तुमच्या अपॉइंटमेंटची उपलब्धता कस्टमाइझ करणे

तुमची उपलब्धता पाहणे लोकांसाठी सोपे व्हावे याकरिता तुम्ही तुमचे अपॉइंटमेंट शेड्यूल कस्टमाइझ करू शकता.

अपॉइंटमेंट शेड्युल सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या तारखा सेट करा

महत्त्वाचे: तुमच्या आवर्ती अपॉइंटमेंट शेड्युलसाठी तुम्ही फक्त सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या तारखा सेट करू शकता. आवर्ती अपॉइंटमेंट शेड्युल कसे सेट करायचे ते जाणून घ्या.
तुमचे अपॉइंटमेंट शेड्युल सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या तुम्हाला हव्या असलेल्या तारखा तुम्ही निवडू शकता.
  1. काँप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सध्याचे अपॉइंटमेंट शेड्यूल आणि त्यानंतर संपादित करा Edit वर क्लिक करा.
  3. शेड्यूल करण्याचा कालावधी डाउन अ‍ॅरो आणि त्यानंतर सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या तारखा वर क्लिक करा.
  4. तुमचे अपॉइंटमेंट शेड्युल सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या तुम्हाला हव्या असलेल्या तारखा निवडा.
  5. पूर्ण झाले वर क्लिक करा.
  6. अपडेट केलेले शेड्यूल सेव्ह करण्यासाठी, पुढील आणि त्यानंतर सेव्ह करा वर क्लिक करा.

तारखेची उपलब्धता बदला

ज्या दिवशी तुम्ही नेहमीपेक्षा जास्त किंवा कमी वेळ उपलब्ध असाल अशा विशिष्ट तारखा तुम्ही निवडू शकता.
  1. काँप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सध्याचे अपॉइंटमेंट शेड्यूल आणि त्यानंतर संपादित करा Edit वर क्लिक करा.
  3. “अ‍ॅडजस्ट केलेली उपलब्धता” च्या अंतर्गत, तारखेची उपलब्धता बदला वर क्लिक करा.
  4. तुम्हाला अ‍ॅडजस्ट करायची असलेली तारीख निवडा.
  5. तुम्ही उपलब्ध असलेल्या वेळा दाखवण्यासाठी, वेळेची रेंज बदला.
    • तुम्ही त्या तारखेला अजिबात उपलब्ध नसल्यास, पूर्ण दिवस उपलब्ध नाही वर क्लिक करा.
    • एकाहून अधिक उपलब्ध असण्याच्या वेळेची रेंज जोडण्यासाठी, वेळ जोडा वर क्लिक करा.
    • तारखेचे एक्सेप्शन काढून टाकण्यासाठी, तारीख आणि वेळेच्या बाजूला, काढून टाका वर क्लिक करा.
  6. अपडेट केलेले शेड्यूल सेव्ह करण्यासाठी, पुढील आणि त्यानंतर सेव्ह करा वर क्लिक करा.
टीप: तुम्ही सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या तारखा असलेल्या आवर्ती शेड्युलच्या बाहेरील तारखांची उपलब्धता अ‍ॅडजस्ट करू शकता.

अपॉइंटमेंटदरम्यान बफर कालावधी जोडा

एका पाठोपाठ एक अपॉइंटमेंट टाळण्यासाठी, तुम्ही बफर कालावधी सुरू आणि अ‍ॅडजस्ट करू शकता.
  1. काँप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सध्याचे अपॉइंटमेंट शेड्यूल आणि त्यानंतर संपादित करा Edit वर क्लिक करा.
  3. बुक केलेल्या अपॉइंटमेंटची सेटिंग्ज डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
  4. “बफर कालावधी” खाली, बॉक्समध्ये खूण करा.
  5. तुम्हाला अपॉइंटमेंटदरम्यान किती बफर कालावधी शेड्युल करायचा आहे ते निवडा.
  6. अपडेट केलेले शेड्यूल सेव्ह करण्यासाठी, पुढील आणि त्यानंतर सेव्ह करा वर क्लिक करा.

तुमची अपॉइंटमेंटची कमाल संख्या सेट करा

तुमच्या दर दिवशीच्या शेड्युलवर तुम्ही अपॉइंटमेंटची कमाल संख्या निवडू शकता.
  1. काँप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सध्याचे अपॉइंटमेंट शेड्यूल आणि त्यानंतर संपादित करा Edit वर क्लिक करा.
  3. बुक केलेल्या अपॉइंटमेंटची सेटिंग्ज डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
  4. “दर दिवशी कमाल बुकींग” खाली, बॉक्समध्ये खूण करा.
  5. तुम्हाला दर दिवशी तुमच्या शेड्युलवर हव्या असलेल्या अपॉइंटमेंटची कमाल संख्या एंटर करा.
  6. अपडेट केलेले शेड्युल सेव्ह करण्यासाठी, पुढील आणि त्यानंतर सेव्ह करा वर क्लिक करा.

सर्व कॅलेंडरमध्ये तुमची उपलब्धता तपासा

दोनदा बुकिंग टाळण्यासाठी, Calendar एकाहून अधिक कॅलेंडरवर तुमची उपलब्धता तपासू शकते (त्यासह तुमचे प्राथमिक कॅलेंडर आणि तुमच्या मालकीची, व्यवस्थापित केलेली किंवा सदस्यत्व घेतलेली कोणतीही कॅलेंडर). तुम्ही अपॉइंटमेंट शेड्यूल सेट करता किंवा बदलता, तेव्हा विवादांसाठी कोणत्या कॅलेंडरचे पुनरावलोकन केले जावे हे तुम्ही निवडू शकता.

महत्त्वाचे:

  • दुय्यम कॅलेंडरवरून उपलब्धता तपासण्यासाठी, तुमच्याकडे पात्र Google Workspace किंवा Google One प्लॅन असणे आवश्यक आहे. अपॉइंटमेंट शेड्यूलसाठीच्या प्रीमियम वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • "व्ह्यू स्विचर" या मेनूच्या अंतर्गत, तुम्ही अपॉइंटमेंट शेड्यूल लपवू शकता. अपॉइंटमेंट शेड्यूल लपवलेले असल्यास आणि तुम्ही नवीन शेड्यूल तयार केल्यास किंवा सद्य अपॉइंटमेंट शेड्यूलमध्ये वेळ जोडल्यास, लपवलेली अपॉइंटमेंट शेड्यूल पुन्हा दिसतील. बुक केलेली अपॉइंटमेंट Calendar ग्रिडवर कधीच लपवलेली नसतात.
  • शेअर केलेल्या कॅलेंडरवर शेड्यूल तयार केले जाते, तेव्हा विवादांसंबंधित पुनरावलोकन करण्यासाठी इतर कॅलेंडर निवडणे शक्य असू शकते.

तुम्ही दुय्यम कॅलेंडरवरून तुमची उपलब्धता तपासू शकता, जसे की:

टिपा:

  • तुमच्या प्राथमिक कॅलेंडरमधील इव्‍हेंटसाठी तुमचे कृपया उत्तर द्या हे “होय” किंवा “कदाचित” केले असल्यास किंवा निवडलेल्या दुय्यम कॅलेंडरवर कोणताही व्यस्त इव्‍हेंट असल्यास, तुमच्या बुकिंग पेजवरील ती वेळ मोकळी दिसणार नाही.
  • तुमच्या बुकिंग पेजवर, तुम्ही उपलब्धतेसाठी कॅलेंडर तपासा बंद केल्यास, सर्व वेळा मोकळ्या दिसतात. तुम्ही अपॉइंटमेंट नसलेला इव्हेंट स्वीकारला असला, तरीही हे लागू होते.
    • महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य बंद केले असले तरीही बुकिंग पेजवरील प्रत्येक अपॉइंटमेंट स्लॉट फक्त एकदाच बुक केला जाऊ शकतो.

तुमची दुय्यम कॅलेंडर निवडण्यासाठी:

  1. कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. अस्तित्वात असलेले अपॉइंटमेंट शेड्युल आणि त्यानंतर संपादित करा Edit वर क्लिक करा.
  3. “Calendars” च्या बाजूला, डाउन अ‍ॅरोडाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
  4. विवादांसाठी तुम्हाला कोणती कॅलेंडर तपासायची आहेत ते निवडा.
    • तुमचे कॅलेंडर तुमच्या निवडलेल्या कॅलेंडरचे पूर्वावलोकन दाखवते, जेणेकरून तुम्ही तुमच्या अपॉइंटमेंट शेड्यूलवर होणारा परिणाम तपासू शकता.
    • तुम्हाला शेड्यूलसंबंधित विवाद तपासायचे नसल्यास, उपलब्धतेसाठी कॅलेंडर तपासा बंद करा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16475638484332313264
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false