Google Calendar ॲपमधील खात्यांदरम्यान स्विच करणे

तुम्ही Google Calendar ॲपमध्ये वेगळ्या खाती मधील इव्हेंट पाहू शकता आणि ते व्यवस्थापित करू शकता.

तुम्ही सुरुवात करण्याआधी

  • तुमचे फोन स्क्रीन ओरिएंटेशन पोर्ट्रेट मोडवर सेट करा, जेणेकरून तुमचा प्रोफाइल फोटो आणि Google खाते हे Google Calendar ॲपमध्ये दिसेल.
  • मेनूमध्ये मेनू, तुमचे सध्याचे खाते सर्वात वरती दिसते. इतर सुरू केलेली खाती तुमच्या सध्याच्या खात्याच्या खाली दिसतात.
  • टीप: तुम्ही सुरू केलेल्या खात्यांसाठी सर्व कॅलेंडर दाखवू किंवा लपवू शकता.
    1. मेनू मेनू वर टॅप करा.
    2. तुम्हाला ग्रिडमध्ये दिसायला हवी अशी कॅलेंडर निवडा.

सर्व वैशिष्ट्ये अ‍ॅक्सेस करण्यासाठी तुमचे Google खाते वापरणे

तुम्ही स्थानिक किंवा तृतीय पक्ष खाते वापरत असल्यास, Google Calendar ची काही वैशिष्ट्ये उपलब्ध नसू शकतात. तुम्ही तुमचे Google खाते वापरता, तेव्हा तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • इव्हेंटमध्ये अतिथी जोडणे.
  • इव्हेंटची आमंत्रणे मिळवणे.
  • इव्हेंट आणि कॅलेंडरसाठी रंग सेट करणे.
  • तुमच्या इव्हेंटमध्ये अटॅचमेंट किंवा व्हिडिओ कॉंफरन्सिंग जोडणे.
  • सर्व डिव्हाइसवर सिंक करणे.
  • टास्क तयार करणे. Google Tasks कसे वापरायचे ते जाणून घ्‍या.

Google चे नसलेले खाते म्हणजे काय?

Google चे नसलेले खाते पुढीलपैकी एक असू शकते:

  • स्थानिक खाते म्हणजे असे कॅलेंडर जे फोनवर स्टोअर केलेले आहे किंवा दुसऱ्या अ‍ॅपने तयार केलेले आहे.
    • खाते सुरू केलेले असल्यास, तुमच्या स्थानिक खात्याशी संबंधित कॅलेंडरवरील इव्‍हेंट दृश्यमान असतात. Google ची नसलेली खाती कशी सुरू करावीत ते जाणून घ्या.
    • तुम्ही इव्हेंट तयार करणे हे करता, तेव्हा तुम्ही स्थानिक खात्याशी संबंधित कॅलेंडर निवडू शकता.
  • तृतीय पक्ष खाते म्हणजे असे खाते जे Google द्वारे व्यवस्थापित केले जात नसून दुसऱ्या कॅलेंडर अ‍ॅपद्वारे व्यवस्थापित केले जाते.
    • तुम्ही सुरू केलेले तृतीय पक्ष खाते वापरण्यास प्राधान्य दिल्यास, तुम्ही तुमच्या प्रोफाइल फोटोवरून त्यावर स्विच करू शकता.
    • तुम्ही इव्हेंट तयार करता, तेव्हा तुम्ही तृतीय पक्ष खात्याशी संबंधित कॅलेंडरदेखील निवडू शकता.

खात्यांदरम्यान स्विच करणे

महत्त्वाचे:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Calendar ॲप Calendar उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा Google खाते वर टॅप करा.
  3. विंडोमधून, पर्याय निवडा:
    • वेगळे खाते निवडा: अ‍ॅपवर तुमची एकाहून अधिक खाती असल्यास, तुम्ही वेगळे सुरू केलेले खाते निवडू शकता.
    • तुमचे Google खाते व्यवस्थापित करा: तुमचे Google खाते कस्टमाइझ करण्यासाठी हा पर्याय निवडा. तुमचे सध्याचे खाते हे Google खाते असेल तरच हा पर्याय उपलब्ध आहे.
    • कार्य प्रोफाइलवर स्विच करा किंवा वैयक्तिक प्रोफाइलवर स्विच करा: तुम्ही तुमच्या फोनवर कार्य मोड वापरत असाल आणि तुम्ही व तुमच्या ऑफिस अ‍ॅडमिनिस्ट्रेटरने हे वैशिष्ट्य सुरू केले असेल, तरच ते काम करते.
      • महत्त्वाचे: तुमच्या कार्य प्रोफाइलवर असलेली कोणतीही वैयक्तिक कॅलेंडर व्यवस्थापित करण्यासाठी, तुमच्या वैयक्तिक प्रोफाइलशी संबंधित Google Calendar अ‍ॅपवर स्विच करा.
    • या डिव्हाइसवरील खाती व्यवस्थापित करा: हा पर्याय तुम्हाला तुमच्या डिव्हाइसच्या सेटिंग्ज वर घेऊन जातो, जेथे तुम्ही खाती जोडू शकता, काढून टाकू शकता किंवा अपडेट करू शकता.
    • दुसरे खाते जोडा: तुम्ही Google Calendar ॲपमध्ये दुसरे खाते जोडू शकता. तुम्ही नवीन Google खाते जोडता, तेव्हा ते तुमचे सध्याचे खाते बनते.
  4. तुमचा प्रोफाइल फोटो किंवा Google खाते हे तुम्ही ज्या खात्यावर स्विच केले आहे ते खाते दाखवते.

टिपा:

  • तुम्ही वेगळ्या खात्यावर स्विच करण्याआधी, कोणतेही बदल किंवा अपडेट सेव्ह करा.
  • एखादे खाते विशिष्ट कृतीसाठी अपात्र असल्यास, Google Calendar हे तुम्हाला सूचित करते आणि पात्र खात्यावर आपोआप स्विच करते.

Google चे नसलेले खाते सुरू करणे

महत्त्वाचे: Calendar ॲपमध्ये Google च्या नसलेल्या खात्यामधील इव्हेंट दाखवण्यासाठी, सेटिंग्जमध्ये खाते सुरू करा.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Calendar ॲप Calendar उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू आणि त्यानंतर सेटिंग्ज यावर टॅप करा.
  3. खाती व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  4. Google चे नसलेले खाते सुरू करा.

खाते स्विच करण्यासंबंधित सूचना

Google Calendar वर तुम्ही Google चे नसलेले खाते वापरून इव्हेंट तयार करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या निवडलेल्या खात्याच्या मर्यादांबद्दल चेतावणी मिळू शकते. रंग, टास्क आणि सिंक करणे यांसारख्या Google Calendar च्या सामान्य वैशिष्ट्यांना सपोर्ट न करणारे खाते तुम्ही वापरता, तेव्हा ही सूचना दिसू शकते.

Google Calendar ची उपलब्ध वैशिष्ट्ये अ‍ॅक्सेस करण्यासाठी: सूचनेमधून, तुमच्या Google खाते वर स्विच करण्यासाठी, खाते स्विच करा वर टॅप करा.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4631594904850495857
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false