तुमचे कॅलेंडर काँप्युटर प्रोग्रामशी सिंक करणे

तुम्ही Outlook किंवा Apple Calendar सारख्या इतर काँप्युटर ॲप्लिकेशनसोबत तुमचे Google Calendar इव्हेंट सिंक करू शकता.

तुमचे कॅलेंडर सिंक करणे किंवा पाहणे

Google Calendar हे दुसर्‍या कॅलेंडर अ‍ॅप्लिकेशनमध्ये पाहण्याचे दोन मार्ग आहेत. तुम्ही तुमचे कॅलेंडर दुसर्‍या अ‍ॅप्लिकेशनमध्ये पाहण्यासाठी जोडू शकता आणि काही अ‍ॅप्लिकेशन तुम्हाला इव्हेंट संपादितदेखील करू देतील.

तुमचे Google Calendar सिंक करणे (पाहणे आणि संपादित करणे)

काही कॅलेंडर अ‍ॅप्लिकेशनसह, तुम्ही तुमचे Google खाते वापरून तुमचे कॅलेंडर सिंक करू शकता. याचाच अर्थ, तुम्ही Google Calendar वरून किंवा तुमच्या इतर अ‍ॅप्लिकेशनवरून इव्हेंट जोडू आणि संपादित करू शकता.

  1. तुमचे इतर कॅलेंडर अ‍ॅप्लिकेशन उघडा.
  2. दुसरे खाते जोडण्याचा पर्याय शोधा. तो "सेटिंग्ज" किंवा "प्राधान्ये" यांमध्ये असू शकतो.
  3. तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी, “Google वापरून साइन इन करा” वापरा.
  4. तुमचे Google खाते जोडण्यासाठी पायर्‍या फॉलो करा.
तुमचे कॅलेंडर मिळवणे (व्ह्यू ओन्ली)

तुमच्या कॅलेंडरमध्ये पूर्ण सिंकचा पर्याय नसल्यास किंवा तुम्हाला तुमच्या एखाद्या कॅलेंडरचे रीड-ओन्ली दृश्य हवे असल्यास, तुम्ही iCal ची लिंक वापरून तुमचे कॅलेंडर अ‍ॅप्लिकेशनशी सिंक करू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतरसेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडील पॅनलवर, “माझ्या कॅलेंडरची सेटिंग्ज” या अंतर्गत, तुम्हाला वापरायच्या असलेल्या कॅलेंडरच्या नावावर क्लिक करा.
  4. कॅलेंडर इंटिग्रेट करा वर क्लिक करा.
  5. "iCal फॉरमॅटमधील गुप्त अ‍ॅड्रेस" विभागामध्ये, लिंक कॉपी करा.
  6. तुमच्या इतर कॅलेंडर अ‍ॅप्लिकेशनच्या निर्देशानुसार लिंक पेस्ट करा.

महत्त्वाचे: तुमच्या कॅलेंडरचा गुप्त अ‍ॅड्रेस फक्त तुम्हाला माहीत असला पाहिजे. हा अ‍ॅड्रेस इतर लोकांसोबत शेअर करू नका. तुम्ही तुमच्या कॅलेंडरचा गुप्त ॲड्रेस चुकून शेअर केल्यास, नवीन गुप्त अ‍ॅड्रेस तयार करण्यासाठी, रीसेट करा वर क्लिक करा.

मला गुप्त अ‍ॅड्रेस सापडत नाही

तुम्ही ऑफिस, शाळा किंवा इतर संस्थेसाठी Google खाते वापरत असल्यास, तुमच्या अ‍ॅडमिनने तुमच्या कॅलेंडरची शेअरिंग सेटिंग्ज बदलली असू शकतात. तुम्हाला गुप्त अ‍ॅड्रेस सापडत नसल्यास, तुमच्या अ‍ॅडमिनची मदत घ्या.

Calendar अ‍ॅड्रेसबद्दल जाणून घ्या

गुप्त ॲड्रेस

गुप्त अ‍ॅड्रेस तुम्हाला Outlook किंवा Apple Calendar यांसारख्या दुसर्‍या अ‍ॅप्लिकेशनमध्ये तुमचे कॅलेंडर पाहू देतो. तुम्हाला तुमचे कॅलेंडर दुसर्‍या एखाद्या व्यक्तीला पाहू द्यायचे असल्यास, तुम्ही तुमचे कॅलेंडर शेअर करणे हे करू शकता.

महत्त्वाचे: तुम्ही तुमचा गुप्त अ‍ॅड्रेस इतर लोकांना देऊ नये. तुम्ही तुमच्या कॅलेंडरचा गुप्त ॲड्रेस चुकून शेअर केल्यास, जुना अ‍ॅड्रेस रद्द करून नवीन अ‍ॅड्रेस तयार करण्यासाठी, रीसेट करा वर क्लिक करा.

सार्वजनिक अ‍ॅड्रेस

सार्वजनिक अ‍ॅड्रेस सार्वजनिकपणे शेअर केला जाऊ शकतो, पण गुप्त अ‍ॅड्रेस कोणाशीही शेअर करू नये. सार्वजनिक अ‍ॅड्रेसबद्दल अधिक जाणून घ्या.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18404569726927906279
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false