर पोहोचेपर्यंत टॅब दाबा.
  4. रूमच्या सूचीमध्ये एंटर करण्यासाठी, डाउन अ‍ॅरो की दाबा.
  5. रूमची निवड टॉगल करण्यासाठी, एंटर दाबा.
  6. इव्हेंट सेव्ह करा.

सुचवलेल्या वेळा वापरणे

तुम्ही अतिथी जोडल्यानंतर, Google Calendar हे सर्वजण कधी उपलब्ध असतील याच्या वेळा सुचवते. वेळांचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि निवडण्यासाठी:

  1. इव्हेंट शोधा किंवा नवीन इव्हेंट तयार करा:
    • Calendar व्ह्यूमध्ये इव्हेंटवर नेव्हिगेट करा. इव्हेंटचे तपशील संपादित करण्यासाठी, इ की दाबा.
    • नवीन इव्हेंट तयार करण्यासाठी, सी की दाबा.
  2. तुम्ही “अतिथी” संपादित करण्याच्या फील्डवर पोहोचेपर्यंत टॅब दाबा आणि त्यानंतर एंटर दाबा. इव्हेंटमध्ये अतिथी जोडा.
  3. “सुचवलेल्या वेळा” या मेनूवर जाण्यासाठी, टॅब दाबा.
  4. मेनू उघडण्यासाठी, एंटर किंवा डाउन अ‍ॅरो की दाबा.
  5. वेळेच्या पर्यायांचे पुनरावलोकन करण्यासाठी, ॲरो की वापरा.
  6. तुम्हाला निवडायची असलेली वेळ सापडल्यावर, एंटर दाबा. मीटिंगची तारीख आणि वेळा या सुचवलेल्या वेळांवर अपडेट होतात.
  7. इव्हेंट सेव्ह करा.

“वेळ शोधा” वापरणे

  1. इव्हेंट शोधा किंवा नवीन इव्हेंट तयार करा:
    • Calendar व्ह्यूमध्ये इव्हेंटवर नेव्हिगेट करा. इव्हेंटचे तपशील उघडण्यासाठी, इ की दाबा.
    • नवीन इव्हेंट तयार करण्यासाठी, सी की दाबा.
  2. तुम्ही “अतिथी” संपादित करण्याच्या फील्डवर पोहोचेपर्यंत टॅब दाबा आणि त्यानंतर एंटर दाबा. इव्‍हेंटमध्ये अतिथी जोडा.
  3. “इव्हेंटचे तपशील” टॅबलिस्टवर जाण्यासाठी, टॅब दाबा. “वेळ शोधा” टॅबवर जाण्यासाठी, राइट अ‍ॅरो की वापरा.
  4. कॅलेंडर पॅनलमध्ये एंटर करण्यासाठी, टॅब दाबा.
  5. वेळेच्या पर्यायांचे पुनरावलोकन करण्यासाठी, ॲरो की वापरा.
  6. तुम्हाला निवडायची असलेली वेळ सापडल्यावर, एंटर दाबा. मीटिंगची तारीख आणि वेळा या सुचवलेल्या वेळांवर अपडेट होतात.
  7. इव्हेंट सेव्ह करा.

दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे कॅलेंडर मिळवणे

तुम्ही तुमच्या कॅलेंडर व्ह्यूमध्ये एखाद्या व्यक्तीचे कॅलेंडर तात्पुरते जोडू शकता.

  1. प्लस की दाबा.
  2. व्यक्तीचा ईमेल अ‍ॅड्रेस एंटर करा.
  3. एंटर दाबा.
  4. दुसऱ्या व्यक्तीचे कॅलेंडर तुमच्या कॅलेंडर व्ह्यूमध्ये जोडले गेले आहे.

टिपा:

  • कॅलेंडरच्या मुख्य भागामधून एखाद्या व्यक्तीचे कॅलेंडर काढून टाकण्यासाठी, पेज रिफ्रेश करा.
  • तुम्ही इव्हेंट तयार केल्यास, Google Calendar हे तुमच्या कॅलेंडरच्या मुख्य भागामधून दुसऱ्या व्यक्तीचे कॅलेंडर आपोआप काढून टाकते.

इव्हेंट हटवणे

महत्त्वाचे: तुम्ही इव्हेंट हटवता, तेव्हा तुम्ही तो सर्व उपस्थितांसाठी रद्द करता. तुम्ही फक्त तुमच्या कॅलेंडरमधून इव्हेंट काढून टाकता, तेव्हा तो इतर उपस्थितांसाठी रद्द होत नाही. इव्हेंट हटवण्यासाठी:

  1. इव्हेंटवर जा.
  2. इव्‍हेंट हटवण्याचे विविध मार्ग आहेत.
    • बॅकस्पेस दाबा.
    • डिलिट दाबा.
    • इव्हेंट डायलॉग उघडण्यासाठी, एंटर दाबा. “हटवा” या बटणावर जाण्यासाठी, ॲरो की वापरा आणि त्यानंतर एंटर दाबा.
    • इव्हेंट संपादित करण्याच्या पेजवरून हटवा:
      1. इव्हेंट संपादित करण्यासाठी इ की दाबा.
      2. तुम्ही “आणखी कृती” या बटणावर पोहोचेपर्यंत टॅब दाबा आणि त्यानंतर एंटर दाबा.
      3. "हटवा" या बटणावर पोहोचेपर्यंत डाउन अ‍ॅरो की दाबा आणि त्यानंतर एंटर दाबा.
  3. पर्यायी: इव्हेंटची पुनरावृत्ती होत असल्यास, एका किंवा सर्व इव्हेंटची पुनरावृत्ती काढून टाकणे यामधील पायऱ्या फॉलो करा.

एका किंवा सर्व इव्हेंटची पुनरावृत्ती काढून टाकणे

एखादा इव्हेंट हा मालिकेचा भाग असल्यास, फक्त एक इव्हेंट काढून टाकायचा आहे की सर्व इव्हेंट असे डायलॉग बॉक्स विचारतो. एका किंवा सर्व इव्हेंटच्या पुनरावृत्ती काढून टाकणे निवडण्यासाठी:

  1. अप आणि डाउन ॲरो की वापरा आणि कोणता इव्हेंट हटवायचा आहे ते निवडा:
    • हा इव्हेंट
    • हा आणि नंतरचे सर्व इव्‍हेंट
    • सर्व इव्हेंट
  2. पर्यायी: मीटिंगसाठी इतर अतिथींना आमंत्रित केले असल्यास, तुम्ही रद्द करण्याबाबतचा मेसेज एंटर करू शकता. तुम्ही तुमचा मेसेज एंटर केल्यानंतर, टॅब दाबा.
  3. तुम्ही “ओके” या बटणावर पोहोचेपर्यंत टॅब दाबा आणि त्यानंतर एंटर दाबा.

इव्‍हेंट रिस्टोअर करणे

तुम्ही एखादा इव्‍हेंट चुकून हटवल्यास, तुम्ही ३० दिवस तो पाहू शकता किंवा रिस्टोअर करू शकता. इव्हेंट रिस्टोअर करण्यासाठी:

  1. स्लॅश हा कीबोर्ड शॉर्टकट वापरून बॅनर च्या भागावर जा.
  2. एस्केप दाबा.
  3. तुम्ही "सेटिंग्ज" मेनू या बटणावर पोहोचेपर्यंत दोनदा टॅब दाबा.
  4. सेटिंग्ज मेनू उघडण्यासाठी, एंटर किंवा डाउन अ‍ॅरो की दाबा.
  5. तुम्ही "ट्रॅश" या बटणावर पोहोचेपर्यंत डाउन अ‍ॅरो की वापरा.
  6. एंटर दाबा.
  7. तुम्ही “{event name} रिस्टोअर करा” या बटणावर पोहोचेपर्यंत टॅब दाबा, जेथे {event name} आणि तुम्हाला जो इव्हेंट रिस्टोअर करायचा आहे तो एकच आहे.
  8. स्पेस किंवा एंटर दाबा.
  9. तुमच्या कॅलेंडरवर परत जाण्यासाठी ब्राउझरवरील मागे जाण्याचा शॉर्टकट दाबा.

इव्हेंट शोधणे

साधा शोध वापरणे

  1. स्लॅश की दाबा.
  2. शोध संज्ञा एंटर करा.
    • संपर्काचे नाव एंटर करा, जुळणाऱ्या संपर्कावर पोहोचेपर्यंत डाउन अ‍ॅरो दाबा.
  3. एंटर दाबा.
    • तुम्ही एकाहून अधिक संज्ञा आणि लोक शोधत असल्यास, तुम्हाला सर्व शोध संज्ञांशी जुळणारे इव्हेंट दिसतात.

कोणतेही इव्हेंट तुमच्या शोधाशी जुळत असल्यास, आजच्या तारखेच्या सर्वात जवळच्या जुळणीवर फोकस असलेला शेड्युल व्ह्यू दिसतो. एकाहून अधिक जुळण्या असल्यास, तुम्ही शेड्युल व्ह्यूमध्ये करता त्याप्रमाणे नेव्हिगेट करू शकता:

  • तुमच्या शोधाशी जुळणाऱ्या इव्हेंटच्या मागील तारखांवर नेव्हिगेट करण्यासाठी, लेफ्ट अ‍ॅरो दाबा.
  • जुळणाऱ्या इव्हेंटच्या आगामी तारखांवर नेव्हिगेट करण्यासाठी, राइट अ‍ॅरो दाबा.
  • जुळलेल्या मागील इव्हेंटवर नेव्हिगेट करण्यासाठी, अप अ‍ॅरो दाबा.
  • जुळलेल्या आगामी इव्हेंटवर नेव्हिगेट करण्यासाठी, डाउन अ‍ॅरो दाबा.
  • इव्हेंटचे पुनरावलोकन करणे हे करण्यासाठी, इव्हेंटवर एंटर दाबा. परिणामांच्या व्ह्यूवर परत जाण्यासाठी, एस्केप दाबा.
  • मागील कॅलेंडरच्या व्ह्यूवर परत जाण्यासाठी, एस्केप दाबा.

प्रगत शोध वापरणे

  1. स्लॅश की दाबा.
  2. "पर्याय शोधा" बटणावर पोहोचेपर्यंत टॅब दाबा.
  3. शोध पर्याय असलेला फॉर्म उघडण्यासाठी, एंटर दाबा.
  4. पर्याय निवडण्यासाठी, तुम्हाला हव्या त्या पर्यायावर पोहोचेपर्यंत टॅब दाबा:
    • कोणती कॅलेंडर शोधायची?
      • "सर्व अ‍ॅक्टिव्ह" हे डीफॉल्ट आहे. अधिक पर्यायांसाठी, डाउन अ‍ॅरो दाबा.
    • इव्हेंटमध्ये कोणते कीवर्ड असणे आवश्यक आहे?
    • सहभागी कोण आहे?
    • इव्हेंट कुठे आहेत?
    • इव्हेंटमध्ये कोणते कीवर्ड नसणे आवश्यक आहे?
    • तारखांची रेंज कधीची आहे?
  5. शोधण्यासाठी, एंटर दाबा.
  6. परिणामांवर नेव्हिगेट करण्यासाठी, वरती साधा शोध वापरणे यामध्ये वर्णन केलेल्या अ‍ॅरो की वापरा.

इव्हेंटच्या आमंत्रणांना प्रतिसाद देणे

इव्हेंट व्ह्यूमधून

  1. इव्हेंटवर नेव्हिगेट करा.
  2. कॉंटेक्स्ट मेनू उघडा.
    • ChromeOS: Shift + F10 दाबा किंवा ChromeVox अ‍ॅक्टिव्ह असताना, Search + m दाबा.
    • Windows: Shift + F10 दाबा किंवा अ‍ॅप्लिकेशन की दाबा.
    • VoiceOver असलेले MacOS: VO + Shift + m दाबा.
  3. कृपया उत्तर द्या हा पर्याय निवडण्यासाठी, खाली शॉर्टकट की वापरा किंवा हव्या असलेल्या आयटमवर अ‍ॅरो करा, त्यानंतर एंटर दाबा.
प्रतिसाद शॉर्टकट
होय y
होय, मीटिंग रूममध्ये आहे r
होय, व्हर्च्युअली सामील होत आहे v
नाही एन
कदाचित एम

इव्हेंट डायलॉगमधून

  1. आधीपासून तयार केलेल्या इव्हेंटवर नेव्हिगेट करण्यासाठी, ॲरो की किंवा टॅब की वापरा. तुम्ही इव्हेंटवर पोहोचल्यावर, एंटर दाबा.
  2. “जात आहात का?” वर नेव्हिगेट करा.
  3. “होय, नाही किंवा कदाचित” या बटणांवर जाण्यासाठी, टॅब दाबा. कृपया उत्तर द्या हा पर्याय निवडण्यासाठी, एंटर दाबा.
  4. पर्यायी: इव्हेंटची पुनरावृत्ती होत असल्यास, तुमचा प्रतिसाद निवडा आणि त्यानंतर एंटर दाबा:
    • हा इव्हेंट
    • हा आणि नंतरचे सर्व इव्‍हेंट
    • सर्व इव्हेंट

इव्हेंट पेजवरून

  1. आधीपासून तयार केलेल्या इव्हेंटवर नेव्हिगेट करण्यासाठी, ॲरो की किंवा टॅब की वापरा.
  2. तुम्ही इव्हेंटवर पोहोचाल, तेव्हा इ की दाबा.
  3. तुम्ही “जात आहात का?” मेनूवर पोहोचेपर्यंत टॅब दाबा आणि “होय, नाही किंवा कदाचित” या बटणांवर जाण्यासाठी अप किंवा डाउन ॲरो की वापरा.
  4. कृपया उत्तर द्या हा पर्याय निवडण्यासाठी, एंटर निवडा.
  5. इव्हेंट सेव्ह करा.

ईमेलमधून

  1. तुमच्या ईमेलमध्ये, ईमेल आमंत्रण उघडा.
  2. तुम्ही “जात आहात का?” वर पोहोचेपर्यंत टॅब दाबा आणि “होय, नाही किंवा कदाचित” या बटणांवर जाण्यासाठी ॲरो की व टॅब की वापरा.
  3. कृपया उत्तर द्या हा पर्याय निवडण्यासाठी, एंटर दाबा.

कॅलेंडर इव्हेंटमधून व्हिडिओ मीटिंगमध्ये सामील होणे

  1. इव्हेंटवर नेव्हिगेट करा.
  2. मीटिंगमध्ये सामील होण्याचे दोन मार्ग आहेत:
    • पहिला पर्याय: कॉंटेक्स्ट मेनू वापरणे
      1. कॉंटेक्स्ट मेनू उघडण्यासाठी:
        • ChromeOS: Shift + F10 दाबा किंवा ChromeVox अ‍ॅक्टिव्ह असताना, Search + m दाबा.
        • Windows: Shift + F10 दाबा किंवा अ‍ॅप्लिकेशन की दाबा.
        • VoiceOver असलेले MacOS: VO + Shift + m दाबा.
      2. तुम्ही "मीटिंगमध्ये सामील व्हा" या बटणावर पोहोचेपर्यंत जे दाबा किंवा डाउन ॲरो की वापरा आणि त्यानंतर एंटर दाबा.
    • दुसरा पर्याय: इव्हेंट डायलॉग उघडणे
      1. इव्हेंट डायलॉग उघडण्यासाठी, एंटर दाबा.
      2. तुम्ही “आता सामील व्हा” या बटणावर पोहोचेपर्यंत टॅब दाबा आणि त्यानंतर एंटर दाबा.

तुमची उपलब्धता आणि ऑफिसमध्ये नाही असे स्टेटस सेट करणे

तुम्ही कार्यालयाबाहेर असल्याचे दाखवता, तेव्हा तुमचे कॅलेंडर असे इव्हेंट तयार करते जे तुम्ही कार्यालयाबाहेर असल्याच्या कालावधीदरम्यान सर्व मीटिंगना आपोआप नकार देतात.

  1. कार्यालयाबाहेरचा नवीन इव्हेंट तयार करण्यासाठी, Shift + c दाबा.
  2. तुम्ही “इव्हेंट” टॅबलिस्टवर पोहोचेपर्यंत टॅब दाबा. “कार्यालयाबाहेर” या टॅबवर जाण्यासाठी, ॲरो की वापरा.
  3. तुम्ही तारखेच्या पॅरामीटरवर पोहोचेपर्यंत टॅब दाबा. तुम्ही कार्यालयाबाहेर असाल ती वेळ किंवा तारखा सेट करा.
  4. इव्हेंट सेव्ह करा.

कॅलेंडर सेटिंग्ज उघडणे

सेटिंग्जवर जाण्यासाठी, एस की दाबा.

तुम्ही सेटिंग्जवर नेव्हिगेटदेखील करू शकता:

  1. स्लॅश की वापरून बॅनर च्या भागावर नेव्हिगेट करा.
  2. एस्केप दाबा.
  3. सेटिंग्ज मेनूवर पोहोचण्यासाठी दोनदा टॅब दाबा.
  4. सेटिंग्ज मेनू उघडण्यासाठी एंटर दाबा .
  5. सेटिंग्ज उघडण्यासाठी पुन्हा एंटर दाबा.

तुमचे कॅलेंडर शेअर करणे

  1. सेटिंग्ज उघडण्यासाठी एस की दाबा.
  2. तुम्ही "माझ्या कॅलेंडरसाठी सेटिंग्ज" यावर पोहोचेपर्यंत Shift + Tab दाबा.
  3. तुम्हाला शेअर करायचे असलेले कॅलेंडर शोधण्यासाठी डाउन अ‍ॅरो दाबा आणि त्यानंतर एंटर दाबा.
  4. तुम्ही “लोक जोडा” या बटणावर पोहोचेपर्यंत टॅब दाबा आणि त्यानंतर एंटर किंवा स्पेस दाबा.
  5. तुमचे कॅलेंडर एखाद्या व्यक्तीसोबत शेअर करण्यासाठी, त्यांचा ईमेल अ‍ॅड्रेस एंटर करा.
  6. तुम्ही “पाठवा” या बटणावर पोहोचेपर्यंत टॅब दाबा आणि त्यानंतर एंटर किंवा स्पेस दाबा.

तुमची वेगवेगळी कॅलेंडर व्यवस्थापित करणे

कॅलेंडर जोडणे

  1. सेटिंग्ज उघडण्यासाठी एस की दाबा.
  2. तुम्ही "साधारण" यावर पोहोचेपर्यंत Shift + Tab दाबा.
  3. कोलॅप्स करण्यासाठी लेफ्ट अ‍ॅरो, "Calendar जोडा" हे करण्यासाठी डाउन अ‍ॅरो, त्यानंतर एंटर दाबा.
  4. पर्याय निवडा आणि त्यानंतर एंटर दाबा:
    • कॅलेंडरचे सदस्यत्व घेणे: तुम्ही इतर कॅलेंडरचे सदस्यत्व घेऊ शकता आणि ती पाहू शकता.
    • नवीन कॅलेंडर तयार करणे: तुम्ही नवीन कॅलेंडर तयार करू शकता.
    • स्रोत ब्राउझ करणे: ही शेड्युल करता येणाऱ्या स्रोतांची सूची आहे. प्रत्येक स्रोत हा टॅब करण्यायोग्य स्थानांतर्गत नेस्ट केलेला असतो.
    • स्वारस्य असलेली कॅलेंडर ब्राउझ करणे: ही क्रीडा विषयक कॅलेंडर आणि सुट्ट्यांशी संबंधित कॅलेंडर यांसारख्या स्वारस्यावर आधारित कॅलेंडरची सूची आहे.
    • URL मधून: तुम्ही लिंकवरून नवीन कॅलेंडर जोडू शकता.

व्ह्यूमधून कॅलेंडर दाखवणे किंवा लपवणे

  1. प्लस की वापरून मुख्य ड्रॉवर भागावर नेव्हिगेट करा.
    • मुख्य ड्रॉवर भाग उपलब्ध नसल्यास, बॅनर च्या सुरुवातीच्या भागावर नेव्हिगेट करा आणि "मुख्य ड्रॉवर" बटण विस्तारित करण्यासाठी एंटर दाबा.
  2. तुम्ही “माझी कॅलेंडर” या बटणावर पोहोचेपर्यंत टॅब दाबा.
    • "माझी कॅलेंडर" हे बटण कोलॅप्स केलेले असल्यास, एंटर दाबा.
  3. पहिल्या कॅलेंडरवर जाण्यासाठी, टॅब दाबा.
  4. तुम्हाला हवे असलेले कॅलेंडर शोधण्यासाठी, डाउन अ‍ॅरो की दाबा.
  5. कॅलेंडर दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी, स्पेस दाबा.
  6. अतिरिक्त पर्यायांसाठी, टॅब दाबा.

इतर कॅलेंडर पाहणे

तुम्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये इतर कॅलेंडर जोडू शकता.

  1. प्लस की वापरून मुख्य ड्रॉवर भागावर नेव्हिगेट करा.
    • मुख्य ड्रॉवर भाग उपलब्ध नसल्यास, बॅनर च्या सुरुवातीच्या भागावर नेव्हिगेट करा आणि "मुख्य ड्रॉवर" बटण विस्तारित करण्यासाठी एंटर दाबा.
  2. तुम्ही “इतर कॅलेंडर” या बटणावर पोहोचेपर्यंत टॅब दाबा.
    • "इतर कॅलेंडर" हे बटण कोलॅप्स केलेले असल्यास, एंटर दाबा.
  3. "इतर कॅलेंडर जोडा" बटणावर पोहोचण्यासाठी टॅब दाबा आणि त्यानंतर एंटर दाबा.
  4. मेनू पर्याय निवडण्यासाठी, अप किंवा डाउन अ‍ॅरो की वापरा:
    • सदस्यत्व घ्या
    • ब्राउझ करा
    • तयार करा
  5. कॅलेंडर जोडण्यासाठी एंटर दाबा.
  6. पहिल्या कॅलेंडरवर जाण्यासाठी, टॅब दाबा.
  7. तुम्हाला हवे असलेले कॅलेंडर शोधण्यासाठी, डाउन अ‍ॅरो की दाबा.
  8. कॅलेंडर दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी, स्पेस दाबा.
  9. अतिरिक्त पर्यायांसाठी, टॅब दाबा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7161264814312587654
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false