कॅलेंडरमधील एंट्रीचा माग ठेवण्यासाठी रंगाची लेबल वापरणे

तुमचा वेळ कसा घालवलात याचे पुनरावलोकन करण्यासाठी, तुम्ही कॅलेंडरमधील एंट्रीना रंगाची लेबल असाइन करू शकता आणि वेळेसंबंधित इनसाइट मध्ये त्यांचा माग ठेवू शकता. वेळेसंबंधित इनसाइट बद्दल अधिक जाणून घ्या.

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या इव्हेंटला असाइन केलेली रंगाची लेबल फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या कॅलेंडरमध्ये "बदल करा आणि शेअरिंग व्यवस्थापित करा" आणि "इव्हेंटमध्ये बदल करा" अ‍ॅक्सेस असलेल्या कोणालाही दिसतील.

वेळेसंबंधित इनसाइट मध्ये रंगाची लेबल पाहण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे

टीप: तुमच्याकडे वेळेसंबंधित इनसाइट हा पर्याय नसल्यास, तुमच्या ॲडमिनने तुमच्या संस्थेसाठी तो बंद केलेला असू शकतो. “माझा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर कोण आहे? याबद्दल अधिक जाणून घ्या

कलरचे लेबल तयार करून असाइन करा

वेळेसंबंधित इनसाइट पॅनलमधून:

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Calendar उघडा.
  2. डावीकडे, आणखी इनसाइट वर क्लिक करा.
    • टीप: तुम्हाला मेनू मेनू उघडावा लागू शकतो.
  3. उजवीकडे, “वेळेचे ब्रेकडाउन” च्या शेजारी, संपादित करा Edit वर क्लिक करा.
    • टीप: तुम्ही वेळेच्या ब्रेकडाउन खाली रंगाची लेबल जोडू किंवा संपादितदेखील करू शकता.
  4. “तुमची रंगाची लेबल” पॉपअपमध्ये, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
    • रंगाचे नवीन लेबल तयार करणे: तळाशी डावीकडे, रंगाचे नवीन लेबल जोडा वर क्लिक करा.
    • सध्या अस्तित्वात असलेल्या मीटिंगमध्ये लेबल असाइन करणे: “लेबल जोडा” फील्डमध्ये, तुमच्या लेबलचे नाव एंटर करा.
    • ठरावीक इव्‍हेंट वगळणे: तुमच्या प्राधान्य दिलेल्या लेबलच्या शेजारी, वेळेसंबंधित इनसाइट मध्ये लपवा वर क्लिक करा.
  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

विशिष्ट इव्‍हेंटच्या एंट्रीसाठी:

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Google Calendar उघडा.
  2. इव्‍हेंटचे आमंत्रण उघडा.
  3. संपादित करा Edit वर क्लिक करा.
  4. कॅलेंडरच्या नावाच्या शेजारी, सध्याचा कॅलेंडरचा रंग निवडा.
  5. रंगाचे नवीन लेबल तयार करा किंवा सध्या अस्तित्वात असलेले लेबल जोडा.
  6. सेव्ह करा वर क्लिक करा.

टीप: रंगाचे लेबल तयार करण्यासाठी किंवा असाइन करण्यासाठी, तुम्ही इव्‍हेंटच्या आमंत्रणावर राइट-क्लिकदेखील करू शकता.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4027576988600011624
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false