एखाद्या व्यक्तीच्या Google Calendar चे सदस्य होणे

दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने तुमच्यासह त्यांचे कॅलेंडर शेअर केलेले असल्यास, तुम्ही ते पाहू शकता. त्यांनी त्यांचे कॅलेंडर तुमच्यासह अद्याप शेअर केलेले नसल्यास, तुम्ही अ‍ॅक्सेसची विनंती करू शकता.

महत्त्वाचे:

  • तुम्ही ४०० पेक्षा जास्त कॅलेंडरचे सदस्यत्व घेतल्यास, कॅलेंडरच्या परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो.
  • तुम्ही कॉंप्युटर किंवा मोबाइल ब्राउझरवर Google Calendar वापरता, फक्त तेव्हा तुम्हाला ज्या कॅलेंडरचे सदस्यत्व घ्यायचे आहे ते शोधू शकता.

कॅलेंडरचे सदस्य होण्यासाठी ईमेल अ‍ॅड्रेस वापरणे

पायरी १: कॅलेंडरचे सदस्यत्व घेण्याची विनंती करणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Calendar उघडा.
  2. डावीकडे, “इतर कॅलेंडर” च्या बाजूला, जोडा Add other calendars आणि त्यानंतर कॅलेंडरचे सदस्य व्हा वर क्लिक करा. कॅलेंडर तुमच्यासोबत शेअर केले असल्यास, तुम्हाला ईमेल मिळेल.
  3. “कॅलेंडर जोडा” बॉक्समध्ये, व्यक्तीचा ईमेल ॲड्रेस एंटर करा किंवा सूचीमधून एक निवडा.
  4. एंटर दाबा.
  5. त्यांचे कॅलेंडर शेअर केलेले आहे किंवा नाही यानुसार पुढीलपैकी एक गोष्ट घडते:
    • कॅलेंडर तुमच्यासोबत शेअर केले नसल्यास, आम्ही तुम्हाला अ‍ॅक्सेसची विनंती करण्यासाठी सूचित करू.
    • कॅलेंडर तुमच्यासोबत आधीच शेअर केले असल्यास, डावीकडे "इतर कॅलेंडर" अंतर्गत त्यांचे कॅलेंडर जोडले जाईल.
    • दुसऱ्या व्यक्तीकडे Google Calendar नसल्यास, तिला Google Calendar वापरण्यास आमंत्रित करण्यासाठी आम्ही तुम्हाला सूचित करू.
तुमच्या मालकीच्या नसलेल्या कॅलेंडरचे सदस्य कसे व्हावे ते पहा

पायरी २: (पर्यायी) दुसऱ्या व्यक्तीकडून मंजुरी मिळवणे

तुम्ही विनंती केलेले कॅलेंडर तुमच्यासोबत शेअर केले नसल्यास, कॅलेंडरच्या मालकाला अ‍ॅक्सेसची विनंती करणारा ईमेल मिळतो.

तुमची विनंती स्वीकारण्यासाठी, दुसऱ्या व्यक्तीने पुढील गोष्टी कराव्यात:

  1. तुम्ही पाठवलेला अ‍ॅक्सेसची विनंती करणारा ईमेल कॉंप्युटरवर उघडणे.
  2. ईमेलमधील लिंकवर क्लिक करणे.
  3. उघडणाऱ्या सेटिंग्ज पेजवर, विनंती पाठवणारी व्‍यक्ती निवडली असल्याची खात्री करणे आणि परवानगी सेटिंग निवडणे.
  4. पाठवा वर क्लिक करणे.

टीप: दुसऱ्या व्यक्तीने तुमची विनंती स्वीकारल्यानंतर तुम्हाला “हे कॅलेंडर जोडा” ची लिंक असलेला ईमेल मिळतो. तुम्ही कॅलेंडर जोडल्यानंतर ते डावीकडे “इतर कॅलेंडर” अंतर्गत दिसेल. कॅलेंडर दिसत नसल्यास, पेज रिफ्रेश करा.

सार्वजनिक कॅलेंडर जोडण्यासाठी लिंक वापरा

महत्त्वाचे: दुसऱ्या व्यक्तीचे कॅलेंडर सार्वजनिक असल्यास, तुम्ही फक्त लिंक असलेले कॅलेंडर जोडू शकता. सार्वजनिक कॅलेंडरबद्दल अधिक जाणून घ्या.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Calendar उघडा.
  2. डावीकडे, "इतर कॅलेंडर" च्या बाजूला, जोडा Add other calendars आणि त्यानंतर URL मधून वर क्लिक करा.
  3. कॅलेंडरचा अ‍ॅड्रेस एंटर करा.
  4. कॅलेंडर जोडा वर क्लिक करा. कॅलेंडर हे डावीकडे "इतर कॅलेंडर" च्या अंतर्गत दिसेल.

टीप: तुमच्या Google Calendar मध्ये बदल दिसण्यासाठी कमाल २४ तास लागू शकतात.

इतर एखाद्या व्यक्तीचे कॅलेंडर लपवणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. डावीकडे, “इतर कॅलेंडर” अंतर्गत, तुम्हाला लपवायच्या असलेल्या कॅलेंडरच्या चौकटीतली खूण काढून टाका.

टीप: तुम्हाला एखादे कॅलेंडर तुमच्या सूचीमधून कायमचे काढून टाकायचे नसल्यास, तुम्ही त्याचे सदस्यत्व रद्द करणे हेदेखील करू शकता. कॅलेंडरचा अ‍ॅक्सेस रिस्टोअर करण्यासाठी, पुन्हा कॅलेंडरचे सदस्यत्व घ्या.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3380991746778280649
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false