इंपोर्ट करताना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करा

आपल्याला Google Calendar मधून माहिती इंपोर्ट करताना एरर येत असल्यास किंवा परिणाम चुकीचे दिसत असल्यास, समस्येचे निराकरण करण्यासाठी खालील टिपा वापरा.

टीप: आपण या ट्रबलशूटिंग पायऱ्या फक्त कॉंप्युटरवर वापरू शकता, फोन किंवा टॅबलेटवर नाही.

सर्वप्रथम, आपण एक्सपोर्ट किंवा इंपोर्ट करताना वापरलेल्या पायऱ्या तपासा

  1. Google Calendar मधून एक्सपोर्ट करतानाच्या पायऱ्या वाचा किंवा इतर कॅलेंडर अॅप्लिकेशनमधून एक्सपोर्ट करण्यासंबंधीची मदतीची माहिती तपासा.
  2. Google Calendar मध्ये इंपोर्ट करणेच्या पायऱ्या वाचा.

इंपोर्ट करताना येणारे एरर्स

आपल्याला यापैकी कोणतेही एरर्स दिसत असल्यास, तुमच्या कॉंप्युटर या ट्रबलशूटिंगच्या पायऱ्या वापरून पाहा.

"शून्य इव्‍हेंटवर प्रक्रिया झाली"

ZIP फाइल्स इंपोर्ट करा

  1. आपल्या कॉंप्युटरवर ZIP फाइल शोधा.
  2. त्या उघडण्यासाठी डबल क्लिक करा. आपल्याला आपल्या प्रत्येक कॅलेंडरसाठी ICAL फाइल्स (“ics” ने शेवट होणाऱ्या) दिसतील.
  3. आपल्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  4. उजव्या शीर्षस्थानी, सेटिंग्जवर क्लिक करा सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज.
  5. Calendars टॅब उघडा.
  6. कॅलेंडर इंपोर्ट करा वर क्लिक करा ("माझी कॅलेंडर" आणि "अन्य कॅलेंडर" विभागांमध्ये).
  7. फाइल निवडा वर क्लिक करा आणि आपल्या ICAL फाइल्सपैकी एक निवडा. “ics” ने शेवट होणारी प्रत्येक फाइल आपल्याला स्वतंत्रपणे इंपोर्ट करावी लागेल.
  8. आपल्याला इंपोर्ट केलेले कार्यक्रम जोडायचे असलेले कॅलेंडर निवडा. बाय डीफॉल्ट, कार्यक्रम आपल्या मुख्य कॅलेंडरमध्ये इंपोर्ट केले जातील.
  9. इंपोर्ट करा वर क्लिक करा.  “ics” ने शेवट होणाऱ्या प्रत्येक फाइलसाठी इंपोर्ट करण्याच्या पायऱ्या पुन्हा करा. 

CSV किंवा ICAL फाइल्स इंपोर्ट करा

आपण इंपोर्ट कराबटण एकापेक्षा अधिक वेळा क्लिक केल्यास, आपल्याला "शून्य कार्यक्रमांवर प्रक्रिया केली" एरर येऊ शकतो. पहिल्या क्लिक नंतर फाइल योग्यप्रकारे इंपोर्ट झाल्यामुळे, दुसऱ्या क्लिक नंतर प्रक्रिया करण्यासाठी नवीन कार्यक्रम नसल्यामुळे एरर मेसेज पॉप-अप होतो. आपले सर्व कार्यक्रम असल्याची खात्री करण्यासाठी आपले कॅलेंडर तपासा.

यामुळे आपल्या समस्येचे निराकरण न झाल्यास, आपल्या CSV फाइल किंवा ICAL फाइल स्वरूप तपासा.

" y पैकी x कार्यक्रमावर प्रक्रिया झाली'"

सामान्यत: जेव्हा Google Calendar आपल्या फाइलमधील काही कार्यक्रम वाचू शकत नाही तेव्हा हा एरर येतो.

Google Calendar फक्त Microsoft Outlook, Apple Calendar आणि Yahoo Calendar सारख्या मुख्य कॅलेंडर अॅप्लिकेशननी तयार केलेल्या फाइल्ससह काम करते. आपण यांपैकी एखाद्या अॅप्लिकेशनवरून आपली फाइल एक्सपोर्ट करत असल्यास, ती एक्सपोर्ट करून पुन्हा Google Calendar मध्ये इंपोर्ट करून पहा.

यामुळे आपल्या समस्येचे निराकरण न झाल्यास, आपल्या CSV फाइल किंवा ICAL फाइल चे स्वरूप तपासा.

"Google Calendar तात्पुरते अनुपलब्ध आहे"

फाइलचा आकार खूप मोठा आहे

हे तेव्हा होते जेव्हा फाइल खूप मोठी असते. Google Calendar एक मेगाबाइट (एक MB) किंवा त्याहून लहान फाइलसह काम करते.

आपली फाइल खूप मोठी असल्यास मूळ अॅप्लिकेशनमधून लहान तारीख श्रेणी एक्सपोर्ट करा. आपल्याला CSV किंवा ICAL कोडव्यक्तिचलितपणे संपादित करणे सोयीस्कर असल्यास फाइलचे लहान फायलींमध्ये विभाजन करू शकता.

इंपोर्ट करणे दोनदा सुरू झाले

आपण इंपोर्ट कराबटण एकापेक्षा अधिक वेळा क्लिक केल्यास, आपल्याला "शून्य कार्यक्रमांवर प्रक्रिया केली" एरर येऊ शकतो. पहिल्या क्लिक नंतर फाइल योग्यप्रकारे इंपोर्ट झाल्यामुळे, दुसऱ्या क्लिक नंतर प्रक्रिया करण्यासाठी नवीन कार्यक्रम नसल्यामुळे एरर मेसेज पॉप-अप होतो. आपले सर्व कार्यक्रम असल्याची खात्री करण्यासाठी आपले कॅलेंडर तपासा.

यामुळे आपल्या समस्येचे निराकरण न झाल्यास, आपल्या CSV फाइल किंवा ICAL फाइल चे स्वरूप तपासा.

"सर्व्हरचे कनेक्शन रीसेट केले होते"

सामान्यत: फाइल योग्यप्रकारे स्वरूपित केलेली नसल्यास असे होते. स्वरूपनाचे निराकरण करण्यासाठी, आपल्या CSV फाइल किंवा ICAL फाइल चे स्वरूपन तपासा.

इंपोर्ट केल्यानंतरचे एरर्स

आपल्याला यांपैकी कोणतेही एरर्स दिसत असल्यास, या ट्रबलशूटिंग पायऱ्या वापरून पाहण्यासाठी आपला कॉंप्युटर वापरा. 

कार्यक्रम चुकीच्या वेळी दिसत आहेत

सर्वप्रथम, आपला टाइमझोन तपासा

Google Calendar चा टाइमझोन मूळ कॅलेंडर अॅप्लिकेशनच्या टाइमझोनशी जुळत आहे का ते तपासा:

  1. आपल्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. उजव्या शीर्षस्थानी, सेटिंग्जवर क्लिक करा सेटिंग्ज आणि त्यानंतर सेटिंग्ज.
  3. "आपल्या सद्य टाइमझोन" विभागामध्ये, ड्रॉप-डाउन मेनूमधून आपला टाइमझोन निवडा.
  4. पृष्ठाच्या तळाशी स्क्रोल करा, त्यानंतर जतन करा वर क्लिक करा.

आपल्याला, आपण एक्सपोर्ट केलेल्या कॅलेंडर अॅप्लिकेशनमधील टाइमझोन सेटिंग्जही तपासणे आवश्यक असेल. आपल्याला मदत हवी असल्यास, अॅप्लिकेशनची मदत माहिती तपासा.

पुढे, पुन्हा इंपोर्ट करण्याचा प्रयत्न करा

आपण आपला टाइमझोन तपासल्यानंतर, आपली फाइल पुन्हा एक्सपोर्ट करा आणि Google Calendar मध्ये पुन्हा इंपोर्ट करा.

आवर्ती कार्यक्रम काम करत नाहीत

काही कॅलेंडर वारंवार होणारे कार्यक्रम एकल कार्यक्रमांचे संकलन म्हणून एक्सपोर्ट करतील. Calendar अन्य कॅलेंडर अॅप्लिकेशन जसे कार्यक्रम एक्सपोर्ट करतात त्याप्रमाणे कार्यक्रम वाचत असल्यामुळे, ते एक वेळचे कार्यक्रम म्हणून इंपोर्ट होतील.

स्वरुपन एरर

फाइलमध्ये स्वरूपन चुकीचे असल्यामुळे इंपोर्टमध्ये एरर असू शकतात. आपल्या फाइलचे स्वरूपन तपासण्याच्या टिपांसाठी आपला फाइल प्रकार निवडा:

CSV फाइल ("csv" ने शेवट होणारी फाइल)

आपली फाइल डिलिमिटर म्हणून स्वल्पविरामाचा वापर करते का हे तपासा

Google Calendar, भाग विभाजित करण्यासाठी अर्धविराम ( ; ) किंवा कोलन ( : ) वापरत असलेल्या फाइल्ससह काम करत नाही. सर्व भाग स्वल्पविरामाने वेगळे केले असल्याची खात्री करा.

आपली फाइल योग्य फिल्ड हेडरसाठी तपासा 

CSV फाइल्स इंपोर्ट करण्यासाठी योग्यप्रकारे स्वरूपित करणे आवश्यक आहे. CSV फाइल्स तयार करणे किंवा संपादित करणे याबद्दल अधिक जाणून घ्या. 

आपल्या फाइलचे आकारमान तपासा 

Google Calendar फक्त एक मेगाबाइट (एक MB) किंवा त्याहून लहान फाइल्ससह काम करते.

आपली फाइल खूप मोठी असल्यास मूळ अॅप्लिकेशनमधून लहान तारीख श्रेणी एक्सपोर्ट करा. आपल्याला CSV कोडव्यक्तिचलितपणे संपादित करणे सोयीस्कर असल्यास फाइलचे लहान फाइल्समध्ये विभाजन करा.

ICAL फाइल ("ics" ने शेवट होणारी फाइल)

आपल्या हेडर आणि फुटरचे स्वरूपन तपासा

ICAL फाइल्स इंपोर्ट करण्यासाठी योग्यप्रकारे स्वरूपित करणे आवश्यक आहे. ICAL फाइल्स तयार करणे किंवा संपादित करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.

आपले फाइल आकारमान तपासा

Google Calendar फक्त एक मेगाबाइट (एक MB) किंवा त्याहून लहान फाइल्ससह काम करते.

आपली फाइल खूप मोठी असल्यास मूळ अॅप्लिकेशनमधून लहान तारीख श्रेणी एक्सपोर्ट करा. आपल्याला ICAL कोडव्यक्तिचलितपणे संपादित करणे सोयीस्कर असल्यास फाइलचे लहान फाइल्समध्ये विभाजन करा.

मला अजूनही मदतीची गरज आहे

तुम्हाला तरीही समस्या असतील तर, इतर वापरकर्त्यांकडून टिपा आणि सूचना मिळवण्यासाठी Google Calendar मदत फोरमला भेट द्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13709565633789587726
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false